एक न्हावी दुसऱ्या लोकांची श्रीमंती बघून दु:खी व्हायचा.
असमाधानी राहून , सुख प्राप्तीसाठी जास्त प्रयत्न करत राहावे ,असं त्याचं मत होतं.
स्वामींच दर्शन करून तो त्यांचे नखं कापतो.
स्वामी त्याला परिवाराबद्दल प्रश्न विचारतात .
न्हावी उत्तर देतो, जमेल तितकं मुला-बाळांचे हट्ट पुरवतो.
स्वामी म्हणतात: "भाग्यवान आहे तुझे मूलं-बाळ." .
मग अगदी केविळवाण्या स्वरात म्हणतात: "आमच्या कडे कोणी पाहत नाही, दोन वेळेचं जेवण मिळतं फक्त!"
"मोठे मोठे भक्त, गोष्ठी मात्र मोठ्या करतात, पण करत काही नाही !"
"आम्हाला पण सुख ऐश्वर्य, मिळायला नको का ?"
"आता विचार करतो कि महाराजांकडेच जाऊन राहवं."
"तुझ काय मत आहे ?"
"मी काय सांगू" असं म्हणून न्हावी थोडा ओशाळतो आणी परततो.
घरी जाऊन न्हावी बायकोला स्वामींच्या नखाची पुरचुंडी फेकायला देतो, पण त्याची
स्वामीभक्त पत्नी, संसारी लोकांच दुख दुर करण्यासाठी नखांचा वापर करू असं सुचवते.
ती म्हणते: "स्वामींच्या नखांच ताईत करुन अडलेल्या-नडलेल्यान्ची मदत करू."
इकडे स्वामींकडे एक भट नावाचा एक व्यक्ती पोटदुखीनी बेजार होऊन येतो.
स्वामी त्याला मुरलीधराच्या मंदिराजवळ असलेल्या कडु लिंबाचा पाला खायला सांगतात.
पण त्या झाडाचे पानं कडू जहर असल्यानी भट बुवा खाऊ शकत नाही.
ते प्रांजळपणे स्वामींना कडू पाला खायची कुवत नाही, अशी कबुली देतात.
स्वामी भक्ता सह झाडाजवळ येतात, तिथे एका भक्ताला म्हणतात-
'पाह रे! पाला कडू आहे का?"
भक्त पाला चाखून, पाला फार कडू आहे, असं उत्तर देतो.
स्वामी मग स्वता होऊन एक फांदी तोडून भटबुवांना देतात.
भट बुवा त्या फांदीची पाने खातात आणी ती गुळासारखी गोड आहे, असं सांगतात.
मग म्हणतात : "स्वामी तुमच्या स्पर्शांनी कडू-जहर पाला गोड झाला, त्या बरोबर माझा पोटदुखीचा त्रास पण गेला.
आपल्या कृपे मुळे माझं कडू लिंबा सारखं आयुष्य धन्य झालं.
स्वामी नखाचे ताईत करुन विकणारा न्हावी भाग # २
न्हाव्याच्या शेजाऱ्याचा मुलगा तापांनी फणफणत होता.न्हाव्याची बायको त्याला स्वामीनखाचं ताईत देते.
विहीरी वर सावकाराची निपुत्रिक सुन जीव द्यायला येते. न्हाव्याची पत्नी तिला अडवते,समझुत घालुन एक ताईत देऊन
परतवते.
न्हाव्याचा एक लाकुडतोड्या मित्र सावकाराच्या कर्जात आकंठ डुबला होता. न्हावी त्याला पण एक ताईत देतो.
काही दिवसांनी लाकुडतोड्या न्हाव्याला बातमी देतो कि तुझ्या दिलेल्या ताईतानी तर माझे दिवसच फिरले.
सावकाराच्या सुनेला दिवस गेले व त्या आनंदात सावकारांनी सगळ्यांचे कर्जे माफ केले.
इकडे, बाळप्पा स्वामींना ताईता मुळे भक्तांना झालेले फायदे सांगतात.
स्वामी म्हणतात: "एक राज कि बात बताये !"
"भक्तांना फायदा नखामुळे नाही त्यांच्या विश्वासाच्या भावनेनी होतो "
तिकडे, लाकुडतोड्या मित्र न्हाव्याला सल्ला देतो कि तु ताईत फुकट न देता विक्रय करत जा ,
अशांनी तु श्रीमंत होणार.
न्हाव्याला पण ते पटतं.
मग काय,परमार्थात आपला स्वार्थ पाहिल्या मुळे ताईताची किमया जाते.
ताईत खरेदी करणारे लोकं फळ न मीळाल्या मुळे भडकतात आणी न्हाव्याला चोप देतात.
