Friday, January 21, 2011

(४८) भक्ताची काळजी सद्गुरूला असतेच

नारायण नावाचा एक फार मोठा सरकारी अधिकारी होता.
तो मनापासुनी स्वामी भक्ती करायचा.
 त्याची पत्नी, आई आणी मुलगा पण धार्मिक होते पण त्या लोकांची स्वामीवर श्रद्धा नव्हती.
त्यांच्या मते स्वामी म्हणजे काय एका मनुष्यच, कोणी  देव नाही.
नारायण स्वामींच्या दर्शनाला येतो. आशीर्वाद घेऊन परतताना त्याच्या लक्ष्यात येतं कि स्वामींना भेट म्हणुन आणलेली शाल द्यायची राह्यली आहे.
रस्त्यात त्याला गौराबाई अडवतात. गोरा बाई म्हणजे काय जणू दुसऱ्या सुन्दाराबाईच.
स्वामींना शाल देईन, असं म्हणुन शाल घेतात, पण स्वामींना काही देत नाही.
इकडे नारायणाला एका सरकारी कामा निमित्य अपरात्री बाहेर गावी जायचं असतं. नारायणाची आई आज किंकरांत आहे असं म्हणुन त्याला जाण्यापासुन परावृत्त करते.
तरी नारायण "स्वामींच्या सेवका नाही भयं चिंता" अस म्हणुन बाहेरगावी जातो.
इकडे स्वामी थंडीनी कुड कुडतात.समोर शेकोटी असली तरी. भुजंग, आणी चोळप्पाला घोंगडी सुद्धा पांघरु देत नाही.
गौर तिथे येते. स्वामी तिला रागावून नारायनणानी दिलेली शाळे बद्दल जाब विचारतात.गौरा निमुटपणे स्वामींना शाल आणून देते.
रस्त्यात त्याला दोन वाटमारे अडवतात आणी मारहाण करुन गाठोडी हिसकून घेतात.
नारायण रक्तबंबाळ होऊन तिथेच धरतीवर कोसळतो ,व कसा-बसा स्वामी-स्वामी म्हणत राहतो.
या जागेच्या काही अंतरावरून दोन पोलीस जात असतात. त्यांना एक मुस्लीम व्यक्ती येऊन, 'मागे एकाला दुखापत झाली आहे' असं सांगतो.
तरी ते पोलीस आम्हाला वेळ नाही असं सांगून पुढे जातात.
पुढे गेल्यावर त्यांना पुढे एक हिंदू वृद्ध भेटतो आणी तीच सूचना देतो, तरीही पोलीस आपल्या वाटेला पुढे जातात.
काही अंतरावर गेल्यावर त्यांना स्वामी प्रत्यक्ष येऊन तीच सूचना देतात.
मात्र या वेळेला स्वामींच्या तेज आणी रुबाबा मुळे पोलिसांना नाही म्हणता येत नाही आणी ते दुखापत झालेल्या नारायणाला मदत करायला परततात.
सांगायची काही गरज नसावी की मागचे दोन व्यक्तीच्या रुपात स्वमीनीच सूचना दिलेली असते.
नारायणाला पाहिल्या बरोबर पोलीस अधिकारी त्यांना लगेचच  ओळखतो आणी घरी आणून सोडतो.
वैद्याचा उपचार करण्यात येतो आणी नारायणाची प्रकृती हळू हळू सुधरते.
नारायणाची  आई  नारायणाला म्हणते- "स्वामी स्वामी, करुन काय मिळालं? किंकरांती च्या दिवशी नको जाऊ म्हटलं तरी गेला! काय केलं स्वामींनी?"
नारायणाचा तरीही स्वामीवर विश्वास ढळ राहतो.
काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणाचे हाल-हवाल विचारायला येतो.
नारायण विचारतो-"तुम्हाला मला दुखापत झाल्याची सूचना कोणी दिली  हो?"
पोलीस म्हणतो-"आम्हाला एका वृद्ध माणसांनी सूचना दिल होती."
नारायण विचार करतो, त्या दिवशी अपरात्री च्या वेळी, ते पण किंकरांतीच्या  दिवशी कोणी त्या सामसूम जागेत आपल्याला पहिले असावे?
नक्कीच स्वामीनीच काही केलं असावं.
तो आपल्या मुलाकडून स्वामींचं चित्र मागवतो आणी पोलिसांना विचारतो- " काहो! हेच का ते, ज्यांनी तुम्हाला सूचना दिली?"
पोलीस अधिकारी म्हणतो:-"हो! हो! हेच ते ."
नारायणाला गहिवरून येतं.त्याच्या घरच्यांना सुद्धा स्वामीकृपेची प्रचीती येते.पण त्यांना प्रश्न पडतो कि स्वामींनी अपघात व्हायचाच का नाही टाळला?
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात.
स्वामी म्हणतात:-" अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणुन काही करू शकणार नाही?"
"अरे भगवंताला कोणत्याही रुपात भक्ताची काळजी असतेच."
"नारायणाच्या नियतीत मारहाण होतीच. आम्ही नियती बदलत नाही पण भक्ताची त्यातून सुटका कशी करावी, याचं धोरण ठेवतो."
"अरे खुद्द प्रभू श्रीरामांनी आपलं वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही."
"नियती स्वताच्याच कर्मानी बनलेली असते, तिला चुकवता येत नाही पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं, याचावरच सद्गुरूचं लक्ष्य असतं."

