Sunday, July 31, 2011

(७२) सत्याची कास

शरद आणी संतोष दोन भाऊ होते, त्यांचा परिवार अगदी गडगंज श्रीमंत होता,
पण स्वभावानी दोन्ही भाऊ अगदी वेग-वेगळ्या टोकावर
होते. शरद गर्विष्ठ, दुष्ट आणी गोर-गरीबांना छलणारा होता. संतोष त्याउलट अडलेल्या-नडलेल्यांना मदत करणारा होता.
त्यांच्या कडे गृह कामात मदत करायला कोमल नावाची एक स्त्री-गडी होती.
संतोष चा स्वभाव मन-मीळाउ असल्यानी कोमल चा भाऊ
मकरंद ,संतोष चा चांगला मित्र होता.
संतोष स्वामींकडे आल्या असतांना, स्वामी संतोष ला गीता देतात. स्वामी प्रसाद म्हणुन संतोष ग्रंथाला घरी आणतो,
पण स्वामींनी गीता आपल्याला का दिली, यावर तो फारसा विचार  करत नाही.
एक दिवशी शरद एकांत साधून कोमलला वाईट हेतूंनी धरतो.
कोमल जेव्हा फार प्रयत्न पण करुन स्वताला सोडवू शकत नाही,तेव्हा
ती  शरद च्या हाताला कड-कडीत चावा घेऊन आपली सुटका करते.
शरदच्या दरारा आणी घरच्या अन्य लोकांच्या प्रेमामुळे ती कुणालाही काहीही सांगत नाही.
पण कामांध शरद तर नवीन संधीच्या शोधात होता.
एक-दिवस घरी कोणी नसतांना तो पुन्हा कोमल वर दुराचार करायला जातो. पण योगा-योगानी संतोष तिथे येऊन
कोमल ला सोडवतो.
पण या वेळेला कोमल घरच्यांना सर्व सांगते. मकरंद पंचायत मध्ये तक्रार नोंदवतो. साक्षीदार म्हणून संतोष चा नाव देण्यात येतं.
पण संतोष धर्म संकटात पडतो,एका पक्षात त्याचा मोठा भाऊ आणी दुसऱ्या पक्षाला त्याचा जिवलग मित्र.
संतोष स्वामींचं मार्गदर्शन मागतो.
स्वामी म्हणता-" सत्याची कास धर, न्यायाच्या पक्षांनी साक्ष दे."
संतोष कोमल ला न्याय मिळवून द्यायला साक्षी साठी तैयार होतो.
चाणाक्ष शरद, आपल्या बायको ला संतोष समोर गया-वया करुन त्याला खरी साक्ष देण्यापासुन परावृत्त करायला पाठवतो.
संतोष पुन्हा गोंधळतो.
पंचायत भरते. शरद वर आरोप मांडला जातो. पंच संतोष ची उलट-तपासणी करतात.
पण शरद गप्प राहतो.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात.
स्वामी म्हणतात:-"शरदा! काय आप्त-जनासाठी सत्यापासुन पाठ फिरवली? अरे आम्ही तुला गीता कशाला दिली होती?"
"अरे फक्त अर्जुनासाठीच नाही तर जगातल्या सर्व दुविधेत असलेल्या लोकांना मार्ग दर्शनासाठी कृष्णानी गीता सांगितली होती."
"गीता नुसती पाठ करण्या साठी नसून आचरणात आणण्या साठी आहे."
"अरे आप्त-जनासाठी आपलं कर्तव्य आणी सत्याची कास सोडू नको."
"आत्ता पर्यंत अगणित-जन्मात अगणित-आप्तजन तुला प्राप्त झाले आहे,आणी त्या मायेतच वावरत राह्यला तर मोक्ष कधीही
प्राप्त होणार नाही."
स्वामींच्या बोधामुळे संतोष खरी साक्ष देतो आणी त्यावरून शरद ला शिक्षा होते.
मकरंद म्हणतो- "शरद ला शिक्षा झाली पण माझ्या निष्पाप बहिणीचं काय तिला काहीही न करता अपमानाचा ठपका
लागला, आता तीचाशी कोण लग्न करणार?"
स्वामी कोमल चा हात संतोष च्या हातात देतात.
कोमल आणी संतोष एकमेकासाठी अनुरूपच होते,म्हणुन सर्व लोकं फार खुश होतात.
पंच विचारतात:-"स्वामी आपल्याला तर सर्व माहित होतं, मग आपणच शरद ला शिक्षा का नाही केली?"
स्वामी म्हणतात:-" आम्ही जर ते केले असते तर कर्तव्याच्या कसोटी वर संतोषची परीक्षा झाली नसती?"
"आपले कर्तव्य पूर्ण केल्या शिवाय, सत्याची कास न धरता त्याला मोक्ष मिळाला नसता."
"आपलं कर्तव्य चोख पारपाडल्या मुळे संतोषची मोक्षाची वाट-चाल आता मोकळी झाली आहे."
संतोष गहिवरून स्वामींचे पाय धरतो.

