Friday, May 27, 2011

(६३) सांभाळुनी मार्गावरीता आणीता न दुजा त्राता

श्रीधर कुलकर्णी नावाचा एक स्वामीभक्त व्यक्ती होता. सरकारी नौकरीतुन निवृत्त झाल्यावर श्रीधर बुवा मुलांसाठी गुरुकुल
चालवायचे. श्रीधर बुवांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलगी तनु सर्व-गुण संपन्न असुन आज्ञाधारक होती.
श्रीधर बुवांचा मुलगा तुषार अगदी वाया गेलेला होता. त्याला दारू,जुगार सारखे व्यसन तर होतेच
पण मारहाण आणी चोरीपर्यंत पण त्याची मजल गेलेली होती.
कितीही समझावले तरी तुषार ऐकत नव्हता.
तुषार मुळे श्रीधरबुवा जाम वैतागले होते.
जेव्हा तुषारनी घरात चोरया करायला सुरुवात केली तेव्हा तर त्यांच्या डोक्यावरून पाणीच गेलं.
चोरीच्या पैशानी तुषार जुगार खेळायचा. जुगारात हरल्यावर तो तनुच्या लग्नासाठी केलेल्या दागिन्यांची सुद्धा चोरी करतो.
गावाच्या जमीनदाराचं श्रीधर बुवांच्या गुरुकुलावर लक्ष्य होतं.त्याल ती जागा खाजगी गरजे करता पाहिजे होती पण काहीही केल्या
श्रीधर बुवा जागा विकायला तैय्यार नसतात.
जुगारात हरून कफल्लक होऊन फिरतांना, तुषारला जमीनदार गाठतो. त्याला तो काही पैशे देतो.
तुषार ते पैशे सुद्धा हरतो. पुन्हा पैशे देण्यासाठी जमीनदार तुषारला गुरुकुलाचे कागद आणून द्यायची अट घालतो.
तुषार ते कागदपत्रे सुद्धा चोरून जमिनदाराला आणून देतो.
तिकडे तुषार चे कृष्ण-कृत्य कळल्यामुळे तनूचं लग्न मोडतं.
जमीनदार गुरुकुलाच्या जमिनीवर जब्ती आणतो.
या सर्व गोष्टीनी श्रीधर बुवांचा मानसिक तौल जातो आणी ते पोलिसात तक्रार नोंदवतात.
पोलीस मागे लागल्यामुळे तुषार एका जागेवर दडून बसतो. तिथे त्याला एक व्यक्ती भेटतो आणी आपुलकीनी बोलतो.
नाव विचारल्यावर तो व्यक्ती अवधूत असं नाव सांगतो.
अवधूत आपला व्यवसाय सोंगाड्याचा सांगतो.
अवधूत च प्रेमळ बोलण्यामुळे व व्यक्तित्वात कमालीचं आकर्षण असल्यामुळे तुषार ला त्याच्यापासून दुर जाता येत नाही.
अवधूत जे म्हणेल त्याला ते इच्छा-नसून पण करावे लागायचे.
अवधूत त्याला आमराईत काम करुन पैशे कमवायला लावतो, त्या पैशाची भाकर खाताना तुषार ला खरं समाधान मिळतं.
रात्री झोपतांना तुषार ला दारू लागायची पण अवधूत त्याला दुध पाजतात.
काही दिवसांनी अवधूत त्याला त्याची सर्व कृष्ण-कृत्य सांगतात.
अवधूत ला आपली सर्व कृष्ण कृत्य माहित आहे हे कळ्यावर तुषार थबकतो.
अवधूत सांगतात:-" तुझ्या या कृत्यामुळे तनूचं लग्न मोडलं आणी गुरुकुलावर जमीनदारांनी ताबा घेतला."
तनूचं लग्न आपल्या मुळे मोडलं हे ऐकुन तुषार ला फार खंत होतो.
अवधूत त्याला श्रीधर बुवांकडे नेतात. कितीही माफी मागितली तरी श्रीधरबुवांचा तुषारवर विश्वास बसत नाही.
तुषार मेहनत करुन पैशे कमवून गुरुकुलाचे कागदपत्रे जमीनदारा कडून परत मिळवतो.
श्रीधर बुवा म्हणतात:-"अरे गुरुकुल तर मी सुद्धा पैशे जोडून परत मिळवले असते पण तनूचं लग्न मोडले त्याचं काय?"
तुषार एका स्वामीभक्त मुलाला आणतो. त्या मुलाची लग्नाबद्दल कुठलीही अट नसते व स्वामीभक्त
परिवाराची वधु मिळणार म्हणुन तो आनंदित असतो.
तरीही श्रीधर बुवांच मन पूर्व-अनुभवांमुळे मानत नव्हतं.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात आणी म्हणतात:-
"श्रीधर ! अरे तुषार बदलला आहे. आम्ही स्वत: गेले आँठ दिवस त्याच्या बरोबर होतो."
"तो पश्चातापानी पोळला आहे ,त्याला नवीन आयुष्य सुरु करू दे."
तुषार ला कळतं कि गेले आँठ दिवस खुद्द स्वामी आपल्या बरोबर राहुन आपल मार्गदर्शन करत होते.आपण इतक्या चुका
 करूनही स्वामी नी आपल्याला क्षमा करुन शहाणे केले या मुळे त्याला गहिवरून येतं.
स्वामींच्या वचनांना शिरोधार्य करुन श्रीधरबुवा तुषार ला क्षमा करुन घरात घेतात.

