Sunday, June 26, 2011

स्वामी हाच आधार

महारुद्रराव एक श्रीमंत  व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा उपवर झाली असून तिचं लग्न जमत नव्हते.
श्रीमन्ताची मुलगी आपल्या कडे सुखानी  नांदणार नाही, असं म्हणुन गरीब लोकं मागणी घालत नव्हते.
श्रीमंत स्थळ यायचे  पण अफाट हुंडा मागायचे, जे महारुद्ररावांच्या तत्वा विरुद्द्ध होतं.
शेवटी ते स्वामींचं स्मरण करुन पुन्हा स्थळासाठी प्रयत्न सुरु करायचा निश्चय करतात.
स्वामी कृपेनी काही दिवसांनी घर बसल्या सर्वप्रकारे योग्य असं स्थळ येऊन राधेच लग्न जमतं.
महारुद्ररावांच्या आनंदाचा पार नाही राहत, ते स्वामींच्या मठात सहस्त्र भोजन घालायचं ठरवतात.
सर्व स्वामींकडे येतात.
भेटल्या बरोबर स्वामी महारुद्राला म्हणतात :" सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा  करू नका."
आनंदाच्या भरात महारुद्रराव, स्वामी वचनाला फारसे महत्व देत नाही.
मग काय सहस्त्र भोजन होतं, सर्व लोकं जेवण करुन झोपतात.
अर्ध्या रात्री स्वामी ओरडतात:-"अरे झोपला काय आहे! चोर येऊन सर्व लुटून गेले आहे."
महारुद्रराव पाहतात तर त्यांचं सर्व सामान चोरी गेलं होतं. राधेच्या लग्नासाठी केलेले सर्व दागिने पण त्यात होते.
महारुद्रराव स्वामींना वैतागून म्हणतात:-"स्वामी चोर आले तेव्हाच का नाही हो सांगितलं?"
स्वामी म्हणतात:-"अरे आम्ही काय पहारेकरी आहो का? आम्ही पहिलेच सांगितले होते, सावध राहा पण तुम्ही
गाफील राहिला."
महारुद्ररावला आपली चूक कळते तो स्वामींची करुणा भाकतो.
स्वामी म्हणतात:- "५ चोर होते. शोध त्यांना "
कोण ते विचारल्यावर स्वामी म्हणतात कि आमच्या पोरांना विचारा.
महारुद्रराव विचार करतात कि स्वामींचे पोरं कोण?
चोळप्पा विचार करतात कि शरीरातले चोर म्हणजे चित्त आणी मन ,पण त्यांचा बंदोबस्त करायला विवेक पाहिजे,
 स्वामी ज्यांना विवेकाची प्रतीमुर्ती म्हणतात ते फसलगावचे भगवान देशपांडे, हेच स्वामींचे पुत्र असावे.
महारुद्रराव आणी चोळप्पा त्यांच्या कडे जातात.
