Sunday, October 2, 2011

(९१) स्वामीनी केली कर्जापासून सुटका

सोलापूर मध्ये राहणाऱ्या एका गृहस्थाची ही कथा आहे. विशेष म्हणजे काही वर्षा पूर्वी झालेली ही घटना
आहे.
एक गृहस्थ होता. घराच्या कर्जाचे हप्ते फेडता न आल्यानी बँक त्याचे घर जब्त करणार होती.
तो कंपनीत कर्जा साठी अर्ज करतो पण लोन पास होत नाही
आणी उलट जागतिक मंदीमुळे त्याला नारळ मिळतो.
नोकरी गेली आता घर जाऊन आपण सडकेवर येणार या भितीनी तो आपल्या मुली आणी बायकोला घरी सोडुन
वाटेल त्या वाटेला पळून जातो.
एका बागेच्या बाकावर तो हात-पाय गळुन बसला होता, तितक्यात एक रुबाबदार सुट घातलेला माणूस मोटारीतून उतरतो आणी
स्वामींच्या मंदिराचा रस्ता विचारतो.
नंतर तो श्रीमंत माणूस आपुलकीनी त्याच्या चिंतेचे कारण विचारतो. तो गृहस्थ आपले सर्व वृतांत सांगतो.
श्रीमंत व्यक्ती त्याचे सांत्वन करुन त्याला बोध करतो:
"मार्ग कधीही संपत नाही मनुष्याचा शोध संपतो "
"अरे आपले दुख किती मोठे आहे हे जगाला न सांगता, दुखाला सांग की माझा देव किती मोठा आहे"
दुखत असलेल्या माणसाला कितीही कोणी सम्झावले तर फारसे पटत नाही. श्रीमंत माणूस जातो पण त्याची ब्रीफ केस राहुन जाते.
तो गृहस्थ ओरडून श्रीमंत व्यक्तीला थांबवतो पण तो श्रीमंत माणूस कार मध्ये बसून निघून जातो.
गृहस्थ मागे परततो तेव्हा त्याच्या हातातून ब्रीफकॅस पडते आणी उघडते, गृहस्थ पाहतो तर काय त्यात पैशे होते.
तो एका निर्जन  स्थानी पैशे मोजतो तर काय नेमके तेवढेच पैशे जेवढे त्याचे कर्ज होते.
तो त्या श्रीमंत व्यक्तीला आठवतो तर त्याचा चेहरा-मोरा फार काही स्वामी सारखंा होता. त्याला कळतं की स्वामीच
श्रीमंत व्यक्तीच्या रुपात येउन त्याची मदत करुन गेले आहे.
तो घरी परततो. तेव्हा बँक त्याच्या बायको-लेकीला घराबाहेर काढून घर सील करत होतं,
तो बँकेच्या माणसाला पैशे देउन घराचा ताबा मिळवतो.
जेव्हा बायको-लेकीला सर्व वृतांत सांगतो, तेव्हा दोघींनाही गहिवरून येत.
ते अनन्य भावांनी स्वामींच्या फोटोला नमस्कार करतात.

(९०) गोष्ट इच्छा भोजनाची

दामाजी आणी तुळसा एक जोडपे होते. ते अत्यंत दरिद्री असले तरी त्यांना स्वामींना भोजन करावायचे होते.
ते शिधा घेऊन स्वामींकडे येतात.
स्वामी त्यांना आम्ही चर-चरात आहे असं सांगुन धर्मशाळेत जेवण तैयार करुन चार ब्राह्मण वाढ, असे सांगतात.
दामाजी चार ब्राह्मणांना जेवण घालतो.
आता त्यांच्या कडे तीन पत्रावळी इतकेच अन्न शिल्लक उरते. एक पत्रावळ स्वामींना देउन
नंतर आपण भोजन करू असे ते ठरवतात.
तितक्यात एक हिंदी भाषी बिहारी ब्राह्मण येउन जेवणाची इच्छा प्रगट करतो.
दामाजी त्याला एक पत्रावळभर अन्न देतो.
पण तो पूर्वी ब्राह्मण जेवणाचा पक्का होता. तो अजून जेवण मागतो.
दामाजी दुसरी पत्रावळ पण देतो.
ब्राह्मण तरीही अन्न मागतो.
शेवटी दामाजी त्याला शेवटची उरलेली पत्रावळ पण देतो.
ब्राह्मण तृप्त होतो आणी जाता-जाता त्यांना  पत्रावळीतली काही भजी प्रसाद म्हणून देतो.
दामाजी आणी तुळसा स्वामींचे दर्शन करुन प्रसाद ग्रहण करू अशे ठरवतात.
स्वामी त्यांना पहिल्या बरोबर म्हणतात: " अरे पेट भर भोजन कराया पर भजीये में नमक कम था."
दामाजी आणी तुळसा भजी खातात तर खरच मीठ कमी होते.
त्यांची खात्री पटते की स्वामी बिहारी ब्राह्मणाच्या रुपात येउन अन्न ग्रहण करुन गेले होते.
तितक्यात नारायण शास्त्रीनी पाठवलेली दोन इंग्रज अधिकारी स्वामींची उगीच्ची शहा-निशा करुन चमत्कार दाखवा असा हट्ट करतात.
स्वामी फाडकन म्हणतात: "पहिले एकमेकांच्या बायका बरोबर झोपणे बंद करा मग या आमची चोकशी करायला या."
आपले गुपित स्वामी जाणुन आहे हे कळल्यावर इंग्रज अधिकारी मान खाली घालुन चालते होतात.

(८९) गच्छत: स्खलनं क्वापी, असे मानुनी नच हो कोपी

पांडुरंग एक उत्तम दर्ज्याचा सोनार होता पण तो जमीनदाराच्या कर्जामुळे गांजला होता. कर्ज न फेडता आल्यानी त्याचे घर जब्त
होणार होते. पण कितीही संकट आले तरी तो स्वामींचे नामस्मरण सोडत नव्हता.त्याचा ठाम विश्वास होता की नाम स्मरणानी
त्याचे भोग संपतील.
अश्या परिस्थितीत त्याला सावकारा कडून दागिने करण्यासाठी आगाऊ रक्कम मिळते.
पांडुरंगला कुबुद्धी होऊन तो चांदीचे दागिने करतो आणी सोन्याचे पाणी चढवून देतो.
आणी वाचलेल्या पैश्यांनी जमीनदाराचे कर्ज फेडतो.
पण खोटे काम किती दिवस लपणार, सावकार त्याला अटक करवतो.
न्यायाधीश त्याला १०० फटक्याची शिक्षा ऐकवतो.
शिपाई फटका घेऊन पांडुरंग सोनारावर  मारतो पण काय त्याच्या पाठीवर लागायच्या आधी फटका फुलाच्या माळेत
बदलतो.
तितक्यात तिथे स्वामी प्रगट होतात.
स्वामी पहिले तर पांडुरंगाची चांगलीच हाजेरी घेतात मग म्हणतात :
"पांडुरंग तु अपराध जरी केला तरी अपराधाच्या तीव्रते पेक्ष्या तुझी भक्ती  जास्त होती, म्हणुन आम्हाला यावे लागले."
मग स्वामींच्या दृष्टीनी चांदीचे दागिने पूर्णपणे सोन्याचे होतात.
स्वामी पुन्हा बोध करतात:" भोग संपवण्या करता वाईट मार्गाचा वापर करू नका तात्पुरते भोग संपले तरी जास्त तीव्रतेनी
ते परतणार."
पांडुरंग आपली चुक मान्य करुन अनन्य भावांनी स्वामी चरणीलीन होतो.