Friday, February 4, 2011

(४९) खोट्या आळापासुन सुटका

धनंजय नावाचा एक गृहस्थ अनन्य स्वामीभक्त होता. तो एका शेठाच्या सोनारीपेढी वर कार्य करायचा.
स्वामी भक्तीत लीन राहण्यामुळे त्याचं कार्याकडे दुर्लक्ष्य व्हायचं.
याचाच फायदा घेऊन त्याचे अधीनस्थ खोटे दागिने करुन दागिने बनवायला मिळालेलं सोनं स्वत: ठेवायचे.
धनंजयची जवाबदारी होती कि त्यांनी दागिने तपासूनच गिऱ्हाईकाला द्यायचं पण तो अधीनस्थांवर  विश्वास ठेऊन,
 न तपासता दागिने गिऱ्हाईकांना द्यायचा.
त्या पेढीच नाव असल्यानी गिऱ्हाइक सुद्धा विश्वसानी दागिने घ्यायचे.
एकदा एका गिऱ्हाइका वर दागिने मोडायची वेळ येते,धनंजय तपासतो तर दागिना खोटा असतो.
पण त्या दागिन्या वर दुकानाची छाप असते.
तो अधीनस्थांना जाब विचारतो तेव्हा ते त्यालाच या कारस्तानात शामिल करू पाहतात.
पण स्वामीभक्त धनंजय, त्यांच्या मोहाला भुलत नाही आणी शेटाला शिकायत करायला जातो.
पण त्याचे अधीनस्थ खरे दागिने धनंजयच्या कपाटात ठेऊन त्याच्या आधी शेटाला गाठून सर्व आळ त्याच्यावरच उलटतात.
शेटजीलापण धनंजयाचाच दोष वाटतो.
शेटजी  त्याला एका दिवसाची मुदत देउन, अफरा-तफर झालेल्या राशीची मागणी करतात,
नाहीतर तुरुंगात पाठवीन अस सांगतात.
मानी  धनंजय तुरुंगात जाउन अब्रू जाण्या पेक्ष्या जीव द्यायला जातो.
गळ्यात फास घालुन तो स्वामींचं नामस्मरण करुन तो उडी मारतो, त्याचं क्षणी तिकडे अक्कलकोटला स्वामी जवळ असलेल्या
भुजंगला गालावर एक चापटी मारतात.
आणी तिकडे गळफासाची दोरी तुटून पडते.
इकडे स्वामी रागावतात ते धनंजयला अंतर्मनात ऐकू येतं.
" वेड्या काही सुचल नाही तर निघाला जीव द्यायला, आपल्या नंतर घरच्यांच काय होईल, हा विचार नाही केला."
"आम्ही असतांना असं पाऊल घ्यायचा विचार तरी कसा आला ?"
"ते सर्व सोड, ताबडतोब अक्कलकोटला निघून ये."
धनंजय बायको आणी मुलगी झोपली असतांना कागदावर निरोप ठेऊन अक्कलकोटला जायला निघतो.