देशपांडे मदत करायला तय्यार पण होतात पण म्हणतात कि हे काम मी एकटा नाही करू शकत.
मला कुणाची मदत पाहिजे.
चोळप्पा म्हणतात कि आपल्याला आता स्वामींच्या दुसऱ्या पोराला शोधले पाहिजे.
पण तो दुसरा पोरगा कोण असावा?
तितक्यात रस्त्यात  जाताना दोन व्यक्ती बोलत असतात.
एक व्यक्ती दुसऱ्याला एका कहाणीचा बोध सांगत असतो- " अरे विवेकाला बुद्द्धी ची जोड लागते."
चोळप्पा सर्वाना म्हणतात आता  बुद्धियुक्त  कोण व्यक्ती स्वामींचा पोर असावा?
तितक्यात देशपांडे म्हणतात- "माझा एक मित्र आहे, गावाचा पाटील आहे बुद्धी आणी शक्तीनी युक्त आहे आणी तो अनन्य स्वामी भक्त आहे."
सर्व जण पाटील यांच्या घरी जातात. पाटीलांना जेव्हा कळतं कि पाच चोर होते , तेव्हा  ते सर्वांना घेऊन चोरांच्या एका
ठिकाणाची झडती घेतात.
पण तिथे फक्त दोन व्यक्ती सापडतात.
त्यांच्या बरोबर असलेला जमादार जेव्हा त्यांना दम देतो तेव्हा चोरं त्यांना सांगतात कि बाकीचे तीन बाहेर गेलेले आहे.
चोरांना शिक्षेत कमीचं लालूच देउन पाटील त्यांना बाकीच्या तिघांना पकडण्या करता मदत मागतात.
दोघे चोर हमी देतात. मग काय ठरवलेल्या जागेवर ३ चोर आपल्या  साथींना भेटायला येतात आणी पकडले जातात.
महारुद्रराव यांना राधेसाठी केलेले दागिने मिळतात.
ते स्वामींकडे येऊन म्हणतात:-"सर्व लोकं आम्हाला विचारायचे कि आम्ही स्वामी भक्ती का करतो?"
कारण त्यांच्या मते सर्व सुख असणाऱ्या व्यक्तीला स्वामी उपासनेची काय गरज असावी."
"तेव्हा मी त्यांना उत्तर देत होतो कि स्वामी भक्तिनी समाधान मिळतं."
"पण आता मला जाणीव झाली कि स्वामी भक्तिनी आधार पण मिळतो."
"काही कार्य करतांना जेव्हा माणसाला विकल्प येतात, मन कामापासून परावृत्त करतं तेव्हा सद्गुरुचं नाव त्याला धीर देतं आणी तो
कार्य करायला तैयार होतो."
"सद्गुरू, हे तत्व माणसाचं भयं नष्ट करुन त्याला कार्य करायला प्रेरीत करतं."
स्वामी स्मित मुद्रेनी म्हणतात: " भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे "


 

Sunday, June 19, 2011

(६६) करावे तसे भरावे

मोरेश्वर नावाचा एक सावकार होता. तो वृत्तींनी अत्यंत अप्रामाणिक होता.कोणीही जर जागा गहाण ठेवायला आला तर त्याला तो
कर्ज न फेडता आल्यास जागा जब्त होईल, अशी भीती दाखवून त्या ऐवजी जागेचा विक्रय कर असं सुचवायचा.
जागेची किम्मत पण तो चालत्या भावा पेक्षा जास्त द्यायचा पण व्यक्ती जागा विक्रय करुन परतताना आपला पाळलेला वाटमारा
पाठवून ती रक्कम लुटून घ्यायचा.
अश्या प्रकारे, त्यांनी कित्येक लोकांना लुबाडलं होतं.
एकदा एक लुबाडला गेलेला भक्त स्वामींकडे आपलं घाराण मांडतो. स्वामी त्याला सांगतात कि वाटमारा मोरेश्वराचाच माणूस होता,
तु पोलिसात तक्रार नोंदव.
मग काय मोरेश्वराला अटक होते. अधिकारी लांच खाऊन आपल्याला सोडत नाही या साठी मोरेश्वर तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून
स्वामींना चांदीच्या पादुका अर्पण करायचा नवस सांगतो.
इकडे मोरेश्वरची पत्नी स्वामींकडे घाराणं घालते. स्वामी पहिले तिच्या नवऱ्याचा वागणुकी बद्दल तिची हाजिरी घेतात
मग तिला आश्वस्त करुन पाठवतात.
मोरेश्वरची पुराव्या अभावी सुटका होते.
पण सुटका होताच मोरेश्वर वेगळीच भाषा बोलू लागतो-"
माझी सुटका माझ्या पैश्या मुळेच झाली आहे, स्वामींना केलेला नवस फळला नाही."
बायको त्याला सांगते की मी करुणा भाकली म्हणुन स्वामींनी तुम्हाला सोडवले आहे, तुम्ही नवस फेडा.
मोरेश्वर चांदीच्या पादुका घेऊन स्वामींकडे जातो पण मनात विकल्प येतात.
अत्यंत लोभानी तो पादुकांच्या खुंट्या तोडून खिशात ठेवतो आणी समाधान मानतो की एवढी चांदी तर वाचली.
स्वामींना पादुका अर्पण करण्यात येतात. खुंट्या तुटलेल्या पादुका पाहून स्वामींना राग येतो.
स्वामी: " काय रे मोरेश्वर! आत्ता पर्यंत जगाला फसवत होता, आज आम्हाला फसवण्यापर्यंत तुझी मजल गेली !"
स्वामी रागवून मोरेश्वरला हाकलून देतात पण जाता जाता त्याला म्हणतात की घरी आम्ही तुझ्या साठी एक भेट ठेवली आहे.
घरी जाऊन मोरेश्वरला कळत कि त्याचा मुलगा वामन वाईट मार्गाला लागला आहे, तो मद्यपान करतो,जुगार खेळतो ,
घरातले पैशे पण चोरतो.
मोरेश्च्वर रागावतो तर वामन दुरुत्तर करतो.
मोरेश्वर आणखी काही सांगणार, त्या आधी शिपाई त्याला परत अटक करतो कारण त्याच्या विरुद्ध पुरावे सापडले होते.
मोरेश्वरला अटक होताच वामन सर्व संपत्ती आपल्या नावावर करण्याचा कारभार सुरु करतो.
आपला वाया गेलेला मुलगा आपल्याला देशोधडीला लावणार या भितीनी मोरेश्वरची बायको तुरंगात त्याला भेटायला जाते.
शिपायाची गया-वाया करुन ते स्वामी दर्शन घडवा अशी विनंती करतात.
शिपाई कंटाळून त्यांची इच्छा पूर्ण करवतो.
मोरेश्वर स्वामींची करुणा भाकतो.
स्वामी रागावतात:- "मोरेश्वरा तु पैसा कमावत नव्हता, लुबाडत होता. "
"अरे जगातल्या न्याय मंदिरात सुटला तरी परमेश्वराच्या न्याय मंदिरातुन कसा सुटणार? "
"अरे तिथे तर एक-एक पैश्याचा आणी तो प्राप्त करण्यासाठी केलेल्या कर्मांचा हिशोब द्यावा लागतो."
"अरे तुला काय कमी होती? अरे धन, हे तर आहेत्या जन्मापुर्तेच असते, "
"धन पुढच्या जन्मात नेता येत नाही पण धन मिळवण्यासाठी
केलेले वाईट कर्म मात्र पुढच्या जन्मात भोगावे लागतात."
"अरे धन जोडायचे तर सत्कर्माचे जोडा ते जन्मो-जन्मी तुम्हाला साथ देणार."
"तुझ्या वाईट वर्तनाचा तुझ्या मुलावर पहा काय परिणाम पडला आहे, तोही तुझ्या सारखा दुराचारी व्हायला निघाला आहे."
"तुझ्या त्याला लाख समझाव तो ऐकणार नाही कारण तु स्वताच वाईट कर्म करतो."
"अरे कुणाला उपदेशकरण्या आधी आपण स्वत: त्या लायकीचे असायला हवे, नाहीतर कोणीही किम्मत देणार नाही."
मोरेश्वर शरणागती पतकारतो. स्वामींची करुणा भाकतो.
स्वामी म्हणतात:- "आम्ही तुला सोडवू पण ज्याचे जे-जे लुबाडले आहे ते त्यांना परत कर. तुझ्या मुलाला परत कसं ताळ्यावर
आणायचे ते ही पाहु.
मोरेश्वर प्रामाणिक पणे कबुली देतो आणी स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे चालायचे वचन देतो.

