Sunday, March 27, 2011

(५५) जुगाराच्या वाटेला जाऊ नका

प्रकाश नावाचा एक स्वामी भक्त होता. सावकाराचं डोक्यावर आलेलं कर्ज फेडण्यासाठी तो परत जुगार खेळायला लागतो.
नशीबाची  साथ असल्यानी  तो फार धन कमवतो, कर्ज फेडलं जातं आणी भक्कम संपत्ती पण मिळते.
तो स्वामींचं नाव घेऊन खेळायचा आणी त्याला यश मिळायचं.
त्याची बायको आणी बाळप्पा त्याला जुगारापासून परावृत्त करायचा प्रयत्न करतात पण प्रकाश काही ऐकत नाही.
त्याला वाटतं कि आपण स्वामी कृपेनी  जिंकत आहे, याचा अर्थ स्वामींचा  सुद्धा एका प्रकारे जुगारासाठी परवानगी आहे.
दिवस फिरतात आणी प्रकाश जुगारात सर्व हरून बसतो.
त्याचं आधीपासून असलेलं घर सुद्धा जातं.
प्रकाश वैतागतो. स्वामी पाठीशी असतंना आपणा का हरलो, ह्याचा त्याला राग येतो.
तो स्वामींना जाब विचारायला येतो.
येऊन तो स्वामींना वाटेल ते बोलतो.
स्वामी रागावुन म्हणतात:-" मुर्खा! आम्ही तुला जुगार खेळ असं म्हटलं होतं का?
"आपल्या मनासारख करायचं आणी अश्या कृत्याला आमची परवानगी आहे, असा वेडपट विचार येतो  तरी कसा तुमच्या  मनात?"
"अरे द्वापारीत कृष्णानी  आपल्या लाडक्या पांडवांची सुद्धा जुगारात मदत केली नव्हती."
"पण जेव्हा ते सत्या साठी लढायला गेले तेव्हा ठाम पणे तो त्यांच्या बरोबर उभा राहिला."
"अरे सत्य मार्गांनी पैसा कमवा, त्या रस्त्यात कष्ट आहे म्हणून गैर-मार्गावर  जाऊ नका."
"अरे जेव्हा नशीब साथ देतं तोपर्यंत तुम्ही जिंकता आणी जेव्हा साथ देत नाही तेव्हा धुळीत जाऊन मिळतात."
"आता मेहनत करुन स्वकष्टांनी  पुन्हा आपलं घर बांध."
"तुम्ही लोकांची राहायची व्यवस्था इथे करण्यात येईल."
प्रकाशला आपली चूक पटते, स्वामी चरणी मस्तक ठेऊन तो पुन्हा आपल्या नव-जीवनाची  सुरुवात करतो.

Friday, March 18, 2011

(५४) प्रपंच आणी परमार्थ


गोपाळरावांना परमार्थाचे वेध लागले होते. 'परमार्थ साधून  मोक्ष गाठायचा आणी सांसारिक बंधापासुन मुक्त व्हायचं',
हा त्यांचा हेतू होता.
त्या मुळे ते प्रपंचा कडे दुर्लक्ष्य करायचे.
सावकाराचं कर्ज डोक्यावर आलं, शेतात गुरं शिरले, पण गोपाळरावांना जणू त्यापासून काही कर्तव्यच नव्हतं.
मुलीच्या लग्नाकडे सुद्धा ते लक्ष्य घालत नव्हते.
इकडे स्वामी, चोळप्पाना त्याच गावात असलेल्या, आपल्या एका आजारी भक्तासाठी औषध द्यायला पाठवतात.
तिथे चोळप्पा, गोपाळरावांना आपले दागिने निमुटपणे सावकाराच्या माणसाला देताना पाहतात.
गोष्ट काढल्यावर गोपाळराव सांगतात- " संसारात मला काहीही रस नाही, मी सद्गुरूच्या शोधात आहे"
चोळप्पा, त्यांना स्वामीना भेटा, असा सल्ला देतात.
गोपाळ राव अक्कलकोटला येतात.
पण स्वामींना आपलं  खोट नाव माधव गोडबोले सांगतात.
शिवाय जगात आपलं कोणी नाही, अशी थाप सुद्धा देतात.
अंतर्यामी स्वामी काहीही म्हणत नाही आणी माधवला आपल्या सेवेत ठेवतात.
तिकडे कर्ज न चुकवल्या बद्दल सावकार त्यांच्या घरच्यांना घरा बाहेर काढतो.
स्वामी तिकडे संन्याश्याच्या रुपात जाऊन, त्यांना अक्कलकोटला स्वामीशरणी जा असं सांगतात.
सर्व जण अक्कलकोटला येतात. त्यांना स्वामी निर्देशानुसार गोपाळच्या बाजूची खोली देण्यात येते.
गोपाळ आपलं तोंड चोरून वावरत असतो.
तिथे गेल्या बरोबर गोपाळच्या आईला हृदय विकाराची बाधा होते.
स्वामी म्हणतात कि तिचा शेवट आला आहे.
आपली आई आता जाणार कळल्यावर गोपाळरावांच्या भावना उचंबळतात.
ते सर्व सोंग विसरून स्वामींची करुणा भाकतात..
स्वामी काहीही करुन माझ्या  आईला बर करा. मी  आपल्याशी खोटं बोललो, मी माधव नाही आणी आलेले लोकं माझ्याच
घरचे आहे.
स्वामी म्हणतात- "अरे परमार्थ लपून छापून, खोटं बोलून होत नाही."
"प्रपंच वाईट नसतो. मोह-मायेत अडकणं हे वाईट असतं."
"प्रपंचात राहुन पण परमार्थ साधता येतं."
"परमार्थ निरपेक्ष भावांनी करायचा असतो."
"एकदा प्रपंचात पडून दुर पळणं हा मोठा गुनाह आहे."
"प्रपंचापासुन पळू नका, नामस्मरण करून आपली आध्यात्मिक प्रगती करा."
"नामस्मरणात प्रचंड ताकत असते."
"एक नामस्मरण केले तर दुसरं  कर्मकांड सुद्धा करायची गरज नसते."
"अपेक्षेविना दुसऱ्यासाठी  केलेलं कार्य सुद्धा परमार्थच असतं, त्या साठी संसार सोडायची गरज नसते."
"वैराग्य मनात असायला हवं, नाहीतर घर-संसार सोडून वनात गेला तर तिथेही दुसरं घर तैयार होईल."
"तुझ्या आईला काहीही झालेलं नाही आहे, तुझ्या मनात परमार्थ आणी वैराग्या विषयी असलेला गैर समज दुर करायला,
ती आमची लीला होती."
"समाधानानी घरी जा, सावकारांनी दिलेले कर्ज फेडले गेले आहे, पण नामस्मरण मात्र विसरू नको."