इकडे स्वामी भुजंगला प्रेमानी म्हणतात, अरे तुझं काही चुकलं नाही रे,भुजंग !,एका वेड्या शिष्याला वाचवायला ती चापटी होती.
धनंजयला रस्त्यात विश्रांती करत असतांना एक माणूस येऊन त्याला उठवतो आणी चोकशी करतो.
धनंजय आपलं मनोगत सांगतो.
मग तो व्यक्ती म्हणतो:- "आम्ही पण आमच्या गुरु बरोबर अक्कलकोटला जात आहे, तुम्ही आमच्या बरोबर चला."
"तुम्हालाही सोबत होईल आणी वाट चुकण्याची पण भीती राहणार नाही."
धनंजय मान्य करतो.
धनंजय त्या व्यक्ती बरोबर त्यांच्या गुरूच्या मठात येतो.
गुरुजी धनंजयला पाहिल्याबरोबर त्याचं नाव आणी त्याचा मनोगत सांगतात,धनंजय थक्क होतो.
मग ते गुरु म्हणतात:- "आम्ही काही दिवसांनी अक्कलकोटला जाणार आहे,
तो पर्यंत आमच्या आश्रमात राहा. पण वीणा वादन करावं लागेल."
"आमच्या आश्रमात सतत वीणा वादन होत."
"आम्ही म्हणू तेव्हा वीणा वादन करायचं आणी आज्ञा देऊ त्या आधी वीणा सोडायची  नाही,
रात्री-अपरात्री सुद्धा वीणा वाजवावी लागेल."
थोड्या आश्चर्यानी  पण धनंजय मान्य करतो.
त्याप्रमाणे एकदा रात्र भर धनंजय वीणा वाजवतो, सकाळी गुरुजी त्याला  आंघोळ करायला लावून यथासांग पौरोहित्य करवून घेतात.
धनंजयच्या मनात प्रश्न येतात पण अंतर्यामी गुरुजी त्याला एकच सांगतात कि वेळ आल्या वर उत्तर मिळेल.
तिकडे धनंजयचे घरचे अक्कलकोटला जाऊन स्वामींना सर्व वृतांत सांगतात, आणी धनंजय बद्दल चिंता व्यक्त करतात.
धनंजय बद्दल स्वामी त्यांना आश्वस्त करुन त्यांना परत पाठवतात.
इकडे गुरुजी धनंजय ला अन्नदान करायला सांगतात.
धनंजय आपल्या कडे पैशे नाही असं सांगतो.
गुरुजी म्हणतात: "फक्त तीन घर माधुकरी मागायची  आणी अन्न दान  कर.
धनंजय तसच करतो.
त्यानंतर गुरुजी धनंजया कडून गुरुचरीत्राची ११ पारायण करवून घेतात.
पारायण झाल्यावर गुरुजी धनंजयला आपल्या शिष्या बरोबर अक्कलकोटला पाठवतात.
अक्कलकोटला गेल्या बरोबर स्वामी धनंजयला ला रागावतात:
"कारे! आम्ही दिलेलं  आयुष्य संपवणारा तु कोण?
"आम्ही सतत म्हणतो कि माणसांनी प्रपंच अथवा परमार्थ दोन्ही कडे जागरूक राहावे,तु असं गाफील  का राहिला?"
धनंजय प्रामाणिक पणे आपली चूक मान्य करतो आणी मग रस्त्यात भेटलेल्या गुरुजी बद्दल विचारतो.
तेव्हा त्याला स्वामींच्या जागी ते गुरुजी दिसतात.त्याला कळतं कि स्वामीनीच स्वत: येऊन आपल्या कडून
देव-कर्म करवून घेतलं आहे.
मग स्वामी म्हणतात: "अरे त्तु मागच्या जन्मी केलेल्या संकल्पा मुळे हे सर्व घडले."
"तु मागच्या जन्मी आमची सेवा करायचा संकल्प केला होता. आमच्या साठी वीणा वाजवायचं सुद्धा तु ठरवलं होत."
"पण संकल्प सिद्धीला जाईल त्या आधीच तुझा मृत्यु झाला."
"म्हणुन आम्ही तुझ्या या जन्मात ते सर्व कार्य करवून घेतलं."
तितक्यात धनंजयची बायको आणी मुलगी तिथे  येतात.
धनंजय ला तिथे पाहून त्यांना आनंद होतो.
ते त्याला आनन्दाची बातमी  देतात कि शेटजी ला सर्व सत्य कळलं आहे,
आणी धनंजय वर केलेल्या अविश्वासा मुळे ते दिलगिरी सुद्धा व्यक्त करुन राहिले आहे
धनंजय निर्दोष आहे हे सुद्धा त्यांना कळलं आहे, आणी त्याचे गुन्हेगार अधिनस्थांना सुद्धा अटक झाली आहे.
धनंजय कृत-कृत्य होऊन स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

1 comment: