वामनराव घोलप एका चांगल्या सरकारी हुद्यावर होता.पण त्याला लाचखोरी आणी जारकर्माची वाईट सवय लागली होती.
त्याबद्दल त्याची पत्नी अंजनी स्वामींपाशी घाराणं घालते.
स्वामी लक्ष्य देऊ असं सांगतात.अंजनीनी वामनाला समझवायचा प्रयत्न केला पण वामन उलट तिच्याशीस मारहाण करतो.
वामनाचे गाडगीळ नावाच्या गृहस्थाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते.
एकदा गाडगीळ त्या दोघांना प्रत्यक्ष रंगे हात पकडतो पण उन्मत्त वामन गाडगीळशीच मारहाण करतो.
गाडगीळ पोलिसात तक्रार नोंदवतो, त्यामुळे वामना वर खटला मांडला जातो.या बद्दल त्याच्या सुटकेसाठी अंजनी स्वामींपाशी
घाराणं घालते.
स्वामी तिला आश्वस्त करतात.
न्याय मंदिरात पण वामन उर्मटा सारखा बोलतो पण काय, सर्व साक्ष्य वामनच्याच पक्षात बोलतात.
वामनला पण आश्चर्य होतं.
शेवटी खटल्याचा निकाल वामनच्या पक्षात होतो.
गाडगीळ त्याला येऊन सांगतो की स्वामीनी त्याला स्वप्नात दृष्टांत दिला होता म्हणुन त्यानीच साक्ष्यांना त्याच्या पक्ष्यात
साक्ष्य द्यायला सांगितलं होतं.
स्वामींच्याच आज्ञेनीच त्यांनी आपल्या पत्नीला सुद्धा माफ केले आहे.
हे ऐकुन वामनला उपरती होते. सर्व जण स्वामींकडे जातात.
स्वामी स्पष्ट सांगतात की अंजनीच्या पुण्यानीच वामनाची सुटका झाली आहे.
वामन क्षमा मागून पुन्हा वाममार्गी न जायचा प्राण करतो.
Friday, December 31, 2010
Friday, December 24, 2010
(43) सत्कार्माचा सुद्धा अहंकार नसावा
केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता.
त्याची पत्नी संगीता पती-परायण आणी कर्तव्यनिष्ठ होती,.
केशव कडे दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा.
संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणुन जेवण देण्यात यायचं.
एका वर्षी त्याची आर्थिक स्थिती घालवलेली असल्यामुळे तो गाव-जेवणाचा बेत रद्द करतो,
त्या एवजी ११ ब्राह्मण आणी स्वामींना बोलवायच ठरवतो.
त्या साठी तो स्वामींना आमंत्रण करायला जातो, रस्त्यात त्याला एक कुष्ठ रोगी भेटतो.
तो सुद्धा स्वामींकडे रोग मुक्ती ची अभिलाषा घेऊन जात असतो.
केशव स्वामींना आपलं मनोगत सांगतो. इकडे तो रोगी स्वामींच्या खूब मागे उभा राहतो.
स्वामी केशवकडून चंदनाचं खोड मागवतात, ते खोड मागे उभ्या असलेल्या रोग्याला देतात.
स्वामी म्हणतात:-" हे घे ! उगाळून लाव ,तुझा रोग बरा होईल."
मग स्वामी म्हणतात:- "तुझ्या घरी आम्ही दत्त जयंतीला येऊ, तु फक्त १० ब्राह्मणांना बोलव, अकाराव्वा आम्ही घेऊन येऊ."
तिकडे ते चंदन उगाळून लावल्या मुळे रोगी पूर्णतह रोग मुक्त होतो.
तो कृतज्ञा भावांनी स्वामी कडे येतो पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो.
कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे, अस सांगतो.
स्वामी म्हणतात:- "अरे तु जवळ येत नाही तर आम्हीच तुझ्या जवळ येऊ."
"अरे सर्व जीव परमेश्वरानी निर्मित केले आहे, त्यात भेद कश्या पाई धरायचा?"
मग केशवला सम्बोधन करुन म्हणतात :-" केशव हाच तुझा अकरावा ब्राह्मण."
केशव पहिले सटपटतो , मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्मानी ब्राह्मण असतो जन्मानी नाही."
केशव सहमत होतो.
दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यासह केशव कडे जातात.
केशव यथासांग स्वामींचं पूजन करतो.
मग ताटं वाढायच्या वेळेला तो पाहतो की पूर्ण गाव प्रसाद ग्रहण करायला आला आहे.
सर्व गावकरी हेच गृहीत धरतात की काही निमित्या कारण आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नसाव, पण दरवर्षी प्रमाणे आपल्याला जायलाच हवं.
सर्व गाववृंद पाहून केशव भितीनी गारठून जातो.
तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकापुर्तच आहे.
स्वामी त्याला नारळ देतात आणी सांगतात याचं पाणी अन्नावर प्रोक्षण कर, म्हणजे अन्न सर्वांना पुरेल.