Friday, March 11, 2011

(53) शारदेचं शुभ मंगल

शारदा नावाची एक रूपस आणी गुणवान तरुणी होती, पण तीचं लग्न काही ठरत नव्हतं.
गोष्ट ठरायची पण ऐनवेळी काही तरी होऊन लग्न मोडायचं.
तिच्या सर्व मैत्रिणींच लग्न होऊन फक्त शारदाच उरली होती.
ती स्वामी कडे आपल्या मैत्रिणी बरोबर जाते.
स्वामी तिचा मनोगत ओळखून तिला म्हणतात-"शारदे आज आम्ही तुझ्या घरी जेवायला येऊ."
स्वामी घरी येतात. शारदेची आई शारदेच्या लग्नात येणाऱ्या अडचणी बद्दल सांगतात.
हे ऐकुन स्वामींची चर्या गंभीर होऊन ते थोड्या रागीट स्वरात म्हणतात-
"काही लोकं झोपेचं सोंग घेऊन जगाला फसवतात पण तश्या लोकांना कम्भरेत लात घालून उठवलं जातं."
स्वामी तिथुन बिना भोजन करता परततात.
जातांना स्वामी सांगतात-"शारदेचं लग्न ठरल्यावरच आम्ही जेवायला येऊ."
काही दिवसांनी मुलंवाले शारदेला पहायला येतात. शारदा पसंद पण येते.
पण जातांना लग्न मोडून जातात.
शारदेला फार दु:ख होतं.
एकदा ती तिच्या आई,बाबा व भावाला बोलतांना ऐकते.
तिला धक्काच बसतो, कारण तिचे बाबा व भाऊच लग्न जमल्यावर शारदेच्या बद्दल अनर्गल बोलून लग्न मोडवत आले होते.
कारण त्यांचं राहत  घर शारदेच्या नावावर होतं आणी शारदेच्या लग्ना नंतर त्यांचा हक्क घरावरून जाणार होता.
शारदा सर्व वृतांत स्वामींना सांगते.
स्वामी तिला आश्वस्त करतात, जा जे-जे होतं ते पहा, शेवटी सर्व तुझ्या मनासारखच होईल.
पुन्हा शारदेला पहायला एक मुलगा येतो, मुलगा-मुलगी एकमेकाला पसंद पण करतात.
सर्व घरचेपण तयारच असतात.
पण मुलंवाले अफाट हुंडा मागतात.
शारदेचे घरचे आपली असमर्थता व्यक्त करतात आणी लग्न पुन्हा मोडतं.
स्वामी मुलवाल्यांकडे  जातात. मुलाकडून दगड मागवून यथासांग पूजा करवतात आणी त्यांना त्याच्यावर दागिने चढवायला सांगतात.
त्या लोकांना काहीपण उमजत नाही.
स्वामी म्हणतात-:"अरे तुम्हाला वाटतं ना कि दगडाला दागिन्यांची काय गरज, मग तुम्ही धना साठी एवढे का हापापले आहा?"
"अरे मेल्यावर माणूस सुद्धा दगडा सारखाच होतो."
मुलंवाल्यांना आपली चूक कळते. मुलगा हुंडयाशिवाय लग्न करायला तैयार होतो.
इकडे शारदा येऊन स्वामींना सांगते:- "स्वामी मी लग्न करणार नाही. मला पैतृक संपतीचा मोह नाही.
पण घरच्यांच्या समाधानासाठी मी कधीच लग्न करणार नाही.
तिच्या घरचे मागोमाग येतात.
स्वामी त्यांची चांगलीच हजेरी घेतात.
मग म्हणतात-"अरे कशे आई-वडील आहा तुम्ही ! आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलीच्या सुखाचा बळी घेतात !"
"आणी शारदेला पहा, तुमच्या स्वार्थासाठी आपल्या सुखाचा सुद्धा ती त्याग करायला तैय्यार आहे."
शारदेच्या घरच्यांना आपली चूक कळते.ते शारदेची माफी मागतात.
आपले वडिलधारी आपली माफी मागतात म्हणुन शारदेला कसंतरीच वाटतं आणी ती त्याना थांबवते..
स्वामी कृपेनी या वेळी शारदेचं लग्न पूर्णपणे ठरतं.
लग्न ठरल्यावर स्वामी शारदे कडे येऊन भोजन ग्रहण करतात.

