Friday, May 27, 2011

(६३) सांभाळुनी मार्गावरीता आणीता न दुजा त्राता

श्रीधर कुलकर्णी नावाचा एक स्वामीभक्त व्यक्ती होता. सरकारी नौकरीतुन निवृत्त झाल्यावर श्रीधर बुवा मुलांसाठी गुरुकुल
चालवायचे. श्रीधर बुवांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलगी तनु सर्व-गुण संपन्न असुन आज्ञाधारक होती.
श्रीधर बुवांचा मुलगा तुषार अगदी वाया गेलेला होता. त्याला दारू,जुगार सारखे व्यसन तर होतेच
पण मारहाण आणी चोरीपर्यंत पण त्याची मजल गेलेली होती.
कितीही समझावले तरी तुषार ऐकत नव्हता.
तुषार मुळे श्रीधरबुवा जाम वैतागले होते.
जेव्हा तुषारनी घरात चोरया करायला सुरुवात केली तेव्हा तर त्यांच्या डोक्यावरून पाणीच गेलं.
चोरीच्या पैशानी तुषार जुगार खेळायचा. जुगारात हरल्यावर तो तनुच्या लग्नासाठी केलेल्या दागिन्यांची सुद्धा चोरी करतो.
गावाच्या जमीनदाराचं श्रीधर बुवांच्या गुरुकुलावर लक्ष्य होतं.त्याल ती जागा खाजगी गरजे करता पाहिजे होती पण काहीही केल्या
श्रीधर बुवा जागा विकायला तैय्यार नसतात.
जुगारात हरून कफल्लक होऊन फिरतांना, तुषारला जमीनदार गाठतो. त्याला तो काही पैशे देतो.
तुषार ते पैशे सुद्धा हरतो. पुन्हा पैशे देण्यासाठी जमीनदार तुषारला गुरुकुलाचे कागद आणून द्यायची अट घालतो.
तुषार ते कागदपत्रे सुद्धा चोरून जमिनदाराला आणून देतो.
तिकडे तुषार चे कृष्ण-कृत्य कळल्यामुळे तनूचं लग्न मोडतं.
जमीनदार गुरुकुलाच्या जमिनीवर जब्ती आणतो.
या सर्व गोष्टीनी श्रीधर बुवांचा मानसिक तौल जातो आणी ते पोलिसात तक्रार नोंदवतात.
पोलीस मागे लागल्यामुळे तुषार एका जागेवर दडून बसतो. तिथे त्याला एक व्यक्ती भेटतो आणी आपुलकीनी बोलतो.
नाव विचारल्यावर तो व्यक्ती अवधूत असं नाव सांगतो.
अवधूत आपला व्यवसाय सोंगाड्याचा सांगतो.
अवधूत च प्रेमळ बोलण्यामुळे व व्यक्तित्वात कमालीचं आकर्षण असल्यामुळे तुषार ला त्याच्यापासून दुर जाता येत नाही.
अवधूत जे म्हणेल त्याला ते इच्छा-नसून पण करावे लागायचे.
अवधूत त्याला आमराईत काम करुन पैशे कमवायला लावतो, त्या पैशाची भाकर खाताना तुषार ला खरं समाधान मिळतं.
रात्री झोपतांना तुषार ला दारू लागायची पण अवधूत त्याला दुध पाजतात.
काही दिवसांनी अवधूत त्याला त्याची सर्व कृष्ण-कृत्य सांगतात.
अवधूत ला आपली सर्व कृष्ण कृत्य माहित आहे हे कळ्यावर तुषार थबकतो.
अवधूत सांगतात:-" तुझ्या या कृत्यामुळे तनूचं लग्न मोडलं आणी गुरुकुलावर जमीनदारांनी ताबा घेतला."
तनूचं लग्न आपल्या मुळे मोडलं हे ऐकुन तुषार ला फार खंत होतो.
अवधूत त्याला श्रीधर बुवांकडे नेतात. कितीही माफी मागितली तरी श्रीधरबुवांचा तुषारवर विश्वास बसत नाही.
तुषार मेहनत करुन पैशे कमवून गुरुकुलाचे कागदपत्रे जमीनदारा कडून परत मिळवतो.
श्रीधर बुवा म्हणतात:-"अरे गुरुकुल तर मी सुद्धा पैशे जोडून परत मिळवले असते पण तनूचं लग्न मोडले त्याचं काय?"
तुषार एका स्वामीभक्त मुलाला आणतो. त्या मुलाची लग्नाबद्दल कुठलीही अट नसते व स्वामीभक्त
परिवाराची वधु मिळणार म्हणुन तो आनंदित असतो.
तरीही श्रीधर बुवांच मन पूर्व-अनुभवांमुळे मानत नव्हतं.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात आणी म्हणतात:-
"श्रीधर ! अरे तुषार बदलला आहे. आम्ही स्वत: गेले आँठ दिवस त्याच्या बरोबर होतो."
"तो पश्चातापानी पोळला आहे ,त्याला नवीन आयुष्य सुरु करू दे."
तुषार ला कळतं कि गेले आँठ दिवस खुद्द स्वामी आपल्या बरोबर राहुन आपल मार्गदर्शन करत होते.आपण इतक्या चुका
 करूनही स्वामी नी आपल्याला क्षमा करुन शहाणे केले या मुळे त्याला गहिवरून येतं.
स्वामींच्या वचनांना शिरोधार्य करुन श्रीधरबुवा तुषार ला क्षमा करुन घरात घेतात.

No comments:

Post a Comment