Tuesday, September 21, 2010

(1)स्वामींचा हिरा

स्वामी मोल्यवान वस्तूंची जवाबदारी बाळप्पा वर सोपवतात.
सुंदराबाई चोळप्पा ला फूस देतात कि तुम्ही एवढे जुने शिष्य असून स्वामींनी एवढी मोठी जवाबदारी नवीन आलेल्या बाळप्पाला दिली.
चोळप्पाच्या मनातलं ओळखून स्वामी सांगतात-"बाळप्पा श्रीमंत घरातला असून त्याची भूक वेगळी, म्हणून तो सर्व त्याग करून आमच्या सेवेत आला आहे."
चोळप्पा विचारतात-" मी  प्रामाणिक नाही आहे का?"
 स्वामी सांगतात -"या प्रश्नाचं उत्तर भविष्यच देईल! "
बाळप्पा धनाची मोजणी करतात तेव्हा स्वामी म्हणतात -"बाळप्पा हे काय मोजत बसला आहे,
आमच्या कडे एक हिरा आहे त्याच्या पुढे ही सर्व संपदा काहीच नाही."
"सध्या त्या हिऱ्याला पैलू पडत आहे, दोन तीन दिवसात तो आमच्या कडे येईल."

तिकडे रामचंद्र नावाचा एक गृहस्थ शंकराचा अनन्य भक्त होता,तो आपल्या संसाराकडे दुर्लक्ष्य करून शिवभक्ती करायचा.
त्याच्या आईच्या मते कलीयुगात देव दर्शन होणे शक्य नाही.
तरी रामचंद्र आपल्या भक्तीत काहीच अंतर येऊ देत नाही.
एकदिवस त्याला शिवभक्ती करताना, दिव्य वाणी सांगते कि अक्कलकोट ला जा, तिथे तुला शिव-दर्शन होईल.
रामचंद्र अक्कलकोटला येतो, तिथे चोळप्पाशी त्याची भेट होते.

रामचंद्र आपला मनोगत आणि दृष्टांता बद्दल सांगतो.
चोळप्पा  सांगतात-"तुम्हाला अक्कलकोट मध्ये स्वामी बद्दलच दृष्टांत झाला आहे."
पण रामचंद्र, शिवात व स्वामीत काहीच  साम्य नाही म्हणून स्वामीभेटेला नकार देतो.
चोळप्पा, बाळप्पांना रामचंद्रा बद्दल सांगतात, बाळप्पा लगेच ओळखतात कि रामचंद्रच स्वामींचा हिरा आहे.
बाळप्पा आणि चोळप्पा  दोघे रामचंद्राला स्वामीभेटेसाठी तैय्यार करतात.
रामचंद्र तैय्यार होतो पण शिवा शिवाय कुणाला  नमस्कार करणार नाही, असं ठामपणे सांगतो.
स्वामी विचारतात- "का रे रामचंन्द्रा महादेव भेटला का?"
रामचंद्र स्पष्ट पणे,"नाही!" असं सांगतो,
स्वामी म्हणतात- मला नीट निरखून पहा."
रामचंद्राला स्वामी शिवरुपात दिसतात.
व्याघ्रचर्म धारण केलेले,हातात डमरू व  त्रिशूल,गळ्यात सर्प,डोक्यावर जटा त्यावर चंद्र.
शिवरुपानंतर स्वामी रामचंद्राला ब्रह्मा आणि विष्णूरूप पण दाखवतात.
रामचंद्र स्वामींच्या पायावर पडतो आणि क्षमा मागतो.
स्वामी उपदेश करतात-"गुरुचं ब्राह्य रूप पाहू नका, गुरूला मनाच्या डोळ्यांनी शोधा."
"आम्ही तुमच्या मधेच आहो,आपली कस्तुरी मृगासारखी गत करून घेऊ नका."



  

No comments:

Post a Comment