Sunday, August 28, 2011

अनेक रूप असली तरी देव एकच असतो

रमाकांत नावाचा एक स्वामीभक्त होता. आनंदाचार्य त्याचे गुरु होते, ते जगत फक्त श्रीकृष्णाला मानायचे.
आनंदाचार्य तशे गयेत राहायचे पण त्यांचं सतत  तीर्थाटन चालत राहायचे.
रमाकांत गरीबीनी गांजला होता, सावकाराचे त्याला कर्ज झाले होते.
ते फेडता न आल्यानी तो वैतागला होता.
तो स्वामींकडे, आपल्या गुरुची भेट घडावावी अशी इच्छा व्यक्त करतो.
स्वामी म्हणतात:-" लवकरच तुला तुझ्या गुरुची भेट घडेल."
आनंदाचार्य त्या वेळेला तीर्थाटन करत होते, स्वामी प्रेरणेनी त्यांना रमाकांत ची आठवण होऊन ते स्वत:
रमाकांत ला भेटायला येतात. रमाकांत त्यांना स्वामी कृपेनी भेट घडली असं सांगतो.
आनंदाचार्य थोडेशे खिन्न होतात, कारण त्यांच्या मते जगाचा नियंता श्रीकृष्णाला वगळून रमाकांत एका माणसाची सेवा
 करतो, या गोष्टीचा खंत होतो.
ते रमाकांतला समझवायचा प्रयत्न करतात पण रमाकांत उलट त्यांनाच स्वामी ईश्वर आहे अशे सांगतो.
काही वेळानी सावकाराचा माणूस येऊन रमाकांताशी हुज्जत घालतो.
आनंदाचार्य हसतात की पाहु याचे स्वामी कशे सोडवणार या संकटातून, पण काय रमाकांताचा जुना मित्र येउन कधी तरी उसणे
घेतलेले पैशे रमाकांतला फेडुन संकट टाळतो.
रमाकांत स्वामींचे आभार मानतो हे, ऐकुन आनंदाचार्य चडफडतात.
काही दिवसांनी रमाकांत चा मुलगा याला फणफणून ताप येतो, बाहेर सोसाट्याचा पाऊस पडत असतो.
रमाकांत आनंदाचार्य यांना विनंती करतो की माझ्या मुलाचे रक्षण करा, पण आनंदाचार्य म्हणतात की अरे तुझ्या स्वामींना
हाक मार.
रमाकांत यावेळेला हतबल होतो.
तितक्यात दारावर एक थाप पडते. दार उघडल्यावर एक अनोळखी माणूस आत् येतो.
तो पावसा पासुन बचावासाठी आलो आहे असं सांगतो, आपलं परिचय देताना आपण वैद्य असल्याचे सांगतो.
रमाकांत त्याला आपल्या पोराला वाचवा अशी विनंती करतो.
वैद्य बुवा मुलाच्या कपाळावर हात काय फेरतात की मुलगा लगेच डोळे उघडतो, मग आपल्या बटव्यातून
एक औषध देउन वैद्यबुवा पाऊस थांबला असे सबब देउन जातात.
सकाळ पर्यंत मुलगा खडखडीत बरा होतो.
आनंदाचार्य थोडेशे गोंधळतात. ते आता रमाकांताला बुचकळ्यात पाडण्यासाठी काही ठरवतात.
ते रमाकांताला सुवर्णभस्म युक्त अशी खीरेची मागणी करतात.
रमाकांत कडे साध्या जेवणाचे सुद्धा हाल होते, मग खीर ती पण सुवर्णभस्म युक्त कुठून आणणार?
दो देवघरा कडे जाऊन स्वामींची मनोमन प्रार्थना करतो:-" लज्जा राखी स्वामीराया...."
काही वेळानी डोळे उघडतो तर काय देवासमोर एक वाटी ,त्यात खीर ती पण सुखे मेवे आणी स्वर्ण भस्म भुरकटलेली.
तो स्वामींना मनोमनी धन्यवाद देउन वाटी आपल्या गुरु समोर ठेवतो.
आनंदाचार्य आश्चर्य चकित होतात. रमाकांत त्यांना जेव्हा सर्व वृतांत सांगतो तेव्हा त्यांना गहिवरून येतं.
स्वामी कोणी साधारण मनुष् नव्हे तर पूर्ण ब्रह्मच आहे याची त्यांना खात्री पटते.
आनंदाचार्य , रमाकांत सोबत स्वामी दर्शनाला येतात.
स्वामी त्यांना पाहताच म्हणतात-" काय रे, श्रीकृष्णाला सोडुन एका मनुष्याच्या दर्शनाला कशाला आला ?"
आनंदाचार्य मान खाली घालतात.
स्वामी म्हणतात:" पहा आमच्यात आणी तुमच्या कृष्णात काही साम्य आहे का?"
आनंदाचार्य पाहतात तर काय ? डोक्याला मोर पीस, हातात बासरी असलेला पितांबरधारी कृष्ण समोर उभा आहे .
स्वामी म्हण्झेच श्रीकृष्ण आहे, ही त्यांना खात्री पटते. ते स्वामींचा चरणी लीन होतात.
इकडे रमाकांताला स्वामींच्या जागेवर, धो-धो पावसात अपरात्री येऊन आपल्या पोराला बरे करणारे वैद्य बुवा दिसतात.
त्याला कळते की स्वामी खुद्द वैद्याच्या रुपात आपली मदत करायला आले होते. त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत राहतात.
स्वामी बोध करतात:- " अरे देव एकच असतो पण तो वेग-वेगळ्या रुपात व्यक्त होतो"
"ज्या व्यक्तीला जे रूप पटते त्या रुपाची तो भक्ती करतो"
" आपली इच्छा दुसऱ्यावर लाडू नये, ज्याला ज्या रुपाची भक्ती करायची त्याला ती करू द्यावी."
आनंदाचार्य आपली चूक मान्य करतात.

