गणपत आणी वंदना नावांच एक जोडपं होतं.त्यांचा उदर निर्वाह म्हशीच्या दुधाच्या विक्रया पासुन होत होता.
त्यांच्या कडे ३ म्हशी होत्या,सोना,चांदी आणी रुपा.
त्यात चांदी वांझ असल्यानी वंदनाच्या डोळ्यात खटकायची,.
एका रात्री चोर त्यांच्या तिन्ही म्हशी नेतात.
रस्त्यात थकवा आल्या मुळे ते म्हशींना एका ओसाड जागेत बांधून, विसाव्याला जातात.
इकडे गणपत स्वामींकडे येऊन म्हशी चोरल्या गेल्या म्हणुन सांगतो.
जर म्हशी मिळाल्या तर त्यातली एक म्हस स्वामींना देऊ, असा नवस करतो.
स्वामी त्याला जमिनीत म्हशी कुठे आहे ते दाखवतात.
गणपत ताबडतोब जाऊन म्हशी घेऊन येतो,पण नवस फेडायला तो वांझ म्हशीला स्वामींना द्यायचं ठरवतो.
त्याला वाटत की असं केल्यानी एका दगडांनी दोन शिकार होतील-दुभत्या म्हशी आपल्याच कडे राहतील आणी
बायकोच्या डोळ्यात खटकणारी म्हस दिल्यानी, नवस पण फेडला जाईल.
गणपत स्वामींकडे जाऊन वांझ म्हस देउन येतो.
दुसऱ्या दिवशी गणपत आपल्या दुभत्या म्हशींचे दुध काढतो पण काय काहीही केल्या एक थेंब सुद्धा दुध निघत नाही.
त्याला कळतं की स्वामींशी केलेल्या लबाडीचा हा परिणाम आहे, तो सपत्नीक स्वामींच्या शरणी येतो.
स्वामी पहिले त्याची हजेरी घेतात मग प्रबोधन करतात-
"अशास्वतावर अवलंबून राहु नको, शास्वत केवळ एक हरिनाम आहे,दत्त-नाम आहे.
आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो, ईश्वर काळजी वाहील.
पण आपल्या कर्तव्या कडे मात्र दुर्लक्ष्य करू नको."
No comments:
Post a Comment