Monday, February 27, 2012

(११५) उपेक्षु नको भगवंता




शेषाचार्य एक आध्यात्मिक उंची गाठलेले व्यक्ती होते. स्वामी म्हणायचे आमची आणी शेषाची युगा-युगाची गाठ आहे.
त्रेतायुगात तो लक्ष्मण तर द्वापारात बलराम म्हणून आमची साथ देत आहे.
स्वामींना कितीही राग आला तरी तो शेषाचार्यांच्या उपस्थितिनी त्यांचा राग शमायचा.
शेषाचार्यांकडे कुलदेवता बालाजीचे पारणे असते. ते विचार करतात की स्वामी म्हणजे साक्षात बालाजी ते असतांना मंदिरात कशाला जायचे.
ते स्वामींना बोलवणे करायला येतात. तिथे असलेली मिठाई स्वामी सर्व उपस्थित लोकांमध्ये वाटायला सांगतात 
पण शेषाचार्यांना काही मिठाई मिळत नाही.
मिठाई म्हटले की शेषाचार्यांचे जीव की प्राण.
मिठाई पाहून त्यांच्या मनात 'मिठाई जिभेला किती सुखद लागते' अशे विचार येतात.
संध्याकाळी त्याच्याकडे स्वामी पारण्याला काही जात नाही. शेषाचार्य येतात तर स्वामी झोपलेले भेटतात आणी शेषाचार्य गेल्या बरोबर 
स्वामी उठून बसत्तात.
दुसऱ्या दिवशी शेषाचार्य स्वामींकडे जातात तर स्वामी त्यांना हाकलुन देतात.
शेषाचार्य मनात विचार करतात की आपल्या हातून काय चूक झाली की स्वामी आपली उपेक्षा करून राहिले आहे.
विचार करता-करता त्यांच्या लक्ष्यात येते की आपली जी मिष्टान्नावर जी वासना जडली त्यामुळे स्वामींना राग आला असावा.
त्या चुकेचे प्रायश्चित म्हणून शेषाचार्य शेण खातात..
गाईचे शेण फार पवित्र असल्यांनी स्वामींचा त्यांच्यावर असलेला रोष कमी होतो.
या वेळेला स्वामी शेषाचार्याची उपेक्षा करत नाही.
स्वामी म्हणतात: " अरे कोणाच्याही भौतिक वस्तू वर वासना जडणे म्हणजे मोक्षाच्या मार्गातली फार मोठ्ठी अडचण. अरे षड-रसाचा
मोह त्याग केल्या शिवाय अध्यात्मिक उन्नती कशी होणार ?"
शेषाचार्य पुढे वासने पासून सावध राहण्याचा निश्चय करतात.

Tuesday, February 21, 2012

(११३) एका बरोबर पाच रूप, घेतले आपण हे देव अरूप

अक्कलकोटला आषाढी एकादशीचा उत्सव असतो. पण  चोळ प्पाची इच्छा होती की स्वामींनी दर वेळे प्रमाणे त्याच्या घरी यावे.
त्याचीच नाही तर इतर ३ भक्तांची पण अशीच इच्छा होती.
बाळप्पा यांची  स्वामींनी अक्कलकोट-गावाच्या उत्सवाला हजर राहावे अशी होती.
या प्रकरणा मुळे त्या सर्वांचा आपसात थोड वाद होतो.
स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हा सर्वांना एक परीक्षा द्यावी लागेल जो उतीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ.
पण ठेवण्यात येतो. हातात तेलानी गच्च भरलेली पंती घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थाना वरून सर्वानी स्वामींकडे यायचं.
जो पहिले येईल तो जिंकेल आणी स्वामी त्याच्याच घरी येईल.
पण तेलाचा एक थेंबपण सांडायला नको.
चोळप्पा सर्वांना पछाडून स्वामींकडे पहिले पोचतो.
पण स्वामी म्हणतात: " अरे पहिले तो आये पर मन में हमारा नाम कहा था ?"
मग काय सर्वच अनुतीर्ण झाले होते. आता स्वामी फक्त गावाच्या उत्सवात हजर राहणार होते.
सर्वांना खंत होतो. आणी होणार पण का नाही ? कारण एवढी सोपी गोष्ट न करता आल्यानी स्वामींचे चरण त्यांच्या
घरी आता पडणार नव्हते.
सर्व निराश होऊन परततात . पण रस्त्यात सर्वांना स्वामी गाठून सांगतात की मी तुझ्या कडे येणार पण मात्र तू कुणालाही सांगू नको.
आषाढी एकादशी च्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व मध्ये वाद होतो.
चोळप्पा म्हणतात की स्वामी त्याचा कडे आले होते, इतर ३ भक्त पण असंच म्हणतात.
बाळप्पा म्हणतात की उगाच थापा मारू नका स्वामी गावाच्या उउत्सावातून कुठेही गेले नाही.
त्यांचा वाद सुरु असतानाच स्वामी म्हणतात : " अरे तुम्ही लोकं का विसरतात की आम्ही चैतन्य-स्वरूप आहो."
"चैतन्याला स्थूल-देहाच्या मर्यादा नसतात. अरे आम्ही कणा-कणात वावरतो. पाच जागी एका बरोबर प्रगट होणे कोणची मोठी गोष्ट आहे?"
"अरे आम्ही तुमच्या मध्ये सुद्धा आहे, फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची."
"आणी जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतातून हुडकून काढणार तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्म चित्ताला प्राप्त होणार."
"अरे 'अहं ब्रह्मास्मि' उगीच थोडी म्हटले आहे. तुमच्यातच नाही आम्ही सर्व जीवात वास करतो. म्हणून उगाच कुणाला त्रास किंवा मनस्ताप देऊ नका."
सर्व लोकं स्वामींची क्षमा मागतात.
सर्व लोकं स्वामीचे रूप आहे या सिद्धांतावर बसप्पा चालायचे. गरिबाला मदत करतांना सुद्धा ते त्याला स्वामी अशी हाक मारून मदत करायचे.

