Friday, February 25, 2011

(५१) भक्ती निरागस आणी एकनिष्ठ असावी

मंगला नावाची एक स्त्री गर्भवती होती. तीचं हे तीसरं बाळंतपण होतं.ती शरीरानी  अगदी  कृष् झाली होती.
तिचा नवरा दिवस भर शेतात राबायचा आणी तिची आणी घराची सर्व व्यवस्था तिची १० वर्षाची मुलगी 'गोरी'पाहायची.
गौरी अल्पवयीन असली तरी
फार समझदार होती. ती सकाळी उठून झाड-लोट करुन, स्वयंपाक करायची तिची केलेली भाकरी घेऊन तिचे बाबा शेतात जायचे,
मग ती आपल्या छोट्या भावाला तैयार करुन ,जेवण करवून पाठशाळेत सोडायची.
थोडक्यात ती घरची सर्व व्यवस्था नीट पाहायची.
पण या सर्व कामामुळे गौरी फार दमायची.
एकदिवस फार दमलेली असतानाच तिला पीठ दळून स्वयंपाक करायचं होतं.
तिला फार झोप येत होती. ती कळकळून स्वामी आजोबाची आठवण करते कारण तिला तिच्या आईनी सांगितलं होतं
कि स्वामी आजोबा आपली सर्व काळजी दुर करणार.
ती साळसुदपणे आपलं सर्व घाराणं सांगते.
तितक्यात तिथे एक वृद्ध आजोबा येतात. ते आपळी ओळख स्वामी आजोबा म्हणुन देतात.
गोष्टी-गोष्टीत आजोबा आणी गौरी सर्व पीठ दळून टाकतात.
पण त्या नंतर एकाएक स्वामी आजोबा तिथुन गौरीच्या नकळत निघून जातात.
गौरी सगळा वृतांत आईला सांगते. मंगळाला वाटतं कि आपण मुलांना धीर द्यायला स्वामी आजोबाचं नाव सांगितलं,
आणी मुलगी खरं समजली.
श्रमा मुळे गौरी उगीचच मनातलं बोलली असावी.
गौरीला जेव्हाही गरज असायची स्वामी आजोबा यायचे आणी तिला मदत करायचे.
एकदा गौरीच्या आईला प्रसव वेदना सुरु होतात. आधीच अशक्त असलेल्या मंगलाला हा प्रसंग अगदी जीव-घेण्यासारखा होता.
सुईण बाई सुद्धा मुल अडलं आहे असं सांगते.
पण गौरी ला ठामपणे विश्वास होता कि तिचे स्वामी आजोबा या प्रसंगातूनही तिच्या आईला आणी होणाऱ्या
 बाळाला सुखरूप वाचवतील.
ती गाव भर स्वामी आजोबांना पाहत फिरते, पण कुठेही स्वामी आजोबा तिला भेटत नाही.
हिरमुसलेली गौरी घरी परत येते.
तिथे तिची आई सुखरूप प्रसूत होते.
त्या स्थानावर स्वामी प्रगट होतात,त्यांना पाह्यल्यावर गौरी पटकन आपल्या स्वामी आजोबांना ओळखते.
ती म्हणते-"स्वामी आजोबा! तुम्ही कुठे होता? मीगाव भर तुम्हाला शोधले होते!"
स्वामी म्हणतात-"अरे मी  तर इथेच होतो, अरे मला तुझी काळजी जी दुर करायची होती."
गौरीचे वडील तर चाट पडतात.गौरी जे स्वामी आजोबाच्या गोष्टी सांगायची ते सर्व खरं होतं.
स्वामी त्यांना म्हणतात- "अरे तुम्ही लोकं दुसर्याला देवाचा केव्हा सद्गुरूचा धीर देतात, पण स्वताला मात्र त्याच्यावर फारसा
विश्वास नसतो.
तुमच्या मनात संकल्प-विकल्प उठतात.देवानी मदल केली तर बरं नाहीतर आम्हीच काही तरी करू.

पण या मुलांच्या बाबतीत अस नसतं. त्यांचा आमच्या  वर ठामपणे विश्वास असतो.त्यांची भक्ती निरागस आणी एकनिष्ठ असते.
आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीनी बांधला जातो, आणी त्याला सर्व काम टाकून भक्तासाठी यावंच लागतं.
देवावर विश्वास कसा करावा, हा या मुलांपासून मोठ्यांनी शिकावा."