Friday, March 4, 2011

(५२) भक्तीत अटी नसाव्या

(५२) भक्तीत अटी नसाव्या
लता नावाची एका तरुणीची आई तिच्या लहानपणीच वारली होती. तिचे बाबा स्वामींचे अनन्य भक्त होते.
पण लताची स्वामींवर श्रद्धा नव्हती. तिच्या मते बाबा स्वामींचे अनन्य भक्त असतांना सुद्धा त्यांना पत्नी वियोग का झाला असावा?
उपवर झाल्यावर लताचं लग्न होऊन ती सासरी जाते.
तिथे गेल्यावर लगेच काही दिवसांनी तिचे बाबा आजारी पडल्यामुळे तिला माहेरी यावं लागतं.
वैद्य बुवा क्षय आणी कावीळ झाली आहे असं निदान करतात. कोणतेही
औषध लागू न झाल्या मुळे ती स्वामींची करुणा भाकते-
"स्वामी माझ्या बाबांना बरं केलं तर मी आजन्म तुमची भक्ती करीन."
बाळप्पाचं लताच्या माहेरी येणं होतं. ते तिच्या बाबांचे जुने स्नेही होते.
त्यांच्या सांगण्या मुळे लता स्वामींकडे जाते.
स्वामी पहिले तिची हाजिरी घेतात-
"छान! देवा समोर अटी ठेंवा. माझ्या मना सारख झालं तर मी भक्ती करीन."
"अरे भक्तीत अटी नको. ज्याची भक्ती करतो त्यांनी जसं ठेवले तसं राह्यची तैयारी असावी."
लता आपली चूक मान्य करते.
स्वामी तिला एक मोर-पीस देतात, लता त्या पिसाला बाबांच्या उशी खाली ठेवते.
लताचे बाबा मनोमन स्वामींची प्रार्थना करतात कि स्वामींनी आपल्या मुलीचं पितृत्व स्वीकारावं.
इकडे स्वामी ती प्रार्थना मान्य करतात.
काही दिवसांनी तिचे बाबा हळू हळू बरे होतात.
बाबा खडखडीत बरे झाल्यावर लता  सासरी परतते.
काही दिवसांनी बाबा तिच्या सासरी येतात व तिला व जावई बापूंना  परवा असलेल्या तिच्या आईच्या श्राद्धा साठी
 आमंत्रीत करतात.
नियत तिथीला लता माहेरी येते तर तिला कळतं कि तिचे बाबा चार दिवसा आधीच निधन पावले होते.
तिला धक्काच बसतो कारण दोन  दिवसा आधीच तर ते तिच्या घरी आलेले होते.
ती स्वामींकडे येऊन सर्व वृतांत सांगते.
स्वामी म्हणतात-: " लता ! खरं तर तुह्या बाबांच आयुष्य तेव्हाच संपल होतं. आम्ही ते तुझ्या साठी काही वेळ लांबवलं होतं."
"प्रारब्ध आणी सृष्टी नियमात आम्ही बदल करत नाही. प्रारब्ध देवाधीकानाही चुकलेलं नाही".
"सद्गुरुचं कार्य भक्तांना मार्गदर्शन करायचं असतं, ज्या मुळे ते कर्माच्या बंधना पासुन मुक्त होऊन मोक्षाच्या वाटेवर चालू लागतात."
"तुझ्या वडिलांनी तुझं पितृत्व आमच्या वर सोपवलं होतं. आम्हीच तुझ्या घरी तुझ्या बाबांच्या रुपात आलो होतो."
"आणी आम्ही तुझं जीवनभर पिता सारखचं रक्षण करू."
लता अनन्य भावांनी स्वामी चरणी लीन होते.