Thursday, November 11, 2010

(35) गर्वहरण

पांडुरंग नावाचा एक व्यक्ती अपघातात पंगु झाला होता.
मल्हारी मार्तंडाचा  त्याला फार  लळा होता.
शरीरामुळे मल्हारीचे  दर्शन होणार नाही, म्हणुन तो नियमांनी स्वामींचे दर्शन करत होता.
काहीही झालं तरी त्याच्या नियमाला तडा गेला नव्हता.
शिवरात्रीच्या दिवशी त्याच्या मनात विचार येतो कि जर आपल्याला मल्हारीचे दर्शन झाले असते तर ....!
तो आल्या बरोबर स्वामी विचारतात:-"काय मनात धरुन आला आहे.....?"
"काहीही सांगू नको."
मग स्वामी त्याला मल्हारी  मार्तंडाच्या रुपात दर्शन देतात, इतकच नाही
त्याच्या अधू झालेल्या पायावर कृपादृष्टी घालुन
त्याचं पंगुत्व पण दुर करतात.
पांडुरंगाच्या घरी एक ब्राह्मण घर गडी म्हणुन होता.
तो अगदी प्रामाणिक आणी कामात चोख होता.
शिकला-सवरलेला असूनही तो अफाट कर्जापाई घर गड्याचे  कार्य आनंदानी करत होता.
पांडुरंगाच्या पत्नीच्या सांगण्या वरून तो स्वामी दर्शनाला जातो.
तिथे जाऊन तो स्वामींना आपल्या  गरिबीचं घाराणं सांगतो.


स्वामी म्हणतात:-" अरे आमच्याकडे तु धनाची आशा धरुन आला,
जणू काय एकादशी कडे महाशिवरात्रीच आली !"
"आमच्या कडे काय आहे ?"
"ही माती घेऊन जा."
ब्राह्मण  म्हणतो:-" मी  ह्या मातीचं काय करू?"
स्वामी ओरडतात:-"घ्यायची तर घे नाही तर नीघ इथून."
ब्राह्मण खिन्न मनानी माती कपड्यात बांधून नेतो.
रस्त्यात भार अधिक झालं म्हणुन पाहतो तर काय?
मातीचं सोनं झालेलं होतं.
तो उलट्या पावलानी परतून स्वामी चरणी नत-मस्तक होतो.
स्वामी म्हणतात:-" ह्या धनानी आपलं कर्ज दुर कर आणी आपल्या कुल देवतेचं दर्शन कर."
" 'मती कर्मानुसारिणी' म्हणुन  सर्वांना आपल्या कर्मानुसार  आमच्याशी मागायची बुद्धी होते."
"धना मुळे सर्वांचच हित होतं असं नाही.
"लोकिक धना शिवाय पण काही धन असतात जसं आध्यात्मिक धन."
"लोकिक धन प्राप्ती साठी माणसांनी मेहनत करावी,सचोटीने वागावं"
"आध्यात्मिक धनासाठी नामस्मरण करावं,सत्कर्म करावं !"

स्वामींना खंडेराव राजाकडे जेवनणाचं निमंत्रण असतं.
स्वामी आपल्या शिष्यांसह राजमहालात जातात.
तिथे असलेला साधू स्वामींना फार घालुन पडून बोलतो,
स्वामींना काही   विधी निषेध नाही म्हणुन निंदा करतो.
स्वामींची आपल्या पंक्तीत बसायची लायकी नाही म्हणून त्यांचं पान
 पंक्ती बाहेर लावा असं सांगतो.
स्वामी निमुटपणे महाला बाहेर जातात पण खंडेराव महाराजाच्या आग्रहाखातर
जेवण करुन जाऊ असं आश्वासन देतात.
तिकडे त्या साधुंसाठी लावलेल्या पानात किडे रांगतात.
स्वामींचे शिष्य साधूंना म्हणतात-"हा सर्व स्वामींच्या अपमानाचं फळ आहे!"
एकदम असं अघटीत घडल्यामुळे साधूंना आपली चूक पटते.
ते स्वामींची क्षमा मागतात.
स्वामी समझ देतात:-" अरे मन पवित्र पाहिजे,मन पवित्र असाल तरच वचनांना किम्मत असते.
मन पवित्र नसतांना म्हटलेलं सत्य सुद्धा असत्या समान असतं."
स्वामींच्या कृपादृष्टीनी किडे नाहीशे होतात.साधूला स्वामींचा अधिकार कळतो.
साधू पुन्हा क्षमा मागून आपल्या सह जेवायची विनंती करतो.
स्वामी उदार माननी साधूला क्षमा करुन विनंती मान्य करतात.

No comments:

Post a Comment