Friday, February 18, 2011

(५०) अहंकाराचा परिणाम

सदाशिव आणी  संगीता एक स्वामीभक्त जोडपं होतं. ते अनन्य भावांनी स्वामींच्या मुर्तीचं पूजन करायचे.
एक दिवस ते पाहतात तर  काय, स्वामींच्या मूर्तीला तडा गेलेला आहे.
त्यांना अपार दु:ख होतं. आता भंगलेली मूर्ती बोळवून नवीन मूर्ती आणायचा विचार करतात.
पण मूर्ती कुठे मिळेल हा प्रश्न पडतो.
एक दिवस ते अक्कलकोट जवळ जमीन पाह्यला जातात.
तिथे त्यांना एक कुंभार पुत्र शंकराच्या पिंड्या घडवतांना दिसतो.त्याच्या कडे स्वामीमूर्ती मिळेल का म्हणुन तिथे जातात.
तो कुंभार पुत्र गण्या  सुद्धा अनन्य स्वामीभक्त होता.
स्वामी मूर्ती घडवायला गण्या सहर्ष तयार होतो.
"मूर्ती झाल्यावर निरोप पाठवा मी माणस पाठवीन"- असं सदाशिव कुंभाराला म्हणतो.
गण्या दिलेल्या मुदतीत मूर्ती घडवायला जीवाचं रान करतो.
मूर्ती साकार होते, पण गण्या आजारी पडतो.
ताप वाढतो, शरीर विस्तवा सारखे तापतं, वैद्यबुवा बोलावले जातात.
वैद्य बुवा उपचार करतात, पण ताप काही कमी होत नाही.रोग आटोक्या बाहेर गेला आहे,अस वैद्य बुवा सांगतात.
सदाशिव आणी संगीता मूर्ती कुठ पर्यंत तैयार झाली हे पहायला येतात, तेव्हा त्यांना सगळ वृतांत कळतं.
गण्याची अशी अवस्था पाहून संगीता कळवळून स्वामींची करुणा भाकते.
स्वामी ज्या गण्यांनी प्राण पणाला लाऊन ठरलेल्या वेळीत तुमची मूर्ती घडवली, त्या श्रमांनी तो आज मृत्यु दारी पडला आहे.
स्वामी त्याला वाचवा, स्वामी कृपा करा.
प्रार्थना सुरु  असतानांच गण्या डोळे उघडतो,त्याची आई त्याला चाचपते
तिला घोर आश्चर्य होत कि गण्याचा ताप अगदी कमी झाला आहे.
मागे बसलेले वैद्य बुवा पण त्याला तपासतात ते सुद्धा थक्क होतात.
असं क्षणात ताप कसा काय बरा होऊ शकतो.
गण्या खड-खडीत बरा झाला आहे, आता माझी गरज नाही, असं म्हणुन वैद्य बुवा जातात.
सर्व लोकं स्वामींचे आभार व्यक्त करतात.
सदाशिव आणी संगीता मूर्ती घेऊन परततात ,त्यांना अमावस्या लागण्या आधी घरी पोचायच असतं.
तिथुन जायला शेवटची बैल-गाडी असते. पण बैलगाडी वाला पुढे वाटसरू येणार आहे, अशी सबब सांगून न्यायला नकार देतो.
पण काय त्याचे गरीब बैल गाडीत जुम्पायलाच तैयार नसतात, काही केल्या ऐकत नाही उलट गाडीवाल्यालाच मारायला येतात.
त्या गाडीत जाणारी एक स्त्री त्याला सुचवते कि तुम्ही स्वामींची मूर्ती नेणाऱ्या जोडप्याला नाकारलं, म्हणुन बैल दुमानत नाही आहे.
सदाशिव आणी संगीताला बरोबर घेतल्यावर बैल पूर्वी सारखे गरीब होतात.
घरी जाऊन सदाशिव स्वामींचं मंदिर बांधून मूर्ती स्थापित करण्याचं ठरवतो.
पण या कार्यात ना-ना विघ्न येतात, कधी गवंडी मिळत नाही तर मिळालेले गवंडी काम सोडून जातात.
शेवटी कसं-बसं एक गवंडी कार्याला आरंभ करतो तर अर्धवट झालेलं मंदीर कोसळून पडतं.
संगीताच्या अंतर्मनात स्वामी म्हणंतात- " आत्म परीक्षण करा!"
पण संगीताला काही विशेष बोध होत नाही.
सदाशिव पुन्हा एकदा मंदिर बांधायला जातो तितक्यात संगीता पडते आणी तिचा पाय मुर्गळतो
गवंडी सुचवतो कि तुम्ही जेव्हाही मंदिर निर्माण करायला जातात तेव्हा काही न काही विघ्न येत आहे.
सदाशिव ला गवंड्याची  सूचना पटते..
ते सर्व स्वामी शरणी जातात.
स्वामी म्हणतात-" काय रे मंदिर कोसळलं म्हणून आला ना रे?"
सदाशिव थक्क होतो
स्वामी पुढे म्हणतात-"अरे मंदिर कोसळण्याच कारण तुझा अहंकार. मी मंदीर बांधणार, उच्य दर्ज्याची सामग्री लावणार."
"आणखी कोणी गावातला  माझ्या सारखं मंदिर बांधू  शकत नाही."
"अरे पुजेला बसताना सुद्धा लोकांना दाखवण्यावर तुझ लक्ष्य असतं."
"तेव्हा सुद्धा ईश्वराचं ध्यान करण्या ऐवजी धंद्यात नफा कसा होईल याच्यावर जास्त लक्ष्य असतं."
"जो पर्यंत मन पूर्वक भक्ती करत होता तो पर्यंत आम्ही तुझ्या देव घरातल्या मुर्तीत वास करत होतो जेव्हा तुझा
मनात दुसरे विचार यायला लागले,तेव्हा आम्ही त्या मूर्तीचा त्याग केला म्हणूनच ती मूर्ती भंग पावली."
सदाशिव आणी संगीता आपली चुक मान्य करतात.
पण संगीताच्या मनात प्रश्न येतो, आमची चूक झाली हे खरं, पण गण्या आजारी का झालां ?
स्वामी म्हणतात:-"गण्या आमचा निस्सीम भक्त होता, पण तुम्हाला भक्ती कशी करतात हे दाखवण्या साठी आम्हाला
त्याला आजारी पाडाव लागलं."
"काय म्हणाला होता तुम्ही?
मूर्ती झाल्यवर कळवा. आम्ही माणसं पाठवू."

