Sunday, September 4, 2011

(७८) सापाचे झाले सोने

मणब्याचा उद्धार पाहून स्वामींना भेटायला निघालेले शास्त्री एका जागेवर विसाव्या साठी थांबतात.
तिथे एका वृद्द्ध आणी गरीब माणसाला पाणी पाजायला एक श्रींमत माणूस घोड्यावरून
उतरून येतो. तो व्यक्ती त्या म्हाताऱ्या माणसाला पण स्वामी म्हणुन हाक मारतो.
शास्त्रीबुवानी विचारल्यावर तो माणूस आपला पूर्व वृतांत सांगतो.
तो बसप्पा असतो, जातींनी तेली पण प्रपंचात मन लागत नाही.
कोणतेही आजीविकेचे कार्य करायची त्याला इच्छाच होत नाही त्याल सुचते ते फक्त नामस्मरण आणी ईश्वराचे ध्यान.
त्यामुळे घरचे अगदी कंटाळले होते.
आणी कंटाळणार पण का नाही? घरात अन्न नाही, भूखेनी रडणारे मुलं-बाळं.
काहीही झाले तरी बसप्पाला ईश्वर उपासने शिवाय दुसरे कार्य करायचीच इच्छा होत नाही.
चित्त शांत व्हावे म्हणुन तो अनेक साधुंशी भेटला अनेकांना गुरु करू पहिले पण चित्ताला ओळख पटली नाही
या मुळे तो उद्विग्न राहायचा.
एकदा वनात त्याला काट्यांमध्ये झोपलेले स्वामी दिसतात.
काट्या मध्ये शांत पणे झोपणारा माणूस साधारण नसावा ,म्हणुन बसप्पा स्वामींशी संवाद करतो.
बसप्पाला पहिल्या  बरोबर स्वामी म्हणतात;-"काय रे तेल्या! घर संसार सोडुन मोक्ष पाहिझे?"
"अरे अशी जवाबदारी टाकून का पळत आहे?"
"घरच्यांना कोण पाहणार?"
स्वामी अंतर्यामी आहे हे कळल्यावर बसप्पा घट्ट स्वामींचे पाय धरतो.
स्वामी म्हणतात:-"योग्य वेळ आली की तुला बोलावु"
काही दिवसांनी रात्री स्वप्नात दृष्टांत देउन स्वामी बसप्पाला बोलावतात.
बसप्पा येतो पण स्वामी दुर जातात.बसप्पा पण मागे-मागे येतो, स्वामींच्या मागे जातांना काटे लागून बसप्पा रक्त-बंबाळ
होतो, तेव्हा स्वामी थांबतात.
स्वामी म्हणतात: 'हमारे साथ चलना इतना आसान नही है, जावो वापस जावो "
"आपल्या संसाराची काळजी घे."
बसप्पा म्हणतो:" प्रपंच आणी परमार्थ एका बरोबर जमत नाही, प्रपंचात ईश्वराचा विसर होतो"
स्वामी म्हणतात:" अरे रामदास स्वामी म्हणुन गेले आहे- "प्रपंच करावा नेटका .........."
"देव प्राप्तीसाठी पळण्याची गरज नाही लायकी झाल्यावर देव स्वत: भेटायला येईल"
" पुंडलिका कडे पांडुरंग आला, एकनाथ कडे पाणी भरले "
स्वामी पुढे जातात. बसप्पा तसाच लंगडत येतो. या वेळेला स्वामी जिथे थांबतात तिथे चारी कडे सापच-साप होते.
स्वामी म्हणतात :- "आमची एवढी सेवा केली त्या बद्दल तुला काही देऊ."
"पण आमच्या कडे काय आहे ? जा हे साप घेऊन जा . वाट्टेल तेवढे साप घेऊन जा."
बसप्पा थरथरतो.
स्वामी एक साप उचलून देतात,बसप्पा जवळ असलेल्या कपड्याची झोळी पसरवतो आणी त्यात साप बांधून घरी जातो.
रस्त्यात साप सोडुन द्यावा असा विचार येतो पण स्वामींनी दिलेला साप कसा सोडु , असा विचार करुन मुकाट्यानी चालत जातो.
घरी गेल्यावर बायको आशेनी गाठोडीत काय आहे म्हणुन विचारते.
तिला काही म्हणणार त्याआधी बायको गाठोडी हिसकवुन घेते.
उघडते तर काय, त्यात चक्क सोन्याचा साप.
बसाप्पाच्या बायकोनी कधी गुंजभर सोनं पाहिलेले नव्हते, आणी आता तर भला मोठ्ठा सोन्याचा साप.
बसप्पा एका काळी पोरा-बाळांना पोटभर अन्न सुद्धादेऊ शकत नव्हता तो आता गावाचा श्रीमंत माणूस बनतो.
त्या दिवशी पासुन बसप्पा प्रत्येक अडलेल्या-नाडलेल्या व्यक्ती मध्ये स्वामी पाहून त्यांना स्वामी म्हणुन हाक मारायचा.आणी यथासांग मदत करायचा.
बसाप्पाचा असा वृतांत ऐकुन नारायण शास्त्री आणखीच गोन्धलतात आणी नव्या जोमानी अक्कलकोट कडे चालायला लागतात.

