गावात एकदा पटकीची साथ येते.त्या साठी गावातली लोकं स्वामींपाशी अपेक्षा घेऊन येतात.
पण स्वामी काहीही उपाययोजना सांगत नाही.
लोकं परततात. रस्त्यात त्यांना एक तांत्रिक भेटतो.त्यांनी एका दगडाला शेंदूर पोतलेल असतं.
तो त्या दगडाला म्हसोबा म्हणुन सांगतो.
त्याच्या मते म्हसोबा कोपल्या मुळेच गावात पटकीची ची साथ आलेली असते.
तो म्हसोबाची पूजा करुन एका कोंबड्याचा बळी द्यायला जातो.
तितक्यात स्वामी तिथे येऊन कोंबड्याला सोडवुन देतात .
मग गावकऱ्यांना रागावतात:- "अरे जगाला उत्पन्न करणाऱ्या ईश्वराला तुम्ही त्याचीच कृती चा जीव घेऊन प्रसन्न करणार?"
"दगडाला प्रसन्न करायला जिवंत जीवाचा बळी देणार?"
"अरे असा अंध विश्वास ठेऊ नका!"
"भोंदू बाबांच्या आहारी जाऊ नका."
"सर्व जीव ईश्वराचे लेकरू असतात, अरे लेकरूचा जीव घेऊन जगात कोणतीही माता प्रसन्न होणार का?"
"मग देव कसा प्रसन्न होणार?"
"आपदा मनुष्यांच्या कर्मानुसार येतात,त्यांच निरसन करायला ईश्वर भक्ती केली पाहिजे न की हिंसक कृत्य."
स्वामी गावकरी आणी तांत्रिकाला पळवून देतात.
स्वामीचा क्रोध अनावर होतो.कुणीही जवळ जायला धजत नाही.
तेव्हा उपाय म्हणुन सदैव भजन करणारी वेडी सोनारीण व ढोलकीवर तिला साथ देणाऱ्या इसमाला बोलवण्यात येतं.
त्यांचं भजन ऐकुन स्वामींच्या रागाचं निरसन होतं, आणी त्यांची चर्या स्मित होते.
No comments:
Post a Comment