"अरे आम्हाला नेणारा तु कौन?"
सदाशिव आपली चूक मान्य करतो.
स्वामी प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात- "मंदिर निर्विघ्न पूर्ण होईल!"

Friday, February 4, 2011

(४९) खोट्या आळापासुन सुटका

धनंजय नावाचा एक गृहस्थ अनन्य स्वामीभक्त होता. तो एका शेठाच्या सोनारीपेढी वर कार्य करायचा.
स्वामी भक्तीत लीन राहण्यामुळे त्याचं कार्याकडे दुर्लक्ष्य व्हायचं.
याचाच फायदा घेऊन त्याचे अधीनस्थ खोटे दागिने करुन दागिने बनवायला मिळालेलं सोनं स्वत: ठेवायचे.
धनंजयची जवाबदारी होती कि त्यांनी दागिने तपासूनच गिऱ्हाईकाला द्यायचं पण तो अधीनस्थांवर  विश्वास ठेऊन,
 न तपासता दागिने गिऱ्हाईकांना द्यायचा.
त्या पेढीच नाव असल्यानी गिऱ्हाइक सुद्धा विश्वसानी दागिने घ्यायचे.
एकदा एका गिऱ्हाइका वर दागिने मोडायची वेळ येते,धनंजय तपासतो तर दागिना खोटा असतो.
पण त्या दागिन्या वर दुकानाची छाप असते.
तो अधीनस्थांना जाब विचारतो तेव्हा ते त्यालाच या कारस्तानात शामिल करू पाहतात.
पण स्वामीभक्त धनंजय, त्यांच्या मोहाला भुलत नाही आणी शेटाला शिकायत करायला जातो.
पण त्याचे अधीनस्थ खरे दागिने धनंजयच्या कपाटात ठेऊन त्याच्या आधी शेटाला गाठून सर्व आळ त्याच्यावरच उलटतात.
शेटजीलापण धनंजयाचाच दोष वाटतो.
शेटजी  त्याला एका दिवसाची मुदत देउन, अफरा-तफर झालेल्या राशीची मागणी करतात,
नाहीतर तुरुंगात पाठवीन अस सांगतात.
मानी  धनंजय तुरुंगात जाउन अब्रू जाण्या पेक्ष्या जीव द्यायला जातो.
गळ्यात फास घालुन तो स्वामींचं नामस्मरण करुन तो उडी मारतो, त्याचं क्षणी तिकडे अक्कलकोटला स्वामी जवळ असलेल्या
भुजंगला गालावर एक चापटी मारतात.
आणी तिकडे गळफासाची दोरी तुटून पडते.
इकडे स्वामी रागावतात ते धनंजयला अंतर्मनात ऐकू येतं.
" वेड्या काही सुचल नाही तर निघाला जीव द्यायला, आपल्या नंतर घरच्यांच काय होईल, हा विचार नाही केला."
"आम्ही असतांना असं पाऊल घ्यायचा विचार तरी कसा आला ?"
"ते सर्व सोड, ताबडतोब अक्कलकोटला निघून ये."
धनंजय बायको आणी मुलगी झोपली असतांना कागदावर निरोप ठेऊन अक्कलकोटला जायला निघतो.