Thursday, January 13, 2011

(४७) अंधश्रद्धा नसावी

गावात एकदा पटकीची साथ येते.त्या साठी गावातली लोकं स्वामींपाशी अपेक्षा घेऊन येतात.
पण स्वामी काहीही उपाययोजना सांगत नाही.
लोकं परततात. रस्त्यात त्यांना एक तांत्रिक भेटतो.त्यांनी एका दगडाला शेंदूर पोतलेल असतं.
तो त्या दगडाला म्हसोबा म्हणुन सांगतो.
त्याच्या मते म्हसोबा कोपल्या मुळेच गावात पटकीची ची साथ आलेली असते.
तो म्हसोबाची पूजा करुन एका कोंबड्याचा बळी द्यायला जातो.
तितक्यात स्वामी तिथे येऊन कोंबड्याला सोडवुन  देतात .
मग गावकऱ्यांना रागावतात:- "अरे जगाला उत्पन्न करणाऱ्या ईश्वराला तुम्ही त्याचीच कृती चा जीव घेऊन प्रसन्न करणार?"
"दगडाला प्रसन्न करायला जिवंत जीवाचा बळी देणार?"
"अरे असा अंध विश्वास ठेऊ  नका!"
"भोंदू बाबांच्या आहारी जाऊ नका."
"सर्व जीव ईश्वराचे लेकरू असतात, अरे लेकरूचा जीव घेऊन जगात कोणतीही माता  प्रसन्न होणार का?"
"मग देव कसा प्रसन्न होणार?"
"आपदा मनुष्यांच्या कर्मानुसार येतात,त्यांच निरसन करायला ईश्वर भक्ती केली पाहिजे न की हिंसक कृत्य."
स्वामी गावकरी आणी तांत्रिकाला पळवून देतात.
स्वामीचा क्रोध अनावर होतो.कुणीही जवळ जायला धजत नाही.
तेव्हा उपाय म्हणुन सदैव भजन करणारी वेडी सोनारीण व ढोलकीवर तिला साथ देणाऱ्या इसमाला बोलवण्यात येतं.
त्यांचं भजन ऐकुन स्वामींच्या रागाचं निरसन होतं, आणी त्यांची चर्या स्मित होते.

