Sunday, June 5, 2011

(६४) मैत्री आणी नातं

वटवृक्षा खाली स्वामी आणी बाळप्पा आपसात बोलत असतात-
स्वामी : "बाळ्या मैत्री असावी तर कृष्ण आणी सुदामा सारखी, कुठून ही काही साम्य नसले तरी एक-मेका वर अफाट प्रेम."
बाळप्पा :" स्वामी ! ते द्वापारीच झालं पण आजच्या जगत ते शक्य आहे का?"
स्वामी : "बाळ्या आहे अशी एक जोडी- आपल्या श्रीपाद आणी सदाची."
"लवकरच, भेट होईल तुझी त्यांच्याशी "

काही वेळानी सदा आणी श्रीपाद स्वामींच्या दर्शनास येतात.
सदा आणी श्रीपाद लहानपणाचे मित्र असतात पण त्यांच्यात सख्या भावा सारखं प्रेम असतं.श्रीपाद फार श्रीमंत घराचा असतो आणी सदा साधारण परिवाराचा असतो.
श्रीपादची बहिण निहारिका रूपस होती, आणी ती आणी सदा मनातल्या मनात एक-मेकाशी आकर्षित होते.
श्रीपादला ही गोष्ठ लक्षात आलेली  होती, व सदा सर्व प्रकारांनी योग्य असल्या मुळे तो स्वताच दोघांच लग्न ठरवतो.
इकडे सदाच्या शेजारी सखू नावाची युवती राहायची, ती आणी सदा बालपणाचे मित्र होते. षोडशी ओलांडल्यावर सखुचं सदावर प्रेम जडलं होतं.
पण सदाचं तिच्या बद्दल असं काही नसल्यामुळे, सखुचं प्रेम एकतर्फी झालेलं  होतं.
एक दिवस सखू सदा  समोर आपलं मनोगत प्रगट करते पण सदा तिचं म्हणण फेटाळून लावतो.
सखुचा भाऊ रामाला जेव्हा हे सर्व कळतं तेव्हा तो सदाला समझवायचा प्रयत्न करतो, त्याला हुंड्याच लालूच पण देतो,पण सदा लग्नासाठी चक्क
नकार देतो.
सर्व बाजूनी निराश होऊन सखू विहिरीत उडी मारून जीव देते.
या प्रकरणामुळे,सदाच मन त्यालाच खात होतं. तो स्वामी दर्शनास जाऊन स्वामींना  आपली मनोव्यथा सांगतो.
स्वामी म्हणतात: "जे व्हायचं ते झालं, पण आता तु निहारीकाशी लग्न  करुन आपला आयुष्य नव्यानी सुरु कर!"
मग काय,सदा आणी निहारीकेच थाटात लग्न होतं, खुद्द स्वामी येऊन त्यांच्यावर अक्षत टाकतात.
इकडे सखू गेल्यामुळे राम वैतागलेला असतो, त्याच्या मनात एक क्रूर कटाची रचना होते.
तो सरकारी शिपायाला लाच देउन त्याला श्रीपाद  कडे पाठवतो.
शिपाई: "सरकार तुमच्या मित्राची ओढ्या कडची  जागा घेण्या साठी उत्सुक आहे. सरकारला तिथे धर्मशाळा बांधायची आहे. त्याबद्दल सरकार त्याला दुसरी त्यापेक्षा मोठी जागा देणार आहे.
सदा घरी न भेटल्या मुळे मी तुमच्या कडे आला आहे."
"तुम्ही त्याच्या कडून स्वाक्षरी घेऊन ठेवा मी कागद पत्र नंतर घेऊन जाईन."
श्रीपाद: 'सदा भेटल्या बरोबर मी त्याला सर्व सांगीन."

काही वेळानी सदा येतो, श्रीपाद त्याला सर्व प्रकरण सांगतो.
श्रीपादवर अतुट विश्वास असल्यानी सदा न वाचता कागदांवर स्वाक्षरी देतो.
पण प्रत्यक्षात असं काहीही नसतं, सरकारला कोणतीही जागा नको असते, आणी त्या कागदांची किम्मत शून्य असते.
एकदा त्या जागेवर काम करतांना सदाला तोच शिपाई अडवतो आणी सरकारी जागेवर काम नको करू असं सांगुन जातो.
सदाला काही समझत नाही.
तेव्हाच राम त्याला सांगतो कि तुझी जमीन श्रीपादनी बाहेरच्या बाहेर सरकारला विकली आहे.
सदाला पहिले विश्वास होत नाही पण नंतर रामाच्या जाळ्यात सापडून तो श्रीपाद कडे खुलासा करायला जातो.
तिथे शिपाई पाहिलेपासून बसलेला असतो आणी तो श्रीपाद्ला रकमेची पोटली देतो. खर तर ती श्रीपाद्च्या दुसऱ्या जागेच्या बद्दल मिळालेला मोबदला असतो.
पण सदाला रामानी सांगितलेल्या गोष्ठींवर विश्वास होतो आणी तो सत्य न जाणता, श्रीपाद वर आळ घालुन  हुज्जत घालतो.
गोष्ठ माराहाणीवर येते आणी दोघांच्या मैत्रीला तडा जातो.
स्वामी खुद्द येऊन रामाला सत्य प्रगट करायला सांगतात ,पण आपल्या बहिणीच्या दुखात जळणरा राम नकार देतो.
काही दिवसांनी एक वाटमारा  पैश्यासाठी रामाची हत्या करतो आणी सदावर खुनाचा खोटा आळ येऊन त्याला अटक होते.
निहारिका आपल्या सोभाग्याचं रक्षण कर, असं म्हणुन आपल्या भावासमोर पदर पसरते.
मोठ्या मनाचा श्रीपाद रामाच्या खुनाचा आळ स्वता वर घेतो, सदाची सुटका होते पण या खुनापाई श्रीपादला फाशी होण्याची शक्यता असते.
पण काही वेळानी खरा अपराधी पकडला जाऊन श्रीपादचीपण सुटका होते.
नंतर सदाची आई येऊन खुलासा करते कि हा सर्व कट रामचा रचलेला होता.
सदाला आपल्या वर्तनाचा खंत वाटतो आणी तो श्रीपादची माफी मागतो.
श्रीपाद पण उदार मनानी सदाला क्षमा करतो.
सर्वजण स्वामींना भेटायला येतात.
स्वामी म्हणतात: "सखु आणी रामच्या प्रारब्धात हे लिहिलेले होतं. असा टोकाचा निर्णय घेण्यासाठी सखुचं अपरीपक़्व मन जवाबदार होतं आणी राम आपल्या कर्मांमुळे
अश्या दारुण मृत्यूच्या मुखात सापडला."
"अरे कोणाच्याही नात्यात गैर-समझ होता कामा नये कारण गैर-समझाचं औषध नसतं, त्यात विश्वास असायला पाहिजे."
"आणी सर्वानी त्या विश्वासाला जपलं पाहिजे."
"कोणत्याही गोष्ठीची पूर्ण शाह-निशा न करता कुणावरही आरोप लावू नका."
सदाला आपली चूक पटते. तो स्वामींची आणी श्रीपाद्ची माफी मागतो.

No comments:

Post a Comment