Sunday, September 25, 2011

(88) चोळप्पाच का?

अखेर नारायणशास्त्री  स्वामींच्या सामोरे येतात.
ते स्वामींना फटकळ पणे विचारतात की फार दंत कथा ऐकल्या आहे तुमच्या बद्दल, काही चमत्कार करुन दाखवा.
स्वामींच्या प्रत्येक चमत्कारा माघे काही विशिष्ठ हेतू असायचा त्या अतिरिक्त स्वामींनी कधीही चमत्कार दाखवले नव्हते.
नारायणशास्त्रीला ही चमत्कार दाखवणे त्यावेळी स्वामीनी गरजेचे समजले नाही. आणी प्रांजळपणे 
मी सामान्य माणूस आहे असे म्हणुन टाळतात.
नारायण शास्त्री स्वामींना बोल बोलत गर्वाने तिथुन निघतात.
अहमद एका गावकऱ्या बरोबर जाऊन नारायण शास्त्रींना जाब विचारतो. कुटील नारायण शास्त्री त्यांना भ्रमित करतात.
नारायण शास्त्री:- "अरे गुरूंना सर्व शिष्य समान असायला हवी मग स्वामी चोळप्पा- चोळप्पा कशाला करतात?"
"चोळप्पा त्यांना पोसतो म्हणुन स्वामींनी त्याला विशेष दर्जा दिला आहे."
शिष्य या तर्काच्या आहारी जातात.
ते स्वामींना जाब विचारण्यासाठी येतात.
स्वामी त्यांना आपल्या बरोबर या असे सांगतात.
चोळप्पा बरोबर सर्व लोकं स्वामींच्या मागे जातात.
स्वामी काटेरी रस्त्यात शिरतात चोळप्पाला वगळून सर्व शिष्य थांबतात.
काही दुर जाऊन स्वामी परततात आणी म्हणतात :-" ह्या साठी आम्हाला चोळप्पा प्रिय आहे."
"खरा शिष्य कितीही अडचणी आल्या तरी गुरुची साथ सोडत नाही,सर्व शिष्य मान खाली घालतात. त्यांना आपली चुक कळते."
स्वामी म्हणतात: "अरे चोळप्पाचे आणी आमचे नाते जन्मा-जन्मा पासुन आहे."
" शिष्याला गुरु प्रती श्रद्धा, निष्ठा आणी भक्ती पाहिजे."
"आणी चोळप्पा मध्ये हे सर्व गुण असल्यामुळे चोळप्पा  आम्हाला प्रिय आहे."


(८७) मीपणाचा त्याग

स्वामी नृसिंह सरस्वती चे अवतार आहे, हे नारायण शास्त्रींना फारसे पटत नाही.
मार्तंड मंदिराचा पुजारी त्यांना अक्कलकोटला जाणाऱ्या रामदासी बुवांची ओळख करुन देतो.
शास्त्रीबुवा महंता बरोबर अक्कलकोटला निघतात.
रामदासी बुवा एका मठाचे महंत होते.
 फार विद्वान चतुर्वेदी ब्राह्मण पण फार गर्विष्ठ.
वेद शास्त्रार्थात  चांगल्या-चांगल्यांचा पराभव  करायचे मग त्यांना शिक्षा म्हणुन आपले पायताण डोक्यावर घेऊन उभे ठेवायचे.
एक दिवस स्वामी तिथे येउन मुक्कामाची परवानगी मागतात. मठात जागा नसते म्हणुन ध्यान-कक्षात
फक्त एका तासा साठी त्यांना परवानगी देतात.
स्वामी तिथे गाढ झोपतात.
एका तासानी महंत येतात आणी स्वामींना उठवतात पण स्वामी काही उठत नाही.
स्वामींची अद्दल घडवायला, महंत बुवा खोलीला बाहेरून ताळा लावून जातात.
स्वामी मठात आहे म्हणुन दर्शनाला स्वामीभक्त गोरे शास्त्री येतात.
महंत त्यांना सांगतात की त्यांनी स्वामींना खोलीत डांबून ठेवले आहे.
गोरेशास्त्री समाझवतात की स्वामी चैतन्य आहे व कोणीही त्यांना अशे डांबून ठेऊ शकत नाही.
पण महंत काही ऐकत नाही.
गोरे शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबाहेर खिन्न मनानी बसून राहतात.
तितक्यात दारातून एक ज्योती बाहेर पडते. गोरेशास्त्री त्या जोतीच्या मागे जातात.
पुढे एक सरोवर येतं. ज्योती सरोवरात लुप्त होते आणी त्याजागी स्वामी सरोवरात सुर्याला अर्घ्य देत असतात.
महंत तिथुनच जात असतात.स्वामींना बघून महंत अगदी थबकतात.
 स्वामी बाहेर येतात. महंत आणी गोरे बरोबर स्वामी पुन्हा मठात येतात.
महंत खोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी गाढ झोपलेले दिसतात. आणी त्यांचा बरोबर स्वामी उभे पण असतात.
एका बरोबर स्वामींचे दोन रूप पाहुन महंत शरण येतात.