केशव तसच करतो.
केशव आणी संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात. ते सर्व अन्न वाढायच्या भांड्यात घेतात, आणी स्वयंपाकाचे भांडे रिकामे होतात.
बाहेर ते सर्व अन्न वाढून येतात तर ते पाहतात काय की सर्व भांडे पुन्हा भरलेले आहे.
अस अनेकदा होतं. सर्व गावकरी तृप्त होतात तरी अन्न शिल्लक राहतं.
केशव गहिवरून स्वामींचे आभार मागतो:-"स्वामी तुमच्या मुळे गावा समोर माझी अब्रू गेली नाही.
मी या वर्षी जेवण देऊ शकलो नाही तरी
तुमच्या मुळे हे सर्व शक्य झालं."
स्वामी थोड्या कठोर शब्दात समझ देतात:-" अरे! हे मी-मी काय लावलं आहे? मी जेवण देतो, मी उत्सव करतो."
"अरे सर्व जेवण ईश्वर देतो, तु फक्त निमित्य मात्र आहे."
"अरे कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळतं, देणारा माणूस फक्त निमित्य मात्र असतो.
"म्हणुन दान,धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये."
"मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं."
"अरे ह्या अहंकार मुळेच मनुष्य ८४ लक्ष्य योनीत फिरत राहतो."
"मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा."

Friday, December 17, 2010
(४२) विचित्र समस्या
एका गृहस्थाच्या मुलीला एक विचित्र समस्या झाली होती. तिच्या पोटात गर्भ वाढला असून पण तिला न बाळ होत होता,न गर्भपात होत होता.
जवळ-जवळ ३ वर्ष ती अशीच वाढलेल्या पोटानी वावरायची. त्या मुळे तिच्या पतीनी तिला माहेरी आणून सोडलं होतं
आणी तो काडी-मोडीच्या तैयारीत होता.
कुणाच्या तरी सांगण्यावरून तो गृहस्थ स्वामींकडे येतो.
स्वामी तेव्हा मुलाबरोबर गोट॒या खेळत होते. त्यांना मुलांबरोबर खेळतांना पाहून त्या गृहस्थाच्या मनात संकल्प-विकल्प येतात: -"अरे आपण आपल्या मुलीसाठी काय नाही केलं? ओषधं,पूजा-पाठ,अनुष्ठान,दान इत्यादी.
आणी आता आपण स्वामींकडे आलो आहे, पण मुलाबरोबर मातीत गोट॒या खेळणारे स्वामी आपली काय मदत करतील?"
तितक्यात स्वामी कडाडून बोलतात -"अरे आमच्या वर विश्वास नाही तर इथे कशाला उभा आहे, चल चालता हो.
तुझ्या मुलीला गर्भ जाऊन तीन वर्ष झाली तरी अपत्य नाही होत ना?
आम्ही मुलामध्ये गोट॒या खेळतो म्हणुन आम्ही काय करू शकणार?"
स्वामी अंतर्यामी आहे, असं जाणुन तो गृहस्थ स्वामी चरणी नत-मस्तक होऊन क्षमा मागतो.
करुणामयी स्वामी त्याला आपलं चरणतीर्थ मुलीला पाजायला सांगतात.
गृहस्थ तसच करतो, त्यामुळे त्याची मुलगी सुखरूप प्रसूती होऊन पुत्र प्राप्त करते.
गृहस्थ अनन्य भावांनी स्वामी कडे येतो व त्याची इच्छा स्वामींना पंच-पक्वानाचं जेवण घालायची असते.
स्वामी समाधीत असल्यानी त्याला ते करता येत नाही.यावर चोळप्पा सुचवतात कि तुम्ही ७ दिवस ब्राह्मणांना भोजन करवा.
ते भोजन स्वामी पर्यंत पोचेल.
गृहस्थ तसच करतो. इकडे स्वामी ७ दिवस पर्यंत भोजन सुद्धा करत नाही.
शिष्य आग्रह करतात तेव्हा स्वामी आपलं पोट भरलं आहे, असं सांगतात.
ब्राह्मणजेवणाची सांगता करुन गृहस्थ स्वामींकडे परततो.
तो स्वामींना आपलं भोजन करवायाचं मनोगत सांगतो.
स्वामी म्हणतात:-"अरे किती वेळा आम्हाला जेवण घालणार? सात दिवसापासून रोज आग्रह करुन-करुन पंच-पकवान खायला घातले. आता पुन: तोच आग्रह का करतो आहे?"
गृहस्थाला काहीपण उमजत नाही, तितक्यात त्याला स्वामीच्या जागी आपण जेवण घातलेला ब्राह्मण दिसतो.
त्याला पटतं कि स्वामींनी ब्राह्मण रुपात येऊन भोजन ग्रहण केले आहे.
तो समाधानपूर्वक आनंदानी घरी परततो.

Subscribe to:
Posts (Atom)