Sunday, May 15, 2011

(६२) विधिलिखित बदलणार नाही

आनंद नावाचा एक मुलगा लग्नाबद्दल सशंकित होता. त्याच्या मते लग्न म्हणजे जुगार होते कारण जर
बायको सुगरण, आज्ञा धारक आणी प्रेमळ असेल तर लग्नाचं  सार्थक होतं पण जर ती कजाग,
उद्धट आणी भांडखोर असली तर प्रपंच नाकी नऊ आणतं.
याचं कारणांनी तो लग्नाला कचरत होता.
त्याचे वडील त्याला स्वामी कडे आणतात.
तिकडे  माधवी नावाची एक उपवर झालेली युवती असते, तीच्या लग्नाचा योग काढायला
तिचे आई-वडील तिला ज्योतिश्या कडे आणतात.
ज्योतिषी हात पाहून सांगतात कि काडी-मोडीचा योग आहे.
उद्धट माधवी ज्योतीश्याला उलटे बोल बोलुन परतते.
तिचे वडील तिला स्वामींकडे आणतात आणी लग्नाच्या योगा बद्दल विचारतात पण ज्योतिश्याचं भाकीत सांगत नाही.
स्वामी त्यांना आनंद सुचवतात.
स्वामींचा आशीर्वाद आहे, असं दोन्ही पक्षांना वाटून, आनंद आणी माधवीच लग्न लावण्यात येतं.
सासरी आल्याबरोबर माधवी आपले रंग दाखवायला लागते.
उलटे उत्तर देणे,काम चुकार पणा करणे तर जणू तिची दिनचर्याच झाली होती.
रोज  आजारीपणाच खोंट सोंग करायची आणी नवरा शेतावर गेल्यावर नट्टा-पट्टा करायची.
एक दिवशी तर हद्दच होते,
आनंदच्या आईचं श्राद्ध असतं आणी प्रसाद करायचं सोडून ती माहेरी जायला निघते.
आनंद समझवायचा प्रयत्न करतो तर ती त्याच्या कै. आई बद्दल अनादरानी बोलते.
आनंदचा तौल जातो आणी तो माधवीच्या श्रीमुखात एक चापटी लावतो. माधवी उग्र होऊन अनर्गल बोलायला लागते.
आनंद काडीमोड घेणार असं सांगून माधवीला घरातून हकलून देतो.
माधवी माहेरी परतते.
माधवीच्या आई-वडिलांना आश्चर्य होतं, स्वामींचा आशीर्वाद असतांना असं कस झाले.
ते स्वामींकडे कारण विचारायला येतात.
स्वामी त्यांची हजेरी घेतात:-" फार छान! आमच्या आधी ज्योतिष्याकडे जातात !"
"प्रतिकूल उत्तर मिळालं म्हणुन मग आमच्या कडे येतात पण प्रतीकुल भाकीत लपवतात!"
"अरे तुम्हाला काय वाटतं, वाटेल तशे कर्म करुन जे प्रारब्ध निर्माण करुन घेतात,ते स्वामींनी पुसून टाकायचं."
"अरे आपल्या मुलीला साधी शिस्त सुद्धा तुम्हाला शिकवता आली नाही!"
"मोठ्यांशी कसं वागायचं,त्यांचा कसा मान राखायचा, हे सुद्धा शिकवलं नाही."
"अरे स्त्रीसाठी नवरा परमेश्वर असतो त्याच्याशी नीट सुद्धा बोलता नाही आलं."
"आम्ही प्रारब्धात बदल करतो ते अपवाद स्वरूप परिस्थितीत,आणी त्याच्या मागे विशेष उद्देश असावा लागतो."
माधवीला त्यावेळेला पश्चाताप होतो, ती पुढे नीट वागायचं वचन देते.
आनंद व त्याचे वडील तिला एक संधी देतात आणी माधवी सासरी परत येउन जीवन सावरायचा नवीन प्रयत्न सुरु करते.

Friday, May 6, 2011

(६१) गोप्याची भक्ती

हरी नावाचा एक कर्मठ आणी कर्मकांडी पुरोहित असतो. त्याच्या मुलाचं नाव गोप्या असतं.
गोप्या अगदी सह्रदय मुलगा असतो, गोर-गरीबांना, मुक्या प्राण्यांना मदत करण्याचा तर त्याला जणू छंदच होता.
पण त्याच्या  वडिलांना हे सर्व आवडतं नव्हतं,त्याच्या मते पोरोहित्य,धर्म-कार्य हेच महत्वाचं असतं.
पण गोप्याची ठाम पणे ही समझुत होती कि गरजवंतांना आणी त्रासलेल्या प्राण्यांना मदत केली तर स्वामी आजोबा प्रसन्न होईल.
हरी त्याला समझवतो कि देवपूजा,धर्म-कर्म,पोथी-वाचन हेच ईश्वराला प्रसन्न करायचे साधन आहे.
पण गोप्यावर काहीही परिणाम होत नाही.
दुसऱ्या दिवशी हरी गोप्याला,आपल्या बरोबर सत्यनारायणाच्या कथेला नेतो.
आंब्याचे पानं नसल्यामुळे, ते आणायला गोप्याला पाठवलं जातं.
रस्त्यात गोप्याला एक गाय दिसते, तिच्या पाठीवर जखम झालेली असते.
उघड्या जखमेवर माश्या बसायच्या, व त्यामुळे ती गाय हैराण झाली होती.
गोप्या सर्व विसरून, औषधीच्या झाडाला शोधण्यात लागतो, शोधल्यावर त्याचे पाने वाटून तो तिच्या जखमेवर लावतो.
तिला खायला हिरवा चारा पण आणून देतो.
पण या सर्वात त्याला पाने आणण्यात फार उशीर होतो.
तिकडे आंब्याच्या पानांची दुसरी व्यवस्था होऊन कथेला शुरुवात सुद्धा होते.
या सर्व प्रकरणानी हरी फार संतापतो.घरी येऊन तो गोप्याला एका खोलीत डांबून ठेवतो. पत्नीला त्याला अन्न-पाणी द्यायचं नाही
अशी ताकीद देतो आणी स्वता बाहेर जातो.
पतीच्या भितीनी गोप्याची आई मन-मारून आपल्या मुलाचे छळ पाहते.
गोप्याला फार तहान लागते, पण त्याच्या आईला पाणी सुद्धा देता येत नाही.
गोप्याचा जीव तहानेनी कासावीस होतो, तो स्वामी आजोबांना हाक मारतो.
मग काय, काही क्षणातच स्वामी आजोबा, त्या बाहेरून कडी लागलेल्या खोलीत प्रगट होतात.
त्यांच्या सोबत गोप्या साठी पाणी आणी खाऊ सुद्धा असतो.
गोप्याला आश्चर्य होतं कि स्वामी बंद खोलीत कशे आले.
स्वामी म्हणतात:-"गोप्या! आम्ही कुठेही प्रगट होऊ शकतो, फक्त गरज आहे ती एकनिष्ठ भक्ती आणी कळकळेच्या हाकेची."
हरी परतून पाहतो तर गोप्या निवांत पणे बसला होता व त्याच्या शेजारी उरलेलं भोजन होतं.
त्याला वाटतं कि आपल्या पत्नीनी आपली आज्ञा पाळली नाही.
तो संतापतो, गोप्याला किर्र वनात जाऊन झाडाला बांधून येतो. तिथे कालोख्यात गोप्या फर घाबरतो.
तो पुन्हा स्वामी आजोबांना हाक मारतो.