Sunday, June 12, 2011

(६५) देव देतो आणी कर्म नेतो

शारदा नावाची एक स्त्री स्वामीभक्त होती पण कर्मकांड,कर्मठपणा इत्यादी गोष्ठींना फार महत्व द्यायची.
शारदा संतानसुखा पासुन वंचीत होती, तिच्या कडे काम करणारी सखुच दु:ख पण हेच होतं.
सखु पण संतान सुखाला पारखी होती.
पण सखुच्या बाबतीत एक गोष्ठ वेगळी होती, तिला स्वामींवर अतुट श्रद्धा होती, एवढी कि संतान सुख
देणार तर स्वामीच, नाहीतर संसारातला कोणताही उपाय लागू पडणार नाही.
शारदा पुत्र सुखासाठी औषध उपचार, पूजापाठ करवत असते.
ती सखुसाठीही ह्या गोष्ठी करू पाहते, पण सखु स्वामींशिवाय दुसरी कोणतीही गोष्ठीवर विश्वास ठेवायला तैय्यार नसते.
एक दिवशी शारदेची बहिण रेणुका तिच्याकडे  येणार होती. शारदेचा नवरा तिला घ्यायला जातो,
 पण रेणुका कुठेही भेटत नाही, म्हणुन परत येतो.
शारदेला भीती वाटते, रेणुका गाणदेवीच्या मंदिरा समोर तर नाही गेली ना?
गावा मध्ये एक गाणदेवीच मंदीर होतं. तिच्या प्रकोपाला पूर्ण गाव घाबरायचा.
रात्री-अपरात्री नको त्या अवस्थेत जर  स्त्रिया तिच्या समोरून गेल्या, तर त्यांना गाणदेवी झपाटते, अशी समझ होती.
थोड्या वेळानी सखु आणी तिचा नवरा, रेणुकेला शोधून आणतात, ती गाणदेवीच्या मंदिर समोर बेशुद्ध झालेली सापडते.
मग काय रेणुका मांत्रिकाला बोलावते.
घरात आरडा-ओरड ऐकुन तिथुन  जात असलेले बाळप्पा आत येतात.
पाहतात तर काय, मांत्रिक अघोरी पणानी  आपले प्रयोग करत असतो,
आणी मग तो रेणुकेला  बरं करण्यासाठी कोंबड्याची बळी मागतो.
बाळप्पा सर्वांना समझवतात कि हा सर्व अंधविश्वास आहे, पण ऐकतो  कोण?
शेवटी बाळप्पा सर्व प्रकार स्वामींच्या कानावर घालतात.
दुसऱ्या दिवशी स्वामी गाणदेवीचा प्रतीक असलेला दगड उपटून काढायला जातात.
मांत्रिक देवीच्या प्रकोपाची भीती घालतो. स्वामी त्याच्या श्री मुखात एक ठेवतात.
दम दिल्यावर मांत्रिक कबुल करतो कि गाणदेवीच्या नावानी दगड त्यानीच ठेवला होता.
गावात काहीही वाईट झालं तर त्याचा संबंध तो गाणदेवीच्या प्रकोपाशी लावून, गावकऱ्या कडून पैशे उकळायचा.
स्वामींच्या उलघड्या मुळे मांत्रिक गाव सोडून जातो.
खर तर, रेणुका रात्री वाट चुकाल्यानी पहिलेच घाबरलेली होती,
 आणी गाणदेवीच्या मंदिरा समोर येऊन पोहचल्य मुळे ती भितीनी गारठून कोसळली होती.
काही काळानी ती स्वताच शुद्धीवर येते.
इकडे चोळप्पा यांच्या घरी एक घुबड शिरून बसतं. घुबड म्हणजे अपशकुन असं समझुन चोळप्पा घराला ताळा
लावून बायको-मुलाला घेऊन शारदेच्या घरी येतात.
शारदा आणी चोळप्पांची पत्नी, अगदी जीवा-भावाच्या मैत्रिणी होत्या.
स्वामींना हे सर्व कळल्यामुळे, स्वामी शारदे कडे येतात, तिथे चोळप्पाला घरी परत ये, अशी आज्ञा करतात.
शारदा स्वामींना म्हणते,मला मुल व्हावं असा आशीर्वाद द्या, नाहीतर मी आमरण उपोषण करीन.
स्वामी काहीही उत्तर न देता परततात.