स्वामी शिकवण देतात-" शास्त्री  बुवा, तुम्ही ज्ञानी आहा पण अहंकार तुमच्या प्रगतीत बाधक आहे. "
"अहंकारणी राग येतो आणी राग राखेत मिळवतो."
"प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही."
"ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते कारण ज्ञानात अपेक्षा असते पण भक्ती निरपेक्ष असते."
महंत बुवा चूक मान्य करुन स्वामी भक्त बनतात.

(८६) स्वामी प्रगट झाले

मार्तंड मंदिराचा पुजारी स्वामीच नृसिंह सरस्वती महाराज आहे अशे नारायण शास्त्रींना सांगतात.
श्री नृसिंहसरस्वती महाराज भक्तांकडून शेवटचा निरोप घेतात. भक्तांना फार दुख होतं.
त्यांचे सांत्वन करायला ते म्हणतात: " अरे दत्त परंपरा ही निर्गुण परंपरा आहे, वडाच्या पारंब्या जमिनीत जाऊन नवीन वृक्ष तैयार
होतो तशेच आम्ही विभिन रुपात अवतरत राहतो.
पुढे कलीयुगाचा अमल फार वाढणार आहे पण तो भक्तिमार्गाची कास धरणाऱ्या लोकांना नडणार नाही.
भक्तांना अभय द्यायला आणी अभक्तांना भक्तिमार्गाला लावायला आम्ही पुन्हा येऊ.
अस म्हणुन नृसिंह सरस्वती महाराज नावेनी नदीच्या दुसऱ्या तीरावर जाऊन कर्दळीवनात दृष्टीआड होतात.
३०० वर्षानंतर उद्धव नावाचा एक लाकुडतोड्या कर्दळी वनात लाकूड तोडायला जातो.
झाड कापता कापता त्याच्या हातातून कुऱ्हाड सुटून एका भल्या मोठ्या वारुळावर आढळते.
कुऱ्हाड घ्यायला तो वारूळा जवळ जातो तर तो पाहतो तरी काय- वारुळातून रक्त येत होते.
उद्धव जाम दचकतो. तितक्यात एक भव्य व्यक्ती वारुळाला भेदून बाहेर येते.तिच्या मांडीतून रक्त वाहत होते.
उद्धव गया-वया करुन चुकून झाले असे म्हणतो.
भव्य व्यक्ती उद्धवला अभय देते आणी म्हणते:-" उद्धव हे तुझ्या हातून घडणारच होते, तु काही खंत मानु नको."
"तुझ्या हातून जग-कल्याणाची मोहिमेचा श्रीगणेश झाला आहे."
ती व्यक्ती आणखी दुसरी कोणी नसून स्वामी समर्थ असते.
स्वामी कर्दळीवनातुन कलकत्याला कालिका मातेचे दर्शन करुन गंगा तटावरून हरिद्वार करत गोदावरी नदी,
हैदराबाद,मंगळवेढा,पंढरपूर होत सोलापूर ला येतात.
सोलापूरला काही दिवस चिंतोपंत टोळ कडे मुक्काम करुन स्वामी अक्कलकोटला येतात