Sunday, July 24, 2011

(71) दानात अहंकार नसावा

गोपाळ शेट नावाचा एक व्यक्ती दानशूर होता. तो गोर-गरीबांना फार मदत करायचा पण आपलं नाव-लोकिक व्हावे ह्या इच्छेनी .
लोकांच्या तोंडातून आपला उदो-उदो ऐकायला त्याला फार आवडायचं.
एकदा स्वामींच्या मनात त्याचा गर्व दुर करायचा विचार येतो, स्वामी चोळप्पाला घेऊन गोपाळशेट च्या गावाला निघतात.
रस्त्यात त्यांना एक व्यक्ती जीव द्यायला जाताना दिसतो.
स्वामी त्याला अडवतात तेव्हा तो आपले दुःख सांगतो.
तो व्यक्ती पत्नी-वियोगानी फार दुखी होता.
सर्वांचा सुखी संसार आहे पण आपला नाही, या भावनेनी तो सदैव व्याकुळ असायचा.
आणी त्या त्रासाला गांजून तो मृत्यु पत्करायला जात होता.
स्वामी त्याला बरोबर घेऊन पुढे प्रवास करतात.
पुढे कर्जापाई सावकाराच्या जाचणी मुळे गांजलेला व्यक्ती जीव देताना सापडतो.
स्वामी त्यालाही बरोबर घेऊन पुढे प्रवास करतात.
त्या दोघांना घेऊन ते गोपाळ शेट च्या घरी येतात.
स्वामी म्हणतात: "गोपाळ शेट तुमचं दानशूर असं नाव-लोकिक  ऐकुन आम्ही तुमच्या कडे या लोकांना घेऊन आलो आहे."
"आम्हाला आशा आहे तुम्ही यांच्या दुखाला दुर करणार."
कर्जानी वैतागलेला व्यक्तीला गोपाळ शेट धनाचीमोठी पोटली देतात.
पत्नी वियोगानी गांजलेल्या व्यक्तीला लग्नासाठी त्याच्या योग्य अशी नवरी पण गोपाळ शेट गाठून देतात,
त्याशिवाय धनाची एक छोटी पोटली पण देतात.
दोन्ही व्यक्तींच्या आनंदाचा पार राहत नाही.
मग गोपाळशेट स्वामींना विचारतात की त्यांना काय अपेक्षा आहे.
स्वामी अगदी फटकळ उत्तर देतात- "आम्हाला जे पाहिजे ते वर बसलेला आमचा बाप देतो."
"आणी जर त्याची इच्छा नसेल तर जगात कोणीही काहीही दिले तरी काहीही फायदा होणार नाही."
गोपाळशेट ला अनावर राग येतो पण तो दात-ओठ चावुन राहतो.
सर्व लोकं गोपाळ शेट कडून परततात.
रस्त्यात त्यातला एक व्यक्ती चोळप्पाला आपली धनाची पोटली सांभाळायला देतो, पण चोळप्पाच्या हाती आधीच एक पोटली
असल्यानी स्वामी खुद्द पोटली हातात घेऊन चालतात.
इकडे गोपाळ शेट आपल्या माणसाला सांगतो की ज्या व्यक्तीच्या हातात काही पोटली नाही त्याला धरुन आण.
गोपाळशेट ला स्वामींना धडा शिकवायचा होता,
म्हणे खूब देव-देव करतो जेव्हा अन्न-पाण्या शिवाय तळघरात डांबून ठेवणार तेव्हा बुद्धी ताळ्यावर येईल.
शेट चा माणूस जेव्हा येतो तेव्हा स्वामींच्या हाती धनाची पोटली असल्यानी त्यांना धरत नाही
आणी उलट ज्याची ती पोटली होती त्याच्या कडे काही नसल्यानी
त्यालाच धरुन आणतो.
गोपाळशेट ला पाहिजे तो व्यक्ती नसल्यानी राग येतो.
गोपाळ शेट त्या माणसाला डांबून ठेवतात आन्ही पुन्हा आपल्या माणसाला तीच
कामगिरी करायला पाठवतात.
योगा-योगानी पत्नी- वियोगानी दुखी झालेला माणूस लघु-शंकेला जायचं म्हणुन आपल्या हातातली पोटली स्वामींना देउन जायला निघतो.
तितक्यात गोपाळ शेट चा माणूस येऊन त्याला धरुन नेतो.
या वेळेला पण गोपाळ शेट चा बेत फसतो.
गोपाळ शेट बारकाईनी  विचार करतो की ज्या माणसांनी आपल्या कडून काहीही घेतले नाही त्यांना आपण पकडू शकलो नाही
आणी उलट ज्यांना पकाडायचे नव्हते ते पकडले गेले.
गोपाळ शेटला "हरी इच्छा बलीअसी" चा सुक्तीचा खरा अर्थ काय तो कळतो.
गोपाळ शेट स्वामींच्या शरणी येतो.
चोळप्पाला काय चालले आहे तेच कळत नाही.
स्वामी म्हणतात: "अरे व्यक्ती कितीही समर्थ असला तरी ज्याच्यावर ईश्वराची सावली असते त्याचे काहीही
वाईट करू शकत नाही. ही गोष्ठ गोपाळ शेटला आता कळली आहे."
"त्या दोन व्यक्तींच्या जीवनात आतापर्यंत जे घडले ते त्यांच्या कर्मा मुळे प्राप्त झालेल्या प्रारब्धा मुळे झाले."
गोपाळशेट प्रांजळ पणे हात जोडून उभा असतांना स्वामी म्हणतात:" अरे त्या निर्दोष लोकांना सोड!"
गोपाळ शेट मान्य करतो.
"लक्ष्यात घे, दान करणे चांगले आहे, पण दानाचा अहंकार नसावा."
"एका हातानी केलेले दान दुसऱ्या हाताला ही कळायला नको"
"दान करुन नाव-लोकिकाची अपेक्षा करणे हे दान नसुन व्यापार झाला."
गोपाळ शेटला चूक पटून तो पुढे नाव-लोकीकाची अपेक्षा न करायचं ठरवतो.