न्हावी त्या लोका पासून जीव वाचवत पळून स्वामी चरणी येऊन पडतो.
स्वामी मग त्याला चांगलीच समझ देतात- "अरे पहिले तुझी भक्ती आणी विश्वास पाहून , आम्ही तुझा शब्द
ठेवत होतो."
"पण तु स्वताच्या स्वार्थासाठी परमार्थाचा विक्रय करायला लागला."
"परिणाम काय? चोप मिळाला ना?"
"अरे काय कमी होती तुला ,सुज्ञ बायको आहे सोन्या सारखी मुलं आहे."
अरे दुसऱ्यांचा पैसा कशाला पाहतो?
"अरे प्रत्येकाला आप-आपल्या पूर्वकर्मानुसार देव प्रारब्ध देतो."
"भगवंताची सेवा करुन मनाची श्रीमंती प्राप्त कर."
"मनाची श्रीमंतीच खरी श्रीमंती आहे."
"तुझ्या बायको-मुलांना पाहून तुला क्षमा करतो , पुन्हा अशी चूक करू नको."
बोध: परमार्थात निज स्वार्थ साधू नये.
Saturday, October 2, 2010
(3) मला ब्रह्म दाखवा
विष्णू बुवा ब्रह्मचारी हे वेद-पुराण संपन्न प्रकांड विद्वान होते. चार वेद सहा पुराण जाणुनही आपल्याला ब्रह्म
भेटला नाही,याचा त्यांना खंत होता.
एकदिवस ते वैतागून मंदिरात जातात, तिथे ब्रह्म दर्शन करीन किंवा प्राण त्यागीन, असा हट्ट धरून सतत घंटानाद
करतात.
योग-योगानी बाळप्पा तिथे येतात आणी विष्णू बुवांची समझ घालुन त्यांना स्वामी कडे नेतात.
विष्णू बुवा सरळ स्वामींना,'ब्रह्म दाखवा ' असा आग्रह करतात.
स्वामी त्यांच्या कडे जाम दुर्लक्ष करतात आणी निद्रालीन होतात.
विष्णुबुवा याला आपला अपमान समझतात आणी स्वामींना दुषण देऊन परततात.
इकडे चोळप्पाच्या विरुद्ध सुंदराबाई, तक्रार नोंदवते कि चोळप्पा स्वामी सेवेसाठी मिळणाऱ्या मेहतान्याचा
उपयोग स्वता साठी करतो.
राणी सरकारच्या आदेशानुसार शिपाई चोलाप्पाच्या घराची झडती घ्यायला येतात.
चोळप्पाच्या पत्नीनी स्वामी सेवेसाठी मिळणाऱ्या रकमेतली शिल्लक उरलेली रकम जमवून एका डब्यात
ठेवलेली असते.
पण तिचा उद्देश ठाम असतो कि ही रकम अडल्या-नडल्या वेळेला स्वामी सेवेसाठीच खर्च करायची.
झडती घेणाऱ्यांचा हाती तो डब्बा लागतो, चोळप्पाची पत्नी डोळे मिटुन स्वामींची करुणा भाकते.
स्वामी कृपेनी डब्यातले पैशे नाहीशे होतात आणी झडती घेणारे रिकामे परततात.
इकडे स्वामी म्हणतात-" अरे तुमचा उद्देश निर्दोष असतांना मी तुम्ही निष्पाप लोकांना कशी शिक्षा होऊ देणार?"
विष्णू बुवा झोपले असतांना त्यांना स्वप्नात, शरीरावर शेकडो विंचू फिरतांना दिसतात, त्यातला एकही विंचू
चावेल या भितीनी ते कासावीस होतात.
जाग आल्यावर सुद्धा त्यांच्या मनावर स्वप्नाच दडपण असतं.
इकडे बाळप्पाला स्वामी सांगतात-"अरे प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते, त्या आधी बोलण्यात काही अर्थ नसतो."
"म्हणून आम्ही विष्णूबुवांच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिले."
स्वामी सुन्दराबाईला समझ देतात-" जो पर्यंत आम्ही ज्याचं राखण करतो तो पर्यंत कोणीही त्याचं वाकडं करू शकत
नाही."
"काही कारणांनी आम्ही तुझ्या कारस्थानांवर दुर्लक्ष्य करतो याचा अर्थ हा नाही कि आम्ही आपल्या लेकराचं रक्षण
करणार नाही."
इकडे विष्णुबुवा तडका-फडकीनी स्वामी कडे येऊ विचारतात-:" ब्रह्म तदाकार वृत्ती याचा अर्थ काय आहे?
"मला ब्रह्म दाखवा."
स्वामी ओरडतात- " मोठा आला ब्रह्म पाहणारा, काल स्वप्नात विंचू चावेल या भितीनी घाबरणारा तु,
ब्रह्म पहायला निघाला आहे!"