चोळप्पा घरी आल्यावर स्वामी खुद्द त्या घुबडाला उचलुन वनात सोडून देतात.
स्वामी म्हणतात: "अरे चोळप्पा ! अरे तुला निर्माण करणाऱ्या देवानीच त्या प्राण्याला पण निर्माण केले ना,
मग त्या प्राण्यामुळे तुला अपशकुन कसा होणार?"
"अरे!, आप-आपल्या कर्मामुळे प्राणी विभिन्न योनीत जन्म घेतात, पण सर्वाच्या ठाई एकच ईश्वर असतो."
"जेव्हा जीवांच्या शरीरातला ईश्वर निघून जातो, जीव निधन पावतो."
"अरे असा अंधविश्वास पाळु नका. अरे आमचा शिष्य म्हणवतो,
मग काही भयं वाटलं तर आमच्या कडे यायचं सोडून असा पळपुट्या सारखा काय पळून जातो !"
चोळप्पा आपली चूक मान्य करतो.
तिकडे शारदेच पाहून सखु पण उपोषण करते. शेवटी त्यांचे नवरे स्वामींकडे घाराणं घालतात.
स्वामींच्या आज्ञेनी दोघांना स्वामींकडे आणण्यात येतं.त्या वेळेला स्वामी श्मशान भूमीत असतात.
स्वामी म्हणतात: "दोघांना अपत्य सुख हवं आहे ना? "
असं म्हणुन स्वामी समोर पडलेली दोन हाडं उचलतात.
त्यातलं एक हाड शारदे कडे भिरकवतात.
शारदा थबकून मागे सरकते. हाड तिच्या समोर जमिनीवर पडतं.
मग स्वामी सखुकडे दुसरं हाड भिरकवतात, सखु ते हाड झेलून, मस्तकाला लावते.
शारदा म्हणते: "अरे काय करते ! फेक ते हाड . विटाळ होणार त्यामुळे. "
सखु म्हणते : "सद्गुरुंनी  काहीही दिले तर ते ग्रहण करण्यात शिष्याचं कल्याणच असतं."
हा सर्व प्रकार पाहून स्वामी म्हणतात: "अरे याला म्हणतात, देव देतो आणी कर्म नेतो".
"अरे तुम्ही लोकांच्या चांगल्या आणी वाईट कर्मांच्या आधारावर परमेश्वर प्रारब्द्ध लिहितो."
"मनुष्याला ते प्रारब्ध भोगणे भाग असतं, पण काही विशेष परिस्थितीत परमेश्वर त्यात बदल करतो,
पण त्या साठीसुद्धा मनुष्याचे सद्कर्म असायला हवे."
"आम्ही देऊ केलेला प्रसाद शारदेनी नाकारला पण सखुनी स्वीकारला."
"शारदेच्या मनात एकनिष्ठ भक्ती नव्हती. कर्मकांडा सारखीच गुरुभक्ती पण तिला एक उपाय वाटला."
"सर्व करू तेव्हा काही तरी मना सारखं होईल."
"अरे तेही मान्य करू, पण मनात जे संकल्प-विकल्प निर्माण झाले त्याचं काय?"
"अरे हाडांना पाहून कोणीही थबकेल, पण कोण देत आहे या गोष्ठी वर लक्ष्य गेलं नाही!"
"कारण तेच, एकनिष्ठ भक्ती नसणं."
"अरे जेव्हापर्यंत मन, चित्त आणी बुद्धी एकत्र नाही होणार तेव्हा प्रपंच असो किंवा परमार्थ यश मिळणार नाही."
"अरे श्रद्धा असायला  सुद्धा उपासना लागते, आणी तिथेच शारदा कमी पडली."
सर्व जण परततात.
काही दिवसांनी सर्वजण शारदेच्या घरी परस्पर चर्चा करत असतांना सखुला वामन होतं.
सखुला लगेच कळतं कि स्वामींचा आशीर्वाद पावला आहे.
शारदेला खंत वाटतो कि आपण जर स्वामींवर एकनिष्ठ भक्ती ठेऊन प्रसाद स्वीकारला असता
तर आपण ही संतानसुखाला प्राप्त झाली असते.
"गतस्य शोचना नास्ति " असा विचार करुन शारदा भक्तीत एकनिष्ठ होण्या साठी उपासना वाढवायचा निश्चय करते.