(७७) गोष्ट मणब्याची

राम नवमी होती. रामजन्मासाठी गावातले प्रकांड विद्वान नारायण शास्त्रींना बोलावण्यात येतं.
रामजन्माच्या वेळेला केशव सपत्नीक येतो. केशवला पहून शास्त्री बुवाच्या तळपायाची आग मस्तकात जाते.
शास्त्रीबुवा केशवच्या कमरेत लात घालुन पाडून देतात. ते
गड्याच्या हाती केशवला हकलून देतात.
केशवचे सर्व पुत्र जन्मापासून मतिमंद होते, म्हणुन शास्त्री बुवा त्याला पापी समझुन तिरस्कार करायचे.
पण केशव अनन्य स्वामीभक्त होता, कितीही वाईट झालं तरी त्याची स्वामी वर श्रद्धा अढळ होती.
त्यांच्या मते गावात अशे पापी माणसे राहिले तर गावावर गंडांतर येतं.
दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुवा पंचायत बोलावून केशवला परिवारा सकट गावा बाहेर काढायला लावतात.
सगळ्या गावात शास्त्रीबुवांचा दरारा होता, म्हणुन पंच त्यांच्या इच्छेप्रमाणे निकाल देतात.
गाव सोडुन, आपल्या मतीमंद मुलांना कुठे जाऊ या चिंतेनी केशव परिवारा सकट विषपान करतो.
संध्याकाळी केशव गाव सोडुन गेला की नाही, हे पाह्यला शास्त्री बुवा गावकऱ्या बरोबर येतात.
पाहतात तर पूर्ण परिवार विषप्राशन करुन पडला होता,फक्त मणब्याची नाडी चालत होती.
शास्त्री बुवा मणब्याला वनात सोडायला सांगतात.
गावकरी मणब्याला वनात सोडायला जातात. वनात त्यांना भारदस्त चाहूळ लागते, कोणी तरी हिंस श्वापद
असावं, असं समझुन गावकरी मणब्याला तिथेच सोडुन परततात.
दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुवा आणी गावकरी मणब्या बद्दल गोष्ठी करत असतात..
शास्त्रीबुवा म्हणतात: "अर्ध्या रस्त्यात मणब्याला सोडले तरी काही काळजी करू नका,
आधीच पोटात विष आहे आणी तुम्ही लोकांच्या
मागे जे श्वापद लागले होते त्यांनीच त्याला खाऊन टाकले असावे.
" नाही... नाही ...., शास्त्रीबुवा तुमच्या दोन्ही गोष्ठी चूक आहे, मी जिवंत आहे."

