चोळप्पा वामन बुवांची स्वामींशी भेट घडवतात.
स्वामी म्हणतात:- " वामना! इतक्या नोकऱ्या धरल्या सोडल्या , आता आमची नोकरी धर."
" ब्रह्मनिष्ठ हो."
वामन बुवा सहमती देतात.
सुंदराबाई चोळप्पांना स्वामी सेवेसाठी आलेले पैशे आपल्या कुटुंबासाठी पण वापरत जा अशी दिशा भूल करते,
चोळप्पांना ते पटत नाही पण सुंदर बाईच्या शब्दांना भुलून ते काही पैशे कुटुंबासाठी वापरतात.
पण त्यांचच मन त्यांना खातं. त्याचं दडपणाखाली ते वावरतात,.
वामनबुवा स्वामी कडे आपल्या कुलदेवी नाशिकची सप्तशृंगी च्या दर्शनाला जायची अनुमती मागतात.
स्वामी अनुमती देतात.
मग बाळप्पांना म्हणतात- "ह्याला म्हणतात, 'काखेला कळसा आणि गावाला वळसा' ! "
देवीच्या मंदिरात ते पुजाऱ्याला देवीतल्या मुखातला विडा प्रसाद म्हणून मागतात,
पुजारी स्पष्ट नाकारतात.
वामन बुवा मनो-मन प्रार्थना करतात:- " जर देवीची माझ्या कुळा वर कृपा आहे तर
देवीच्या मुखात ला विडा माझ्या हातात पडावा."
इकडे स्वामी म्हणतात:- " अरे किती हट्ट करणार,आणि आम्ही किती हट्ट पुरवायचे."
बाळप्पांनी दिलेला विडा स्वामी तोंडात घालतात आणी तिकडे देवीच्या मुखातला विडा
वामन बुवांच्या हातात पडतो. हे पाहून,पुजारी सुद्धा चकित होतो.
चोळप्पाला स्वामी म्हणतात:-"मनात चोर असला कि भीती वाटते.तुला सर्व कळतं पण वळत नाही."
"मनुष्य आपली चूक लोकांपासून लपवू शकतो पण देव आणि गुरु पासून नाही."
"चोळप्पा स्वताला फसवू नको."
देवी दर्शना नंतर वामनबुवा पंढरपूरला पांडुरंग दर्शनाला जातात.
तिथे पांडुरंगाच्या मूर्तीत त्यांना स्वामी पांडुरंग रुपात दिसतात.
तीर्थयात्रा आटपून वामन बुवा स्वामी दर्शनाला येतात.
स्वामी म्हणतात-" काय वामना! झाली मनसोक्त तीर्थ यात्रा."
" अरे पण हातात विडा आम्हाला द्यावा लागला.पांडुरंगाला जी गंगा अर्पण केली ती
आम्ही ग्रहण केली."
"अरे कशाला वण-वण फिरतो. परमानंदात राहा "
"ईश्वराचं रूप नाही स्वरूप ओळखा ,भक्तीची ताकद एवढी वाढवा कि भगवंताला तुमच्या कडे यायल पाहिझे."
"देवाला हृदयात ठेवा तेव्हा तो तुम्हाला त्याच्या हृदयात स्थान देईल."
वामन बुवा गहिवरून म्हणतात:- "स्वामी आपल्या लीला अगाध आहे!"
"त्यांना शब्दबद्ध करुन ग्रंथ लिहू इच्छितो."
स्वामी स्मितमुद्रेनी म्हणतात:- "तुझी इच्छा पूर्ण होईल. माझा आशीर्वाद आहे."
पुढे वामन बुवा स्वामीलीलेंवर ग्रंथ लिहितात ,हाच ग्रंथ श्रीगुरुलीलामृत म्हणून साकार होतो.
No comments:
Post a Comment