Friday, May 6, 2011

(६१) गोप्याची भक्ती

हरी नावाचा एक कर्मठ आणी कर्मकांडी पुरोहित असतो. त्याच्या मुलाचं नाव गोप्या असतं.
गोप्या अगदी सह्रदय मुलगा असतो, गोर-गरीबांना, मुक्या प्राण्यांना मदत करण्याचा तर त्याला जणू छंदच होता.
पण त्याच्या  वडिलांना हे सर्व आवडतं नव्हतं,त्याच्या मते पोरोहित्य,धर्म-कार्य हेच महत्वाचं असतं.
पण गोप्याची ठाम पणे ही समझुत होती कि गरजवंतांना आणी त्रासलेल्या प्राण्यांना मदत केली तर स्वामी आजोबा प्रसन्न होईल.
हरी त्याला समझवतो कि देवपूजा,धर्म-कर्म,पोथी-वाचन हेच ईश्वराला प्रसन्न करायचे साधन आहे.
पण गोप्यावर काहीही परिणाम होत नाही.
दुसऱ्या दिवशी हरी गोप्याला,आपल्या बरोबर सत्यनारायणाच्या कथेला नेतो.
आंब्याचे पानं नसल्यामुळे, ते आणायला गोप्याला पाठवलं जातं.
रस्त्यात गोप्याला एक गाय दिसते, तिच्या पाठीवर जखम झालेली असते.
उघड्या जखमेवर माश्या बसायच्या, व त्यामुळे ती गाय हैराण झाली होती.
गोप्या सर्व विसरून, औषधीच्या झाडाला शोधण्यात लागतो, शोधल्यावर त्याचे पाने वाटून तो तिच्या जखमेवर लावतो.
तिला खायला हिरवा चारा पण आणून देतो.
पण या सर्वात त्याला पाने आणण्यात फार उशीर होतो.
तिकडे आंब्याच्या पानांची दुसरी व्यवस्था होऊन कथेला शुरुवात सुद्धा होते.
या सर्व प्रकरणानी हरी फार संतापतो.घरी येऊन तो गोप्याला एका खोलीत डांबून ठेवतो. पत्नीला त्याला अन्न-पाणी द्यायचं नाही
अशी ताकीद देतो आणी स्वता बाहेर जातो.
पतीच्या भितीनी गोप्याची आई मन-मारून आपल्या मुलाचे छळ पाहते.
गोप्याला फार तहान लागते, पण त्याच्या आईला पाणी सुद्धा देता येत नाही.
गोप्याचा जीव तहानेनी कासावीस होतो, तो स्वामी आजोबांना हाक मारतो.
मग काय, काही क्षणातच स्वामी आजोबा, त्या बाहेरून कडी लागलेल्या खोलीत प्रगट होतात.
त्यांच्या सोबत गोप्या साठी पाणी आणी खाऊ सुद्धा असतो.
गोप्याला आश्चर्य होतं कि स्वामी बंद खोलीत कशे आले.
स्वामी म्हणतात:-"गोप्या! आम्ही कुठेही प्रगट होऊ शकतो, फक्त गरज आहे ती एकनिष्ठ भक्ती आणी कळकळेच्या हाकेची."
हरी परतून पाहतो तर गोप्या निवांत पणे बसला होता व त्याच्या शेजारी उरलेलं भोजन होतं.
त्याला वाटतं कि आपल्या पत्नीनी आपली आज्ञा पाळली नाही.
तो संतापतो, गोप्याला किर्र वनात जाऊन झाडाला बांधून येतो. तिथे कालोख्यात गोप्या फर घाबरतो.
तो पुन्हा स्वामी आजोबांना हाक मारतो.
इकडे अर्ध्या रात्री हरीची झोप उघडते, तो पाहतो तर काय! गोप्या चक्क त्याच्या बाजूला झोपलेला होता.
अर्ध्या रात्री तो रागाच्या भरात, आपल्या पत्नी आणी मुलाचा छळ करणार, त्या आधीच स्वामी तिथे प्रगट होतात.
स्वामी जाम रागावतात:-" काय रे दुसऱ्यांनी भक्ती सुद्धा करायची तर तुमच्या प्रमाणे? तुम्ही स्वताला काय भक्ती मार्गाचे
अधिकारी समाझतात ?"
"अरे जो तो आपल्या बुद्धी आणी आवडीप्रमाणे ईश्वराची भक्ती करतो, त्या पासुन त्यांना परावृत्त करुन आपल्या पद्धतीनीच
भक्ती करायला लावण्यात काय अर्थ आहे?"
स्वामींची चर्या गंभीर होते.
ते मंद स्वरात म्हणतात:-"देवाला कुणाची भक्ती आवडते, हे जर जाणायचं असेल तर उद्या आमच्याकडे या."
दुसऱ्या दिवशी स्वामी सर्वांना शिव मंदिरात नेतात.
तिथे महादेवाच्या पिंडी वर छिद्र नसलेला गढु लावण्यात येतो.
स्वामी म्हणतात:-" हरी, तु आणी गोप्यानी, ह्या छिद्र नसलेल्या गढुत दुध टाकायचे, ज्याच्या टाकण्यानी  महादेवावर
दुधाचा अभिषेक होईल, त्याची भक्ती देवाला जास्त आवडते, असं समझा."
छिद्र नसलेल्या गढुतुन दुध कसं पडेल, असा विचार करत हरी गढुत दुध टाकतो.
फार वेळ झाली तरी दुधाची धार महादेवावर पडत नाही.
मग गोप्या त्या गढुत  दुध टाकतो.
आपलं नाही ते नाही, पण गोप्याच्या टाकण्यानी पण दुध महादेवावर पडणार नाही, असं गृहीत धरुन हरी निशंक असतो.
पण तो पाहतो तरी काय! छिद्र नसलेल्या गढुतुन हळू-हळू दुधाची धार महादेवावर पडायला लागते.
त्याचा त्याच्याच डोळ्यावर विश्वास बसत नाही.
परत पाहतो तरी तेच दिसतं.
स्वामी म्हणतात:-" हरी कळलं कि देवाला कुणाची भक्ती जास्त आवडली?"
हरी आपली मन खाली घालतो.
स्वामी म्हणता:-"हरी प्रपंचात माणसाला ईश्वराचा विसर होतो म्हणुन देव पूजा,कर्म-कांड इत्यादी केले जातात."
तुम्ही जी भक्ती करतात, त्यात काही गैर नाही पण आपल्या भक्तीच्या पद्धतीचा अभिमान बाळगून
तुम्ही दुसऱ्यालाही तसच करायला भाग पाडतात, त्यांचा छळ करतात, हे चुकीचं आहे."
"अरे भगवंत फक्त मूर्तीत आणी पुराणात दडलेला नाही, तो चालत्या फिरत्या प्रत्येक जीवात असतो."
गोप्यानी जी गाईची सुश्रुसा केली ती प्रत्यक्ष देवाला पावली.
"अरे चालत्या फिरत्या देवाचाच छळ करुन, कोणत्या दुसऱ्या देवाला तुम्ही प्रसन्न करणार?"
"ज्याला-त्याला आपल्या बुद्धी,भक्ती आणी त्यांच्या पद्धतीनी देवाची भक्ती करू द्या."
"त्यांच्यावर उगाच दडपण आणू नका."
हरी आपली चुक मान्य करतो.
स्वामी त्त्याला क्षमा करुन आशीर्वाद देतात.
 

No comments:

Post a Comment