इकडे स्वामी भुजंगला प्रेमानी म्हणतात, अरे तुझं काही चुकलं नाही रे,भुजंग !,एका वेड्या शिष्याला वाचवायला ती चापटी होती.
धनंजयला रस्त्यात विश्रांती करत असतांना एक माणूस येऊन त्याला उठवतो आणी चोकशी करतो.
धनंजय आपलं मनोगत सांगतो.
मग तो व्यक्ती म्हणतो:- "आम्ही पण आमच्या गुरु बरोबर अक्कलकोटला जात आहे, तुम्ही आमच्या बरोबर चला."
"तुम्हालाही सोबत होईल आणी वाट चुकण्याची पण भीती राहणार नाही."
धनंजय मान्य करतो.
धनंजय त्या व्यक्ती बरोबर त्यांच्या गुरूच्या मठात येतो.
गुरुजी धनंजयला पाहिल्याबरोबर त्याचं नाव आणी त्याचा मनोगत सांगतात,धनंजय थक्क होतो.
मग ते गुरु म्हणतात:- "आम्ही काही दिवसांनी अक्कलकोटला जाणार आहे,
तो पर्यंत आमच्या आश्रमात राहा. पण वीणा वादन करावं लागेल."
"आमच्या आश्रमात सतत वीणा वादन होत."
"आम्ही म्हणू तेव्हा वीणा वादन करायचं आणी आज्ञा देऊ त्या आधी वीणा सोडायची  नाही,
रात्री-अपरात्री सुद्धा वीणा वाजवावी लागेल."
थोड्या आश्चर्यानी  पण धनंजय मान्य करतो.
त्याप्रमाणे एकदा रात्र भर धनंजय वीणा वाजवतो, सकाळी गुरुजी त्याला  आंघोळ करायला लावून यथासांग पौरोहित्य करवून घेतात.
धनंजयच्या मनात प्रश्न येतात पण अंतर्यामी गुरुजी त्याला एकच सांगतात कि वेळ आल्या वर उत्तर मिळेल.
तिकडे धनंजयचे घरचे अक्कलकोटला जाऊन स्वामींना सर्व वृतांत सांगतात, आणी धनंजय बद्दल चिंता व्यक्त करतात.
धनंजय बद्दल स्वामी त्यांना आश्वस्त करुन त्यांना परत पाठवतात.
इकडे गुरुजी धनंजय ला अन्नदान करायला सांगतात.
धनंजय आपल्या कडे पैशे नाही असं सांगतो.
गुरुजी म्हणतात: "फक्त तीन घर माधुकरी मागायची  आणी अन्न दान  कर.
धनंजय तसच करतो.
त्यानंतर गुरुजी धनंजया कडून गुरुचरीत्राची ११ पारायण करवून घेतात.
पारायण झाल्यावर गुरुजी धनंजयला आपल्या शिष्या बरोबर अक्कलकोटला पाठवतात.
अक्कलकोटला गेल्या बरोबर स्वामी धनंजयला ला रागावतात:
"कारे! आम्ही दिलेलं  आयुष्य संपवणारा तु कोण?
"आम्ही सतत म्हणतो कि माणसांनी प्रपंच अथवा परमार्थ दोन्ही कडे जागरूक राहावे,तु असं गाफील  का राहिला?"
धनंजय प्रामाणिक पणे आपली चूक मान्य करतो आणी मग रस्त्यात भेटलेल्या गुरुजी बद्दल विचारतो.
तेव्हा त्याला स्वामींच्या जागी ते गुरुजी दिसतात.त्याला कळतं कि स्वामीनीच स्वत: येऊन आपल्या कडून
देव-कर्म करवून घेतलं आहे.
मग स्वामी म्हणतात: "अरे त्तु मागच्या जन्मी केलेल्या संकल्पा मुळे हे सर्व घडले."
"तु मागच्या जन्मी आमची सेवा करायचा संकल्प केला होता. आमच्या साठी वीणा वाजवायचं सुद्धा तु ठरवलं होत."
"पण संकल्प सिद्धीला जाईल त्या आधीच तुझा मृत्यु झाला."
"म्हणुन आम्ही तुझ्या या जन्मात ते सर्व कार्य करवून घेतलं."
तितक्यात धनंजयची बायको आणी मुलगी तिथे  येतात.
धनंजय ला तिथे पाहून त्यांना आनंद होतो.
ते त्याला आनन्दाची बातमी  देतात कि शेटजी ला सर्व सत्य कळलं आहे,
आणी धनंजय वर केलेल्या अविश्वासा मुळे ते दिलगिरी सुद्धा व्यक्त करुन राहिले आहे
धनंजय निर्दोष आहे हे सुद्धा त्यांना कळलं आहे, आणी त्याचे गुन्हेगार अधिनस्थांना सुद्धा अटक झाली आहे.
धनंजय कृत-कृत्य होऊन स्वामी चरणी मस्तक ठेवतो.