Friday, April 15, 2011

(५८) अपत्य सुखाची आस

लग्नाचे ५ वर्ष झाले तरी गीताला अपत्य सुख प्राप्त झाले नव्हते.त्यामुळे तिची सासू आणी नवरा मदन तिचा छळ करायचे.
एकदिवस सासूबाई मदन च दुसरं लग्न करायला निघतात.
गीता विचार करते कि जर सवत आली तर ती आपल्याला घरा बाहेर काढेल.
त्यापेक्षा जर आपलीच धाकटी बहिणीशी जर आपल्या नवऱ्याचं लग्न झालं तर आपल्याला घरा बाहेर जायची वेळ नाही येणार.
ती स्वामींचे दर्शन घेऊन आपला बेत सांगते.
स्वामी म्हणतात:" गीता, हा विचार मनातातून काढून यामुळे  काहीही फायदा होणार नाही."
पण घरा बाहेर काढल्या जायच्या भितीनी गीता स्वामीवचना कडे दुर्लक्ष्य करते.
मग काय, तिची धाकटी बहिण संगीता आणी मदन विवाहबद्ध होतात.
काही वर्ष होतात तरी संगीतालाही अपत्य होत नाही .
या कारणे मदन आणी त्याची आई दोघांनाही घरा बाहेर काढायला पाहतात.
तितक्यात स्वामी तिकडे येतात.
स्वामी रागावतात:-"अरे ही पद्धत आहे का, आपल्या विवाहित स्त्रियांशी वागायची.अरे जिला लक्ष्मी म्हणून आणतात तिला काय
असं घरा बाहेर काढतात?"
"आणी अपत्य नाही झालं, यात स्त्रीचाच दोष आहे, हे कश्यावरून?"
"दोष पुरुषाचा सुद्धा असू शकतो."
"तुम्हा तिघां मध्ये दोष कुणाचा आहे, हे जर माहित करायचं असेल तर या आमच्या बरोबर."
स्वामींच्या आश्रमात तीन एकासारखे रोपटे दाखवण्यात येतात.
स्वामी म्हणतात:- "तुम्ही तिघानी एका-एका रोपट्याला पाणी घालायचं ज्याच्या  पाणी घातल्यानी रोपट्यात 
वाढ होईल त्याच्यात दोष नाही."
गीता आणी संगीता दोघेही एका-एका रोपट्याला पाणी घालतात, आणी लगेचच त्यांनी पाणी घातलेल्या रोपट्यात वाढ होते.
पण मदननी पाणी घातलेल्या रोपट्याची वाढ होत नाही.
स्वामी म्हणतात:- " मदन आता कळलं कि दोष कुणात आहे?"
"अरे दोष स्त्री आणी पुरुष कुणातही असू शकतो पण जवाबदार मात्र स्त्रीलाच ठरवलं जातं."
मदन वैतागून तिथुन निघतो.
त्याची आई त्याचं सात्वन करते, पण मदन काही ऐकायला तयार नसतो.
त्याचा  आईशी झाल्या संवादात मदनाचं गुपित गावातल्या टवाळ मंडळीच्या कानी पडतं.
मग काय टवाळ  मंडळी मदनची चेष्टा सुरु करते.
मदन चिडून हात उगारतो, मग काय टवाळ मंडळी त्याला बेदम मारते.
आपला असा अपमान झाल्या मुळे मदन चिमणीतलं राकेल अंगावर ओतून आत्म-घात करायचा प्रयत्न करतो.
त्याच्या बायका व आई त्याला अडवतात.
आई म्हणते:" रे बाबा  तुच  जर गेला तर आम्ही तिघींनी कुणाच्या आसऱ्यावर  जगायचं."
मदत थोडा  सावरतो.
शेवटी स्वामींच्या शरणी जाऊन मार्गदर्शन घ्यावं असं ते ठरवतात.
स्वामी म्हणतात: "अरे प्रारब्द्ध प्रतिकूल असल्यानी जर  काही उणीव मानवाच्या पदरी पडली तर त्यातून बाहेर कसं निघावे,
 हा विचार करायला हवा."
"अरे जसं तुम्ही अपत्यसुखानी  वंचित आहा तसं कोणी अपत्य सुद्धा मातृ-पितृ सुखानी वंचीत असेल,
त्याला दत्तक घ्या."
"तुम्हा सर्वांच्या समस्येवर हाच तोडगा आहे."
"त्यामुळे त्या पालकविहीन अर्भकाला पण मातृ-पितृ सुख मिळेल."
सर्वाना स्वामींचा सल्ला पटतो आणी ते समाधानानी घरी परततात.