(४५) लबाडीचा परिणाम

गणपत आणी वंदना नावांच एक जोडपं होतं.त्यांचा उदर निर्वाह म्हशीच्या दुधाच्या विक्रया पासुन होत होता.
त्यांच्या कडे ३ म्हशी होत्या,सोना,चांदी आणी रुपा.
त्यात चांदी वांझ असल्यानी वंदनाच्या डोळ्यात खटकायची,.
एका रात्री चोर त्यांच्या तिन्ही म्हशी नेतात.
रस्त्यात थकवा आल्या मुळे ते म्हशींना एका ओसाड जागेत बांधून, विसाव्याला जातात.
इकडे गणपत स्वामींकडे  येऊन म्हशी चोरल्या गेल्या म्हणुन सांगतो.
जर म्हशी मिळाल्या तर त्यातली एक म्हस स्वामींना देऊ, असा नवस करतो.
स्वामी त्याला जमिनीत म्हशी कुठे आहे ते दाखवतात.
गणपत ताबडतोब जाऊन म्हशी घेऊन येतो,पण नवस फेडायला तो वांझ म्हशीला स्वामींना द्यायचं ठरवतो.
त्याला वाटत की असं केल्यानी एका दगडांनी दोन शिकार होतील-दुभत्या म्हशी आपल्याच कडे राहतील आणी
बायकोच्या डोळ्यात खटकणारी म्हस दिल्यानी, नवस पण फेडला जाईल.
गणपत स्वामींकडे जाऊन वांझ म्हस देउन येतो.
दुसऱ्या दिवशी गणपत आपल्या दुभत्या म्हशींचे दुध काढतो पण काय काहीही केल्या एक थेंब सुद्धा दुध निघत नाही.
त्याला कळतं की स्वामींशी केलेल्या लबाडीचा  हा परिणाम आहे, तो सपत्नीक स्वामींच्या शरणी येतो.
स्वामी पहिले त्याची हजेरी घेतात मग प्रबोधन करतात-
"अशास्वतावर अवलंबून राहु नको, शास्वत केवळ एक हरिनाम आहे,दत्त-नाम आहे.
आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो, ईश्वर काळजी वाहील.
पण आपल्या कर्तव्या कडे मात्र दुर्लक्ष्य करू नको."

Friday, January 7, 2011

(44) देव आणी विज्ञान

गोविंद नावाचा एक अभियंता कर्तव्यनिष्ठ आणी तेल-बुद्धीचा होता,पण तो देव-दैव काहीही मानत नव्हता.
त्यच्या प्रमाणे कर्तव्यच जगात सर्व काही होतं.
पण त्याची पत्नी आणी आई धार्मिक आणी स्वामीभक्त होते.
कितीही म्हटलं तरी गोविंद ईश्वर भक्ती करायला तैयार नसतो.
एकदा विहीर खणनासाठी भूमीपूजनाचा कार्यक्रम असतो.
अभियंता म्हणुन गोविन्दालाच पूजनाचा मानकरी ठरवलं जातं, पण गीविंद या सर्वाला पाखंड म्हणुन कुदाली घेऊन
पहिला वार जमिनीवर घालायला जातो.
पण काय कुदाल उचलल्या बरोबर गोविंद च्या छातीत अत्यंत वेदना होतात,कुदाल हातातून गळते.
वैद्यबुवा याला हृदय विकाराचा झटका सांगतात, आणी गोविंद जेम-तेम २-३ दिवसाचा सोबती आहे असं सांगतात.
गोविंद अंथरुणात खिळून राहतो.
तितक्यात भुजंग येऊन सांगतो की तो या गावी कीर्तन करायला आला होता, तेव्हाच स्वामींनी त्याला दृष्टांत देउन सांगितलं की-"
गोविंदाला घरी जाऊन निरोप दे की त्याचा रोग ललितास्तोत्र वाचल्यानी बरा होईल"
तरीही गीविंद विश्वास न करुन स्वामी वचन फेटाळून लावतो.

घरचे फार गया-वया करतात तेव्हा त्यांच्या खुशी साठी गोविंद मन नसतानाही ललिता स्तोत्र वाचतो.
२-३ दिवसा नंतर वैद्य बुवा निदान करुन सांगतात की गोविंद पूर्णत: रोगमुक्त झाला आहे.
गोविंद तर थक्क होतो, स्वामी वचनाची महत्ता त्याला कळते.
सर्व लोकं स्वामी दर्शनाला येतात.
गोविंद म्हणतो-" स्वामी माझा तुमच्यावर विश्वास नव्हता तरी तुम्ही मला रोग मुक्त कशे केले?"
स्वामी म्हणता:- "अरे! तुझा विश्वास नव्हता पण तुझ्या परिवाराचा तर होता ना !"
"अरे!, आम्हाला आमच्या भक्तासाठी तुला बरं करावं लागलं."
"अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे, अस माननं चुकीचं आहे."
" जिथे विज्ञानाचं प्रांत संपते तिथूनच देवाच प्रांत सुरु होतो."
"तुझा विज्ञान सुद्धा ईश्वरानीच  बनवला आहे."
"जशे तुम्ही शिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते तसच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरीय साक्षात्कार झालेल्या
लोकांना तुमच्या सारखे ईश्वराला न मानणारे पढत-मुर्खांची कीव येते."