Sunday, March 27, 2011

(५५) जुगाराच्या वाटेला जाऊ नका

प्रकाश नावाचा एक स्वामी भक्त होता. सावकाराचं डोक्यावर आलेलं कर्ज फेडण्यासाठी तो परत जुगार खेळायला लागतो.
नशीबाची  साथ असल्यानी  तो फार धन कमवतो, कर्ज फेडलं जातं आणी भक्कम संपत्ती पण मिळते.
तो स्वामींचं नाव घेऊन खेळायचा आणी त्याला यश मिळायचं.
त्याची बायको आणी बाळप्पा त्याला जुगारापासून परावृत्त करायचा प्रयत्न करतात पण प्रकाश काही ऐकत नाही.
त्याला वाटतं कि आपण स्वामी कृपेनी  जिंकत आहे, याचा अर्थ स्वामींचा  सुद्धा एका प्रकारे जुगारासाठी परवानगी आहे.
दिवस फिरतात आणी प्रकाश जुगारात सर्व हरून बसतो.
त्याचं आधीपासून असलेलं घर सुद्धा जातं.
प्रकाश वैतागतो. स्वामी पाठीशी असतंना आपणा का हरलो, ह्याचा त्याला राग येतो.
तो स्वामींना जाब विचारायला येतो.
येऊन तो स्वामींना वाटेल ते बोलतो.
स्वामी रागावुन म्हणतात:-" मुर्खा! आम्ही तुला जुगार खेळ असं म्हटलं होतं का?
"आपल्या मनासारख करायचं आणी अश्या कृत्याला आमची परवानगी आहे, असा वेडपट विचार येतो  तरी कसा तुमच्या  मनात?"
"अरे द्वापारीत कृष्णानी  आपल्या लाडक्या पांडवांची सुद्धा जुगारात मदत केली नव्हती."
"पण जेव्हा ते सत्या साठी लढायला गेले तेव्हा ठाम पणे तो त्यांच्या बरोबर उभा राहिला."
"अरे सत्य मार्गांनी पैसा कमवा, त्या रस्त्यात कष्ट आहे म्हणून गैर-मार्गावर  जाऊ नका."
"अरे जेव्हा नशीब साथ देतं तोपर्यंत तुम्ही जिंकता आणी जेव्हा साथ देत नाही तेव्हा धुळीत जाऊन मिळतात."
"आता मेहनत करुन स्वकष्टांनी  पुन्हा आपलं घर बांध."
"तुम्ही लोकांची राहायची व्यवस्था इथे करण्यात येईल."
प्रकाशला आपली चूक पटते, स्वामी चरणी मस्तक ठेऊन तो पुन्हा आपल्या नव-जीवनाची  सुरुवात करतो.

No comments:

Post a Comment