Tuesday, June 12, 2012

स्वामींच्या गोष्टींपासून शिकवण-3


(११) सुरदासाची इच्छापूर्ती: ईश्वर प्राप्तीची दांडगी तळमळ असुन जो सतत ईश्वर दर्शनासाठी खटत असतो त्याला देव स्वताहुन दर्शन देतो.
(१२)धनाचे झाले कोळसे: ईश्वराशी किंवा सद्गुरुशी ठकपणे  वागणारा व्यक्ती दुखाला प्राप्त होतो.
(१३) गोष्ट दुसऱ्या लग्नाची: प्रारब्द्ध सहसा चुकत नाही.
(१४) चोरापासून सावध राहा: चांगुलपणा करावा पण माणसाची पारख करूनच.
(१५) आवाळू पासून सुटका: देह-भोग भोगून किंवा ईश्वरीय कृपेनीच सुटतात.

स्वामींच्या गोष्टींपासून शिकवण-2


(६) गोसाव्याची मनोकामना: एखाद्या सत्कार्य साठी जर मनपासून तळमळ असली तर ईश्वरीय शक्ती खुद्द येऊन ते साध्य करण्या साठी मदत करते
(७)रोगापासून भक्ती: पूर्व-पुण्याई  असलेल्या साशंक भक्ताचेही सद्गुरू कल्याण करतात.
(८)स्वामींचा हनुमान: जग जाळून सद्गुरूची अनन्य भक्ती करणारा शिष्य गुरूस पुत्रा-समान असतो.
(९) भूत-बाधेपासूनसुटका: वाम-शक्त्यांपासून पासून सद्गुरू रक्षण करतात.
(१०)राघव कीर्तनकार होतो, सुरदासाची इच्छापूर्ती : सद्गुरू-कृपा काही विशेष परिस्थितीत नैसर्गिक नियमांवर पण मात करून मनुष्याचे कल्याण करते.

स्वामींच्या गोष्टींपासून शिकवण-1



स्वामींचा साक्षात्कार एखाद्यालाच होतो पण स्वामींची शिकवण सर्वासाठी असते. 
स्वामींच्या शिकवणी, मनुष्याचे दोन्ही लोकं सुधारवयास साह्य करतात आणी मनुष्याचे जीवन सोपे करतात.


कहाणी: शिकवण


(१) स्वामींचा हिरा: अनेक रूप असले तरी ईश्वर एक आहे.
(२)वामन बुवांची गोष्ट: सद्गुरूच्या ठाई ईश्वर असतोच.
(३) मला ब्रह्म दाखवा: पात्रता नसताना ईश्वराचे सगुण दर्शन होत नाही त्या साठी आराधना करून पात्रता वाढवायचाच प्रयत्नच मनुष्याच्या हाती असतो.
(४) स्वामी नखांचे ताईत करून विकणारा न्हावी: परमार्थाचा विक्रय करू नये.
(५)परमार्थात स्त्री-पुरुष भेद नसतो : रूप,लावण्य किंवा धन हे काही चिरकाल पर्यंत टिकत नाही, जे टिकते ते आध्यात्मिक धन

Saturday, March 3, 2012

(११७) सर्वथा तूची त्राता




संताजी नावाचा एक भक्त स्वामींना २०० मोहरा द्यायला येतो. 
स्वामी म्हणतात: -" ठेव आपल्या कडे, आम्ही म्हणू तेव्हा देशील."
गणेश नावाचा एक कर्तव्यनिष्ठ आणी स्वामीभक्त गृहस्थ होता. तो एका सावकाराच्या  खाजगी सेवेत होता.
एकदा सावकार त्याला २०० मोहरा देऊन त्याला शेजारच्या गावात आपल्या भावाला देऊन व्यापार आणायला सांगतो.
गावाला जाताना गणेश एका मंदिरात विसाव्याला बसतो. तिथे त्याचा डोळा लागतो. डोळे उघडून पाहतो तर काय मोहरांची पोटली नव्हती.
तो कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे पाहत फिरतो. रक्कम फार मोठी होती. जन्म भर राबून पण ती फेडणे त्याला शक्य नव्हते.
त्याला वाटले की आता सावकार आपल्याला चाबकांनी फोडणार.
तितक्यात पुजारी बुवा येऊन त्याला म्हणतात: " अरे शुंभा सारखा काय उभा आहे! मंदिराच्या पायथ्याशी जा आणी तिथे रस्ताभर पाहत जा .
कुठे तरी पडली असेल."
माणूस संकटात  असतो तेव्हा तो पटकन कोणीही काही सांगितले तर  ऐकतो. 
गणेश आपली राहिली-सुरलेली शक्ती एकत्र करून मंदिराच्या पायथ्याशी पहात-पहात जातो.तितक्यात त्याच्या समोर एक पोटली येऊन पडते.
त्या पोटळीत नेमक्या २०० मोहरा असतात. गणेशचे संकट टळते.
सावकाराचे काम करून तो परततो.
तिकडे संताजी स्वामींकडे येऊन म्हणतो:-"तुमच्या दृष्टांता प्रमाणे मी निर्दिष्ट जागे वर मोहरांची पोटली भिरकावली. "
"मी फक्त या गोष्टीची खात्री करायला आलो आहे की माझी सेवा तुमच्या पर्यंत पोहचली की नाही?"
स्वामी म्हणतात: " हो तुझी सेवा आमच्या पर्यंत पोहचली." 
तितक्यात गणेश येऊन आपल्या बरोबर घडलेली विलक्षण घटना सांगतो.
सर्वंना स्वामींनी गणेशची कशी मदत केली हे लक्ष्यात येते. गणेश ला पण खुण पटते की स्वामीनीच पुजाऱ्याचे रूप घेऊन आपले मार्गदर्शन केले.
नंतर स्वामींची आज्ञा  घेऊन गणेश, बायको आणी मुलाला घेऊन ज्योतिबा आणी महालक्ष्मीच्या दर्शनाला जातो.
स्वामी त्याला म्हणतात  कि रस्त्यात जो जे सांगेल तशे कर.
ज्योतिबाच्या मंदिराच्या खाली एक माणूस गणेशला हळद लाऊन सांगतो:-"ज्योतीबा आणो महालक्ष्मी च्या समोर एक-एक कवड ठेव."
"आणी ज्योतिबा समोर एक नारळ फोड."
गणेश ज्योतिबा समोर कवड ठेऊन नारळ फोडायला जातो. तिथला पुजारी त्याला काळभैरवाच्या समोर नारळ फोड अशे सांगतो.
गणेश तसच करतो.
आता महालक्ष्मी कडे जायची तैयारी असते. तिथे जायच्या आधी ते विसावा घेतात.
बाळ रडतो म्हणून गणेश त्याला हवेत भिरकावतो आणी हवेतच अलगद झेलून घेतो. अस तो परत-परत करतो.
पण दुर्लक्ष्य होऊन बाळ जमिनीवर पडतो. पण आश्रयच म्हणा बाळाच्या केसाला पण धक्का लागत नाही.
इतक्या उंचावरून पडून सुद्धा बाळाला काहीपण इजा होत नाही. बाळ रडत सुद्धा नाही.
ही सर्व स्वामींचीच कृपा असं समझुन ते महालक्ष्मी चे दर्शन करून स्वामींकडे येतात.
गणेश म्हणतो: "स्वामी, इतक्या वरून बाळ पडून पण काही इजा झाली नाही."
स्वामी म्हणतत: " अरे तू काळ भैरवा समोर नारळ फोडला ना ! म्हणून तुझ्या बाळाला पडून पण इजा झाली नाही."
चाणाक्ष्य बाळप्पांना लगेचच समझत की आपण डोक्याला नारळ म्हणतो.
स्वामींनी विविध रूप धरून रस्त्यात गणेशचे मार्गदर्शन केले आणी काळभैरवा समोर नारळ फोडायला लाऊन त्या लहान मुलाच्या जीवावर आलेले
गंडांतर टाळले.
स्वामीकृपेची प्रचीती येऊन गणेश स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

