Monday, October 24, 2011

(१००) गुरु त्रिकालज्ञानी

वामन नावाचा एक माणूस पुराण सांगून आपले व परिवाराचे चरितार्थ चालवत होता. पण गावात दुष्काळ पसरतो आणी कोणी
पुराण ऐकण्यासाठी दक्षिणा द्यायला तैयार नसतो.
संसाराला कंटाळुन वामन बायको आणी आई सह स्वामी शरणी वाचलेले आयुष्य काढायचे ठरवतात.
पण स्वामी वामनला झिडकारतात " अरे प्रपंचात हरून परमार्था कडे वळण्यात काय अर्थ आहे ? अरे अनुकूल प्रपंच असताना
जो ईश्वरा कडे वळतो त्याची खरी किम्मत असते."
"इथे राहुन आम्हाला काय पुराण ऐकवणार ? अरे आम्ही संसाराची उत्पत्ती केली आणी आम्हालाच तु पुराण सांगणार?"
अशे अनेक दिवस स्वामी वामन ला अशेच हिणवतात.
एक रात्री वामन  वैतागून वनात पळून जातो. तिथे मनातला उद्वेग जावा म्हणुन तो ईश्वराचे ध्यान करत बसतो.
सकाळी वामनची आई आणी बायको पाहतात तर वामन नसतो, ते कावरे-बावरे होऊन स्वामींकडे जातात.
वामनाची आई स्वामींना  म्हणते:" तुम्ही वामनला आपल्या पदरात घेतले नाही म्हणुन तो वैतागून पळून गेला."
स्वामी म्हणतात: " अरे पळपुटा आहे वामन . प्रपंच जमला नाही म्हणुन परमार्थाकडे वळला."
मग स्वामी जोर-जोऱ्यात वामन ला हाक मारतात.
वनात ध्यानस्थ बसलेल्या वामनच्या कानात आवाज गुंजतो.
स्वामींची आज्ञा समझुन तो स्वामी कडे परत येतो.
स्वामी म्हणतात: "अरे मागच्या जन्मात तुझ्या हातून खूप जीव-ह्त्या झाली होती. "
"आमच्या नकारानी तुला जो मानसिक त्रास झाला त्यांनी तुझ्या पापांची भरपाई झाली."
"आम्ही आधीच जर तुला होकार दिला असता तर ते पापं नष्ट झाले नसते."
"तुझ्या साठी आमचा नकार जास्त फायदेमंद होता."
वामन स्वामींना अनन्य भावांनी शरण जातो.
 

(९९) गुरु तारणहार

राज्यात पाण्याची टंचाई होते, म्हणुन राजे विहीरी आणी पाणपोई बनवा अशी आज्ञा देतात.
नथोबाला ही जवाबदारी देण्यात येते. नथोबा अनन्य स्वामीभक्त होता.
राज्याच्या दरबारात दाजीबा नावाचा एक  अगदी अप्रामाणिक व्यक्ती होता.
तो नथोबाला खर्च जास्त दाखवून उरलेली रकम आपसात वाटू, असा सल्ला देतो.
प्रामाणिक नथोबा ठाम पणे नकार देतो.
रघुनाथ शास्त्री दाजीबाला कुटील सल्ला देतो. त्याप्रमाणे दाजीबा राजाला चाहाडी करतो की नाथोबा सरकारी खजिन्यात
गफलत करत आहे.
राजा हिशोब मागवतात तर खरच फार मोठी रकम कमी निघते.
राजा नथोबाला बडतर्फ करतात आणी १०० फटक्याची शिक्षा पण ठोठावतात.
रात्री राजा स्वामींच्या दर्शनाला येतात, नमस्कार करतांना स्वामी राजाला हातानी ढकलून पाडून देतात.
स्वामी रागावतात: "अरे राजा असून डोळ्यावर झापड  लाऊन काय बसला आहे. राजानी डोळस असले पाहिजे."
"अरे पूर्ण शाहनिशा न करता तु प्रामाणिक आणी निष्पाप लोकांना काय शिक्षा करतो."
"अरे हे सर्व दाजीबानी रचलेला कट आहे.तितक्यात खजिन्याचे अधिकारी येउन सांगतात की हिशोब अगदी चोख आहे आणी
काही गल्लत झाल्यामुळे हिशोब चुकला होता."
राजा नथोबाची शिक्षा माफ करुन पुन्हा कामावर पण रुजू करतो.
पण नथोबाचा तर मोह्भंग झाला होता, तो संसाराला राम-राम करून स्वामी-सेवेत आयुष्य काढायचे ठरवतो.

(९८) प्रपंच आणी परमार्थ

रामू आणी अनुसुया, हे एक जोडपं होते. वयाची साठी ओलांडली तरी वागणे एका नूतन लग्न झालेल्या जोडप्या सारखे-
सदैव बरोबर हिंडणे, बरोबर जेवणे, त्यांना जणुएकमेकाशिवाय करमत नव्हते.
एकदा स्वामी रामू ला म्हणतात -" अरे साठी ओलांडली तरी फक्त प्रपंचात काय गुरफटला आहे.
काही देवाचे कर तीर्थाटन कर."
मग काय रामू बुवा निघाले तीर्थाटन करायला पण जोडीनी.
काही दुर गेल्यावर अनुसूया बाई दमतात आणी रामू बुवा तिच्या साठी पाणी आणायला जातात.
पाणी घेऊन येतात तर पहातात त रकाय अनुसूया बाई जागेवर नाही. कितीही शोधले तरी सापडत नाही.
रामू बुवा स्वामी कडे परतून आपले घाराणे सांगतात.
स्वामी रामूची हाजिरीघेतात: " काय रे जन्म घेताना बरोबर घेऊन आला होता का ? अरे जाताना तिला बरोबर घेऊन जाणार
होता का? अरे योग होतो पण कधी न कधी तर वियोग तर होणारच."
"अरे आप्तजनांचा वियोग तर होणारच कारण जग असच नश्वर आहे.".
"अरे म्हणुन तर नश्वर चा त्याग करुन ईश्वरा कडे जायला पाहिजे."
रामू स्वीकारार्थी चर्या करतो पण खिन्नपणा नी तिथुन निघतो.
स्वामी हाक मारतात: " अरे एकटा काय जात आहे, या अनुसुयेला कोण नेणार ?"
रामू मागे पाहतो तर काय अनुसूया उभी होती.
अनुसूया सांगते की मी जिथे बसली होती तिथे डोळे लागले आणी डोळे उघडले तेव्हा इथे आलेली होती.
रामुला कळते की आपली प्रपंचाची आसक्ती कमी होऊन आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणुन स्वामींनी ही लीला केली होती.