Saturday, April 9, 2011

(५७) श्रीमंतीचा अभिमान नसावा

अक्कलकोटला गुरु पौर्णिमेचा उत्सवा निमित्य नामदेवबुवा अक्कलकोटला जायचा बेत ठरवतात.
त्यांच्या बरोबर त्यांचा मित्र आणी गावातला श्रीमंत गोविंदशेठ पण यायला निघतात.
गोविंद शेठ निपुत्रिक होते .ते स्वामींसाठी  पंच-पकवानाचा नेवैद्य आणी भरजरी वस्त्र घेतात.
स्वामींना भेट देउन आपलं मनोवांछित प्राप्त करुन घ्यायचं, असा ध्येय होता.
शंकर नावाचा एक गाव-गडी स्वामींचा निस्सीम भक्त असल्यानी त्याला पण बरोबर घेण्यात येतं.
एक गाव-गडी आपल्या बरोबर अक्कलकोटला जाणार म्हणुन गोविंद शेठाची तळपायाची आग मस्तकात जाते.
ते नामदेवबुवाला शंकर ला का बरोबर घेतलं, असा जाब विचारतात.
नामदेव बुवा म्हणतात:- "शंकर स्वामींचा निस्सीम भक्त आहे, म्हणुन मी  त्याला शब्द दिला आहे, आणी मी  तो पाळणार."
गोविंदशेठ दात ओठ चावून राहतात. रस्त्यात ते शंकर चा तिरस्कार करतात.
रस्त्यात एक गरीब व्यक्ती येऊन मुलाच्या इलाजापाई पैशे मागतो. गोविंद शेठ त्याला हकलतात,
पण शंकर स्वामींना भेट म्हणुन द्यायचे पैशे गरिबाला देतात.
गोविंद शेठ संतापतात, शंकराला रस्त्यात  छळत राहतात.
पुढे न्याहरी करतांना एक  भुकेला मुस्लीम  व्यक्ती अन्न मागतो.
गोविंद शेठ त्याला पुन्हा हकलतात, पण शंकर आपली भाकर त्याला देतो.
रात्री मुक्काम धर्मशाळेत करण्यात येतो तिथे शंकरा कडे पांघरायला काही नसल्यानी तो कुडकुडत राहतो.
स्वामी इच्छेनी गोविंद शेठ च्या अंगावरची भरजरी घोंगडी शंकराच्या अंगावर येऊन पडते.
सकाळी थंडीनी कुडकुडत गोविंद शेठ उठून पाहतो तर काय आपली भरजरी घोंगडी शंकराच्या अंगावर.
तोंडानी शिव्या हासडत तो शंकराशी मारहाण करतो. नामदेवबुवा  मध्ये पडून शंकराचा बचाव करतात.
काही वेळानी गोविंद शेठला कळतं कि आपलं सर्व सामान चोरीला गेलं आहे, त्यात स्वामींसाठी आणलेली किमती भेट वस्तू
सुद्धा असतात.
गोविंद शेठ, पुन्हा शंकरावर आळ लावून त्याच्याशी मारहाण करतात.
झडती घेतल्यावर पण काही न सापडल्या मुळे गोविंद शेठ तात्पुरता माघार घेतात.
अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी मोठ्ठी रांग लागते.
शंकर स्वामी चरणी मस्तक ठेऊन म्हणतो कि तुम्हाला भेट म्हणुन आणलेले पैशे रस्त्यात खर्च झाले.
आता फक्त शेंगदाणेच तुम्हाला भेट करू शकतो.
स्वामी म्हणतात:- " अरे तेरे पैसे हमको कब के मिल गये, तेरा दिया हुवा खाना भी लजीज था."
तैलबुद्धीचा शंकर लगेचच समझतो कि रस्त्यात भेटलेले गरजवंत लोकांच्या रुपात स्वामीच आलेले होते.
त्याचा कंठ दाटून येतो.
स्वामी पुढे म्हणतात:-" रस्त्यात इतका त्रास झालं तरी तु श्रद्धा अढळ ठेवली, पण आता तुला उगाच छळणाऱ्या व्यक्तीला त्याच्या
दुष्कृत्याचे फळ भोगावे लागणार आहे."
रांगेत मागे उभ्या असलेल्या गोविंद शेठाला अर्धांगवायूचा झटका येतो, तो खाली कोसळतो, अर्धं शरीर खिळून जातं.
त्याला नीट बोलता सुद्धा येत नाही.
स्वामी खुद्द त्याच्या जवळ जाऊन म्हणतात:-
"अरे खूब गर्व होताना तुला तुझ्या श्रीमंतीचा, त्याच्यापाई तु निरपराध व्यक्तींचा छळ करायचा."
"आणी काय रे!, स्वामींना भरजरी वस्त्र आणी पंच पकवानाचा नैवैद्य दाखवलं म्हणझे काय सर्व तुझ्या मनासारखं होईल?"
"अरे देवाशी व्यापार करायला निघाला."
"अरे ज्यांनी सर्व ऐश्वर्य दिले त्यालाच ऐश्वर्याचा  एक भाग देउन काय आपलं मनोगत साधणार?"
गोविंद शेठ निरुत्तर होतो.
शंकर स्वामींची करुणा भाकतो आणी म्हणतो स्वामी जर मला त्रास दिल्या मुळे गोविंद शेठ्ची ही
दशा झाली आहे तर त्यांना माफ करा.
तुमचे दर्शन झाले आता माझ्या मनात काहीही खंत उरलेला नाही.
स्वामी म्हणतात:-"पहा किती मोठं हृदय आहे त्याचं, काही शिक् त्याच्यापासून. "
शंकर आपली चूक मान्य करतो.
स्वामी कृपेनी शंकर पुन्हापुर्वी सारखा होतो.