Monday, February 27, 2012

(११६) स्वर्ण विद्येच्या शिल्पकाराचा उद्धार




बीडकर नावचे एक गृहस्थ अत्तराचे व्यापारी होते. त्यांचा व्यापार तर 
चांगलाच चालायचा पण त्यात त्यांना जडीबुटीनी धातूचे स्वर्णकरण्याची विद्या पण हस्तगत झाली होती.
त्यांचे एका नर्तकी वर प्रेम होते आणी तिला लग्नाचे वचन पण दिले होते.
नर्ताकिनी पण दुसऱ्या लोकासाठी नाचणे बंद केले होते.
ती बीडकरांच्या मागे लग्ना साठी लागली होती.
पण बीडकर यांचे आधीच लग्न झालेले होते म्हणून त्यांना प्रश्न पडला होता.
आपल्या मित्राला आपली चिंता सांगताना त्यंना खबर येते की त्या नर्तकीचा सर्प दंशानी मृत्यू झाला.
मित्र त्यांना म्हणतो की ईश्वरानीच तुमची या प्रश्ना पासून सुटका केली.
पण त्या नर्तकी वर जीव असल्यानी त्यांना जगा-प्रती थोडा वीतराग आला होता.
संसार दु:ख प्राप्त  झाल्यावरच मनुष्याला अध्यात्माची आठवण येते.
मनाच्या शांतीसाठी बीडकर आध्यात्मात उपाय शोधात्तात.
तितक्यात एक रामदासी उयुन त्यांना  म्हणतो की आध्यात्म-मार्ग इतका सोपा नसतो आणी त्यात तुझ्या सारखा ऐश्वर्यात लोळणारा माणूस 
काय आध्यात्मा कडे वळणार?
त्या रामदासाचा टोमणा बीडकर च्या हृदयात लागतो.
ते आपल्या आराध्य देव मारुतीचा मंदिरात जातात.
तिथे ते मारुतीचा धावा करतात. तितक्यात त्यांना देववाणी ऐकू येते की अक्कलकोटला स्वामी समर्था कडे जा.
बीडकर अक्कलकोटला येतात.
तिथे ते स्वामी सेवेत राहतात.
एकदा स्वामींचे पाय चेपताना त्यांचा डोळा लागतो. डोळे उघडतात तेव्हा पाहतात तर काय स्वामी जवळ एक मोठ्ठ्या फणेचा नाग बसला आहे.
बीडकर स्वामींवर विश्वास ठेऊन मुखांनी नामस्मरण करत पाय चेपत राहत्तात.
स्वामी लगेच उठतात. आणी उठल्या बरोबर बीडकरांच्या श्रीमुखात एक जोरदार ठेवतात.
बीडकरचा चेहरा आनंदानी खिळून उठतो. ते आनंदात डोलू लागतात.
स्वामी मग त्या नागाला हातात धरून तिथून निघतात.
गुरु आपल्या निवडक शिष्यावर शक्तिपात करतो तेव्हा त्याचे प्रकार वेग-वेगळे  असतात.
चापटी मारणे हा ही एक शक्तीपाताचा प्रकार होता.
या मुळे बीडकर यांच्या मनातला द्वंद संपून त्यांना होणाऱ्या उद्वेगाचे निरसन होते. खर ज्ञान मिळाल्यानी त्यांचा चेहरा प्रफुल्लित होतो.
ते स्वामी शरणी येतात. स्वामी त्यांना सहस्त्र भोजन घाल असे सांगतात.
बीडकर आपल्याकडे असलेल्या अत्तराच्या बाटल्या विकायला निघात्ता पण त्यांना ठेच लागून बाटल्या चकनाचूर होतात.
हुशार बाळप्पा त्यांना मार्ग सांगतात. त्या राहिली-सुध्लेल्या अत्तराचं अष्टगंध करून ते राजाला विकून येतात.
आणी त्या पैशानी बीडकर सहस्त्र भोजनपार पाडतात.
स्वामी भोजन ग्रहण करून म्हणतात: " भोजन तो दिया अब दक्षिणा देणने का वक्त आ गया है."
पण बिद्कारांकडे पैशे नसतात. सर्व पैशे तर सहस्त्र भोजनात खर्च झालेले असतात.
मग स्वामी म्हणतत अरे दक्षिणा नसेल तर एक वचन दे- " जडी बुटी चे  कार्य सोडून दे"
जडी-बुटी चे   कार्य म्हणजे धातू  चे सोने बनवण्याचे कार्य.
बीडकरांना प्रश्न पडतो पण ते सद्गुरू आज्ञेला  सर्वोपरी मानून सोनं बनवणार नाही अशे वचन देतात.
स्वामी मग त्यांना नर्मदा प्रदिक्षणा घालायला सांगतात.
माया ही ब्रह्मा आणी मोक्ष प्राप्तीत सर्वात मोठी बाधा असते.
बीडकर यांची आध्यात्म मार्गावर उन्नती व्हावी म्हणू स्वामींनी केलेली ही उपाय योजना होती.
नुसते धातूचे स्वर्ण करत बसल्या पेक्ष्या आता बीडकर स्वताच्या जीवनाचे सुवर्ण करण्याच्या मार्गावर चालायला लागले होते.

(११५) उपेक्षु नको भगवंता




शेषाचार्य एक आध्यात्मिक उंची गाठलेले व्यक्ती होते. स्वामी म्हणायचे आमची आणी शेषाची युगा-युगाची गाठ आहे.
त्रेतायुगात तो लक्ष्मण तर द्वापारात बलराम म्हणून आमची साथ देत आहे.
स्वामींना कितीही राग आला तरी तो शेषाचार्यांच्या उपस्थितिनी त्यांचा राग शमायचा.
शेषाचार्यांकडे कुलदेवता बालाजीचे पारणे असते. ते विचार करतात की स्वामी म्हणजे साक्षात बालाजी ते असतांना मंदिरात कशाला जायचे.
ते स्वामींना बोलवणे करायला येतात. तिथे असलेली मिठाई स्वामी सर्व उपस्थित लोकांमध्ये वाटायला सांगतात 
पण शेषाचार्यांना काही मिठाई मिळत नाही.
मिठाई म्हटले की शेषाचार्यांचे जीव की प्राण.
मिठाई पाहून त्यांच्या मनात 'मिठाई जिभेला किती सुखद लागते' अशे विचार येतात.
संध्याकाळी त्याच्याकडे स्वामी पारण्याला काही जात नाही. शेषाचार्य येतात तर स्वामी झोपलेले भेटतात आणी शेषाचार्य गेल्या बरोबर 
स्वामी उठून बसत्तात.
दुसऱ्या दिवशी शेषाचार्य स्वामींकडे जातात तर स्वामी त्यांना हाकलुन देतात.
शेषाचार्य मनात विचार करतात की आपल्या हातून काय चूक झाली की स्वामी आपली उपेक्षा करून राहिले आहे.
विचार करता-करता त्यांच्या लक्ष्यात येते की आपली जी मिष्टान्नावर जी वासना जडली त्यामुळे स्वामींना राग आला असावा.
त्या चुकेचे प्रायश्चित म्हणून शेषाचार्य शेण खातात..
गाईचे शेण फार पवित्र असल्यांनी स्वामींचा त्यांच्यावर असलेला रोष कमी होतो.
या वेळेला स्वामी शेषाचार्याची उपेक्षा करत नाही.
स्वामी म्हणतात: " अरे कोणाच्याही भौतिक वस्तू वर वासना जडणे म्हणजे मोक्षाच्या मार्गातली फार मोठ्ठी अडचण. अरे षड-रसाचा
मोह त्याग केल्या शिवाय अध्यात्मिक उन्नती कशी होणार ?"
शेषाचार्य पुढे वासने पासून सावध राहण्याचा निश्चय करतात.