Sunday, July 17, 2011

माणसाची पारख

नरेंद्र महाराजांना एक अंगरक्षक पाहिजे होता पण पाहिजे तसा मिळत नव्हता.
त्यांच्या राज्यात एक वीर नावाचा व्यक्ती होता. नावा सारखाच तो खरा वीर होता पण दारिद्रानी गांजला होता.
या साठी तो नरेंद्र राजा कडे नौकरी मागायला जातो. रस्त्यात एक गुंड एक माणसाला लुटत होता,वीर प्राणांवर खेळून
त्या माणसाला वाचवतो.
राजाचे मुनीम हे पाहून त्याला राज्या कडे घेऊन येतात.
राज्याच्या अंगाराक्षकाचे काम करायला वीर तैयार होतो पण दिवसाला ५०० मोहोरा मागतो, एवढी जास्त रक्कम ऐकुन राजा
विचार करू असं म्हणुन त्याला परतावतो.
स्वामींशी भेट होता ते राजाला म्हणतात कि काही दिवस वीर ला ठेऊन परीक्षा पहा, उतीर्ण झालं तर नियुक्त करा, आम्ही स्वत:
परीक्षेत तुझी मदत करू.
वीरची नियुक्ती होते,तो आपलं काम योग्य पणे करतो.
एक दिवस राजाला एक स्त्री चे रुदन ऐकू येते. तो वीर ला कोण रडते आहे, हा तपास करायला सांगतो.
वीर शोध घेतो, ते त्याला एक सुंदर व कुलीन स्त्री रडतांना दिसते.
विचारल्यावर ती सांगते कि मी राज्याची राजलक्ष्मी आहे.पण आता राजाला सोडुन जाणार आहे.
आता राजा दरिद्री होणार.मागोमाग राजा येऊन गवाक्षातून हे एकत असतो.
वीर उपाय विचारतो.
राजलक्ष्मी म्हणते कि तुझ्या ३२ शुभ लक्षणानी युक्त मुलाची बळी दिली तर मी इथे थांबीन.
वीर घरी जाऊन संकल्प सोडुन विष पाजून आपल्या मुलाचा बळी देतो.
निपुत्रिक होऊन कसे जगायचे म्हणुन तो स्वत: ही विष पिऊन जीव देतो.
पती आणी पुत्र गेल्यावर त्याची पत्नी पण विष पिऊन प्राण त्यागते.
राजा पर्यंत गोष्ट येते, आपण राजा असून प्रजेचे रक्षण करू शकलो नाही याचा त्याला खंत वाटतो.
तो स्वताच्या तलवारींनी आपलीच मुंडकी छाटायला जातो पण तलवार मानेच्या एक बोटं पर्यंत येऊनच थांबते.
तितक्यात स्वामी प्रगट होतात.
स्वामी म्हणतात:" राजा तु कनवाळू आहे, आपल्या मुळे प्रजेचा जीव गेला याची तुला खंत वाटून तु प्राण द्यायला गेला.
राजा असाच असावा.आम्ही तुझ्या वर प्रसन्न आहो."
राजा स्वामींकडे वीर च्या परिवाराचे जीवन मागतो. स्वमिकृपेनी वीर परिवारा सकट जिवंत होतो.
मग स्वामी राजलक्ष्मी चे रूप दाखवून त्यांना जाणीव करुन देतात कि ही त्यांचीच रचना होती.
वीर आणी नरेंद्र राजा दोन्ही परीक्षेत उतीर्ण होतात.
स्वामी नरेंद्र राजाला म्हणतात: "उत्तम माणसांना ओळखा आणी त्यांना जपा."
"वस्तू उत्तम असली तर किम्मत ही उत्तम मोजावी लाजते."