शास्त्रीबुवा पाहतात तर काय? हे वाक्य मणब्याच्या तोंडाततुन पडले होते.
मणब्या जो आधी बे..बे असा आवाज काढून इशाऱ्यानी बोलायचा तो असं अस्खळीत बोलत होता.
शास्त्री बुवा म्हणतात: "तु जिवंत कसा आणी तु बोलायला कसा लागला?"
मणब्या फाड-फाड बोलून सांगतो की वनात एक साधू आले आणी त्यांच्या कृपेनी मी बोलायला लागलो आणी
माझा मतीमंद पण पण गेला.
गावकरी म्हणतात की असं भेटलं तरी कोण तुला ?
मणब्या ओल्या मातीवर काडीनी रेखा चित्र काढून दाखवतो.
गावकरी पटकन ओळखतात: " हे तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ"
शास्त्रीबुवा दातओठ चावुन राहतात. आता कोणच्याही कारणांनी मणब्याला गावा बाहेर काढता येणार नव्हते.
सर्व लोकं स्वामींचा जय-जयकर करतात.
शास्त्रीबुवा पुन्हा मणब्याला विचारतात " स्वामींनी मग तुझ्या आई-वडिलांना आणी भावांना का नाही वाचवले?"
मणब्या एका विद्वानासारखे उत्तर देतो-" संत निसर्ग नियमात सहसा बदल करत नाही, अगदी विशिष्ट परिस्थिती ला वगळून"
"माझे आई-वडील आणी भाऊ आपल्या गतीला प्राप्त झाले, त्यांच्या साठी हेच उत्तम होते."
"जीवन जगणे हे महत्वाचे नाही जन्म-मरणाच्या चक्रातून सुटणे हे महत्वाचे आहे."
मणब्याच्या काय पालट मुळे शास्त्री बुवांचे डोके एकदम फिरते.
ते मुकाट्यानी असा स्वामी समर्थ आहे तरी कोण हे पहायला अक्कलकोट साठी प्रस्थान करतात.

