सिद्धप्पा जंगम नावाचे एक साधक होते. त्यांना फार सिद्ध्या प्राप्त झाल्या होत्या.
पण ते फार जात-पात,उच्च-नीच अश्या गोष्टींना महत्व द्यायचे.
इकडे स्वामी, कडे एक भक्त स्वामींना २ डाळिंब भेट करतो. सुंदराबाई ते डाळिंब उचलून स्वामींच्या लोकिक
दृष्टीआड आपल्या नातवाला खाऊ घालतात.
नातू खातांना जे दाणे खाली पडतात ते उचलून त्या स्वामींना देतात.
डाळिंब भेट करणारया भक्ताच्या पाहण्यात हे सर्व येतं, तो आक्षेप घेतो.
सुंदराबाई त्यालाच उलट उत्तर देतात.
स्वामी सुन्दाराबाईला तुझ्या पापांचा घडा भरला आहे, अशी ताकीद देउन विषय तिथेच संपवतात.
स्वामी दर्शनाला एक कनिष्ठ जातीचा व्यक्ती येतो, आपली जात कनिष्ठ म्हणुन दुर उभा राहतो.
स्वामी त्याला जवळ बोलावतात आणी ईश्वरा कडे भेद नसतो असं सांगतात.
तिकडे सिद्धप्पा जंगम देवाची करुणा भाकतात आणी मोक्ष मिळावा अशी विनवणी करतात.
भिंतीवरचा आरसा खाली पडून फुटतो. तेव्हाच देव वाणी होते, तडा गेलेल्या आरश्याला पूर्वीप्रमाणे केल्यास मोक्ष मिळेल.
सिद्धी वापरून सुद्धा सिद्धप्पा जंगम यांना यश येत नाही.
ते पुन्हा देवाची करुणा भाकतात.पुन्हा देववाणी होते, तोडलेल्या फुलांना पुन्हा झाडावर पूर्वीप्रमाणे लावायची.
या वेळेल सुद्धा सिद्धप्पा जंगम प्रयत्नात अपयशी ठरतात.
पुन्हा देववाणी होते,कि स्वामी समर्थांच्या शरणी जा .
सिद्धप्पा जंगम स्वामींशी भेटायला येतात.मनात अनेक संकल्प-विकल्प असतात.
स्वामी जवळ येताना, स्वामी इच्छेनी त्यांचे पाय स्थिरावतात ,काहीही केल्या स्वामी जवळ जाता येत नाही.
स्वामी म्हणतात: "सिद्धप्पा जंगम आमच्या विषयी शंका आहे ना!"
स्वामींनी आपल्या मनाचं जाणलं म्हणुन सिद्धप्पा जंगम थक्क होतात, त्यांना स्वामींचा थोरावा कळतो.ते क्षमा मागतात.
स्वामी इच्छेनी त्यांचे पाय मोकळे होतात.
स्वामी समीप येऊन ते आपलं मनोगत व्यक्त करतात.
स्वामी म्हणतात:- "अरे मोक्ष मिळवण्ं काही शेजारच्या गावात जाण्या इतक सोपं आहे का?"
जा तिकडे गोठ्यात जाऊन शेण आणून जमीन सारव, अशी आज्ञा करतात, सिद्धप्पा जंगम निमुटपणे मान्य करतात.
सिद्धप्पा जंगम यांचे शिष्य आपत्ती घेतात, तरी सिद्धप्पा जंगम काही पण ऐकत नाही.
स्वामी म्हणतात:-'अरे मोक्ष मिळवायला मन आधी स्वच्छ पाहिजे, भेद-भाव,त्याज्य-ग्राह्य अश्या भावना नको."
मग स्वामी सिद्धप्पा जंगम यांना शेतात जाऊन कार्य करायला सांगतात, सिद्धप्पा जंगम निमुटपणे मान्य करतात.
सिद्धप्पा जंगम यांचे शिष्य स्थळ त्याग करतात, रस्त्यात आपल्या मनात कुणाकडूनही समाधानकारक उत्तर न मिळालेला
प्रश्न स्वामींना विचारून,
स्वामींची योग्यतेचं निर्धारण करू, असं ठरवून परततात्त.
स्वामी जवळ आल्या बरोबर, स्वामी त्यांच्या मनात असलेला तिसऱ्या अध्यायाचा ४२ वा श्लोक म्हणतात-
"इंद्रियाणि ........ स:".
"म्हनणजे शरीरा पेक्षा मन श्रेष्ठ आहे, मना पेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धी पेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे,
आत्मा म्हणजेच मनुष्यात असलेला ईश्वराचा अंश."
शिष्यांना स्वामींचा अधिकार कळतो, ते नतमस्तक होतात.
तेवढ्यात सिद्धप्पा जंगम कार्य करुन परततात.
स्वामी म्हणतात:-"सिद्धप्पा जंगम, अरे तुझ्या अभिमानाला तडा घालवण्यासाठीच आम्ही तुला निकृष्ठ वाटणारी
कार्य सांगितली."
"अरे महाला सारख्या मठात राहुन मोक्ष कसा मिळणार?"
"अरे गरीब-गुबडे,कनिष्ठ जातीचे लोकात असलेल्या नारायणा पासुन अलिप्त राहुन मोक्ष कसा मिळेल?"
"आपलं कर्तव्य चोख पाड पाडणं सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे."
"सर्वा भूती इश्वर पहिल्या शिवाय गती कशी प्राप्त होणार?"
"घे प्रसाद ग्रहण कर! "असं म्हणुन कनिष्ठ जातीच्या व्यक्तींनी आणलेली भाकरी ग्रहण करायला सांगतात.
सिद्धप्पा जंगम प्रसाद स्वीकारतात.
शेवटची परीक्षा पार केल्यामुळे सिद्धप्पा जंगम यांच्या मोक्षाची वाटचाल मोकळी होते.
No comments:
Post a Comment