Sunday, April 3, 2011

(५६) शेजार धरम पाळावा


गणेश आणी वसीम शेजारी  होते, पण त्यांचं आपसात पटत नव्हतं.
गणेशचा मुलगा श्याम आणी वसीम चा साजिद मित्र होते, पण आप-आपल्या वडिलांच्या धाकानी
त्यांना आपसात खेळता येत नव्हते.
छोट्या-छोट्या गोष्टींवर, गणेश आणी वसीमच्या खटपटी व्हायच्या.
गणेश आपल्या मुलाकडून फक्त अभ्यास करवायचा पण त्याला खेळू देत नव्हता
आणी वसीम आपल्या मुलाला शिकु देत नव्हता.
वसीम म्हणायचं कि याला पुढे जाऊन आपला  धंदा करायचा आहे, मग शिकायची काय गरज?
एकदा  गणेश आणी वसीमची खटपट चालू असतांना स्वामी येतात, आणी वसीम कडे जातात.
त्याला ते समझ देतात कि मुलांसाठी शिक्षण किती महत्वाचं असतं,वसीम मुलाला शिकवायचं मान्य करतो.
मग गणेशकडे येतात ,त्याला समझ देतात कि नुसतं शिक्षणच नाही  खेळणं सुद्धा मुलांसाठी गरजेच असतं.
पुन्हा एकदा गणेश आणी वसीमच भांडण जुंपत ,
तेव्हा स्वामी येऊन गणेशला सांगतात कि त्यांनी  वसीमचा अपमान केला आहे,आणी त्याला त्याची एकदिवस सेवा करावी लागेल.
गणेश चक्क नकार देतो, वसीम सुद्धा गणेश कडून सेवा करुन घ्यायला तैयार नसतो.
शेजारधर्म पाळा असं सांगून स्वामी परततात.
एकदा वसीमची बायको आणी मुलगा उर्सला गेलेले असतात.
त्याचं दिवशी गणेश कडे सत्यनारायण कथा असते.
स्वामींना आमंत्रण असतं.
स्वामी येतात आणी आल्या बरोबर गणेशच्या हाती कुराण देउन त्याला वाचायला सांगतात.

थोड्या खिन्न माननी  पण गणेश कुराण वाचायला लागतो.
तिकडे वसीम ला देवाज्ञा होते.
वसीमचे घरचे विलाप करतात, गणेश सुद्धा तिथे शेजारी असल्यानी हजार असतो.
स्वामी सांगतात-" वसीम एक नेकदिल  बंदा होता. कुराण वाचतांना त्याच्या शेवटची वेळ आली होती,
गणेशनी वाचलेल्या कुरण ऐकतानाच त्यांनी प्राण सोडले.
आम्ही गणेशला जी सेवा करण्या बद्दल म्हणत होतो, ती सेवा आज गणेश कडून घडली आहे.
वसीम आता जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त झाला  आहे."
गणेशला पण  कळते कि लाख आपण नकार द्यावा पण मनुष्याला देवाची आज्ञा मानावीच लागते.
तो ही वसीमच्या बायको ला आली बहिण मानुन तिच्या परिवाराची जवाबदारी घेतो.