Friday, October 29, 2010

(33) स्वामींनी दिला पुरावा

वैष्णव नावाचं एक गाव होतं. तिथे गोपाळ बुवा नावाचे
एक नावाजलेले प्रभोधनकार होते.
अख्या पंचक्रोशीत त्यांचं नाव होतं.
एकदा इंग्रज सरकार त्या गावावर जपती आणतात
.गावकऱ्यांना तो गाव इनाम  म्हणुन  मिळाला होता पण
त्यांच्या कडे काही पण पुरावा नव्हता.
गोपाळ बुवांना आपल्या नामांकित पणाचा फार गर्व होतं.
पण इंग्रज सरकार त्यांना लेशमात्र ही किम्मत देत नाही.
शेवटी सर्व स्वामींच्या शरणी जातात.
स्वामी सर्व अधिकाऱ्यांना पाण्याच्या ओढ्या जवळ बोलावतात.
स्वामी म्हणतात:-" पाणी के अंदर सबुत है ,धुंडो उसे?"
शिपाई शोध घेतात,तेव्हा त्यांना पाण्यात एक दगड सापडतो,त्याच्यावर
स्पष्ट लिहिलेलं असतं, कि हा गाव
सयाजीराव राजानी इनाम म्हणुन वामनराव जोशी यांना दिला होता.
गावावरची जप्ती टळते.
गोपाळ बुवांचा गर्व ही नाहीसा होतो.
सर्व गावकरी स्वामी चरणी नतमस्तक होतात.

Sunday, October 24, 2010

(32) लबाडीचं फळ

श्रीपादराव आणी अनुराधा एक निपुत्रिक जोडपं होतं.श्रीपादररावांना संतानाची फार लालसा होती.
पण भाग्यात संतती नाही म्हणून ते गप्प बसायचे.
त्यांची मातुश्री सुनेला सारखी मर्मान्तक टोमणे मारायची.
अनुराधेची मैत्रीण पुष्पाला पोटदुखीचा त्रास होता.
काहीही करता पोटदुखी जात नाही.
त्या करता ती स्वामींकडे येऊन आपली व्यथा सांगते.
स्वामी म्हणतात-" गंगा भागीरथी झाल्यावर व्याधी जाणार."
पुष्पेला  स्वामी वचनाचा फारसा काही बोध होत नाही.
अनुराधा तिला सांगते कि गंगा भागीरथी चा बोध वैधव्य आहे.
अनुराधेला मासिक धर्म बंद झाल्या मुळे आता संतान व्हायची शेवटची आशा ही संपली
असं म्हणुन घरचे घरा बाहेर काढतात.
अनुराधा पुष्पाकडे जाते.स्वामी वचनाप्रमाणे पुष्पाला वैधव्य आलेले असतं आणी तिची
पोट-दुखी सुद्धा कायमची बंद झालेली असते.
पुष्पा,अनुराधेला स्वामीकडे जायचं सुचवते.
आता स्वामीच मार्ग दाखवू शकतात,अस ठरवून अनुराधा अक्कलकोटला येते.
अक्कलकोटला अनुराधाचा भाऊ मन्नू गवळी राहायचा. तो वृत्तींनी अगदी अप्रामाणिक होता.
दुधात पाण्याची भेसळ करायचा,गरजवंत पाहून भाव दुप्पट करायचा.
एकदिवस तो दुधात वापरण्याचं पाण्याची भेसळ करुन दुप्पट किमतीत स्वामींच्या शिष्यांना दुध विकतो.
त्या पाण्या मुळे दुध नासतं. स्वामींच्या कानावर सर्व प्रकरण  येतं.
दुसऱ्या दिवशी मन्नू गवळ्याच्या गायीचा थनातून दुधा ऐवजी रक्त येतं.
हा सर्व स्वामींचा प्रकोप म्हणुन तो स्वामींना शरण येतो.
स्वामी त्याला समझ देतात, व प्रामाणिक पणे वागत जा असं सांगतात.
दुसऱ्या दिवशी अनुराधा स्वामींची भेट घेते.
स्वामी म्हणतात:-"तुला खोडकर मुलगा होईल!"
अनुराधा आनंदानी सासरी परतते .
अनुराधेला पहिल्या बरोबर नवरा आणी सासू परतायचं कारण विचारतात.
अनुराधा स्वामींच्या आशीर्वाद बद्दल सांगते.
तरीही घरचे तिला हकलतात.
तितक्यात अनुराधेला घेरी येते, त्यांनतर वमन ही होतं.
सासुबाई पटकन ओळखतात कि अनुराधेला दिवस गेले आहे.
त्यानंतर आई-मुलाच्या व्यवहारात कमालीचा बदल होतो.
ते तीचं कौतुक करतात. अनुराधा पण मागचं सर्व विसरून खुशाल राह्यच ठरवते.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात.
स्वामी आई-मुलाची चांगलीच हाजरी घेतात.
ते दोन्ही स्वामींची क्षमा मागतात.अनुराधेचा संसार सुखमय होतो.