 

Sunday, August 21, 2011

(७५) चोराचा सज्जन मुलगा

शिवराम नावाचा एक चोर होता,तो आपल्या मुलगा श्रीधरलाही चोर करू पाहत होता.
त्याची बायको नलिनी स्वामी भक्त होती, ती आपल्या मुलाला चांगले संस्कार द्यायची.
या मुळे शिवराम जाम वैतागायचा.एक दिवस रोगग्रस्त होऊन नलीनी देवा घरी जाते.
शिवराम श्रीधरचा बेदम छळ करायला लागतो.
या अत्याचाराला कंटाळुन श्रीधर घर सोडुन पळतो.
एका जागेवर तो रडत बसतो तिथे एका जोडप्याला त्याच्यावर दया येते. तो आपलं कोणी नाही असे सांगतो.
ते त्याला आपल्या शेत आणी घराची राखण करण्याची नोकरी देतात. त्या बद्दल ते त्याला गुरुकुलात पाठवणार होते.
श्रीधर प्रामाणिक पणे आपलं कार्य करत होता पण एक दिवस त्याच्या मालकाचा मित्र येऊन श्रीधर चोराचा मुलगा आहे,
असा खुलासा करतो.
श्रीधर चे मालक काही विचार न करता त्याला घरातून व कामावरून बाहेर काढून टाकतात.
श्रीधर एका ओसाड जागेवर बसून राहतो. त्याचं जागेवर त्याला दोन चोरांचा वार्तालाप कानावर पडतो.
त्याला कळत की चोर त्याच्या मालका कडेच चोरी करणार आहे, तो धावत जाऊन पोलीस शिपायाला खबर देउन आणतो.
चोर पकडले जातात. ते दोघे चोर कोणी दुसरे नसून त्याचे बाबा आणी त्यांचा साथीदार असतात.
श्रीधरचे मालक पुन्हा काहीही  विचार न करता श्रीधरनीच चोरं आणले असं आरोप  करतात.
शिपाई त्यांना सांगतो की श्रीधरच्या सुचने मुळेच चोरं पकडले गेले आहे.
तितक्यात स्वामी येऊन श्रीधरच्या मालकाला समझ देतात.
स्वामी म्हणतात:" अरे पूर्ण पडताळ केल्या शिवाय कोणाच्याही गोष्ठी वर विश्वास ठेऊ नका,किचडात पण कमळ
उगवते हे विसरू नये. माणसाला त्याच्या लायकी प्रमाणे व्यवहार करा, त्याच्या घराण्यां प्रमाणे नाही."
श्रीधर चे मालक आपली चूक मान्य करतात.