(११४) अंध श्रद्धा ठेऊ नका


गणपतीबुवा स्वामींच्या दर्शनाला येतात पण स्वामी त्यांना हकलुन देतात.
गणपती बुवांना फार वाईट वाटतं. योगा-योगानी त्याच गावात एक भोंदू साधू कृष्णास्वामी आलेले असतात.
कृष्णा स्वामी लोकांना भासवायचे की ते साक्षात कृष्णाचा अवतार आहे. गणपतीबुवा तर त्यांच्या आहारीच गेले होते. 
आणी याच कारणामुळे स्वामींनी त्यांना हाकलले होते.
स्वामी सदैव सावधगिरी बाळगा अशे म्हणायचे. श्रद्धा ठेवा पण अंध श्रद्धा ठेऊ नका अशी शिकवण नेहमी भक्तांना द्यायचे. पण इथेच तर गणपती बुवा चुकले होते.
गणपती बुवांचा मुलगा अकस्मात आजारी पडतो.
पण कृष्णास्वामी वर अगाढ श्रद्धा असल्यानी गणपती बुवा त्याला वैद्या कडे सुद्धा नेत नाही.
इकडे कृष्णास्वामी यांचे प्रबोधन सुरु असतांना स्वामी समर्थ  तिथे येतात.
कृष्णास्वामी त्यांचा अपमान करतात. आपल्या समोर स्वामी काहीच नाही, अशे मत मांडतात. 
मग स्वामींना आपल्याशी शास्त्रार्थ करावे, अशे आवाहन  पण करतात.
पण स्वामी मुकाट्याने काही न बोलता तिथून निघून येतात.
गावाचे लोकं कृष्णा स्वामींचा जय जयकार करतात.
हा सर्व प्रकार ऐकून गणपती बुवाची कृष्णा स्वामीवरची श्रद्धा वाढते.
त्याशिवाय कृष्णस्वामी त्यांचाशी फार अगत्यानी बोलायचे.
कृष्णास्वामी गावकऱ्यांना भूल घालायला लागले होते कि तुम्ही मला धन-संपदा दान करा त्या बद्दल तुम्हाला अनेकपट धन प्राप्त होणार.
गावकरी सुद्धा  त्यांच्या आहारी जायला लागले होते.
पण इकडे गणपतीबुवाच्या मुलाचा आजार  हाता बाहेर जात होता.
चोळप्पा  कळ-कळीनी त्यांना आपल्या  मुलाला स्वामींकडे न्या अशे सांगतो.
पण गणपतीबुवा चोळप्पाला ढकलून देतात.चोळप्पा पडणार तितक्यात मागून स्वामीसमर्थ त्याला सांभाळतात.
मग स्वामी गणपती बुवाला जाम रागवतात: " मुर्खा अजून तुला अक्कल आली नाही. चांगक्या-वाईटाची पारख तुला कशी येत नाही. डोळे बंद करून असा कुणावर कसा विश्वास ठेवतो."
गणपती बुवा तरीही काही ऐकायला तैयार नसतात.
मग स्वामी म्हणतात: " बघ तुझा कृष्णास्वामी काय करतो आहे ?"
सर्व लोकांना समोरच्या भिंतीवर कृष्णास्वामींचे  कृष्ण-कृत्य दिसतात.
कृष्णा स्वामींच्या स्त्री-शिष्या नृत्य करत होत्या आणी कृष्णास्वामी  मद्य-पान करत नयन-सुखं घेत होते.
मग काय गणपती बुवा सकट सर्व गावकऱ्यांचे डोळे उघडतात.
गणपतीबुवा स्वामींची करुणा भाकतात. कृपासिंधु स्वामी आपल्या कृपा-दृष्टीनी त्यांच्या मुलाला खडखडीत बरा करतात.
इकडे सर्व गावकरी कृष्णास्वामींना चोप देतात. कृष्णास्वामी पळत स्वामी शरणी येतो.
पण स्वामींना खोटे काम करणारे आणी दुसऱ्यांना लुबाडणारे लोकं आवडत नसल्या मुळे ते कृष्णास्वामीला गाव सोडून जा अशी आज्ञा करतात.
कृष्णास्वामी लज्जित होऊन आपल्या शिष्यासह गाव सोडून निघून जातो.