एकदा अक्कलकोट मध्ये दुष्काळ पडतो. खायला अन्न नाही आणी प्यायला पाणी नाही.
लोकं आसुसून पावसाची वाट पाहतात पण पाऊस काही
पडत नाही. सर्व स्वामींकडे येतात. स्वामी त्यांना रेणुका-सहस्त्रनाम आणी पर्जन्य-सुक्त वाचायला सांगतात.
काही जन उपासनेला बसतात पण पाऊस काही पडत नाही.
स्वामी आपल्या एका भक्ताला घेऊन अक्कलकोटच्या बाहेर पडतात.
तिथे एका शिव मंदिरात जातात.
तिथल्या शिवाच्या पिंडीला रोखटोक पणे विचारतात :"काय समस्या आहे तुमची? पाऊस का नाही पाडत?"
मग तिथुन निघतांना स्वामी म्हणातात:" आम्ही वळसण गावाला पोहचू तो पर्यंत पाऊस पडला पाहिजे."
स्वामी त्या मंदिरातून परततात, चालता-चालता वळसण गाव लागतो तरी पावसाचा काही थांग-पत्ता नसतो.
स्वामी तिथल्या शिव मंदिरात जातात.
स्वामी तिथल्या शिव-पिंडीला जाब विचारतात:-" काय समस्या आहे तुमची ? पाऊस का नाही पाडत ?"
" अच्छा हरभरे पाहिजे तुम्हाला ?"
मग स्वामी भक्ताला आज्ञा करतात:- "जा हरभरे घेऊन ये."
भक्त गेल्यावर स्वामी स्वता शिव आराधना करायला बसतात.
स्वामी जोर-जोऱ्यात उपासना करतात:-" शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो .."
'हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो "
" शंभो s s ......"
इकडे स्वामी शिव आराधना करतात तिथे गावकरी स्वामींनी सांगीतलेली आराधना करतात.
मग काय नर-नारायण एक होता, पाऊस काय पडल्या शिवाय राहणार?
एकदम आकाश ढगांनी अंधारून जाते आणी जोरदार पाऊस पडायला लागतो.
स्वामी जेव्हा अक्कलकोटला परततात तेव्हा सर्व गावकरी
स्वामींच्या चरणी लीन होतात.
स्वामी बोध करतात: " अरे निसर्ग कोपतो याचे करण असतं. तुम्ही लोकांचे कर्म जवाबदार असतात. "
"तुम्ही आपल्या स्वार्थ आणी सोयी साठी निसर्गाची विटंबना करतात."
" हिरव्या झाडांना कापतात. अरे उन्हाळ्यात ज्या झाडा खाली विसावा घेतात, थंडीत त्याचं झाडाला कापून
त्याची शेकोटी करतात."
"मनुष्याचे पापं वाढले की निसर्ग कोपतो आणी निसर्ग कोपल्यावर देवाला दुषण लाऊन काहीही साध्य नाही होणार."
"मनुष्यांनी न्यायनी वागावे, निसर्गाचा मान राखावा, आपल्या स्वार्थावर आटोका ठेवावा."
"ईश्वर कधीही अन्यायी नसतो पण होणारा त्रास प्रतिकुल कर्मामुळेच उद्भवतो."
"म्हणुन मनुष्यांनी सतत ईश्वराची उपासना करावी.कळत-नकळत झालेले दोष ईश्वर भक्तिनी घालवावे."
सर्व गावकरी आपली चुक मान्य करतात.

No comments:
Post a Comment