Tuesday, February 21, 2012

(११३) एका बरोबर पाच रूप, घेतले आपण हे देव अरूप

अक्कलकोटला आषाढी एकादशीचा उत्सव असतो. पण  चोळ प्पाची इच्छा होती की स्वामींनी दर वेळे प्रमाणे त्याच्या घरी यावे.
त्याचीच नाही तर इतर ३ भक्तांची पण अशीच इच्छा होती.
बाळप्पा यांची  स्वामींनी अक्कलकोट-गावाच्या उत्सवाला हजर राहावे अशी होती.
या प्रकरणा मुळे त्या सर्वांचा आपसात थोड वाद होतो.
स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हा सर्वांना एक परीक्षा द्यावी लागेल जो उतीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ.
पण ठेवण्यात येतो. हातात तेलानी गच्च भरलेली पंती घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थाना वरून सर्वानी स्वामींकडे यायचं.
जो पहिले येईल तो जिंकेल आणी स्वामी त्याच्याच घरी येईल.
पण तेलाचा एक थेंबपण सांडायला नको.
चोळप्पा सर्वांना पछाडून स्वामींकडे पहिले पोचतो.
पण स्वामी म्हणतात: " अरे पहिले तो आये पर मन में हमारा नाम कहा था ?"
मग काय सर्वच अनुतीर्ण झाले होते. आता स्वामी फक्त गावाच्या उत्सवात हजर राहणार होते.
सर्वांना खंत होतो. आणी होणार पण का नाही ? कारण एवढी सोपी गोष्ट न करता आल्यानी स्वामींचे चरण त्यांच्या
घरी आता पडणार नव्हते.
सर्व निराश होऊन परततात . पण रस्त्यात सर्वांना स्वामी गाठून सांगतात की मी तुझ्या कडे येणार पण मात्र तू कुणालाही सांगू नको.
आषाढी एकादशी च्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व मध्ये वाद होतो.
चोळप्पा म्हणतात की स्वामी त्याचा कडे आले होते, इतर ३ भक्त पण असंच म्हणतात.
बाळप्पा म्हणतात की उगाच थापा मारू नका स्वामी गावाच्या उउत्सावातून कुठेही गेले नाही.
त्यांचा वाद सुरु असतानाच स्वामी म्हणतात : " अरे तुम्ही लोकं का विसरतात की आम्ही चैतन्य-स्वरूप आहो."
"चैतन्याला स्थूल-देहाच्या मर्यादा नसतात. अरे आम्ही कणा-कणात वावरतो. पाच जागी एका बरोबर प्रगट होणे कोणची मोठी गोष्ट आहे?"
"अरे आम्ही तुमच्या मध्ये सुद्धा आहे, फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची."
"आणी जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतातून हुडकून काढणार तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्म चित्ताला प्राप्त होणार."
"अरे 'अहं ब्रह्मास्मि' उगीच थोडी म्हटले आहे. तुमच्यातच नाही आम्ही सर्व जीवात वास करतो. म्हणून उगाच कुणाला त्रास किंवा मनस्ताप देऊ नका."
सर्व लोकं स्वामींची क्षमा मागतात.
सर्व लोकं स्वामीचे रूप आहे या सिद्धांतावर बसप्पा चालायचे. गरिबाला मदत करतांना सुद्धा ते त्याला स्वामी अशी हाक मारून मदत करायचे.

(११४) अंध श्रद्धा ठेऊ नका


गणपतीबुवा स्वामींच्या दर्शनाला येतात पण स्वामी त्यांना हकलुन देतात.
गणपती बुवांना फार वाईट वाटतं. योगा-योगानी त्याच गावात एक भोंदू साधू कृष्णास्वामी आलेले असतात.
कृष्णा स्वामी लोकांना भासवायचे की ते साक्षात कृष्णाचा अवतार आहे. गणपतीबुवा तर त्यांच्या आहारीच गेले होते. 
आणी याच कारणामुळे स्वामींनी त्यांना हाकलले होते.
स्वामी सदैव सावधगिरी बाळगा अशे म्हणायचे. श्रद्धा ठेवा पण अंध श्रद्धा ठेऊ नका अशी शिकवण नेहमी भक्तांना द्यायचे. पण इथेच तर गणपती बुवा चुकले होते.
गणपती बुवांचा मुलगा अकस्मात आजारी पडतो.
पण कृष्णास्वामी वर अगाढ श्रद्धा असल्यानी गणपती बुवा त्याला वैद्या कडे सुद्धा नेत नाही.
इकडे कृष्णास्वामी यांचे प्रबोधन सुरु असतांना स्वामी समर्थ  तिथे येतात.
कृष्णास्वामी त्यांचा अपमान करतात. आपल्या समोर स्वामी काहीच नाही, अशे मत मांडतात. 
मग स्वामींना आपल्याशी शास्त्रार्थ करावे, अशे आवाहन  पण करतात.
पण स्वामी मुकाट्याने काही न बोलता तिथून निघून येतात.
गावाचे लोकं कृष्णा स्वामींचा जय जयकार करतात.
हा सर्व प्रकार ऐकून गणपती बुवाची कृष्णा स्वामीवरची श्रद्धा वाढते.
त्याशिवाय कृष्णस्वामी त्यांचाशी फार अगत्यानी बोलायचे.
कृष्णास्वामी गावकऱ्यांना भूल घालायला लागले होते कि तुम्ही मला धन-संपदा दान करा त्या बद्दल तुम्हाला अनेकपट धन प्राप्त होणार.
गावकरी सुद्धा  त्यांच्या आहारी जायला लागले होते.
पण इकडे गणपतीबुवाच्या मुलाचा आजार  हाता बाहेर जात होता.
चोळप्पा  कळ-कळीनी त्यांना आपल्या  मुलाला स्वामींकडे न्या अशे सांगतो.
पण गणपतीबुवा चोळप्पाला ढकलून देतात.चोळप्पा पडणार तितक्यात मागून स्वामीसमर्थ त्याला सांभाळतात.
मग स्वामी गणपती बुवाला जाम रागवतात: " मुर्खा अजून तुला अक्कल आली नाही. चांगक्या-वाईटाची पारख तुला कशी येत नाही. डोळे बंद करून असा कुणावर कसा विश्वास ठेवतो."
गणपती बुवा तरीही काही ऐकायला तैयार नसतात.
मग स्वामी म्हणतात: " बघ तुझा कृष्णास्वामी काय करतो आहे ?"
सर्व लोकांना समोरच्या भिंतीवर कृष्णास्वामींचे  कृष्ण-कृत्य दिसतात.
कृष्णा स्वामींच्या स्त्री-शिष्या नृत्य करत होत्या आणी कृष्णास्वामी  मद्य-पान करत नयन-सुखं घेत होते.
मग काय गणपती बुवा सकट सर्व गावकऱ्यांचे डोळे उघडतात.
गणपतीबुवा स्वामींची करुणा भाकतात. कृपासिंधु स्वामी आपल्या कृपा-दृष्टीनी त्यांच्या मुलाला खडखडीत बरा करतात.
इकडे सर्व गावकरी कृष्णास्वामींना चोप देतात. कृष्णास्वामी पळत स्वामी शरणी येतो.
पण स्वामींना खोटे काम करणारे आणी दुसऱ्यांना लुबाडणारे लोकं आवडत नसल्या मुळे ते कृष्णास्वामीला गाव सोडून जा अशी आज्ञा करतात.
कृष्णास्वामी लज्जित होऊन आपल्या शिष्यासह गाव सोडून निघून जातो.

