Sunday, June 12, 2011

(६५) देव देतो आणी कर्म नेतो

शारदा नावाची एक स्त्री स्वामीभक्त होती पण कर्मकांड,कर्मठपणा इत्यादी गोष्ठींना फार महत्व द्यायची.
शारदा संतानसुखा पासुन वंचीत होती, तिच्या कडे काम करणारी सखुच दु:ख पण हेच होतं.
सखु पण संतान सुखाला पारखी होती.
पण सखुच्या बाबतीत एक गोष्ठ वेगळी होती, तिला स्वामींवर अतुट श्रद्धा होती, एवढी कि संतान सुख
देणार तर स्वामीच, नाहीतर संसारातला कोणताही उपाय लागू पडणार नाही.
शारदा पुत्र सुखासाठी औषध उपचार, पूजापाठ करवत असते.
ती सखुसाठीही ह्या गोष्ठी करू पाहते, पण सखु स्वामींशिवाय दुसरी कोणतीही गोष्ठीवर विश्वास ठेवायला तैय्यार नसते.
एक दिवशी शारदेची बहिण रेणुका तिच्याकडे  येणार होती. शारदेचा नवरा तिला घ्यायला जातो,
 पण रेणुका कुठेही भेटत नाही, म्हणुन परत येतो.
शारदेला भीती वाटते, रेणुका गाणदेवीच्या मंदिरा समोर तर नाही गेली ना?
गावा मध्ये एक गाणदेवीच मंदीर होतं. तिच्या प्रकोपाला पूर्ण गाव घाबरायचा.
रात्री-अपरात्री नको त्या अवस्थेत जर  स्त्रिया तिच्या समोरून गेल्या, तर त्यांना गाणदेवी झपाटते, अशी समझ होती.
थोड्या वेळानी सखु आणी तिचा नवरा, रेणुकेला शोधून आणतात, ती गाणदेवीच्या मंदिर समोर बेशुद्ध झालेली सापडते.
मग काय रेणुका मांत्रिकाला बोलावते.
घरात आरडा-ओरड ऐकुन तिथुन  जात असलेले बाळप्पा आत येतात.
पाहतात तर काय, मांत्रिक अघोरी पणानी  आपले प्रयोग करत असतो,
आणी मग तो रेणुकेला  बरं करण्यासाठी कोंबड्याची बळी मागतो.
बाळप्पा सर्वांना समझवतात कि हा सर्व अंधविश्वास आहे, पण ऐकतो  कोण?
शेवटी बाळप्पा सर्व प्रकार स्वामींच्या कानावर घालतात.
दुसऱ्या दिवशी स्वामी गाणदेवीचा प्रतीक असलेला दगड उपटून काढायला जातात.
मांत्रिक देवीच्या प्रकोपाची भीती घालतो. स्वामी त्याच्या श्री मुखात एक ठेवतात.
दम दिल्यावर मांत्रिक कबुल करतो कि गाणदेवीच्या नावानी दगड त्यानीच ठेवला होता.
गावात काहीही वाईट झालं तर त्याचा संबंध तो गाणदेवीच्या प्रकोपाशी लावून, गावकऱ्या कडून पैशे उकळायचा.
स्वामींच्या उलघड्या मुळे मांत्रिक गाव सोडून जातो.
खर तर, रेणुका रात्री वाट चुकाल्यानी पहिलेच घाबरलेली होती,
 आणी गाणदेवीच्या मंदिरा समोर येऊन पोहचल्य मुळे ती भितीनी गारठून कोसळली होती.
काही काळानी ती स्वताच शुद्धीवर येते.
इकडे चोळप्पा यांच्या घरी एक घुबड शिरून बसतं. घुबड म्हणजे अपशकुन असं समझुन चोळप्पा घराला ताळा
लावून बायको-मुलाला घेऊन शारदेच्या घरी येतात.
शारदा आणी चोळप्पांची पत्नी, अगदी जीवा-भावाच्या मैत्रिणी होत्या.
स्वामींना हे सर्व कळल्यामुळे, स्वामी शारदे कडे येतात, तिथे चोळप्पाला घरी परत ये, अशी आज्ञा करतात.
शारदा स्वामींना म्हणते,मला मुल व्हावं असा आशीर्वाद द्या, नाहीतर मी आमरण उपोषण करीन.
स्वामी काहीही उत्तर न देता परततात.
