Sunday, August 28, 2011

अनेक रूप असली तरी देव एकच असतो

रमाकांत नावाचा एक स्वामीभक्त होता. आनंदाचार्य त्याचे गुरु होते, ते जगत फक्त श्रीकृष्णाला मानायचे.
आनंदाचार्य तशे गयेत राहायचे पण त्यांचं सतत  तीर्थाटन चालत राहायचे.
रमाकांत गरीबीनी गांजला होता, सावकाराचे त्याला कर्ज झाले होते.
ते फेडता न आल्यानी तो वैतागला होता.
तो स्वामींकडे, आपल्या गुरुची भेट घडावावी अशी इच्छा व्यक्त करतो.
स्वामी म्हणतात:-" लवकरच तुला तुझ्या गुरुची भेट घडेल."
आनंदाचार्य त्या वेळेला तीर्थाटन करत होते, स्वामी प्रेरणेनी त्यांना रमाकांत ची आठवण होऊन ते स्वत:
रमाकांत ला भेटायला येतात. रमाकांत त्यांना स्वामी कृपेनी भेट घडली असं सांगतो.
आनंदाचार्य थोडेशे खिन्न होतात, कारण त्यांच्या मते जगाचा नियंता श्रीकृष्णाला वगळून रमाकांत एका माणसाची सेवा
 करतो, या गोष्टीचा खंत होतो.
ते रमाकांतला समझवायचा प्रयत्न करतात पण रमाकांत उलट त्यांनाच स्वामी ईश्वर आहे अशे सांगतो.
काही वेळानी सावकाराचा माणूस येऊन रमाकांताशी हुज्जत घालतो.
आनंदाचार्य हसतात की पाहु याचे स्वामी कशे सोडवणार या संकटातून, पण काय रमाकांताचा जुना मित्र येउन कधी तरी उसणे
घेतलेले पैशे रमाकांतला फेडुन संकट टाळतो.
रमाकांत स्वामींचे आभार मानतो हे, ऐकुन आनंदाचार्य चडफडतात.
काही दिवसांनी रमाकांत चा मुलगा याला फणफणून ताप येतो, बाहेर सोसाट्याचा पाऊस पडत असतो.
रमाकांत आनंदाचार्य यांना विनंती करतो की माझ्या मुलाचे रक्षण करा, पण आनंदाचार्य म्हणतात की अरे तुझ्या स्वामींना
हाक मार.
रमाकांत यावेळेला हतबल होतो.
तितक्यात दारावर एक थाप पडते. दार उघडल्यावर एक अनोळखी माणूस आत् येतो.
तो पावसा पासुन बचावासाठी आलो आहे असं सांगतो, आपलं परिचय देताना आपण वैद्य असल्याचे सांगतो.
रमाकांत त्याला आपल्या पोराला वाचवा अशी विनंती करतो.
वैद्य बुवा मुलाच्या कपाळावर हात काय फेरतात की मुलगा लगेच डोळे उघडतो, मग आपल्या बटव्यातून
एक औषध देउन वैद्यबुवा पाऊस थांबला असे सबब देउन जातात.
सकाळ पर्यंत मुलगा खडखडीत बरा होतो.
आनंदाचार्य थोडेशे गोंधळतात. ते आता रमाकांताला बुचकळ्यात पाडण्यासाठी काही ठरवतात.
ते रमाकांताला सुवर्णभस्म युक्त अशी खीरेची मागणी करतात.
रमाकांत कडे साध्या जेवणाचे सुद्धा हाल होते, मग खीर ती पण सुवर्णभस्म युक्त कुठून आणणार?
दो देवघरा कडे जाऊन स्वामींची मनोमन प्रार्थना करतो:-" लज्जा राखी स्वामीराया...."
काही वेळानी डोळे उघडतो तर काय देवासमोर एक वाटी ,त्यात खीर ती पण सुखे मेवे आणी स्वर्ण भस्म भुरकटलेली.
तो स्वामींना मनोमनी धन्यवाद देउन वाटी आपल्या गुरु समोर ठेवतो.
आनंदाचार्य आश्चर्य चकित होतात. रमाकांत त्यांना जेव्हा सर्व वृतांत सांगतो तेव्हा त्यांना गहिवरून येतं.
स्वामी कोणी साधारण मनुष् नव्हे तर पूर्ण ब्रह्मच आहे याची त्यांना खात्री पटते.
आनंदाचार्य , रमाकांत सोबत स्वामी दर्शनाला येतात.
स्वामी त्यांना पाहताच म्हणतात-" काय रे, श्रीकृष्णाला सोडुन एका मनुष्याच्या दर्शनाला कशाला आला ?"
आनंदाचार्य मान खाली घालतात.
स्वामी म्हणतात:" पहा आमच्यात आणी तुमच्या कृष्णात काही साम्य आहे का?"
आनंदाचार्य पाहतात तर काय ? डोक्याला मोर पीस, हातात बासरी असलेला पितांबरधारी कृष्ण समोर उभा आहे .
स्वामी म्हण्झेच श्रीकृष्ण आहे, ही त्यांना खात्री पटते. ते स्वामींचा चरणी लीन होतात.
इकडे रमाकांताला स्वामींच्या जागेवर, धो-धो पावसात अपरात्री येऊन आपल्या पोराला बरे करणारे वैद्य बुवा दिसतात.
त्याला कळते की स्वामी खुद्द वैद्याच्या रुपात आपली मदत करायला आले होते. त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत राहतात.
स्वामी बोध करतात:- " अरे देव एकच असतो पण तो वेग-वेगळ्या रुपात व्यक्त होतो"
"ज्या व्यक्तीला जे रूप पटते त्या रुपाची तो भक्ती करतो"
" आपली इच्छा दुसऱ्यावर लाडू नये, ज्याला ज्या रुपाची भक्ती करायची त्याला ती करू द्यावी."
आनंदाचार्य आपली चूक मान्य करतात.

 

No comments:

Post a Comment