Monday, November 7, 2011

(१०३) दुष्काळा पासुन सुटका

एकदा अक्कलकोट मध्ये दुष्काळ पडतो. खायला अन्न नाही आणी प्यायला पाणी नाही.
लोकं आसुसून पावसाची वाट पाहतात पण पाऊस काही
पडत नाही. सर्व स्वामींकडे येतात. स्वामी त्यांना रेणुका-सहस्त्रनाम आणी पर्जन्य-सुक्त वाचायला सांगतात.
काही जन उपासनेला बसतात पण पाऊस काही पडत नाही.
स्वामी आपल्या एका भक्ताला घेऊन अक्कलकोटच्या बाहेर पडतात.
तिथे एका शिव मंदिरात जातात.
तिथल्या शिवाच्या पिंडीला रोखटोक पणे विचारतात :"काय समस्या आहे तुमची? पाऊस का नाही पाडत?"
मग तिथुन निघतांना स्वामी म्हणातात:" आम्ही वळसण गावाला पोहचू तो पर्यंत पाऊस पडला पाहिजे."
स्वामी त्या मंदिरातून परततात, चालता-चालता वळसण  गाव लागतो तरी पावसाचा काही थांग-पत्ता नसतो.
स्वामी तिथल्या शिव मंदिरात जातात.
स्वामी तिथल्या शिव-पिंडीला जाब विचारतात:-" काय समस्या आहे तुमची ? पाऊस का नाही पाडत ?"
" अच्छा हरभरे पाहिजे तुम्हाला ?"
मग स्वामी भक्ताला आज्ञा करतात:- "जा हरभरे घेऊन ये."
भक्त गेल्यावर स्वामी स्वता शिव आराधना करायला बसतात.
स्वामी जोर-जोऱ्यात उपासना करतात:-" शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो .."
'हे  गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो "
" शंभो s s ......"
इकडे स्वामी शिव आराधना करतात तिथे गावकरी स्वामींनी सांगीतलेली आराधना करतात.
मग काय  नर-नारायण एक होता, पाऊस काय पडल्या शिवाय राहणार?
एकदम आकाश  ढगांनी अंधारून जाते आणी जोरदार पाऊस पडायला लागतो.
स्वामी जेव्हा अक्कलकोटला परततात तेव्हा सर्व गावकरी
स्वामींच्या चरणी लीन होतात.
स्वामी बोध करतात: " अरे निसर्ग कोपतो याचे करण असतं. तुम्ही लोकांचे कर्म जवाबदार असतात. "
"तुम्ही आपल्या स्वार्थ आणी सोयी साठी निसर्गाची विटंबना करतात."
" हिरव्या झाडांना कापतात. अरे उन्हाळ्यात ज्या झाडा खाली विसावा घेतात, थंडीत त्याचं झाडाला कापून
त्याची शेकोटी करतात."
"मनुष्याचे पापं वाढले की निसर्ग कोपतो आणी निसर्ग कोपल्यावर देवाला दुषण लाऊन काहीही साध्य नाही होणार."
"मनुष्यांनी न्यायनी वागावे, निसर्गाचा मान राखावा, आपल्या स्वार्थावर आटोका ठेवावा."
"ईश्वर कधीही अन्यायी नसतो पण होणारा त्रास प्रतिकुल कर्मामुळेच उद्भवतो."
"म्हणुन मनुष्यांनी सतत ईश्वराची उपासना करावी.कळत-नकळत झालेले दोष ईश्वर भक्तिनी घालवावे."
सर्व गावकरी आपली चुक मान्य करतात.