 

Sunday, June 5, 2011

(६४) मैत्री आणी नातं

वटवृक्षा खाली स्वामी आणी बाळप्पा आपसात बोलत असतात-
स्वामी : "बाळ्या मैत्री असावी तर कृष्ण आणी सुदामा सारखी, कुठून ही काही साम्य नसले तरी एक-मेका वर अफाट प्रेम."
बाळप्पा :" स्वामी ! ते द्वापारीच झालं पण आजच्या जगत ते शक्य आहे का?"
स्वामी : "बाळ्या आहे अशी एक जोडी- आपल्या श्रीपाद आणी सदाची."
"लवकरच, भेट होईल तुझी त्यांच्याशी "

काही वेळानी सदा आणी श्रीपाद स्वामींच्या दर्शनास येतात.
सदा आणी श्रीपाद लहानपणाचे मित्र असतात पण त्यांच्यात सख्या भावा सारखं प्रेम असतं.श्रीपाद फार श्रीमंत घराचा असतो आणी सदा साधारण परिवाराचा असतो.
श्रीपादची बहिण निहारिका रूपस होती, आणी ती आणी सदा मनातल्या मनात एक-मेकाशी आकर्षित होते.
श्रीपादला ही गोष्ठ लक्षात आलेली  होती, व सदा सर्व प्रकारांनी योग्य असल्या मुळे तो स्वताच दोघांच लग्न ठरवतो.
इकडे सदाच्या शेजारी सखू नावाची युवती राहायची, ती आणी सदा बालपणाचे मित्र होते. षोडशी ओलांडल्यावर सखुचं सदावर प्रेम जडलं होतं.
पण सदाचं तिच्या बद्दल असं काही नसल्यामुळे, सखुचं प्रेम एकतर्फी झालेलं  होतं.
एक दिवस सखू सदा  समोर आपलं मनोगत प्रगट करते पण सदा तिचं म्हणण फेटाळून लावतो.
सखुचा भाऊ रामाला जेव्हा हे सर्व कळतं तेव्हा तो सदाला समझवायचा प्रयत्न करतो, त्याला हुंड्याच लालूच पण देतो,पण सदा लग्नासाठी चक्क
नकार देतो.
सर्व बाजूनी निराश होऊन सखू विहिरीत उडी मारून जीव देते.
या प्रकरणामुळे,सदाच मन त्यालाच खात होतं. तो स्वामी दर्शनास जाऊन स्वामींना  आपली मनोव्यथा सांगतो.
स्वामी म्हणतात: "जे व्हायचं ते झालं, पण आता तु निहारीकाशी लग्न  करुन आपला आयुष्य नव्यानी सुरु कर!"
मग काय,सदा आणी निहारीकेच थाटात लग्न होतं, खुद्द स्वामी येऊन त्यांच्यावर अक्षत टाकतात.
इकडे सखू गेल्यामुळे राम वैतागलेला असतो, त्याच्या मनात एक क्रूर कटाची रचना होते.
तो सरकारी शिपायाला लाच देउन त्याला श्रीपाद  कडे पाठवतो.
शिपाई: "सरकार तुमच्या मित्राची ओढ्या कडची  जागा घेण्या साठी उत्सुक आहे. सरकारला तिथे धर्मशाळा बांधायची आहे. त्याबद्दल सरकार त्याला दुसरी त्यापेक्षा मोठी जागा देणार आहे.
सदा घरी न भेटल्या मुळे मी तुमच्या कडे आला आहे."
"तुम्ही त्याच्या कडून स्वाक्षरी घेऊन ठेवा मी कागद पत्र नंतर घेऊन जाईन."
श्रीपाद: 'सदा भेटल्या बरोबर मी त्याला सर्व सांगीन."