आपल्याला पडलेल्या स्वप्नाची जाणीव स्वामींना आहे, हे कळल्यावर विष्णूबुवांना स्वामींच्या अधिकाराची
प्रचीती येते.
ते स्वामी चरणी लीन होऊन क्षमा मागतात.
स्वामी आपली उशी देऊन तिला कानाला स्पर्श कर असं सांगतात.
स्वामींच्या उशीचा स्पर्श झाल्या बरोबर विष्णूबुवांना ब्रह्म साक्षात्कार घडतो, ते आनंदानी डोलु लागतात.
बोध :स्वताची जो पर्यंत पात्रता नसते तो पर्यंत ईश्वर दर्शनाचा हट्ट धरून कोणताही अतिरेक करू नये.

(2) श्रीगुरुलीलामृत रचयीता वामनबुवांची गोष्ट
चोळप्पा वामन बुवांची स्वामींशी भेट घडवतात.
स्वामी म्हणतात:- " वामना! इतक्या नोकऱ्या धरल्या सोडल्या , आता आमची नोकरी धर."
" ब्रह्मनिष्ठ हो."
वामन बुवा सहमती देतात.
सुंदराबाई चोळप्पांना स्वामी सेवेसाठी आलेले पैशे आपल्या कुटुंबासाठी पण वापरत जा अशी दिशा भूल करते,
चोळप्पांना ते पटत नाही पण सुंदर बाईच्या शब्दांना भुलून ते काही पैशे कुटुंबासाठी वापरतात.
पण त्यांचच मन त्यांना खातं. त्याचं दडपणाखाली ते वावरतात,.
वामनबुवा स्वामी कडे आपल्या कुलदेवी नाशिकची सप्तशृंगी च्या दर्शनाला जायची अनुमती मागतात.
स्वामी अनुमती देतात.
मग बाळप्पांना म्हणतात- "ह्याला म्हणतात, 'काखेला कळसा आणि गावाला वळसा' ! "
देवीच्या मंदिरात ते पुजाऱ्याला देवीतल्या मुखातला विडा प्रसाद म्हणून मागतात,
पुजारी स्पष्ट नाकारतात.
वामन बुवा मनो-मन प्रार्थना करतात:- " जर देवीची माझ्या कुळा वर कृपा आहे तर
देवीच्या मुखात ला विडा माझ्या हातात पडावा."
इकडे स्वामी म्हणतात:- " अरे किती हट्ट करणार,आणि आम्ही किती हट्ट पुरवायचे."
बाळप्पांनी दिलेला विडा स्वामी तोंडात घालतात आणी तिकडे देवीच्या मुखातला विडा
वामन बुवांच्या हातात पडतो. हे पाहून,पुजारी सुद्धा चकित होतो.
चोळप्पाला स्वामी म्हणतात:-"मनात चोर असला कि भीती वाटते.तुला सर्व कळतं पण वळत नाही."
"मनुष्य आपली चूक लोकांपासून लपवू शकतो पण देव आणि गुरु पासून नाही."
"चोळप्पा स्वताला फसवू नको."
देवी दर्शना नंतर वामनबुवा पंढरपूरला पांडुरंग दर्शनाला जातात.
तिथे पांडुरंगाच्या मूर्तीत त्यांना स्वामी पांडुरंग रुपात दिसतात.
तीर्थयात्रा आटपून वामन बुवा स्वामी दर्शनाला येतात.
स्वामी म्हणतात-" काय वामना! झाली मनसोक्त तीर्थ यात्रा."
" अरे पण हातात विडा आम्हाला द्यावा लागला.पांडुरंगाला जी गंगा अर्पण केली ती
आम्ही ग्रहण केली."
"अरे कशाला वण-वण फिरतो. परमानंदात राहा "
"ईश्वराचं रूप नाही स्वरूप ओळखा ,भक्तीची ताकद एवढी वाढवा कि भगवंताला तुमच्या कडे यायल पाहिझे."
"देवाला हृदयात ठेवा तेव्हा तो तुम्हाला त्याच्या हृदयात स्थान देईल."
वामन बुवा गहिवरून म्हणतात:- "स्वामी आपल्या लीला अगाध आहे!"
"त्यांना शब्दबद्ध करुन ग्रंथ लिहू इच्छितो."
स्वामी स्मितमुद्रेनी म्हणतात:- "तुझी इच्छा पूर्ण होईल. माझा आशीर्वाद आहे."
पुढे वामन बुवा स्वामीलीलेंवर ग्रंथ लिहितात ,हाच ग्रंथ श्रीगुरुलीलामृत म्हणून साकार होतो.

Subscribe to:
Posts (Atom)