(११२) हरी इच्छा बलीयसी


चोळपा स्वामी आज्ञा घेऊन आपली मुलगी राजुबाई ला  भेटायला जातो. तिच्या घरी गेल्यावर त्याला कळते की राजुबाई ला क्षय झाला आहे.
काहीही इलाज केला तरी गुण येत नाही. इकडे स्वामी शेणाच्या गवऱ्या बनवतात.
चोल्प्पा अक्कलकोटला परतून स्वामींकडे  साकडे घालतो. स्वामी काही न म्हणता त्याला केलेली गवरी देतात.
स्वामींचा इशारा समझुन चोळप्पा थबकतो.
काही दिवसांनी राजु बाईला देवाज्ञा होते. 
 महिन्या नंतर चोळपाच्या मुलगा- कृष्णप्पा आजारी पडतो.
त्याल वैद्या कडे नेता-नेताच त्याला देवाज्ञा होते.
चोल्प्पा वर तर जणू दुखाचा पर्वतच कोसळतो.कृष्णप्पाच्या ओर्ध्देहिकाची तैयारी चालू असताना स्वामी तिथे येतात.
स्वामी म्हणता: " रडायला काय झाले आहे?"
चोळप्पाची सासू फणफणून महानते:- 'अहो स्वामी कृष्णप्पा गेला हो .."
चोलप्पाची पत्नी स्वामींना दूषण लावते.
स्वामी म्हणता: " कौन म्हणतो कृष्णप्पा मेला आहे ? तो झोपला आहे."
मग स्वामी कृष्णप्पाला आवाज देतात- "कृष्णप्पा उठ......."
मग स्वामी हाक मारतात:- "अरे नीलकंठा उठ...".
स्वामींची ही हाक ऐकून कृष्णप्पा उठून बसतो.
स्वामी मग खुलासा करतात: " राजु बाई चा वेळ आला होता आणी त्यानंतर तिला नवीन जन्म पण घ्यायचा पण होता पण 
कृष्ण्प्पाचा हा शेवटचा जन्म होता.
या जन्मा नंतर त्याला मोक्ष मिळणार होता. तुमच्या साठी आम्ही त्याला जीवन दिले. आम्ही विधीलीखीतात अत्यंत विशेष परिस्थितीतच बदल करतो.
चोळप्पाचा परिवार स्वामींची क्षमा मागतो.

Friday, January 6, 2012

(१११) भक्ता हाती विप्रमद जिरवले


श्रीपाद नावाचा एक ब्राह्मण अनन्य स्वामी भक्त होता. एक दिवशी स्वामिनी त्याला काशीला जा अशी आज्ञा करतात.
काशी मध्ये विद्वान ब्राह्मणाचा घोळका आढळतो. ते ब्राह्मण श्रीपादच्या अज्ञाना पाई त्याचा पदोपदी अपमान करतात.
परिस्थितीमुळे श्रीपादचे शिक्षण फारसे झाले नव्हते. 
या सर्व अपमाना मुळे तो विप्र-सभेत जायचे टाळतो.
काशीत एक दिवस फिरत असताना स्वामी एकदम त्याच्या समोर प्रगट होतात.
स्वामी श्रीपाद ला घेऊन विप्रसभेत जातात. विप्र सभा एका देऊळात भरली होती.
श्रीपाद तिथे स्वामींना चोरंगावर बसवून त्यांची पाद्य पूजा करतो.
स्वामी म्हणतात -"पाद्य पूजा झाली पण नैवैद्य कुठे आहे."
त्या ज्ञानांनी उन्मत्त झालेल्या ब्राह्मणा मधून एक स्वामींच्या समोर मांसाहारी पदार्थ नैवैद्य म्हणून ठेवतो.
स्वामी हे पाहून संतप्त  होतात. तितक्यात देऊळात एक देवी प्रगट होते. देवी फार क्रोधित असते.
ती म्हणते-" चांडाळा तू स्वामींना मांसाहाराचा नैवैद्य दाखवला ! " मी  तुला आता भस्म करणार."
पाहता-पाहता तो ब्राह्मण भस्म होतो.
श्रीपाद स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतो.
स्वामी त्याच्या मस्तकावर हात ठेवतात.
स्वामींच्या हस्त-स्पर्शांनी श्रीपाद च्या डोक्यात चारी वेद, सहा पुराण व त्या शिवाय अनेक शास्त्रांचे ज्ञान जागृत होतं.
विश्वाचे सर्व ज्ञान मनुष्याच्या डोक्यात असते पण फक्त कुणात ते जागृत होतं आणी कुणात  नाही. मनन,पठण,अवलोकन,अनुभव आणी गुरूची 
शिकवण, हे सामान्य रुपानी मनुष्याच्या डोक्यात असलेल्या सुप्त ज्ञानाला जागृत करतात.
स्वामी कृपेनी एका क्षणात श्रीपाद मध्ये ते ज्ञान जागृत होतं.ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या स्पर्शांनी रेड्याकडून वेद म्हणवले होते.
श्रीपाद स्वामी आज्ञेनी त्या ब्राह्मणांशी वाद-विवाद करायला बसतो.
काही क्षणातच तो त्या सर्व ब्राह्मणांचा चोफेर पराभव करतो.
ब्राह्मणांना स्वामींचे सामर्थ्य कळतं आणी ते स्वामींचा शरणी येतात.

Sunday, December 18, 2011

(११०) क्यो रंडी छोडी कि नही?




सोहनी नावाचा एक माणूस विधुर होता. दोन विवाह करून पण त्याचं कुटुंब नव्हते.
आपल्या आईच्या सल्ल्यानी तो तिसरे लग्न करायचे ठरवतो व त्या साठी स्वामींची परवानगी मागतो.
स्वामी चक्क नकार देतात तरीही आईच्या सांगण्यानी सोहनी लग्न करतो.
इकडे चोळप्पा आणी त्याची पत्नी स्वामी मुळे झालेल्या सोई आणी आमदनी मुळे खुश असतात.
त्यात अक्कलकोट संस्थाना कडून स्वामिनी मिळवून दिलेल्या मेहनतान्यानी त्यांना फार आधार असतो.
पण स्वामी जर सोडून गेले तर हे सर्व सुखं नाहीसे होईल अशी शंका चोळप्पाची बायको काढते.
चोळप्पा एक खड्डा खणतो. त्याचा उद्देश तो खड्डा स्वामींच्या समाधी साठी खणण्याचा असतो.
स्वामींना जेव्हा हे कळते तेव्हा ते म्हणतात: " अरे चोळ्या, आमच्या आधी आम्ही तुला या खड्यात घालून जाऊ."
स्वामी वचनाचे गांभीर्य कळून चोळप्पाची बायको कासावीस होते.
पण चोळप्पा गुरूच्या आधी जर शिष्याचे मरण आले तर याला भाग्य समजतो.
सोहनी आपल्या नूतन पत्नी सह स्वामींचा आशीर्वाद घ्यायला येतो.
स्वामी रागावतात :"अरे नाही म्हटले तरी तू लग्न केले ना . आता कशाला इथे आला आहे?".
सोहनी आपल्या नूतन पत्नी सह स्वामींचे पाय पडतो.
स्वामी म्हणतात: "तुझ्या ललाटी जे लिहिले आहे ते तुला प्राप्त हो. "
काही दिवसांनी सोहनीची बायको जीना उतरताना खाली पडते, तिच्या कम्भरेला मार बसून ती कायमची अंथरुणाला खिळते.
सोहनी स्वामी शरणी येतो.
स्वामी म्हणतात; " अरे तुला म्हटले होते, लग्न नको करू, त्तरी आमची आज्ञा मोडून तू लग्न केले."
"तुझ्या भाग्यात लग्न होते पण लग्नाचे सुखं नव्हते."
"आता जा इथून, आमच्या कडे काही उपाय नाही."

