Sunday, August 14, 2011

(७४) आत्मोन्नती- हेच शत्रूस सर्वश्रेष्ठ शासन

उद्धव नावाचा एक गायक होता. संगीताच्या एका सामन्यात दशरथ नावाचा दुसरा  गायक त्याचा चौफेर पराभव करतो आणी त्याच्या कडून पुढे कधीही न गाण्याची हमी लिहून घेतो.
जन्मभर उद्धव या अपमानाच्या अग्नीत जळत राहतो, शेवटी त्याचा मृत्यु पण उद्विग्न अवस्थेतच होतो.
मरण्याच्या आधी तो आपला मुलगा अशोक याला हे सर्व वृतांत सांगतो.
जाता-जाता तो अशोकला  अपमानाचा बदला घे अस सांगतो.
अशोक दशरथ चा शोध काढतो. आणी तो अक्कलकोटला असल्या मुळे अशोक ही तिथे येतो.
तो स्वामी दर्शनाला येतो आणी तिथेच मुक्काम करतो.
अशोक, दशरथ चा वध करुन सूड उगवायला पाहतो.
एक दिवस लपून बसून तो दशरथ वर नेम धरुन तो सुरा भिरकावतो पण नेम चुकतो.
अशेच काही प्रयत्न फेटाळले जातात. एक दिवस अशोकला उपरती होते की आपण हे जे करतो ते बरोबर नाही.
पण वडिलांनी म्हटलेला बदला कसा घ्यायचा?
तो एक दिवस स्वामींना मनातलं कोडं विचारतो.
स्वामी म्हणतात: " अरे बदला विधायक असावा. कुणालाही खाली पाडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण वर कस जाऊ हा विचार करायचा असतो."
मग काय अशोक ठरवतो की दशरथ पेक्षा चांगल गायन करुन आपण बदला घेऊ.
अशोकची गायनात कधीही रुची नव्हती. पण आपल्या वडिलांना बरं वाटावे म्हणुन तो त्यांना गायन ऐकवत होता.
पण आता तो पूर्ण-जोमानी गायन शिकायला लागतो.
सुहासिक फुलं जेवढं उमलतं तेवढ जास्त त्याचा सुवास दूर-दुर पर्यंत जातो.
गावात सर्व दुर अशोकच्या गायनाची तारीफ होते.
हे ऐकुन गर्वीष्ठ दशरथची उत्सुकता वाढते.
एकदा स्वामींच्या समोर अशोक गायन करत असतांना दशरथ येऊन ऐकतो.
अशोकच गायन ऐकुन तो भाव-विभोर होतो. त्याला कळतं की आपलं गायन अशोक च्या गायना पुढे काहीच नाही.
तो मुक्त-कंठानी अशोकची तारीफ करतो.
अशोक सर्व प्रकरण सांगतो.
स्वामी म्हणतात: "अरे दशरथ 'बहुरत्ना वसुंधरा' या गोष्ठीला विसरू नको.
अर्थ हा की, या धरती वर अनेक रत्न आहे म्हणुन कोणीही आपल्या कर्तुत्ववान पणाचा किंवा यशाचा अभिमान धरू नये.
स्वामी, दशरथला त्याची चूक पटवून देतात. दशरथ पुन्हा कधीही असे वर्तन न करण्याची हमी देतो.
अशोकचा बदला पण विधायकपणानी सिद्ध होतो.

No comments:

Post a Comment