(१०२) पाप पुण्याचा जमाखर्च

गोविंद नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. तो फार दान-पुण्य करायचा. पण तो एका भयंकर व्याधींनी ग्रस्त होता-
भोजन झाल्यावर त्याच्या पोटात भयंकर वेदना व्हायच्या.
त्याचा मित्र त्याला स्वामींकडे आणतो.
स्वामी उपाय संगतात्त- "सात दिवस फक्त गाईचे शेण खायचे आणी गोमुत्र प्यायचे, या अतिरिक्त काहीही खायचे नाही."
उपाय म्हणजे अगदी द्रविडी प्राणायामच होता पण प्रचंड  वेदनेंना आठवून गोविंद तैयार होतो, सात दिवसा नंतर
तो पूर्ण पणे बरा होऊन स्वामींच्या चरणी पडतो.
तो स्वामींना विचारतो-" मी इतके दान पुण्य करतो तरी माझ्या वाटेला हे दुख का आले?"
स्वामी म्हणतात:" अरे भाग्यानी तु श्रीमंत झाला आणी थोडे-फार दान पुण्य करण्याची काय गमजा मारतो?"
"अरे जे थोडे फार असते त्यातले पण कुणाला देणे ह्याला खरी किम्मत आहे."
"श्रीमंतानी सुपात्र गरजवंतांना दान केलेच पाहिजे."
"आणी तुझ्या भोगला तुझीच कर्म जवाबदार आहे."
गरीब असताना तुझ्या कडे एक गाय होती, ती वृद्ध होऊन तिनी जेव्हा दुध देणे बंद केले तेव्हा तु तिचा चारा बंद केला."
"ती गोमाता भूखेच्या वेदना सहन करत मेली, तुझ्या हातून घडलेल्या या पापा मुळे तुला हे भोग प्राप्त झाले आहे."
"अरे आपली कशीही परिस्थिती असली तरी मनुष्याला आपले कर्तव्य सोडता येत नाही."
गोविंद आपली चुक मान्य करतो आणी स्वामींनी रोगमुक्त केल्या मुळे स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतो.

(१०१) मनुष्य आणी स्वार्थ

नारायण नावाचा एक राजस्थानी माणूस होता. त्याची बायकोची प्रसुतीची वेळ आली होती पण मुल अडले होते.
काहीही करुन बायकोची प्रसुती होत नव्हती.
तितक्यात एक साधू येउन त्याला सल्ला देतो की अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना साकडं घाल आणी मुल झाले की
अक्कलकोटला ब्राह्मण वाढ.
हेकेखोर नारायण पहिले वाद घालतो पण अडलेला माणूस कितीवेळ हट्टावर पेटून राहणार.
तो शेवटी स्वामींना बायको आणी संततीसह  अक्कलकोटला येईन असा नवस सांगतो.
नवस करताच लगेच त्याची बायको सुखरूप प्रसूत होते.
पाहता-पाहता मुलगा मोठा होतो तरी नारायण नवस फेडत नाही. त्याची आईनी आठवण करुन दिली तर तो
तीचाशीच हुज्जत घालायचा.
एकदिवस आईनी अन्न-पाणी त्याग करणार अशी धमकी दिल्यानी तो अक्कलकोटला यायला तैयार होतो.
अक्कलकोटला जसाच तो स्वामींचे पाया पडतो, स्वामी त्याला पाडून देतात.
स्वामी रागावतात:" अरे कृतघ्ना ! आता आठवण आली नवस फेडायची.चल चालता हो."
नारायण परिवारासह परत फिरतो.
मुक्कामाच्या जागेवर येताच त्याला कडकडून ताप येतो आणी तो अंथरुणाला खिळतो.कितीही उपचार झाले तरी तो
बरा होत नाही. अनेक दिवस झाल्यावर त्याला पश्चाताप होतो आणी तो स्वामींची करुणा भाकतो.
आपली चुक झाली अशी प्रांजळपणे कबुली देतो.
लगेचच स्वामी तिथे प्रगट होतात आणी त्याला बोध देतात:
" अरे तुझ्या अहंकार आणी कृतघ्नपणा मुळे तुला हे भोग प्राप्त झाले होते,तुझ्या या आजारपणामुळे ते भोग संपले,
आणी आपली चुक प्रामाणिक पणे कबुल केल्यानी तुझ प्रायश्चित ही झाले."
असं म्हणुन स्वामी अदृश्य होतात.
नारायण लगेच बरा होतो आणी मनोमन स्वामींना नमस्कार करतो.