Monday, September 12, 2011

(८३) उंदीरास जीवनदान

शास्त्री पुढे निघतात, रस्त्यात त्यांना मोरोपंत नावाचा एक राजपुरोहित एक वृतांत सांगतो.
गणेश चतुर्थीचा दिवस होता.राजमहालात गणपती बसवायची पूर्ण तैयारी झाली होती.
मोरोपंत राजाची  वाट पाहत असतात. तितक्यात तिथे एक  उंदीर येऊन थैमान घालतो.
काहीही केल्या तो पकड मध्ये येत नाही.
राजा देवघरा कडे येतात तर पहातात की स्वामी आलेले आहे.
आता स्वामींशी बोलावे की गणपती स्थापना करायची, स्वामी त्याला गणपती स्थापना कर अशेसांगतात.
स्वामी बाहेर झोपाळ्यावर बसतात.
राजा पुजेला बसतो, उंदीर पुन्हा येऊन मोरोपंतांना नडतो.
मोरोपंत हातातले चंदनाचे खोड नेम धरुन उदिंराला मारतात. उंदीर प्राण सोडतो. शिपाई उन्दिराला बाहेर फेकायला जातात.
स्वामी त्याच्या कडून मृत उंदीर घेतात आणी त्याच्या पाठीवर प्रेमानी हात फिरवतात.पाहता-पाहता उंदीर जिवंत होतो.
सर्व जण थक्क होतात.
स्वामी मोरोपंताला बोध करतात: " अरे सर्व जीवात देव असतो, अरे जीवाचा वध करुन मूर्तीपुजेनी काय देव प्रसन्न होणार का?"
"अरे जर उंदीर त्रास देतो तर त्याला पकडून दुर सोडा पण जीव घेणे योग्य नाही."
"आणी मोरोपंता, रागाला आवरत जा, योग्य वेळेला राग येणे गरजेचे असले तरी शुल्लक गोष्टीवर राग करू नये."
मोरोपंत कधीही राग न करण्याचे प्राण करतात.
स्वामी म्हणतात: " अरे ह्या उंदीराला मनुष्य जन्म घेऊन आमची सेवा करायची आहे,
तो मनुष्य जन्म घेऊन आमची सेवा करेल तेव्हा त्याला मोक्ष मिळेल."
ही कहाणी ऐकुन पण नारायण शास्त्री स्वामी बद्दल अनादारानी बोलतात.
स्वामींच्या बद्दल अनादर दाखवल्या मुळे मोरोपंतांना जाम राग येतो पण ते कशे-बशे रागावर आवर घालतात.
नारायण शास्त्री  आपला पुढचा प्रवास करायला निघतात.

(८२) भाकड गाय दुध देते

रस्त्यात एका धर्म शाळेत नारायण शास्त्रींचा मुक्काम असतो. तिथे त्यांना एक ब्राह्मण प्यायला निशुल्क दुध देतो.
कारण विचारल्यावर तो सांगतो की पौर्णिमेच्या दिवशी तो वाटसरूंना निशुल्क दुध देतो.
नंतर तो आपली कथा सांगतो-
त्याचे नाव कृष्णंभट असतं. त्याच्या  गाय दुध देणे बंद करते. तरी तो तीचं नीट संगोपन करत असतो.
तो, दुसरे काही उत्पन्न नसल्यानी दारिद्रानी गांजलेला असतो.
एकदा स्वामींना तो घरी बोलावतो. त्यांचं पूजन करतो स्वामी नैवेद्य म्हणुन दुध मागतात.
कृष्णंभटला दुध देता येत नाही तो घरी दुध नसल्याचे सांगतो.
स्वामी म्हणतत: " काय रे खोटं कशाला बोलतो ,घरात गाय आहे पण आम्हाला दुध नाही अशे सांगतो."
कृष्णंभट म्हणतो : "अहो स्वामी ती गाय भाकड आहे दुध देत नाही."
स्वामी म्हणतात: " अरे ती गाय दुध देते ,आमच्याशी खोटं बोलतो."
कृष्णंभट स्वामींच्या समाधानासाठी बायकोला गाईचे दुध काढ अशे सांगतो.
दुध येणार नाही तेव्हा स्वामींचे समाधान होईल.
बायको थोडीशी चिडून दुध काढायला जाते, पण काय गाईच्या थनातून दुध येते.
तिला आधी भास वाटतो पण पाहता-पाहता हातातला पेला गच्च भरून जातो.
मोठेभांडे आणले जातात तेही भरतात.
कृष्णंभट आणी त्याची बायको स्वामींच्या चरणात पडतात.
नारायण शास्त्री ना तर आता स्वामी पक्के मांत्रिक वाटतात ते आपला पुढच्या प्रवासाला निघतात.

(८१) निपुत्रिक स्त्रीला पुत्र प्राप्ती

नारायण शास्त्री  पुढे जातात तर रस्त्यात एक लहान मुलगा स्वामी भक्ती करतांना दिसतो. शास्त्री त्याच्या आईला जाब विचारतात
की एवढ्या लहान मुलाला हे काय स्वामी भक्ती शिकवली.
ती बाई सांगते की हा अवधूत स्वामींच्या कृपेमुळेच झाला आहे.
ती आपली कहाणी सांगते.
तीच नाव रुख्मीणी असतं, लग्नानंतर फार वर्षे होऊन ही तिला संतती होत नसते, आणी त्यावर तिला क्षय रोग ही जडतो.
तिच्या नवऱ्याचा मित्र तिला स्वामींकडे आणतो. स्वामी तिला बोरीच्या झाडाची सेवा करायला सांगतात.
मागच्या जन्माच्या कर्मा मुळे हे झालं आहे पण बोरीच्या झाडाची सेवा केल्यानी हे दोष फिटणार.
बोरीचे झाड काही देवीय झाड नाही म्हणुन जोडपं वडाच्या झाडाची  प्रदक्षिणा करतात.
हे पाहून त्यांना स्वामी कडे नेणाऱ्या भक्ताला दुःख होतं आणी तो स्वामींकडे जातो.
स्वामी तिथे बोरीचे रोप लावत असतात. भक्त म्हणतो स्वामी हे रोप मोठे होईल तो पर्यंत रुख्मिणी काही राहणार नाही.
स्वामी म्हणतात की तिच्या साठी मुंबईच्या कामाठीपुऱ्यात कधीचे झाड लागले आहे.
भक्ताला स्वामींच्या वाक्यातली खोच कळते, तो लगबगीने रुख्मीणी कडे येउन स्वामी वचनाचे मर्म सांगतो.
भक्त म्हणतो: "रामाला बोर खाऊ घालणारी शबरी राम मय झाली होती तसेच स्वामी सुत राममय झाले आहे.
बोरीच्या झाडाशी तात्पर्य त्यांच्या मठात सेवा करण्याशी आहे."
रुख्मिणीचा क्षय रोग फार वाढला होता तरी ती कशी-बशी हिम्मत करुन मुंबईच्या मठात जाते आणी सेवा सुरु करते.
तिला तिथे दिवस जातात आणी त्या मध्ये तिला कळत सुद्धा नाही तिचा क्षय रोग केव्हा बरा झाला.
गोपाळ अष्टमीच्या दिवशी जसाच गोपाळ कृष्णाला पाळण्यात ठेवण्यात येतो तेव्हाच तिला पण पुत्र प्राप्ती होते.
त्या मुलाचे नाव अवधूत ठेवण्यात येत.
नारायण शास्त्रीना आता स्वामी कोणीतरी मांत्रिक वाटतो ते स्वामींना भेटायला पुढचा प्रवास करतात.