काही वेळानी सदा येतो, श्रीपाद त्याला सर्व प्रकरण सांगतो.
श्रीपादवर अतुट विश्वास असल्यानी सदा न वाचता कागदांवर स्वाक्षरी देतो.
पण प्रत्यक्षात असं काहीही नसतं, सरकारला कोणतीही जागा नको असते, आणी त्या कागदांची किम्मत शून्य असते.
एकदा त्या जागेवर काम करतांना सदाला तोच शिपाई अडवतो आणी सरकारी जागेवर काम नको करू असं सांगुन जातो.
सदाला काही समझत नाही.
तेव्हाच राम त्याला सांगतो कि तुझी जमीन श्रीपादनी बाहेरच्या बाहेर सरकारला विकली आहे.
सदाला पहिले विश्वास होत नाही पण नंतर रामाच्या जाळ्यात सापडून तो श्रीपाद कडे खुलासा करायला जातो.
तिथे शिपाई पाहिलेपासून बसलेला असतो आणी तो श्रीपाद्ला रकमेची पोटली देतो. खर तर ती श्रीपाद्च्या दुसऱ्या जागेच्या बद्दल मिळालेला मोबदला असतो.
पण सदाला रामानी सांगितलेल्या गोष्ठींवर विश्वास होतो आणी तो सत्य न जाणता, श्रीपाद वर आळ घालुन  हुज्जत घालतो.
गोष्ठ माराहाणीवर येते आणी दोघांच्या मैत्रीला तडा जातो.
स्वामी खुद्द येऊन रामाला सत्य प्रगट करायला सांगतात ,पण आपल्या बहिणीच्या दुखात जळणरा राम नकार देतो.
काही दिवसांनी एक वाटमारा  पैश्यासाठी रामाची हत्या करतो आणी सदावर खुनाचा खोटा आळ येऊन त्याला अटक होते.
निहारिका आपल्या सोभाग्याचं रक्षण कर, असं म्हणुन आपल्या भावासमोर पदर पसरते.
मोठ्या मनाचा श्रीपाद रामाच्या खुनाचा आळ स्वता वर घेतो, सदाची सुटका होते पण या खुनापाई श्रीपादला फाशी होण्याची शक्यता असते.
पण काही वेळानी खरा अपराधी पकडला जाऊन श्रीपादचीपण सुटका होते.
नंतर सदाची आई येऊन खुलासा करते कि हा सर्व कट रामचा रचलेला होता.
सदाला आपल्या वर्तनाचा खंत वाटतो आणी तो श्रीपादची माफी मागतो.
श्रीपाद पण उदार मनानी सदाला क्षमा करतो.
सर्वजण स्वामींना भेटायला येतात.
स्वामी म्हणतात: "सखु आणी रामच्या प्रारब्धात हे लिहिलेले होतं. असा टोकाचा निर्णय घेण्यासाठी सखुचं अपरीपक़्व मन जवाबदार होतं आणी राम आपल्या कर्मांमुळे
अश्या दारुण मृत्यूच्या मुखात सापडला."
"अरे कोणाच्याही नात्यात गैर-समझ होता कामा नये कारण गैर-समझाचं औषध नसतं, त्यात विश्वास असायला पाहिजे."
"आणी सर्वानी त्या विश्वासाला जपलं पाहिजे."
"कोणत्याही गोष्ठीची पूर्ण शाह-निशा न करता कुणावरही आरोप लावू नका."
सदाला आपली चूक पटते. तो स्वामींची आणी श्रीपाद्ची माफी मागतो.