चोळप्पा घरी आल्यावर स्वामी खुद्द त्या घुबडाला उचलुन वनात सोडून देतात.
स्वामी म्हणतात: "अरे चोळप्पा ! अरे तुला निर्माण करणाऱ्या देवानीच त्या प्राण्याला पण निर्माण केले ना,
मग त्या प्राण्यामुळे तुला अपशकुन कसा होणार?"
"अरे!, आप-आपल्या कर्मामुळे प्राणी विभिन्न योनीत जन्म घेतात, पण सर्वाच्या ठाई एकच ईश्वर असतो."
"जेव्हा जीवांच्या शरीरातला ईश्वर निघून जातो, जीव निधन पावतो."
"अरे असा अंधविश्वास पाळु नका. अरे आमचा शिष्य म्हणवतो,
मग काही भयं वाटलं तर आमच्या कडे यायचं सोडून असा पळपुट्या सारखा काय पळून जातो !"
चोळप्पा आपली चूक मान्य करतो.
तिकडे शारदेच पाहून सखु पण उपोषण करते. शेवटी त्यांचे नवरे स्वामींकडे घाराणं घालतात.
स्वामींच्या आज्ञेनी दोघांना स्वामींकडे आणण्यात येतं.त्या वेळेला स्वामी श्मशान भूमीत असतात.
स्वामी म्हणतात: "दोघांना अपत्य सुख हवं आहे ना? "
असं म्हणुन स्वामी समोर पडलेली दोन हाडं उचलतात.
त्यातलं एक हाड शारदे कडे भिरकवतात.
शारदा थबकून मागे सरकते. हाड तिच्या समोर जमिनीवर पडतं.
मग स्वामी सखुकडे दुसरं हाड भिरकवतात, सखु ते हाड झेलून, मस्तकाला लावते.
शारदा म्हणते: "अरे काय करते ! फेक ते हाड . विटाळ होणार त्यामुळे. "
सखु म्हणते : "सद्गुरुंनी  काहीही दिले तर ते ग्रहण करण्यात शिष्याचं कल्याणच असतं."
हा सर्व प्रकार पाहून स्वामी म्हणतात: "अरे याला म्हणतात, देव देतो आणी कर्म नेतो".
"अरे तुम्ही लोकांच्या चांगल्या आणी वाईट कर्मांच्या आधारावर परमेश्वर प्रारब्द्ध लिहितो."
"मनुष्याला ते प्रारब्ध भोगणे भाग असतं, पण काही विशेष परिस्थितीत परमेश्वर त्यात बदल करतो,
पण त्या साठीसुद्धा मनुष्याचे सद्कर्म असायला हवे."
"आम्ही देऊ केलेला प्रसाद शारदेनी नाकारला पण सखुनी स्वीकारला."
"शारदेच्या मनात एकनिष्ठ भक्ती नव्हती. कर्मकांडा सारखीच गुरुभक्ती पण तिला एक उपाय वाटला."
"सर्व करू तेव्हा काही तरी मना सारखं होईल."
"अरे तेही मान्य करू, पण मनात जे संकल्प-विकल्प निर्माण झाले त्याचं काय?"
"अरे हाडांना पाहून कोणीही थबकेल, पण कोण देत आहे या गोष्ठी वर लक्ष्य गेलं नाही!"
"कारण तेच, एकनिष्ठ भक्ती नसणं."
"अरे जेव्हापर्यंत मन, चित्त आणी बुद्धी एकत्र नाही होणार तेव्हा प्रपंच असो किंवा परमार्थ यश मिळणार नाही."
"अरे श्रद्धा असायला  सुद्धा उपासना लागते, आणी तिथेच शारदा कमी पडली."
सर्व जण परततात.
काही दिवसांनी सर्वजण शारदेच्या घरी परस्पर चर्चा करत असतांना सखुला वामन होतं.
सखुला लगेच कळतं कि स्वामींचा आशीर्वाद पावला आहे.
शारदेला खंत वाटतो कि आपण जर स्वामींवर एकनिष्ठ भक्ती ठेऊन प्रसाद स्वीकारला असता
तर आपण ही संतानसुखाला प्राप्त झाली असते.
"गतस्य शोचना नास्ति " असा विचार करुन शारदा भक्तीत एकनिष्ठ होण्या साठी उपासना वाढवायचा निश्चय करते.


 

No comments:

Post a Comment