वामन नावाचा एक माणूस पुराण सांगून आपले व परिवाराचे चरितार्थ चालवत होता. पण गावात दुष्काळ पसरतो आणी कोणी
पुराण ऐकण्यासाठी दक्षिणा द्यायला तैयार नसतो.
संसाराला कंटाळुन वामन बायको आणी आई सह स्वामी शरणी वाचलेले आयुष्य काढायचे ठरवतात.
पण स्वामी वामनला झिडकारतात " अरे प्रपंचात हरून परमार्था कडे वळण्यात काय अर्थ आहे ? अरे अनुकूल प्रपंच असताना
जो ईश्वरा कडे वळतो त्याची खरी किम्मत असते."
"इथे राहुन आम्हाला काय पुराण ऐकवणार ? अरे आम्ही संसाराची उत्पत्ती केली आणी आम्हालाच तु पुराण सांगणार?"
अशे अनेक दिवस स्वामी वामन ला अशेच हिणवतात.
एक रात्री वामन वैतागून वनात पळून जातो. तिथे मनातला उद्वेग जावा म्हणुन तो ईश्वराचे ध्यान करत बसतो.
सकाळी वामनची आई आणी बायको पाहतात तर वामन नसतो, ते कावरे-बावरे होऊन स्वामींकडे जातात.
वामनाची आई स्वामींना म्हणते:" तुम्ही वामनला आपल्या पदरात घेतले नाही म्हणुन तो वैतागून पळून गेला."
स्वामी म्हणतात: " अरे पळपुटा आहे वामन . प्रपंच जमला नाही म्हणुन परमार्थाकडे वळला."
मग स्वामी जोर-जोऱ्यात वामन ला हाक मारतात.
वनात ध्यानस्थ बसलेल्या वामनच्या कानात आवाज गुंजतो.
स्वामींची आज्ञा समझुन तो स्वामी कडे परत येतो.
स्वामी म्हणतात: "अरे मागच्या जन्मात तुझ्या हातून खूप जीव-ह्त्या झाली होती. "
"आमच्या नकारानी तुला जो मानसिक त्रास झाला त्यांनी तुझ्या पापांची भरपाई झाली."
"आम्ही आधीच जर तुला होकार दिला असता तर ते पापं नष्ट झाले नसते."
"तुझ्या साठी आमचा नकार जास्त फायदेमंद होता."
वामन स्वामींना अनन्य भावांनी शरण जातो.

No comments:
Post a Comment