Sunday, August 14, 2011

(७४) आत्मोन्नती- हेच शत्रूस सर्वश्रेष्ठ शासन

उद्धव नावाचा एक गायक होता. संगीताच्या एका सामन्यात दशरथ नावाचा दुसरा  गायक त्याचा चौफेर पराभव करतो आणी त्याच्या कडून पुढे कधीही न गाण्याची हमी लिहून घेतो.
जन्मभर उद्धव या अपमानाच्या अग्नीत जळत राहतो, शेवटी त्याचा मृत्यु पण उद्विग्न अवस्थेतच होतो.
मरण्याच्या आधी तो आपला मुलगा अशोक याला हे सर्व वृतांत सांगतो.
जाता-जाता तो अशोकला  अपमानाचा बदला घे अस सांगतो.
अशोक दशरथ चा शोध काढतो. आणी तो अक्कलकोटला असल्या मुळे अशोक ही तिथे येतो.
तो स्वामी दर्शनाला येतो आणी तिथेच मुक्काम करतो.
अशोक, दशरथ चा वध करुन सूड उगवायला पाहतो.
एक दिवस लपून बसून तो दशरथ वर नेम धरुन तो सुरा भिरकावतो पण नेम चुकतो.
अशेच काही प्रयत्न फेटाळले जातात. एक दिवस अशोकला उपरती होते की आपण हे जे करतो ते बरोबर नाही.
पण वडिलांनी म्हटलेला बदला कसा घ्यायचा?
तो एक दिवस स्वामींना मनातलं कोडं विचारतो.
स्वामी म्हणतात: " अरे बदला विधायक असावा. कुणालाही खाली पाडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण वर कस जाऊ हा विचार करायचा असतो."
मग काय अशोक ठरवतो की दशरथ पेक्षा चांगल गायन करुन आपण बदला घेऊ.
अशोकची गायनात कधीही रुची नव्हती. पण आपल्या वडिलांना बरं वाटावे म्हणुन तो त्यांना गायन ऐकवत होता.
पण आता तो पूर्ण-जोमानी गायन शिकायला लागतो.
सुहासिक फुलं जेवढं उमलतं तेवढ जास्त त्याचा सुवास दूर-दुर पर्यंत जातो.
गावात सर्व दुर अशोकच्या गायनाची तारीफ होते.
हे ऐकुन गर्वीष्ठ दशरथची उत्सुकता वाढते.
एकदा स्वामींच्या समोर अशोक गायन करत असतांना दशरथ येऊन ऐकतो.
अशोकच गायन ऐकुन तो भाव-विभोर होतो. त्याला कळतं की आपलं गायन अशोक च्या गायना पुढे काहीच नाही.
तो मुक्त-कंठानी अशोकची तारीफ करतो.
अशोक सर्व प्रकरण सांगतो.
स्वामी म्हणतात: "अरे दशरथ 'बहुरत्ना वसुंधरा' या गोष्ठीला विसरू नको.
अर्थ हा की, या धरती वर अनेक रत्न आहे म्हणुन कोणीही आपल्या कर्तुत्ववान पणाचा किंवा यशाचा अभिमान धरू नये.
स्वामी, दशरथला त्याची चूक पटवून देतात. दशरथ पुन्हा कधीही असे वर्तन न करण्याची हमी देतो.
अशोकचा बदला पण विधायकपणानी सिद्ध होतो.

Monday, August 8, 2011

(७३) प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही

सुमन नावाची एक स्वामीभक्त स्त्री, गरोदर असतांना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णू बरोबर येते.
स्वामी म्हणतात:-"तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तैयारी ठेव."
सुमनला स्वामी-वचन खरं होणार ही खात्री होती, पण "तैयारी ठेव" या ताकीदीनी तिचा थरकंप सुटतो.
ती या गोष्टी मुळे फार चिंतेत राहायची.
सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी-दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतं देतात.
शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणुन घेतो.
सुमन एकदा विहिरीतून पाणी आणतांना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते.
वैद्यबुवा गर्भस्थ शिशुचं निधन झालं आहे, अस निदान करतात आणी सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात.
हे ऐकुन सुमन फार खचून जाते.
इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्यानी पीक खराब होते.
शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात. त्याच्यावर देशोधडी वर जायची वेळ येते.
इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतर्यामी स्वामी बालळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात.
स्वामी आणी बाळप्पा मध्ये संवाद होतो-
स्वामी: "बाळ्या! अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मानी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते."
बाळप्पा: "स्वामी यावर काही उपाय नाही का?"
स्वामी: "अरे एकदा पापाचे विपरीत-प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगाला
मागे-पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात."
"अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो. मनुष्याच्या हातून कळत-नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणी
त्याचं परिवर्तन विपरीत-प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते."
"लोग कहते है की भगवान के यहा न्याय मे  देर है, अरे भगवान सबको समय देता है अपने पापं नष्ट करने का."
"कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नाही माने, तब उनका संहार किया."
बाळप्पा: "स्वामी मग अश्या विपरीत प्रारब्धात मनुष्यांनी काय करावे?"
स्वामी: "अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो, आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो."
"पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो, म्हणतो - "मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले?" .
"बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आता पर्यंत केली, ती जर केली नसती तर आणखी भयाण संकट आले असते."
तिकडे शेत व्हायाल्यामुळे शिवा पण खचलेला असतो.त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते.
पण मग त्याच्या मनात विचार येतो, की स्वामीनी धान्याचे खाली पोते देउन आपल्याला एक खुण केली होती.
तो खंबीर होऊन उठतो, आणी आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो.
स्वामी त्याला सांगतात की जसा तु खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे.तिला जाऊन काही बोध कर.
पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते, आणी वेडेपणाच्या भरात ती  गळफास लावायला जाते.
पण योगा-योगानी शिवा आणी विष्णू तिथे येऊन तिला अडवतात.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात:-" सुमन! मरण सोपं नसतं . आणी मरण जीवाच्या हाती नसतं. अरे जर देवानी ठरवलेली वेळ नसली तर
काहीही केलं तरी सुटका होणार नाही."
"मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार."
"अरे आपल्या सासू,नवरा आणी भावाचा विचार कर. तुझ्या या पाऊला मुळे त्यांना काय वाटले असते?"
सुमन म्हणते:" स्वामी,संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू?"
तितक्यात शारदा(शिवाची बायको) आपल्या नणंदेला आपलं बाळ देते.
शारदा: " हे माझं बाळ घे! याला तु आपल्या मुला सारखे वाढव. याची तुला जास्त गरज आहे."
"मला काय, मला दुसरं अपत्य होईल."
स्वामीवचना प्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणी आनंदानी पुढच्या आयुष्याची सुरुवात करते.