एक सावकार क्षयानी बेजार झाला होता. काहीही केल्या त्याचा आजार
बरा होत नव्हता.
सावकाराला शेवटचा उपाय स्वामीचाच होता.
सावकार सुंदराबाईच्या हाती स्वामींना निरोप पाठवतो.
स्वामी स्वत: होऊन सावकाराच्या गावी येतात.
सावकार त्यांच्यासाठी मेणा पाठवतो.
मेणा उचलणाऱ्या लोकांना जास्त भार होतो म्हणुन स्वामी आपला भार
अगदी कमी करतात.
मेणा फुला सारखा हलका होतो.
स्वामी सावकाराला ३ दिवस रताळे उकळून खायला सांगतात.
त्यानंतर स्वामी थेट श्मशान भूमीत जातात. तिथे जाऊन ते हाडांच्या
ढिगावर बसतात.
काही मेणा उचलणारे व्यक्ती स्वामी बद्दल शंका घेतात.
एवढे धार्मिक व्यक्ती होऊन अश्या अमंगल गोष्टी जवळ कशे घेतात?
मेणा उचलणारा एक व्यक्ती स्वामींना आपल्या गरिबीचं घाराणं सांगतो.
स्वामी त्याला वाटेल तेवढे हाडं उचल असं सांगतात.
खिन्न मनानी तो व्यक्ती स्वामींचं मन ठेवायला ३ हाडं वेचून पोटळीत ठेवतो.
काही वेळानी पोटली जड झाली म्हणुन उघडून पाहतो तर काय, हाडं चक्क
सोन्याची झाली होती.
तो कृतज्ञ भावांनी स्वामीचरणी नतमस्तक होतो.
शंका करणाऱ्या अन्य व्यक्तींना स्वामी अधिकाराची प्रचीती येते, ते सुद्धा
स्वामी चरणी मस्तक ठेवतात.
स्वामी म्हणतात:- " याच्या प्रारब्धात होतं म्हणुन याला मिळालं! "
इकडे सावकार गावात रताळे घ्यायला जातो. वाटेत त्याच्या मनात विचार येतात कितका सोपा उपाय
आधी माहित असता तर कधीच घेतला असता.
सावकाराला गावात कुठेही रताळे सापडत नाही.
हताश होऊन तो स्वामी कडे येतो.
स्वामी त्याला समझ देतात:-"अरे रोग बरा करायची किमया रताळयात नाही, आमच्या वचनात होती."
"आम्ही रताळ्याच्या जागी कारले म्हटले असते तरी तोच परिणाम झालं असता."
"तुझ्या मनात जो मी पणा आला होता तो वाईट होता."
"मला माहित असतं तर मीच केलं असतं, ही भावना चुकीची होती."
"लक्षात ठेव सामर्थ्य गुरु वचनात असतं साधन म्हणुन वापरलेल्या वस्तुत नाही."
सावकार आपली चूक मान्य करतो.
स्वामी त्याला आपल्या कडे असलेली रताळे देतात.
No comments:
Post a Comment