सोहनी निराशहून परततो.
त्याच्या घरी आळंदीचे नृसिंह सरस्वती आलेले असतात.
सोहनी व त्यांची मातोश्री त्यांना सर्व घाराणे सांगून उपाय मागतात.
नृसिंह स्वामी म्हणतात: "स्वामींनी म्हटले म्हणजे विधिलिखित, ते टळणे शक्य नाही."
"माझ्या जवळ सिद्ध्य आहे पण सिद्धीनी सुखं मिळते विधिलिखित टळत नाही."
सोहनी च्या सल्ल्यावर नृसिंह महाराज स्वामींना भेटायला जातात.
नृसिंह महाराज यायच्या आधी स्वामी शिष्या कडून व्याघ्रांबर मांडून ठेवतात.
नृसिंह महाराजांना पाहताच स्वामी म्हणतात:" क्यो रंडी छोडी की नही?"
नृसिंह स्वामी म्हणतात: " अभी तक तो नाही छोडी पार आपकी कृपा हुई तो जल्दी ही छोड दुंगा."

सर्व शिष्यांना नृसिंह स्वामींचा किळस येतो, एवढे मोठे महात्मा असून अशे चाळे.
स्वामी ओरडून म्हणतत: " अरे मुर्खानो रंडी म्हणजे कोणी स्त्री नसून आमचा अर्थ सिद्धीशी आहे.
जो पर्यंत हा नृसिंह सिद्धीच्या तावडीतून सुटणारा नाही तो पर्यंत त्याचा मोक्ष मार्ग उघडणार नाही.
मग स्वामी नृसिंह महाराजांना त्या व्याघ्रांबरा वर ध्यान लावायला सांगतात.
स्वामी कृपेनी त्यांना मोक्ष मार्ग सापडतो. आपण कुठे कमी पडत होतो ते कळते.
मग स्वामी त्यांना आशीर्वाद देतात, कि तुला तर मोक्ष मिळेलच पण तुझे दर्शन करणाऱ्यांना पण मोक्ष मिळणार.

(१०९) अहमदअली ला धडा




अहमदअली एक कट्टर मुस्लीम व्यक्ती होता. इतर मुस्लीम व्यक्तीनी स्वामींकडे गेलेले त्याला अगदी खपत नव्हते.
एक दिवस तो वैतागून स्वामींची हाजिरी घ्यायला जातो.
तो दिवस तो वटवृक्षा कडे  जाऊन उद्धटपणे विचारतो-" यहा स्वामी समर्थ कौन है?"

स्वामी म्हणतात: " आम्ही आहे स्वामी समर्थ!"
अहमद अली स्वामींना पाहतो तर पाहतच राहतो. जणू त्याचा पुतळाच होतो. तो अगदी स्थिर तसाच उभा राहतो.
काही काळानी स्वामी-इच्छेनी तो भानात येतो.
स्वामी त्याला चंद्र पाहायला सांगतात. त्याला चंद्रात स्वामींचा चेहरा दिसतो.
त्याला स्वामींच्या अधिकाराची जाणीव होतो. ज्या चंद्राला मुस्लीम एवढं पवित्र मानतात त्यात स्वामी दिसल्यानी
त्याला कळतं कि स्वामीच त्याचा अल्ला आहे.
तो स्वामींच्या शरणी येतो.

Friday, December 2, 2011

(१०८) हमारी कस्तुरी लाओ






ठाकुरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रभोधनकार होता. तो जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोकं साक्षात डोलायचे.
तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही तो दुखी होता-कारण त्याच्या अंगावर उभरलेले कोढ.
त्याला फक्त हाच प्रश्न होता कि जन्म भर एवढी अनन्य भावानी दत्त उपासना करून आपल्याला कोढ का झाला!
एक दिवस तो वैतागून निर्णय करतो कि आता संसार सोडून काशीला जाऊन वाचलेले जीवन तिथेच काढावे.
तो आपल्या परिवाराची व्यवस्था लाऊन काशी ला जायची तैयारी करतो.
त्याआधी तो गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार करतो.
जायच्या आधी तो गावकऱ्यांच्या आग्रहाखातर गावात दत्तप्रभोधन करतो.
त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात कि काशी ला न जाता अक्कलकोटला जा.
दत्त आज्ञा झाल्यानी तो काशी ला न जाता अक्कलकोटला जातो.
स्वामी त्याला पाहताच म्हणतात: "हमारी कस्तुरी लाओ !"
ठाकुरदासला स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी त्याला प्रचीती होते.
तो स्वामी चरणी मस्तक ठेवतो.
ठाकुरदास स्वामींना म्हणतो: " जन्म भर दत्त-उपासना करून पण मला कुष्ठ रोग का झाला ?"
स्वमी म्हणतात: "हे तुझे भोग आहे. वेळ आले कि ते संपतील."
काही दिवसांनी स्वामी ठाकूरदासला चुलीतले विझलेले लाकूड आणायला सांगतात व त्याचे काळोख तोंडावर फासायला सांगतात.
ठाकूरदासचा कुष्ठ बरा होतो.
स्वामी बोध करतात: " कर्म मुळे विपरीत-प्रारब्ध प्राप्त झाल्यानी सद्कर्माची कास सोडू नये. उपासना पंथ सांडू नये."
"भोग आपली वेळ आली कि आपोआप संपणार".
ठाकुरदास स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