Saturday, October 23, 2010

(31) गादी आणी पाषण एकसमान

पुराणिकबुवा नावाजलेले प्रबोधनकार होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता.
एकदा ते अक्कलकोटला येतात. आपलं ज्ञान अफाट आहे, अशी स्वामींना  प्रचीती यावी, असं त्यांची  इच्छा होती .
स्वामी स्वताहून, त्यांना आमच्या समोर कीर्तन करा असं निमंत्रण देतात.
पुराणिक बुवा कीर्तन सुरु करतात:-
"मानव जीवनात चार पुरूषार्थ असतात- 'धर्म अर्थ काम मोक्ष'
यात मोक्षाचं महत्व फार असतं. कारण मोक्षच आपल्याला जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवतो.
मोक्ष प्राप्त करायला संतान असावी लागते.
"निपुत्रीको गतीर्नास्ती " या शास्त्र वचना प्रमाणे निपुत्रीकाला गती मिळत नाही."

स्वामी एकदम संतापून भडकतात-"बंद कर तुझी वटवट!
"अरे अशे असत्य वचन सांगून तु लोकांची दिशाभूल करत आहे."
"अरे नारद,शुकाचार्य,भीष्माचार्य हे सर्व निपुत्रिक होते,यांना काय उत्तम गती मिळाली नाही?"
"अरे तुझ्या कीर्तनानी लोकं देव मार्गावर जायच्या ऐवजी पुत्र प्राप्तीलाच आपलं ध्येय समाझेल."
"अरे ज्याचं वर्तनच वाईट आहे,पण अनेक पुत्र आहे,त्याला काय गती मिळणार?"
"अरे मोक्ष मिळतो तो अनन्य भावांनी ईश्वर भक्ती करणाऱ्यांना ,सदाचरण आचारणाऱ्यांना,
परोपकार करणाऱ्यांना."
"आमचीच चूक झाली जे आम्ही तुला इथे बोलावलं."
कीर्तन बंद पडतं. पुराणिक बुवा संतापतात.
दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा स्वामींना  जाब विचारायला येतात.
स्वामी निद्राग्रस्त असतात. स्वामींना मऊ-मऊ गादी वर झोपलेले पाहून पुराणिक बुवांना
प्रश्न पडतो, स्वामी सन्यासी असून गादी वर कशे काय झोपतात?
पुन्हा कधी तरी स्वामींना गाठू आणी त्याचं पाखंड उजागर करू अश्या बेतांनी पुराणिक बुवा परततात.
दुसऱ्या दिवशी पुराणिक पुन्हा येतात,तेव्हा स्वामी कुठे जायच्या तयारीत असतात.
पुराणिक  म्हणतात-"मला तुम्हाला काही विचारायचं आहे."
स्वामी म्हणतात:- "आम्हाला वेळ नाही. आम्ही शेजारच्या गावातल्या टेकरीवरच्या देऊळात जात आहे."
पुराणिक बुवा पण बरोबर येतात.त्या दिवसात फार थंडी पडली होती.
टेकडीच्या पायथ्याशी पोहचता-पोहचता रात्र होते.
पुराणिक बुवा फार दमतात, त्यावर हाडं गारठेल अशी थंडी त्यांना बेजार करुन टाकते.
ते स्वामींना गावात कुठेतरी मुक्काम करू असं सांगतात.
स्वामी म्हणतात -
"आम्ही कुठेच जाणार नाही वाटल्यास इथे विश्रांती  घेऊ."
पुराणिक एकटेच गावा कडे जायला पाहतात पण वन्य श्वापदांच्या  भयानी ते जाऊ शकत नाही.
ते स्वामी कडे परत येतात.
स्वामी एका खडकावर निर्विकारपणे विश्रांती घेतात.
स्वामी म्हणतात:- "पुराणिक किती वेळ असं उभ राहणार , त्या दुसऱ्या खडकावर जाऊन विश्रांती घे."
पुराणिक त्या खडकाला स्पर्श करुन पाहतात, तो खडक थंडी मुळे बर्फाच्या शिळे
सारखा जाणवतो.
पुराणिक बुवा मनात विचार करतात:-" मला अंगभर कपडे घालुन पण थंडी झोंबून
राह्यली आहे आणी स्वामी एका लंगोटी वर बर्फा सारख्या शिळे वर विश्रांती घेत आहे.
पुराणिक बुवा म्हणतात :- "अहो एवढ्या थंड शिळे वर तुम्ही अशे निर्विघ्न  कशे झोपू शकतात?"
स्वामी म्हणतात:-" अरे आम्ही संन्याशी! आम्हाला खडका वरंच झोपलं पाहिजे, मऊ-मऊ गादी वर कशाला झोपायचं?
पुराणिक बुवांना स्वामी अंतरज्ञानी असल्याची प्रचीती येते.
ते स्वामींच्या शरणी येतात.
"स्वामी तुम्ही असामान्य आहा. तुम्ही देवाचे अवतार आहा .मीच तुम्हाला ओळखण्यात चूक केली.
मला क्षमा करा."
स्वामी प्रेमळ शब्दात म्हणतात:-" आम्हाला ओळखण्यात खूब उशीर  केला  पुराणिक ..!"
"अरे आम्हाला माहित आहे, तु विद्वान आहे, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही."
"त्याबरोबर श्रद्धा आणी विश्वास पण पाहिजे."
"ज्याच्या ठायी हे असतात त्याचं हृदय निर्मल होतं."
"आणी अश्या निर्मल हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो."
पुराणिकबुवा प्रांजळ पणे स्वीकृती देतात.