Sunday, June 26, 2011

स्वामी हाच आधार

महारुद्रराव एक श्रीमंत  व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा उपवर झाली असून तिचं लग्न जमत नव्हते.
श्रीमन्ताची मुलगी आपल्या कडे सुखानी  नांदणार नाही, असं म्हणुन गरीब लोकं मागणी घालत नव्हते.
श्रीमंत स्थळ यायचे  पण अफाट हुंडा मागायचे, जे महारुद्ररावांच्या तत्वा विरुद्द्ध होतं.
शेवटी ते स्वामींचं स्मरण करुन पुन्हा स्थळासाठी प्रयत्न सुरु करायचा निश्चय करतात.
स्वामी कृपेनी काही दिवसांनी घर बसल्या सर्वप्रकारे योग्य असं स्थळ येऊन राधेच लग्न जमतं.
महारुद्ररावांच्या आनंदाचा पार नाही राहत, ते स्वामींच्या मठात सहस्त्र भोजन घालायचं ठरवतात.
सर्व स्वामींकडे येतात.
भेटल्या बरोबर स्वामी महारुद्राला म्हणतात :" सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा  करू नका."
आनंदाच्या भरात महारुद्रराव, स्वामी वचनाला फारसे महत्व देत नाही.
मग काय सहस्त्र भोजन होतं, सर्व लोकं जेवण करुन झोपतात.
अर्ध्या रात्री स्वामी ओरडतात:-"अरे झोपला काय आहे! चोर येऊन सर्व लुटून गेले आहे."
महारुद्रराव पाहतात तर त्यांचं सर्व सामान चोरी गेलं होतं. राधेच्या लग्नासाठी केलेले सर्व दागिने पण त्यात होते.
महारुद्रराव स्वामींना वैतागून म्हणतात:-"स्वामी चोर आले तेव्हाच का नाही हो सांगितलं?"
स्वामी म्हणतात:-"अरे आम्ही काय पहारेकरी आहो का? आम्ही पहिलेच सांगितले होते, सावध राहा पण तुम्ही
गाफील राहिला."
महारुद्ररावला आपली चूक कळते तो स्वामींची करुणा भाकतो.
स्वामी म्हणतात:- "५ चोर होते. शोध त्यांना "
कोण ते विचारल्यावर स्वामी म्हणतात कि आमच्या पोरांना विचारा.
महारुद्रराव विचार करतात कि स्वामींचे पोरं कोण?
चोळप्पा विचार करतात कि शरीरातले चोर म्हणजे चित्त आणी मन ,पण त्यांचा बंदोबस्त करायला विवेक पाहिजे,
 स्वामी ज्यांना विवेकाची प्रतीमुर्ती म्हणतात ते फसलगावचे भगवान देशपांडे, हेच स्वामींचे पुत्र असावे.
महारुद्रराव आणी चोळप्पा त्यांच्या कडे जातात.
देशपांडे मदत करायला तय्यार पण होतात पण म्हणतात कि हे काम मी एकटा नाही करू शकत.
मला कुणाची मदत पाहिजे.
चोळप्पा म्हणतात कि आपल्याला आता स्वामींच्या दुसऱ्या पोराला शोधले पाहिजे.
पण तो दुसरा पोरगा कोण असावा?
तितक्यात रस्त्यात  जाताना दोन व्यक्ती बोलत असतात.
एक व्यक्ती दुसऱ्याला एका कहाणीचा बोध सांगत असतो- " अरे विवेकाला बुद्द्धी ची जोड लागते."
चोळप्पा सर्वाना म्हणतात आता  बुद्धियुक्त  कोण व्यक्ती स्वामींचा पोर असावा?
तितक्यात देशपांडे म्हणतात- "माझा एक मित्र आहे, गावाचा पाटील आहे बुद्धी आणी शक्तीनी युक्त आहे आणी तो अनन्य स्वामी भक्त आहे."
सर्व जण पाटील यांच्या घरी जातात. पाटीलांना जेव्हा कळतं कि पाच चोर होते , तेव्हा  ते सर्वांना घेऊन चोरांच्या एका
ठिकाणाची झडती घेतात.
पण तिथे फक्त दोन व्यक्ती सापडतात.
त्यांच्या बरोबर असलेला जमादार जेव्हा त्यांना दम देतो तेव्हा चोरं त्यांना सांगतात कि बाकीचे तीन बाहेर गेलेले आहे.
चोरांना शिक्षेत कमीचं लालूच देउन पाटील त्यांना बाकीच्या तिघांना पकडण्या करता मदत मागतात.
दोघे चोर हमी देतात. मग काय ठरवलेल्या जागेवर ३ चोर आपल्या  साथींना भेटायला येतात आणी पकडले जातात.
महारुद्रराव यांना राधेसाठी केलेले दागिने मिळतात.
ते स्वामींकडे येऊन म्हणतात:-"सर्व लोकं आम्हाला विचारायचे कि आम्ही स्वामी भक्ती का करतो?"
कारण त्यांच्या मते सर्व सुख असणाऱ्या व्यक्तीला स्वामी उपासनेची काय गरज असावी."
"तेव्हा मी त्यांना उत्तर देत होतो कि स्वामी भक्तिनी समाधान मिळतं."
"पण आता मला जाणीव झाली कि स्वामी भक्तिनी आधार पण मिळतो."
"काही कार्य करतांना जेव्हा माणसाला विकल्प येतात, मन कामापासून परावृत्त करतं तेव्हा सद्गुरुचं नाव त्याला धीर देतं आणी तो
कार्य करायला तैयार होतो."
"सद्गुरू, हे तत्व माणसाचं भयं नष्ट करुन त्याला कार्य करायला प्रेरीत करतं."
स्वामी स्मित मुद्रेनी म्हणतात: " भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे "


 

No comments:

Post a Comment