(१०७) राज हट्टाचा पराभव




बडोद्याचे राजा मल्हारराव गायकवाड यांच्या मनात स्वामींना बडोद्याला आणायचा विचार येतो..
लोकानी  स्वामींना बडोद्याचे स्वामी समर्थ अशे जाणावे, असे  त्यांना वाटले.
ते दरबारात विडा ठेवतात कि जो कोणी स्वामींना बडोद्याला आणेल त्यांना धन आणी जागीर देऊ.
तात्या साहेब नावाचे सरदार तो विडा उचलतात.ते अक्कलकोट साठी निघतात.
सुंदराबाई नावाची एक स्त्री होती, ती पायाला झालेल्या घावांनी बेजार झाली होती. काहीही केल्या घाव बरा होत नव्हता.
कोणी तरी तिला अक्कलकोटला स्वामींच्या शरणी जा, अस सुचवतात.
तात्या साहेबांना आपण स्वामी भक्त आहे अशी सूचना देऊन सुंदराबाई चक्क त्यांच्या रिकाम्या असलेल्या घोड्यावर बसून अक्कलकोटला येतात.
स्वामींच्या फक्त कृपादृष्टीनी सुन्दाराबाईचा पाय बरा होतो.
स्वामींकडे येणाऱ्या लोकांची गर्दी आणी अक्कलकोटचे ऐश्वर्य पाहून सुंदाराबाई अक्काल्कोटलाच राहण्याचा विचार करत्तात.
तात्यासाहेब स्वामींना बडोद्याला या अस निमंत्रण करतात, स्वामी साफ ते निमंत्रण फेटाळून लावतात.
तात्यासाहेब खूप प्रयत्न करतात. दान-धर्म.,अन्नदान पण स्वामी काही अक्कलकोट सोडायला तैयार होत नाही.
शेवटी ते चोळप्पा ला १०,००० रु. ची जागीरीचे लालूच देतात.
चोळप्पा स्वामींना बडोद्याला चला असा सल्ला देतात.
स्वामी म्हणतात: " अरे चोळ्या ! साक्षात तुझ्या समोर त्रिभुवनाचे वैभव लोळत आहे तरी तू १०,००० रु. च्या जागिरी बद्दल विचार करत आहे."
चोळप्पा खजील होतात.
शेवटी हार मानून तात्या साहेब परततात.
यशवंत राव या वेळेला विडा उचलतात.
ते स्वामींना थोड्या धाकाच्या भाषेत बोलतात, स्वामी एकदम ओरडतात- " अरे याला बेड्या घाला.".
कुणालाही काही कळत नाही. पण  थोड्याच वेळात बडोद्याचे सैनिक येऊन यशवंतरावला बेडया घालून अटक करतात.
नंतर उलघडा होतो कि यशवंतरावानी राजाला दासीच्या हाती विष दिले होते. पण राजाचे प्राण वाचतात.


राजाला पण आपली चूक कळते कि राजहट्टाचा अंमल मायेत गुंतलेले साधारण माणसावर चालवता येतो पण मायेचा समुद्र ओलांडून गेलेले 
थोर संतांवर आपण सत्ता गाजवू शकत नाही.
राजा आपला हट्ट सोडतो.





Sunday, November 20, 2011

(106) बाळप्पाची स्वामीभेट


कोंडुनाना स्वामींशी तीर्थयात्रे साठी परवानगी मागतात. स्वामी होकार देतात आणि म्हणतात: "जा पण आमच्या श्वानाला पण घेऊन ये."
कोंडु नानाला पाहून चोळप्पा पण तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन करण्या साठी आज्ञा मागतो.
स्वामी चोळप्पाला तुळजापूरच्या भवानी मातेचे रूप दाखवतात.
चोळप्पा गहिवरून म्हणतो:-"स्वामी ३३ कोटी देव माझ्या समोर असतांना मी उगीच तीर्थ यात्रेची कामना केली हो !"
कोंडुनाना गाणगापूरला येतात. तहानेनी व्याकुळ होऊन ते विहिरीतून पाणी काढून प्यायला जातात.
जसच पाणी काढले जाते, त्यांच्या कम्भरेत एक लात पडते.
मागे पाहतात तर काय घोड्यावर बसलेला एका इंग्रजांनी ती लात मारली होती.
ती विहीर ब्रिटीश अधिकाऱ्यांना पाणी-पुरवठा करण्यासाठी होती, आणि सत्तेत आंधळे झालेल्या इंग्रजांनला 
एका गरीब भारतीयांनी त्यातून पाणी घेतलेले सहन झाले नाही.
बाळप्पा कोंडुनानाला हात देऊन उचलतात आणि धर्मशाळेत नेतात.
बालप्पा श्रीमंत घराचे असतात,त्यांचा मोठ्ठा कारोबार असतो आणि ते घर आणि व्यवसाय सोडून 
गुरूच्या शोधात बाहेर निघालेले असतात.
कोंडुनानांना बाळप्पाला भेटुन  कळते कि स्वामिनी ज्या श्वानाला आण म्हटले ते हेच.
ते बाळप्पाना म्हणतात कि तुमचा गुरूचा शोध संपला, अक्कलकोट चे स्वामींनी तुम्हाला बोलावले आहे.
बाळप्पा अक्कलकोटला यायला तैयार होतात.
पण रात्री स्वप्नात दृष्टांत देऊन स्वामी बाळप्पाला म्हणतात:-" उतावळा होऊ नको. भेटेची वेळ अजून आली नाही."
तिकडे त्या इंग्रजाला अकस्मात पायात इजा होते-ज्या पायांनी लात मारली त्याच पायात.
रस्त्यात भेट झाल्यावर इंग्रज आपले दुख कोंडु नानाला सांगतो.कोन्दुंना त्याल स्वामींच्या शरणी ये असे सांगतात.
इंग्रज अधिकारी कोंडु नाना बरोबर अक्कलकोटला येतो. बाळप्पा गाणगापुरलाच  राहूनच आराधना करतात.
इंग्रज अक्कलकोटला स्वामींच्या चरणात पडून म्हणतो कि स्वामी मला स्पर्श करून बरं करा.
स्वामी म्हणतात: "अरे पहिले आम्हाला लाता मारतो आणि आता चरणानी स्पर्श करा असे म्हणतो!"
इंग्रज म्हणतो: " मी केंव्हातुम्हाला लात मारली?"
स्वमी म्हणतात: ' आम्ही आमच्या भक्तांच्या ठाई वास करतो. आणि तू आमच्या भक्ताला लात मारली."
इंग्रज  आपली चूक मान्य करतो.
मग स्वामी उपाय सांगतात: " तांदूळ धुतलेले पाणी आणि वाटलेले आळू चे कांदे एकत्र करून लाव तुझा पाय बरा होईल."
तिकडे धर्मशाळेत बाळप्पा पाण्याच्या नांदीत बुडत असलेल्या विन्चुला पाहतात.
त्या विन्चुचे प्राण वाचवायला बाळप्पा त्याला हातानी बाहेर काढतात.या प्रयत्नात विंचू त्यांना चावतो पण बाळप्पा त्याला बाहेर काढतात.
स्वामी बाळप्पाला  दृष्टांत देऊन सांगत्तात: "बाळप्पा तू परीक्षेत उतीर्ण झाला".
बाळप्पा ठरवतात कि जर एका हि घरात भिक्षेत जर गव्हाच्या पोळ्या मिळाल्या तर यालाच 
स्वामींची आज्ञा मानून अक्कलकोटला प्रस्थान करायचं.
शेवटी एका घरात गव्हाच्या पोळ्या मिळतात आणि बालप्पा अक्कलकोटला येतात.
बाळप्पा नी आणलेली खाडी साखर स्वामी सर्वाना देतात पण बाळप्पाला देत नाही.
स्वामी म्हणता: " बाळप्पा इथे राहणे सोपे नाही. तुला स्वताला सिद्ध करावे लागेल."
त्यानंतर बाळप्पा गुरु सेवेला लागतात आणि लहान-मोठे सर्व कार्य करायला लागतात.
बाळप्पा श्रीमंत घरातले असल्यानी, स्वामी नी हे हि योजना केलेली होती.

