Monday, November 7, 2011

(१०१) मनुष्य आणी स्वार्थ

नारायण नावाचा एक राजस्थानी माणूस होता. त्याची बायकोची प्रसुतीची वेळ आली होती पण मुल अडले होते.
काहीही करुन बायकोची प्रसुती होत नव्हती.
तितक्यात एक साधू येउन त्याला सल्ला देतो की अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना साकडं घाल आणी मुल झाले की
अक्कलकोटला ब्राह्मण वाढ.
हेकेखोर नारायण पहिले वाद घालतो पण अडलेला माणूस कितीवेळ हट्टावर पेटून राहणार.
तो शेवटी स्वामींना बायको आणी संततीसह  अक्कलकोटला येईन असा नवस सांगतो.
नवस करताच लगेच त्याची बायको सुखरूप प्रसूत होते.
पाहता-पाहता मुलगा मोठा होतो तरी नारायण नवस फेडत नाही. त्याची आईनी आठवण करुन दिली तर तो
तीचाशीच हुज्जत घालायचा.
एकदिवस आईनी अन्न-पाणी त्याग करणार अशी धमकी दिल्यानी तो अक्कलकोटला यायला तैयार होतो.
अक्कलकोटला जसाच तो स्वामींचे पाया पडतो, स्वामी त्याला पाडून देतात.
स्वामी रागावतात:" अरे कृतघ्ना ! आता आठवण आली नवस फेडायची.चल चालता हो."
नारायण परिवारासह परत फिरतो.
मुक्कामाच्या जागेवर येताच त्याला कडकडून ताप येतो आणी तो अंथरुणाला खिळतो.कितीही उपचार झाले तरी तो
बरा होत नाही. अनेक दिवस झाल्यावर त्याला पश्चाताप होतो आणी तो स्वामींची करुणा भाकतो.
आपली चुक झाली अशी प्रांजळपणे कबुली देतो.
लगेचच स्वामी तिथे प्रगट होतात आणी त्याला बोध देतात:
" अरे तुझ्या अहंकार आणी कृतघ्नपणा मुळे तुला हे भोग प्राप्त झाले होते,तुझ्या या आजारपणामुळे ते भोग संपले,
आणी आपली चुक प्रामाणिक पणे कबुल केल्यानी तुझ प्रायश्चित ही झाले."
असं म्हणुन स्वामी अदृश्य होतात.
नारायण लगेच बरा होतो आणी मनोमन स्वामींना नमस्कार करतो.

No comments:

Post a Comment