इकडे अर्ध्या रात्री हरीची झोप उघडते, तो पाहतो तर काय! गोप्या चक्क त्याच्या बाजूला झोपलेला होता.
अर्ध्या रात्री तो रागाच्या भरात, आपल्या पत्नी आणी मुलाचा छळ करणार, त्या आधीच स्वामी तिथे प्रगट होतात.
स्वामी जाम रागावतात:-" काय रे दुसऱ्यांनी भक्ती सुद्धा करायची तर तुमच्या प्रमाणे? तुम्ही स्वताला काय भक्ती मार्गाचे
अधिकारी समाझतात ?"
"अरे जो तो आपल्या बुद्धी आणी आवडीप्रमाणे ईश्वराची भक्ती करतो, त्या पासुन त्यांना परावृत्त करुन आपल्या पद्धतीनीच
भक्ती करायला लावण्यात काय अर्थ आहे?"
स्वामींची चर्या गंभीर होते.
ते मंद स्वरात म्हणतात:-"देवाला कुणाची भक्ती आवडते, हे जर जाणायचं असेल तर उद्या आमच्याकडे या."
दुसऱ्या दिवशी स्वामी सर्वांना शिव मंदिरात नेतात.
तिथे महादेवाच्या पिंडी वर छिद्र नसलेला गढु लावण्यात येतो.
स्वामी म्हणतात:-" हरी, तु आणी गोप्यानी, ह्या छिद्र नसलेल्या गढुत दुध टाकायचे, ज्याच्या टाकण्यानी  महादेवावर
दुधाचा अभिषेक होईल, त्याची भक्ती देवाला जास्त आवडते, असं समझा."
छिद्र नसलेल्या गढुतुन दुध कसं पडेल, असा विचार करत हरी गढुत दुध टाकतो.
फार वेळ झाली तरी दुधाची धार महादेवावर पडत नाही.
मग गोप्या त्या गढुत  दुध टाकतो.
आपलं नाही ते नाही, पण गोप्याच्या टाकण्यानी पण दुध महादेवावर पडणार नाही, असं गृहीत धरुन हरी निशंक असतो.
पण तो पाहतो तरी काय! छिद्र नसलेल्या गढुतुन हळू-हळू दुधाची धार महादेवावर पडायला लागते.
त्याचा त्याच्याच डोळ्यावर विश्वास बसत नाही.
परत पाहतो तरी तेच दिसतं.
स्वामी म्हणतात:-" हरी कळलं कि देवाला कुणाची भक्ती जास्त आवडली?"
हरी आपली मन खाली घालतो.
स्वामी म्हणता:-"हरी प्रपंचात माणसाला ईश्वराचा विसर होतो म्हणुन देव पूजा,कर्म-कांड इत्यादी केले जातात."
तुम्ही जी भक्ती करतात, त्यात काही गैर नाही पण आपल्या भक्तीच्या पद्धतीचा अभिमान बाळगून
तुम्ही दुसऱ्यालाही तसच करायला भाग पाडतात, त्यांचा छळ करतात, हे चुकीचं आहे."
"अरे भगवंत फक्त मूर्तीत आणी पुराणात दडलेला नाही, तो चालत्या फिरत्या प्रत्येक जीवात असतो."
गोप्यानी जी गाईची सुश्रुसा केली ती प्रत्यक्ष देवाला पावली.
"अरे चालत्या फिरत्या देवाचाच छळ करुन, कोणत्या दुसऱ्या देवाला तुम्ही प्रसन्न करणार?"
"ज्याला-त्याला आपल्या बुद्धी,भक्ती आणी त्यांच्या पद्धतीनी देवाची भक्ती करू द्या."
"त्यांच्यावर उगाच दडपण आणू नका."
हरी आपली चुक मान्य करतो.
स्वामी त्त्याला क्षमा करुन आशीर्वाद देतात.