स्वामी भक्तांना एक गोष्ट सांगतात:-
"एक माणूस होता तो वाराप्रमाणे देवाची भक्ती करायचा. सोमवारी शिवाची ,गुरुवारी दत्ताची,
शुक्रवारी देवीची.
एक दिवस तो पाण्यात पडला. एका देवाला बोलावलं, तो येई पर्यंत दुसऱ्याचा धावा केला,दुसऱ्या देवाचा धावा ऐकून पहिला
परतला ,दुसरा येतो तो पर्यंत तिसऱ्याचा धावा केला.
अश्या प्रकारानी एकही देव मदतीला आला नाही आणी तो माणूस बुडून मेला.
तात्पर्य असं कि माणसांनी एकाच देवाची निस्सीम भक्ती करावी.
१० छोट्या-छोट्या विहीरी खोदल्या पेक्षा एकच भली मोठ्ठी बावडी खोदलेली बरी."
स्वामींचा शिष्य श्रीपाद प्रापंचीक त्रासांनी गांजला होता,त्याला काहीच सोसेनासं झालं होतं.
स्वामी भक्ती करूनही काही त्रास संपत नाही म्हणुन तो ज्योतिष्याच्या शरणी जातो.
ज्योतिषी ग्रहांचा त्रास सांगतो,आणी उपाय म्हणुन परवा येणाऱ्या ग्राम देवताच्या पालखीचे दर्शन घ्यायला सांगतो.
पण स्वामी नेमकी त्याचं दिवसाची कार्य जवाबदारी श्रीपादवर घालतात.
तो स्वामींना पालखी दर्शनसाठी परवानगी मागतो पण स्वामी चक्क नकार देतात.
श्रीपादच्या मनात चल-विचल होते.
पालखीच्या दिवशी स्वामी ध्यान अवस्थेत आहे असं समझुन तो भुजंग नावाच्या दुसऱ्या शिष्य बरोबर पालखी
दर्शनासाठी गुपचूप पळ काढतो.
रस्त्यात आपली मोल्यवान स्वर्णमुद्रीका तो भुजंग ला सांभाळायला देतो.
भुजंग ती हातातच ठेवतो.
पालखीवर फुलांच्या पाकळ्या टाकतांना मुद्रीका पण भिरकावली जाते,पण भूजन्गच्या लक्ष्यात येत नाही.
पालखी गेल्यावर त्यांच्या लक्षात हा प्रकरण येतो.
खूब शोध घेऊन सुद्धा मुद्रीका मिळत नाही, म्हणुन ते निराष होतात.
स्वामी आज्ञेचं उल्लंघन झालं म्हणुन हा प्रकरण घडला असं समझुन ते स्वामी शरणी जातात.
स्वामी पहिले त्यांची चांगलीच हाजरी घेतात.
भुजंग स्वामींची करुणा भाकतो-" स्वामी माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे,
माझ्या हातून एवढी मोल्यावन वस्तू हरवली गेली आहे.
माझ्यावर कृपा करा."
स्वामींना करुणा येते.
स्वामी म्हणतात-" मुकाट्याने गप्प बस, अंगठी आपोआप चालत तुमच्यापाशी येईल."
तिकडे ती मुद्रीका रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीला सापडते, तो उचलणार त्याच्या आधीच दुसरा उचलतो.
यावरून दोघांचं भांडण जुंपतं, तितक्यात एक शिपाई येऊन त्यांना दम देउन खर प्रकरण जाणतो.
मग तो त्या दोघांना व मुद्रीका घेऊन स्वामींकडे न्याय-निवाड्या साठी येतो.
श्रीपादला मुद्रीका मिळते, आणी भुजंग चिंतामुक्त होतो.
स्वामी म्हणतात:-"अरे गुरु असतांना तु ज्योतिष्य कडे कशाला गेला?
गेला तर गेला गुरु आज्ञेच उल्लंघन पण केलं.
अरे! गुरुचं ऐकत नाही आणी संकट आल्यावर गुरुकडे धावत येतात.
अरे शिष्यांनी गुरुशी एकनिष्ठ असावं , कितीही संकट आली तरी त्याची कसं सोडू नये.
संकट पूर्व कर्मामुळे येतात, आणी त्याचवेळेला जर गुरुची कास सोडली तर व्यक्ती जास्त दु:खाला प्राप्त होतो.
गुरुकृपेनी संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते,व त्या संकटातून लवकर सुटका होते."
No comments:
Post a Comment