Sunday, November 20, 2011

(106) बाळप्पाची स्वामीभेट


कोंडुनाना स्वामींशी तीर्थयात्रे साठी परवानगी मागतात. स्वामी होकार देतात आणि म्हणतात: "जा पण आमच्या श्वानाला पण घेऊन ये."
कोंडु नानाला पाहून चोळप्पा पण तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन करण्या साठी आज्ञा मागतो.
स्वामी चोळप्पाला तुळजापूरच्या भवानी मातेचे रूप दाखवतात.
चोळप्पा गहिवरून म्हणतो:-"स्वामी ३३ कोटी देव माझ्या समोर असतांना मी उगीच तीर्थ यात्रेची कामना केली हो !"
कोंडुनाना गाणगापूरला येतात. तहानेनी व्याकुळ होऊन ते विहिरीतून पाणी काढून प्यायला जातात.
जसच पाणी काढले जाते, त्यांच्या कम्भरेत एक लात पडते.
मागे पाहतात तर काय घोड्यावर बसलेला एका इंग्रजांनी ती लात मारली होती.
ती विहीर ब्रिटीश अधिकाऱ्यांना पाणी-पुरवठा करण्यासाठी होती, आणि सत्तेत आंधळे झालेल्या इंग्रजांनला 
एका गरीब भारतीयांनी त्यातून पाणी घेतलेले सहन झाले नाही.
बाळप्पा कोंडुनानाला हात देऊन उचलतात आणि धर्मशाळेत नेतात.
बालप्पा श्रीमंत घराचे असतात,त्यांचा मोठ्ठा कारोबार असतो आणि ते घर आणि व्यवसाय सोडून 
गुरूच्या शोधात बाहेर निघालेले असतात.
कोंडुनानांना बाळप्पाला भेटुन  कळते कि स्वामिनी ज्या श्वानाला आण म्हटले ते हेच.
ते बाळप्पाना म्हणतात कि तुमचा गुरूचा शोध संपला, अक्कलकोट चे स्वामींनी तुम्हाला बोलावले आहे.
बाळप्पा अक्कलकोटला यायला तैयार होतात.
पण रात्री स्वप्नात दृष्टांत देऊन स्वामी बाळप्पाला म्हणतात:-" उतावळा होऊ नको. भेटेची वेळ अजून आली नाही."
तिकडे त्या इंग्रजाला अकस्मात पायात इजा होते-ज्या पायांनी लात मारली त्याच पायात.
रस्त्यात भेट झाल्यावर इंग्रज आपले दुख कोंडु नानाला सांगतो.कोन्दुंना त्याल स्वामींच्या शरणी ये असे सांगतात.
इंग्रज अधिकारी कोंडु नाना बरोबर अक्कलकोटला येतो. बाळप्पा गाणगापुरलाच  राहूनच आराधना करतात.
इंग्रज अक्कलकोटला स्वामींच्या चरणात पडून म्हणतो कि स्वामी मला स्पर्श करून बरं करा.
स्वामी म्हणतात: "अरे पहिले आम्हाला लाता मारतो आणि आता चरणानी स्पर्श करा असे म्हणतो!"
इंग्रज म्हणतो: " मी केंव्हातुम्हाला लात मारली?"
स्वमी म्हणतात: ' आम्ही आमच्या भक्तांच्या ठाई वास करतो. आणि तू आमच्या भक्ताला लात मारली."
इंग्रज  आपली चूक मान्य करतो.
मग स्वामी उपाय सांगतात: " तांदूळ धुतलेले पाणी आणि वाटलेले आळू चे कांदे एकत्र करून लाव तुझा पाय बरा होईल."
तिकडे धर्मशाळेत बाळप्पा पाण्याच्या नांदीत बुडत असलेल्या विन्चुला पाहतात.
त्या विन्चुचे प्राण वाचवायला बाळप्पा त्याला हातानी बाहेर काढतात.या प्रयत्नात विंचू त्यांना चावतो पण बाळप्पा त्याला बाहेर काढतात.
स्वामी बाळप्पाला  दृष्टांत देऊन सांगत्तात: "बाळप्पा तू परीक्षेत उतीर्ण झाला".
बाळप्पा ठरवतात कि जर एका हि घरात भिक्षेत जर गव्हाच्या पोळ्या मिळाल्या तर यालाच 
स्वामींची आज्ञा मानून अक्कलकोटला प्रस्थान करायचं.
शेवटी एका घरात गव्हाच्या पोळ्या मिळतात आणि बालप्पा अक्कलकोटला येतात.
बाळप्पा नी आणलेली खाडी साखर स्वामी सर्वाना देतात पण बाळप्पाला देत नाही.
स्वामी म्हणता: " बाळप्पा इथे राहणे सोपे नाही. तुला स्वताला सिद्ध करावे लागेल."
त्यानंतर बाळप्पा गुरु सेवेला लागतात आणि लहान-मोठे सर्व कार्य करायला लागतात.
बाळप्पा श्रीमंत घरातले असल्यानी, स्वामी नी हे हि योजना केलेली होती.

(१०५) कथा एका किमायागाराची




स्वामी चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळतात.स्वामी म्हणतात-"जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिझे ! लक्ष केंद्रित करावं लागतं."
खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच.चोळप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात,
निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते.
स्वामी मान्य करतात.पण समझ पण देतात-"पारायण करताना खेळाचा आवाज ऐकु तरी कसा येतो ? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताताना तर ती उच्च पातळीची हवी."
चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो.वामन बुवा स्वामींना पहातच राहतात.
एका मुलाला भूख लागली म्हणून स्वामी आतून नेवेद्याचे अन्न आणून घास भरवतात.
नेवेद्याचे अन्न आणताना ,चोल्प्पाची सासू विरोध करते.पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात:"पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं-ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका.चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाशी तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही.
तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामी बद्दल घालुन-पाडुन बोलतात.मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामी कडे जातात.
घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलपस्वामींना,आपल्या गुरु स्वामीसमर्था बद्दल सांगतात.
घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वाद विवाद होतो. जाता-जाता वामन बुवा सांगून जातात कि माझे गुरु येईल तुमची परीक्षा पहायला.
इकडे स्वामी चोळप्पाला गांवो-गाव फिरून आपला उपदेश जन-सामान्यात आपला उपदेश पोचंव, असं सांगतात-"तू सर्वाना समर्पण शिकवू शकतो. वामनाला पण तू दीक्षा दिली.खूप सोसले आहे त्यांनी माझ्या साठी.मी त्याच्या पाठीशी आहे. "
तिकडे शास्त्रीबुवा घोलपस्वामी कडे दगडं घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात.अर्ध सोनं आम्ही घेऊ अश्या अटीवर घोलपस्वामी,आपले प्रयत्न सुरु करतात. पण काय,काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही,त्यांना वाटतं कि वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे,म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात.
घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात. पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणी उलट तेच स्वता पडून त्याचं धोंड्या खाली चिरडले जातात.
धोंड्याच्या आवाजांनी वामन बुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते,ते मनो-मन स्वामींना आपले रक्षण केल्या बद्दल धन्यवाद देतात.
काही वेळानी घोलप जागे होतात, त्यांना स्वामींच्या सामर्थाची प्रचीती येते.
ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात.
स्वामी बोध करतात: "घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये.अरे आपले सामर्थ आणी शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणा करता करावा."
"त्यांना धर्म-प्रवृत्त करण्यात करावा."
"ब्रह्मचा अंतिम सत्य आहे बाकी सर्व क्षण भंगुर आहे' ह्या गोष्टीची जाणीव सर्वाना करुन द्यायला हवी."
स्वामी घोलपना माहूर ला जान राहायची आज्ञा करतात.
पहिले घोलप यांना स्वामी-चरण सोडुन जाणे जीवावर येतं पण मग ते बारकाई नी  विचार करतात कि माहूरला आदिमायेच्या रुपात स्वामीच आहे,
 असे समझुन ते माहूर साठी प्रस्थान करतात.
स्वामी मग वामन बुवाचे कौतुक करतात.
स्वामी म्हणतात: "अरे इतके प्रलोभन वाहत असताना सुद्धा तु तटस्थ राहिला, गुरुवर निष्ट आढळ ठेवली."
"तु परीक्षेत उतीर्ण झाला आहे."
"तुझी मोक्षाची वाटचाल आता सुरु झाली आहे."