(१०५) कथा एका किमायागाराची




स्वामी चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळतात.स्वामी म्हणतात-"जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिझे ! लक्ष केंद्रित करावं लागतं."
खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच.चोळप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात,
निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते.
स्वामी मान्य करतात.पण समझ पण देतात-"पारायण करताना खेळाचा आवाज ऐकु तरी कसा येतो ? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताताना तर ती उच्च पातळीची हवी."
चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो.वामन बुवा स्वामींना पहातच राहतात.
एका मुलाला भूख लागली म्हणून स्वामी आतून नेवेद्याचे अन्न आणून घास भरवतात.
नेवेद्याचे अन्न आणताना ,चोल्प्पाची सासू विरोध करते.पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात:"पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं-ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका.चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाशी तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही.
तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामी बद्दल घालुन-पाडुन बोलतात.मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामी कडे जातात.
घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलपस्वामींना,आपल्या गुरु स्वामीसमर्था बद्दल सांगतात.
घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वाद विवाद होतो. जाता-जाता वामन बुवा सांगून जातात कि माझे गुरु येईल तुमची परीक्षा पहायला.
इकडे स्वामी चोळप्पाला गांवो-गाव फिरून आपला उपदेश जन-सामान्यात आपला उपदेश पोचंव, असं सांगतात-"तू सर्वाना समर्पण शिकवू शकतो. वामनाला पण तू दीक्षा दिली.खूप सोसले आहे त्यांनी माझ्या साठी.मी त्याच्या पाठीशी आहे. "
तिकडे शास्त्रीबुवा घोलपस्वामी कडे दगडं घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात.अर्ध सोनं आम्ही घेऊ अश्या अटीवर घोलपस्वामी,आपले प्रयत्न सुरु करतात. पण काय,काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही,त्यांना वाटतं कि वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे,म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात.
घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात. पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणी उलट तेच स्वता पडून त्याचं धोंड्या खाली चिरडले जातात.
धोंड्याच्या आवाजांनी वामन बुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते,ते मनो-मन स्वामींना आपले रक्षण केल्या बद्दल धन्यवाद देतात.
काही वेळानी घोलप जागे होतात, त्यांना स्वामींच्या सामर्थाची प्रचीती येते.
ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात.
स्वामी बोध करतात: "घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये.अरे आपले सामर्थ आणी शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणा करता करावा."
"त्यांना धर्म-प्रवृत्त करण्यात करावा."
"ब्रह्मचा अंतिम सत्य आहे बाकी सर्व क्षण भंगुर आहे' ह्या गोष्टीची जाणीव सर्वाना करुन द्यायला हवी."
स्वामी घोलपना माहूर ला जान राहायची आज्ञा करतात.
पहिले घोलप यांना स्वामी-चरण सोडुन जाणे जीवावर येतं पण मग ते बारकाई नी  विचार करतात कि माहूरला आदिमायेच्या रुपात स्वामीच आहे,
 असे समझुन ते माहूर साठी प्रस्थान करतात.
स्वामी मग वामन बुवाचे कौतुक करतात.
स्वामी म्हणतात: "अरे इतके प्रलोभन वाहत असताना सुद्धा तु तटस्थ राहिला, गुरुवर निष्ट आढळ ठेवली."
"तु परीक्षेत उतीर्ण झाला आहे."
"तुझी मोक्षाची वाटचाल आता सुरु झाली आहे."

Monday, November 7, 2011

(१०४) मी पणाचा पराभव

बाबा सबनीस एक प्रकांड विद्वान कीर्तनकार होते. राम मंदिरात त्यांचे कीर्तन होते. सर्व लोकं मंत्र-मुग्ध होऊन कीर्तन ऐकतात.
तिथे हरीबाई नावाची एक बाई येते आणी मंदिराच्या पायरीवर किर्तना कडे पाठ करुन रामाचे नामस्मरण करत बसते.
कीर्तन संपल्यावर हरी बाईला बाबा सबनीस विचारतात-" तुम्हाला काय आम्ह्चे कीर्तन ऐकावे असे नाही वाटत का?"
हरी बाई थोड्या फटकल पणे बोलते-"या मोठ्या-मोठ्या गोष्टी मला समझत नाही.कानातून मनात पोहचत नाही. "
"आम्हाला आमचे स्वामींच्या साध्या-सरळ गोष्टी आवडतात."
तितक्यात नारायण शास्त्री येउन बाबा सबनीसला म्हणतात:" तुम्ही या मुर्ख बाईशी काय वाद घालत आहा?'
" या सर्वाना त्या भोंदू स्वामीनी वेड लावले आहे."
मग शास्त्री बाबा सबनीसला म्हणातात की हनुमान जयंतीला स्वामी राम मंदिरात येणार आहे, तिथे तुम्ही आपल्या विद्वत्तेनी शास्त्रात
त्यांचा पराभव करा.
हनुमान जयंतीच्या दिवशी स्वामी मंदिरात येतात.बाबा सबनीस त्यांना तत्व-ज्ञानाचे प्रश्न विचारतात.
स्वामी म्हणातात: "अरे ह्या गोष्टी आम्हाला काय माहित! आम्ही काय पुराण वाचतो का?"
मग स्वामी वामकुक्षी साठी निघून जाता.
नारायण शास्त्री आणी बाबा सबनीस तिथेच स्वामींची टवाळी करत राहतात.
तितक्यात एक साप येउन बाबा सबनीसला डसतो.
योगा-योगानी गावात राहणारे मांत्रिक आणी वैद्य सुद्धा गावात नसतात.
गावकरी म्हणातात की आता फक्त स्वामीच वाचवू शकतात.
माणूस कितीही ज्ञानी असला तरी संकटात फक्त देहबुद्धी पर्यंतच त्याचे ज्ञान मर्यादित राहते.
बाबा सबनीस आपला ताठा सोडुन स्वामी शरणी यायला निघतात्त.
स्वामी पहिले बाबा सबनीस ची फिरकी घेतात:- "अरे आम्ही काय करणार? आम्ही वेद-पुराण थोडेच वाचले आहे!
आम्हाला काय कळतं तत्व ज्ञाना बद्दल ?"
आता तर विषा मुळे बाबा सबनीसना  प्रचंड वेदना व्हायला लागल्या होत्या.
बाबा सबनीस एकदम शरणागती पत्करतात आणी केविलवाण्या स्वरात म्हणातात:- "स्वामी काही पण करा हो .... पण मला वाचवा . "
"विष आता तर झोंबून राहिले आहे."
स्वामींना दया येते. जशी दिव्यात काजळी असते तसच मान-लोकिक मिळवलेल्या विद्वानाच्या ठायी अभिमान तर असणारच.
स्वामी एक ताठ मागवून सबनीस यांना सर्पदंश झालेला पाय ताठात ठेवायला सांगतात.
स्वामींच्या कृपा-दृष्टीनी आपो-आप विष बाहेर ताठात पडायला लागतं.
सर्व विष गेल्यावर बाबा सबनीस च्या प्राणात-प्राण येतो.
ते स्वामींच्या चरणी पडतात.
स्वामी बोध करतात: "ज्ञान श्रेष्ठ असतं पण थोडे ज्ञान झाल्याने भक्ती असलेल्या लोकांना नडू नये."
"ज्यांनी-त्यांनी आपल्या पद्धतीनी ईश्वराची उपासना करावी."
"ज्ञान-कर्म-आणी भक्ती तिन्ही जीवाला ईश्वरा कडे नेतात."
"ज्याला जी वाट सोयीस्कर वाटेल त्यांनी ती वाट पत्करावी."
सबनीस आपली चुक मान्य करतात.