Sunday, August 28, 2011

अनेक रूप असली तरी देव एकच असतो

रमाकांत नावाचा एक स्वामीभक्त होता. आनंदाचार्य त्याचे गुरु होते, ते जगत फक्त श्रीकृष्णाला मानायचे.
आनंदाचार्य तशे गयेत राहायचे पण त्यांचं सतत  तीर्थाटन चालत राहायचे.
रमाकांत गरीबीनी गांजला होता, सावकाराचे त्याला कर्ज झाले होते.
ते फेडता न आल्यानी तो वैतागला होता.
तो स्वामींकडे, आपल्या गुरुची भेट घडावावी अशी इच्छा व्यक्त करतो.
स्वामी म्हणतात:-" लवकरच तुला तुझ्या गुरुची भेट घडेल."
आनंदाचार्य त्या वेळेला तीर्थाटन करत होते, स्वामी प्रेरणेनी त्यांना रमाकांत ची आठवण होऊन ते स्वत:
रमाकांत ला भेटायला येतात. रमाकांत त्यांना स्वामी कृपेनी भेट घडली असं सांगतो.
आनंदाचार्य थोडेशे खिन्न होतात, कारण त्यांच्या मते जगाचा नियंता श्रीकृष्णाला वगळून रमाकांत एका माणसाची सेवा
 करतो, या गोष्टीचा खंत होतो.
ते रमाकांतला समझवायचा प्रयत्न करतात पण रमाकांत उलट त्यांनाच स्वामी ईश्वर आहे अशे सांगतो.
काही वेळानी सावकाराचा माणूस येऊन रमाकांताशी हुज्जत घालतो.
आनंदाचार्य हसतात की पाहु याचे स्वामी कशे सोडवणार या संकटातून, पण काय रमाकांताचा जुना मित्र येउन कधी तरी उसणे
घेतलेले पैशे रमाकांतला फेडुन संकट टाळतो.
रमाकांत स्वामींचे आभार मानतो हे, ऐकुन आनंदाचार्य चडफडतात.
काही दिवसांनी रमाकांत चा मुलगा याला फणफणून ताप येतो, बाहेर सोसाट्याचा पाऊस पडत असतो.
रमाकांत आनंदाचार्य यांना विनंती करतो की माझ्या मुलाचे रक्षण करा, पण आनंदाचार्य म्हणतात की अरे तुझ्या स्वामींना
हाक मार.
रमाकांत यावेळेला हतबल होतो.
तितक्यात दारावर एक थाप पडते. दार उघडल्यावर एक अनोळखी माणूस आत् येतो.
तो पावसा पासुन बचावासाठी आलो आहे असं सांगतो, आपलं परिचय देताना आपण वैद्य असल्याचे सांगतो.
रमाकांत त्याला आपल्या पोराला वाचवा अशी विनंती करतो.
वैद्य बुवा मुलाच्या कपाळावर हात काय फेरतात की मुलगा लगेच डोळे उघडतो, मग आपल्या बटव्यातून
एक औषध देउन वैद्यबुवा पाऊस थांबला असे सबब देउन जातात.
सकाळ पर्यंत मुलगा खडखडीत बरा होतो.
आनंदाचार्य थोडेशे गोंधळतात. ते आता रमाकांताला बुचकळ्यात पाडण्यासाठी काही ठरवतात.
ते रमाकांताला सुवर्णभस्म युक्त अशी खीरेची मागणी करतात.
रमाकांत कडे साध्या जेवणाचे सुद्धा हाल होते, मग खीर ती पण सुवर्णभस्म युक्त कुठून आणणार?
दो देवघरा कडे जाऊन स्वामींची मनोमन प्रार्थना करतो:-" लज्जा राखी स्वामीराया...."
काही वेळानी डोळे उघडतो तर काय देवासमोर एक वाटी ,त्यात खीर ती पण सुखे मेवे आणी स्वर्ण भस्म भुरकटलेली.
तो स्वामींना मनोमनी धन्यवाद देउन वाटी आपल्या गुरु समोर ठेवतो.
आनंदाचार्य आश्चर्य चकित होतात. रमाकांत त्यांना जेव्हा सर्व वृतांत सांगतो तेव्हा त्यांना गहिवरून येतं.
स्वामी कोणी साधारण मनुष् नव्हे तर पूर्ण ब्रह्मच आहे याची त्यांना खात्री पटते.
आनंदाचार्य , रमाकांत सोबत स्वामी दर्शनाला येतात.
स्वामी त्यांना पाहताच म्हणतात-" काय रे, श्रीकृष्णाला सोडुन एका मनुष्याच्या दर्शनाला कशाला आला ?"
आनंदाचार्य मान खाली घालतात.
स्वामी म्हणतात:" पहा आमच्यात आणी तुमच्या कृष्णात काही साम्य आहे का?"
आनंदाचार्य पाहतात तर काय ? डोक्याला मोर पीस, हातात बासरी असलेला पितांबरधारी कृष्ण समोर उभा आहे .
स्वामी म्हण्झेच श्रीकृष्ण आहे, ही त्यांना खात्री पटते. ते स्वामींचा चरणी लीन होतात.
इकडे रमाकांताला स्वामींच्या जागेवर, धो-धो पावसात अपरात्री येऊन आपल्या पोराला बरे करणारे वैद्य बुवा दिसतात.
त्याला कळते की स्वामी खुद्द वैद्याच्या रुपात आपली मदत करायला आले होते. त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत राहतात.
स्वामी बोध करतात:- " अरे देव एकच असतो पण तो वेग-वेगळ्या रुपात व्यक्त होतो"
"ज्या व्यक्तीला जे रूप पटते त्या रुपाची तो भक्ती करतो"
" आपली इच्छा दुसऱ्यावर लाडू नये, ज्याला ज्या रुपाची भक्ती करायची त्याला ती करू द्यावी."
आनंदाचार्य आपली चूक मान्य करतात.