सदाशिव आणी संगीता एक स्वामीभक्त जोडपं होतं. ते अनन्य भावांनी स्वामींच्या मुर्तीचं पूजन करायचे.
एक दिवस ते पाहतात तर काय, स्वामींच्या मूर्तीला तडा गेलेला आहे.
त्यांना अपार दु:ख होतं. आता भंगलेली मूर्ती बोळवून नवीन मूर्ती आणायचा विचार करतात.
पण मूर्ती कुठे मिळेल हा प्रश्न पडतो.
एक दिवस ते अक्कलकोट जवळ जमीन पाह्यला जातात.
तिथे त्यांना एक कुंभार पुत्र शंकराच्या पिंड्या घडवतांना दिसतो.त्याच्या कडे स्वामीमूर्ती मिळेल का म्हणुन तिथे जातात.
तो कुंभार पुत्र गण्या सुद्धा अनन्य स्वामीभक्त होता.
स्वामी मूर्ती घडवायला गण्या सहर्ष तयार होतो.
"मूर्ती झाल्यावर निरोप पाठवा मी माणस पाठवीन"- असं सदाशिव कुंभाराला म्हणतो.
गण्या दिलेल्या मुदतीत मूर्ती घडवायला जीवाचं रान करतो.
मूर्ती साकार होते, पण गण्या आजारी पडतो.
ताप वाढतो, शरीर विस्तवा सारखे तापतं, वैद्यबुवा बोलावले जातात.
वैद्य बुवा उपचार करतात, पण ताप काही कमी होत नाही.रोग आटोक्या बाहेर गेला आहे,अस वैद्य बुवा सांगतात.
सदाशिव आणी संगीता मूर्ती कुठ पर्यंत तैयार झाली हे पहायला येतात, तेव्हा त्यांना सगळ वृतांत कळतं.
गण्याची अशी अवस्था पाहून संगीता कळवळून स्वामींची करुणा भाकते.
स्वामी ज्या गण्यांनी प्राण पणाला लाऊन ठरलेल्या वेळीत तुमची मूर्ती घडवली, त्या श्रमांनी तो आज मृत्यु दारी पडला आहे.
स्वामी त्याला वाचवा, स्वामी कृपा करा.
प्रार्थना सुरु असतानांच गण्या डोळे उघडतो,त्याची आई त्याला चाचपते
तिला घोर आश्चर्य होत कि गण्याचा ताप अगदी कमी झाला आहे.
मागे बसलेले वैद्य बुवा पण त्याला तपासतात ते सुद्धा थक्क होतात.
असं क्षणात ताप कसा काय बरा होऊ शकतो.
गण्या खड-खडीत बरा झाला आहे, आता माझी गरज नाही, असं म्हणुन वैद्य बुवा जातात.
सर्व लोकं स्वामींचे आभार व्यक्त करतात.
सदाशिव आणी संगीता मूर्ती घेऊन परततात ,त्यांना अमावस्या लागण्या आधी घरी पोचायच असतं.
तिथुन जायला शेवटची बैल-गाडी असते. पण बैलगाडी वाला पुढे वाटसरू येणार आहे, अशी सबब सांगून न्यायला नकार देतो.
पण काय त्याचे गरीब बैल गाडीत जुम्पायलाच तैयार नसतात, काही केल्या ऐकत नाही उलट गाडीवाल्यालाच मारायला येतात.
त्या गाडीत जाणारी एक स्त्री त्याला सुचवते कि तुम्ही स्वामींची मूर्ती नेणाऱ्या जोडप्याला नाकारलं, म्हणुन बैल दुमानत नाही आहे.
सदाशिव आणी संगीताला बरोबर घेतल्यावर बैल पूर्वी सारखे गरीब होतात.
घरी जाऊन सदाशिव स्वामींचं मंदिर बांधून मूर्ती स्थापित करण्याचं ठरवतो.
पण या कार्यात ना-ना विघ्न येतात, कधी गवंडी मिळत नाही तर मिळालेले गवंडी काम सोडून जातात.
शेवटी कसं-बसं एक गवंडी कार्याला आरंभ करतो तर अर्धवट झालेलं मंदीर कोसळून पडतं.
संगीताच्या अंतर्मनात स्वामी म्हणंतात- " आत्म परीक्षण करा!"
पण संगीताला काही विशेष बोध होत नाही.
सदाशिव पुन्हा एकदा मंदिर बांधायला जातो तितक्यात संगीता पडते आणी तिचा पाय मुर्गळतो
गवंडी सुचवतो कि तुम्ही जेव्हाही मंदिर निर्माण करायला जातात तेव्हा काही न काही विघ्न येत आहे.
सदाशिव ला गवंड्याची सूचना पटते..
ते सर्व स्वामी शरणी जातात.
स्वामी म्हणतात-" काय रे मंदिर कोसळलं म्हणून आला ना रे?"
सदाशिव थक्क होतो
स्वामी पुढे म्हणतात-"अरे मंदिर कोसळण्याच कारण तुझा अहंकार. मी मंदीर बांधणार, उच्य दर्ज्याची सामग्री लावणार."
"आणखी कोणी गावातला माझ्या सारखं मंदिर बांधू शकत नाही."
"अरे पुजेला बसताना सुद्धा लोकांना दाखवण्यावर तुझ लक्ष्य असतं."
"तेव्हा सुद्धा ईश्वराचं ध्यान करण्या ऐवजी धंद्यात नफा कसा होईल याच्यावर जास्त लक्ष्य असतं."
"जो पर्यंत मन पूर्वक भक्ती करत होता तो पर्यंत आम्ही तुझ्या देव घरातल्या मुर्तीत वास करत होतो जेव्हा तुझा
मनात दुसरे विचार यायला लागले,तेव्हा आम्ही त्या मूर्तीचा त्याग केला म्हणूनच ती मूर्ती भंग पावली."
सदाशिव आणी संगीता आपली चुक मान्य करतात.
पण संगीताच्या मनात प्रश्न येतो, आमची चूक झाली हे खरं, पण गण्या आजारी का झालां ?
स्वामी म्हणतात:-"गण्या आमचा निस्सीम भक्त होता, पण तुम्हाला भक्ती कशी करतात हे दाखवण्या साठी आम्हाला
त्याला आजारी पाडाव लागलं."
"काय म्हणाला होता तुम्ही?
मूर्ती झाल्यवर कळवा. आम्ही माणसं पाठवू."
"अरे आम्हाला नेणारा तु कौन?"
सदाशिव आपली चूक मान्य करतो.
स्वामी प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात- "मंदिर निर्विघ्न पूर्ण होईल!"

No comments:
Post a Comment