Monday, November 7, 2011

(१०४) मी पणाचा पराभव

बाबा सबनीस एक प्रकांड विद्वान कीर्तनकार होते. राम मंदिरात त्यांचे कीर्तन होते. सर्व लोकं मंत्र-मुग्ध होऊन कीर्तन ऐकतात.
तिथे हरीबाई नावाची एक बाई येते आणी मंदिराच्या पायरीवर किर्तना कडे पाठ करुन रामाचे नामस्मरण करत बसते.
कीर्तन संपल्यावर हरी बाईला बाबा सबनीस विचारतात-" तुम्हाला काय आम्ह्चे कीर्तन ऐकावे असे नाही वाटत का?"
हरी बाई थोड्या फटकल पणे बोलते-"या मोठ्या-मोठ्या गोष्टी मला समझत नाही.कानातून मनात पोहचत नाही. "
"आम्हाला आमचे स्वामींच्या साध्या-सरळ गोष्टी आवडतात."
तितक्यात नारायण शास्त्री येउन बाबा सबनीसला म्हणतात:" तुम्ही या मुर्ख बाईशी काय वाद घालत आहा?'
" या सर्वाना त्या भोंदू स्वामीनी वेड लावले आहे."
मग शास्त्री बाबा सबनीसला म्हणातात की हनुमान जयंतीला स्वामी राम मंदिरात येणार आहे, तिथे तुम्ही आपल्या विद्वत्तेनी शास्त्रात
त्यांचा पराभव करा.
हनुमान जयंतीच्या दिवशी स्वामी मंदिरात येतात.बाबा सबनीस त्यांना तत्व-ज्ञानाचे प्रश्न विचारतात.
स्वामी म्हणातात: "अरे ह्या गोष्टी आम्हाला काय माहित! आम्ही काय पुराण वाचतो का?"
मग स्वामी वामकुक्षी साठी निघून जाता.
नारायण शास्त्री आणी बाबा सबनीस तिथेच स्वामींची टवाळी करत राहतात.
तितक्यात एक साप येउन बाबा सबनीसला डसतो.
योगा-योगानी गावात राहणारे मांत्रिक आणी वैद्य सुद्धा गावात नसतात.
गावकरी म्हणातात की आता फक्त स्वामीच वाचवू शकतात.
माणूस कितीही ज्ञानी असला तरी संकटात फक्त देहबुद्धी पर्यंतच त्याचे ज्ञान मर्यादित राहते.
बाबा सबनीस आपला ताठा सोडुन स्वामी शरणी यायला निघतात्त.
स्वामी पहिले बाबा सबनीस ची फिरकी घेतात:- "अरे आम्ही काय करणार? आम्ही वेद-पुराण थोडेच वाचले आहे!
आम्हाला काय कळतं तत्व ज्ञाना बद्दल ?"
आता तर विषा मुळे बाबा सबनीसना  प्रचंड वेदना व्हायला लागल्या होत्या.
बाबा सबनीस एकदम शरणागती पत्करतात आणी केविलवाण्या स्वरात म्हणातात:- "स्वामी काही पण करा हो .... पण मला वाचवा . "
"विष आता तर झोंबून राहिले आहे."
स्वामींना दया येते. जशी दिव्यात काजळी असते तसच मान-लोकिक मिळवलेल्या विद्वानाच्या ठायी अभिमान तर असणारच.
स्वामी एक ताठ मागवून सबनीस यांना सर्पदंश झालेला पाय ताठात ठेवायला सांगतात.
स्वामींच्या कृपा-दृष्टीनी आपो-आप विष बाहेर ताठात पडायला लागतं.
सर्व विष गेल्यावर बाबा सबनीस च्या प्राणात-प्राण येतो.
ते स्वामींच्या चरणी पडतात.
स्वामी बोध करतात: "ज्ञान श्रेष्ठ असतं पण थोडे ज्ञान झाल्याने भक्ती असलेल्या लोकांना नडू नये."
"ज्यांनी-त्यांनी आपल्या पद्धतीनी ईश्वराची उपासना करावी."
"ज्ञान-कर्म-आणी भक्ती तिन्ही जीवाला ईश्वरा कडे नेतात."
"ज्याला जी वाट सोयीस्कर वाटेल त्यांनी ती वाट पत्करावी."
सबनीस आपली चुक मान्य करतात.

(१०३) दुष्काळा पासुन सुटका

एकदा अक्कलकोट मध्ये दुष्काळ पडतो. खायला अन्न नाही आणी प्यायला पाणी नाही.
लोकं आसुसून पावसाची वाट पाहतात पण पाऊस काही
पडत नाही. सर्व स्वामींकडे येतात. स्वामी त्यांना रेणुका-सहस्त्रनाम आणी पर्जन्य-सुक्त वाचायला सांगतात.
काही जन उपासनेला बसतात पण पाऊस काही पडत नाही.
स्वामी आपल्या एका भक्ताला घेऊन अक्कलकोटच्या बाहेर पडतात.
तिथे एका शिव मंदिरात जातात.
तिथल्या शिवाच्या पिंडीला रोखटोक पणे विचारतात :"काय समस्या आहे तुमची? पाऊस का नाही पाडत?"
मग तिथुन निघतांना स्वामी म्हणातात:" आम्ही वळसण गावाला पोहचू तो पर्यंत पाऊस पडला पाहिजे."
स्वामी त्या मंदिरातून परततात, चालता-चालता वळसण  गाव लागतो तरी पावसाचा काही थांग-पत्ता नसतो.
स्वामी तिथल्या शिव मंदिरात जातात.
स्वामी तिथल्या शिव-पिंडीला जाब विचारतात:-" काय समस्या आहे तुमची ? पाऊस का नाही पाडत ?"
" अच्छा हरभरे पाहिजे तुम्हाला ?"
मग स्वामी भक्ताला आज्ञा करतात:- "जा हरभरे घेऊन ये."
भक्त गेल्यावर स्वामी स्वता शिव आराधना करायला बसतात.
स्वामी जोर-जोऱ्यात उपासना करतात:-" शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो .."
'हे  गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो "
" शंभो s s ......"
इकडे स्वामी शिव आराधना करतात तिथे गावकरी स्वामींनी सांगीतलेली आराधना करतात.
मग काय  नर-नारायण एक होता, पाऊस काय पडल्या शिवाय राहणार?
एकदम आकाश  ढगांनी अंधारून जाते आणी जोरदार पाऊस पडायला लागतो.
स्वामी जेव्हा अक्कलकोटला परततात तेव्हा सर्व गावकरी
स्वामींच्या चरणी लीन होतात.
स्वामी बोध करतात: " अरे निसर्ग कोपतो याचे करण असतं. तुम्ही लोकांचे कर्म जवाबदार असतात. "
"तुम्ही आपल्या स्वार्थ आणी सोयी साठी निसर्गाची विटंबना करतात."
" हिरव्या झाडांना कापतात. अरे उन्हाळ्यात ज्या झाडा खाली विसावा घेतात, थंडीत त्याचं झाडाला कापून
त्याची शेकोटी करतात."
"मनुष्याचे पापं वाढले की निसर्ग कोपतो आणी निसर्ग कोपल्यावर देवाला दुषण लाऊन काहीही साध्य नाही होणार."
"मनुष्यांनी न्यायनी वागावे, निसर्गाचा मान राखावा, आपल्या स्वार्थावर आटोका ठेवावा."
"ईश्वर कधीही अन्यायी नसतो पण होणारा त्रास प्रतिकुल कर्मामुळेच उद्भवतो."
"म्हणुन मनुष्यांनी सतत ईश्वराची उपासना करावी.कळत-नकळत झालेले दोष ईश्वर भक्तिनी घालवावे."
सर्व गावकरी आपली चुक मान्य करतात.

(१०२) पाप पुण्याचा जमाखर्च

गोविंद नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. तो फार दान-पुण्य करायचा. पण तो एका भयंकर व्याधींनी ग्रस्त होता-
भोजन झाल्यावर त्याच्या पोटात भयंकर वेदना व्हायच्या.
त्याचा मित्र त्याला स्वामींकडे आणतो.
स्वामी उपाय संगतात्त- "सात दिवस फक्त गाईचे शेण खायचे आणी गोमुत्र प्यायचे, या अतिरिक्त काहीही खायचे नाही."
उपाय म्हणजे अगदी द्रविडी प्राणायामच होता पण प्रचंड  वेदनेंना आठवून गोविंद तैयार होतो, सात दिवसा नंतर
तो पूर्ण पणे बरा होऊन स्वामींच्या चरणी पडतो.
तो स्वामींना विचारतो-" मी इतके दान पुण्य करतो तरी माझ्या वाटेला हे दुख का आले?"
स्वामी म्हणतात:" अरे भाग्यानी तु श्रीमंत झाला आणी थोडे-फार दान पुण्य करण्याची काय गमजा मारतो?"
"अरे जे थोडे फार असते त्यातले पण कुणाला देणे ह्याला खरी किम्मत आहे."
"श्रीमंतानी सुपात्र गरजवंतांना दान केलेच पाहिजे."
"आणी तुझ्या भोगला तुझीच कर्म जवाबदार आहे."
गरीब असताना तुझ्या कडे एक गाय होती, ती वृद्ध होऊन तिनी जेव्हा दुध देणे बंद केले तेव्हा तु तिचा चारा बंद केला."
"ती गोमाता भूखेच्या वेदना सहन करत मेली, तुझ्या हातून घडलेल्या या पापा मुळे तुला हे भोग प्राप्त झाले आहे."
"अरे आपली कशीही परिस्थिती असली तरी मनुष्याला आपले कर्तव्य सोडता येत नाही."
गोविंद आपली चुक मान्य करतो आणी स्वामींनी रोगमुक्त केल्या मुळे स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतो.

(१०१) मनुष्य आणी स्वार्थ

नारायण नावाचा एक राजस्थानी माणूस होता. त्याची बायकोची प्रसुतीची वेळ आली होती पण मुल अडले होते.
काहीही करुन बायकोची प्रसुती होत नव्हती.
तितक्यात एक साधू येउन त्याला सल्ला देतो की अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना साकडं घाल आणी मुल झाले की
अक्कलकोटला ब्राह्मण वाढ.
हेकेखोर नारायण पहिले वाद घालतो पण अडलेला माणूस कितीवेळ हट्टावर पेटून राहणार.
तो शेवटी स्वामींना बायको आणी संततीसह  अक्कलकोटला येईन असा नवस सांगतो.
नवस करताच लगेच त्याची बायको सुखरूप प्रसूत होते.
पाहता-पाहता मुलगा मोठा होतो तरी नारायण नवस फेडत नाही. त्याची आईनी आठवण करुन दिली तर तो
तीचाशीच हुज्जत घालायचा.
एकदिवस आईनी अन्न-पाणी त्याग करणार अशी धमकी दिल्यानी तो अक्कलकोटला यायला तैयार होतो.
अक्कलकोटला जसाच तो स्वामींचे पाया पडतो, स्वामी त्याला पाडून देतात.
स्वामी रागावतात:" अरे कृतघ्ना ! आता आठवण आली नवस फेडायची.चल चालता हो."
नारायण परिवारासह परत फिरतो.
मुक्कामाच्या जागेवर येताच त्याला कडकडून ताप येतो आणी तो अंथरुणाला खिळतो.कितीही उपचार झाले तरी तो
बरा होत नाही. अनेक दिवस झाल्यावर त्याला पश्चाताप होतो आणी तो स्वामींची करुणा भाकतो.
आपली चुक झाली अशी प्रांजळपणे कबुली देतो.
लगेचच स्वामी तिथे प्रगट होतात आणी त्याला बोध देतात:
" अरे तुझ्या अहंकार आणी कृतघ्नपणा मुळे तुला हे भोग प्राप्त झाले होते,तुझ्या या आजारपणामुळे ते भोग संपले,
आणी आपली चुक प्रामाणिक पणे कबुल केल्यानी तुझ प्रायश्चित ही झाले."
असं म्हणुन स्वामी अदृश्य होतात.
नारायण लगेच बरा होतो आणी मनोमन स्वामींना नमस्कार करतो.