Friday, January 6, 2012

(१११) भक्ता हाती विप्रमद जिरवले


श्रीपाद नावाचा एक ब्राह्मण अनन्य स्वामी भक्त होता. एक दिवशी स्वामिनी त्याला काशीला जा अशी आज्ञा करतात.
काशी मध्ये विद्वान ब्राह्मणाचा घोळका आढळतो. ते ब्राह्मण श्रीपादच्या अज्ञाना पाई त्याचा पदोपदी अपमान करतात.
परिस्थितीमुळे श्रीपादचे शिक्षण फारसे झाले नव्हते. 
या सर्व अपमाना मुळे तो विप्र-सभेत जायचे टाळतो.
काशीत एक दिवस फिरत असताना स्वामी एकदम त्याच्या समोर प्रगट होतात.
स्वामी श्रीपाद ला घेऊन विप्रसभेत जातात. विप्र सभा एका देऊळात भरली होती.
श्रीपाद तिथे स्वामींना चोरंगावर बसवून त्यांची पाद्य पूजा करतो.
स्वामी म्हणतात -"पाद्य पूजा झाली पण नैवैद्य कुठे आहे."
त्या ज्ञानांनी उन्मत्त झालेल्या ब्राह्मणा मधून एक स्वामींच्या समोर मांसाहारी पदार्थ नैवैद्य म्हणून ठेवतो.
स्वामी हे पाहून संतप्त  होतात. तितक्यात देऊळात एक देवी प्रगट होते. देवी फार क्रोधित असते.
ती म्हणते-" चांडाळा तू स्वामींना मांसाहाराचा नैवैद्य दाखवला ! " मी  तुला आता भस्म करणार."
पाहता-पाहता तो ब्राह्मण भस्म होतो.
श्रीपाद स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतो.
स्वामी त्याच्या मस्तकावर हात ठेवतात.
स्वामींच्या हस्त-स्पर्शांनी श्रीपाद च्या डोक्यात चारी वेद, सहा पुराण व त्या शिवाय अनेक शास्त्रांचे ज्ञान जागृत होतं.
विश्वाचे सर्व ज्ञान मनुष्याच्या डोक्यात असते पण फक्त कुणात ते जागृत होतं आणी कुणात  नाही. मनन,पठण,अवलोकन,अनुभव आणी गुरूची 
शिकवण, हे सामान्य रुपानी मनुष्याच्या डोक्यात असलेल्या सुप्त ज्ञानाला जागृत करतात.
स्वामी कृपेनी एका क्षणात श्रीपाद मध्ये ते ज्ञान जागृत होतं.ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या स्पर्शांनी रेड्याकडून वेद म्हणवले होते.
श्रीपाद स्वामी आज्ञेनी त्या ब्राह्मणांशी वाद-विवाद करायला बसतो.
काही क्षणातच तो त्या सर्व ब्राह्मणांचा चोफेर पराभव करतो.
ब्राह्मणांना स्वामींचे सामर्थ्य कळतं आणी ते स्वामींचा शरणी येतात.