(१०३) दुष्काळा पासुन सुटका

एकदा अक्कलकोट मध्ये दुष्काळ पडतो. खायला अन्न नाही आणी प्यायला पाणी नाही.
लोकं आसुसून पावसाची वाट पाहतात पण पाऊस काही
पडत नाही. सर्व स्वामींकडे येतात. स्वामी त्यांना रेणुका-सहस्त्रनाम आणी पर्जन्य-सुक्त वाचायला सांगतात.
काही जन उपासनेला बसतात पण पाऊस काही पडत नाही.
स्वामी आपल्या एका भक्ताला घेऊन अक्कलकोटच्या बाहेर पडतात.
तिथे एका शिव मंदिरात जातात.
तिथल्या शिवाच्या पिंडीला रोखटोक पणे विचारतात :"काय समस्या आहे तुमची? पाऊस का नाही पाडत?"
मग तिथुन निघतांना स्वामी म्हणातात:" आम्ही वळसण गावाला पोहचू तो पर्यंत पाऊस पडला पाहिजे."
स्वामी त्या मंदिरातून परततात, चालता-चालता वळसण  गाव लागतो तरी पावसाचा काही थांग-पत्ता नसतो.
स्वामी तिथल्या शिव मंदिरात जातात.
स्वामी तिथल्या शिव-पिंडीला जाब विचारतात:-" काय समस्या आहे तुमची ? पाऊस का नाही पाडत ?"
" अच्छा हरभरे पाहिजे तुम्हाला ?"
मग स्वामी भक्ताला आज्ञा करतात:- "जा हरभरे घेऊन ये."
भक्त गेल्यावर स्वामी स्वता शिव आराधना करायला बसतात.
स्वामी जोर-जोऱ्यात उपासना करतात:-" शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो .."
'हे  गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो "
" शंभो s s ......"
इकडे स्वामी शिव आराधना करतात तिथे गावकरी स्वामींनी सांगीतलेली आराधना करतात.
मग काय  नर-नारायण एक होता, पाऊस काय पडल्या शिवाय राहणार?
एकदम आकाश  ढगांनी अंधारून जाते आणी जोरदार पाऊस पडायला लागतो.
स्वामी जेव्हा अक्कलकोटला परततात तेव्हा सर्व गावकरी
स्वामींच्या चरणी लीन होतात.
स्वामी बोध करतात: " अरे निसर्ग कोपतो याचे करण असतं. तुम्ही लोकांचे कर्म जवाबदार असतात. "
"तुम्ही आपल्या स्वार्थ आणी सोयी साठी निसर्गाची विटंबना करतात."
" हिरव्या झाडांना कापतात. अरे उन्हाळ्यात ज्या झाडा खाली विसावा घेतात, थंडीत त्याचं झाडाला कापून
त्याची शेकोटी करतात."
"मनुष्याचे पापं वाढले की निसर्ग कोपतो आणी निसर्ग कोपल्यावर देवाला दुषण लाऊन काहीही साध्य नाही होणार."
"मनुष्यांनी न्यायनी वागावे, निसर्गाचा मान राखावा, आपल्या स्वार्थावर आटोका ठेवावा."
"ईश्वर कधीही अन्यायी नसतो पण होणारा त्रास प्रतिकुल कर्मामुळेच उद्भवतो."
"म्हणुन मनुष्यांनी सतत ईश्वराची उपासना करावी.कळत-नकळत झालेले दोष ईश्वर भक्तिनी घालवावे."
सर्व गावकरी आपली चुक मान्य करतात.

(१०२) पाप पुण्याचा जमाखर्च

गोविंद नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. तो फार दान-पुण्य करायचा. पण तो एका भयंकर व्याधींनी ग्रस्त होता-
भोजन झाल्यावर त्याच्या पोटात भयंकर वेदना व्हायच्या.
त्याचा मित्र त्याला स्वामींकडे आणतो.
स्वामी उपाय संगतात्त- "सात दिवस फक्त गाईचे शेण खायचे आणी गोमुत्र प्यायचे, या अतिरिक्त काहीही खायचे नाही."
उपाय म्हणजे अगदी द्रविडी प्राणायामच होता पण प्रचंड  वेदनेंना आठवून गोविंद तैयार होतो, सात दिवसा नंतर
तो पूर्ण पणे बरा होऊन स्वामींच्या चरणी पडतो.
तो स्वामींना विचारतो-" मी इतके दान पुण्य करतो तरी माझ्या वाटेला हे दुख का आले?"
स्वामी म्हणतात:" अरे भाग्यानी तु श्रीमंत झाला आणी थोडे-फार दान पुण्य करण्याची काय गमजा मारतो?"
"अरे जे थोडे फार असते त्यातले पण कुणाला देणे ह्याला खरी किम्मत आहे."
"श्रीमंतानी सुपात्र गरजवंतांना दान केलेच पाहिजे."
"आणी तुझ्या भोगला तुझीच कर्म जवाबदार आहे."
गरीब असताना तुझ्या कडे एक गाय होती, ती वृद्ध होऊन तिनी जेव्हा दुध देणे बंद केले तेव्हा तु तिचा चारा बंद केला."
"ती गोमाता भूखेच्या वेदना सहन करत मेली, तुझ्या हातून घडलेल्या या पापा मुळे तुला हे भोग प्राप्त झाले आहे."
"अरे आपली कशीही परिस्थिती असली तरी मनुष्याला आपले कर्तव्य सोडता येत नाही."
गोविंद आपली चुक मान्य करतो आणी स्वामींनी रोगमुक्त केल्या मुळे स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतो.

(१०१) मनुष्य आणी स्वार्थ

नारायण नावाचा एक राजस्थानी माणूस होता. त्याची बायकोची प्रसुतीची वेळ आली होती पण मुल अडले होते.
काहीही करुन बायकोची प्रसुती होत नव्हती.
तितक्यात एक साधू येउन त्याला सल्ला देतो की अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना साकडं घाल आणी मुल झाले की
अक्कलकोटला ब्राह्मण वाढ.
हेकेखोर नारायण पहिले वाद घालतो पण अडलेला माणूस कितीवेळ हट्टावर पेटून राहणार.
तो शेवटी स्वामींना बायको आणी संततीसह  अक्कलकोटला येईन असा नवस सांगतो.
नवस करताच लगेच त्याची बायको सुखरूप प्रसूत होते.
पाहता-पाहता मुलगा मोठा होतो तरी नारायण नवस फेडत नाही. त्याची आईनी आठवण करुन दिली तर तो
तीचाशीच हुज्जत घालायचा.
एकदिवस आईनी अन्न-पाणी त्याग करणार अशी धमकी दिल्यानी तो अक्कलकोटला यायला तैयार होतो.
अक्कलकोटला जसाच तो स्वामींचे पाया पडतो, स्वामी त्याला पाडून देतात.
स्वामी रागावतात:" अरे कृतघ्ना ! आता आठवण आली नवस फेडायची.चल चालता हो."
नारायण परिवारासह परत फिरतो.
मुक्कामाच्या जागेवर येताच त्याला कडकडून ताप येतो आणी तो अंथरुणाला खिळतो.कितीही उपचार झाले तरी तो
बरा होत नाही. अनेक दिवस झाल्यावर त्याला पश्चाताप होतो आणी तो स्वामींची करुणा भाकतो.
आपली चुक झाली अशी प्रांजळपणे कबुली देतो.
लगेचच स्वामी तिथे प्रगट होतात आणी त्याला बोध देतात:
" अरे तुझ्या अहंकार आणी कृतघ्नपणा मुळे तुला हे भोग प्राप्त झाले होते,तुझ्या या आजारपणामुळे ते भोग संपले,
आणी आपली चुक प्रामाणिक पणे कबुल केल्यानी तुझ प्रायश्चित ही झाले."
असं म्हणुन स्वामी अदृश्य होतात.
नारायण लगेच बरा होतो आणी मनोमन स्वामींना नमस्कार करतो.