शारदा नावाची एक रूपस आणी गुणवान तरुणी होती, पण तीचं लग्न काही ठरत नव्हतं.
गोष्ट ठरायची पण ऐनवेळी काही तरी होऊन लग्न मोडायचं.
तिच्या सर्व मैत्रिणींच लग्न होऊन फक्त शारदाच उरली होती.
ती स्वामी कडे आपल्या मैत्रिणी बरोबर जाते.
स्वामी तिचा मनोगत ओळखून तिला म्हणतात-"शारदे आज आम्ही तुझ्या घरी जेवायला येऊ."
स्वामी घरी येतात. शारदेची आई शारदेच्या लग्नात येणाऱ्या अडचणी बद्दल सांगतात.
हे ऐकुन स्वामींची चर्या गंभीर होऊन ते थोड्या रागीट स्वरात म्हणतात-
"काही लोकं झोपेचं सोंग घेऊन जगाला फसवतात पण तश्या लोकांना कम्भरेत लात घालून उठवलं जातं."
स्वामी तिथुन बिना भोजन करता परततात.
जातांना स्वामी सांगतात-"शारदेचं लग्न ठरल्यावरच आम्ही जेवायला येऊ."
काही दिवसांनी मुलंवाले शारदेला पहायला येतात. शारदा पसंद पण येते.
पण जातांना लग्न मोडून जातात.
शारदेला फार दु:ख होतं.
एकदा ती तिच्या आई,बाबा व भावाला बोलतांना ऐकते.
तिला धक्काच बसतो, कारण तिचे बाबा व भाऊच लग्न जमल्यावर शारदेच्या बद्दल अनर्गल बोलून लग्न मोडवत आले होते.
कारण त्यांचं राहत घर शारदेच्या नावावर होतं आणी शारदेच्या लग्ना नंतर त्यांचा हक्क घरावरून जाणार होता.
शारदा सर्व वृतांत स्वामींना सांगते.
स्वामी तिला आश्वस्त करतात, जा जे-जे होतं ते पहा, शेवटी सर्व तुझ्या मनासारखच होईल.
पुन्हा शारदेला पहायला एक मुलगा येतो, मुलगा-मुलगी एकमेकाला पसंद पण करतात.
सर्व घरचेपण तयारच असतात.
पण मुलंवाले अफाट हुंडा मागतात.
शारदेचे घरचे आपली असमर्थता व्यक्त करतात आणी लग्न पुन्हा मोडतं.
स्वामी मुलवाल्यांकडे जातात. मुलाकडून दगड मागवून यथासांग पूजा करवतात आणी त्यांना त्याच्यावर दागिने चढवायला सांगतात.
त्या लोकांना काहीपण उमजत नाही.
स्वामी म्हणतात-:"अरे तुम्हाला वाटतं ना कि दगडाला दागिन्यांची काय गरज, मग तुम्ही धना साठी एवढे का हापापले आहा?"
"अरे मेल्यावर माणूस सुद्धा दगडा सारखाच होतो."
मुलंवाल्यांना आपली चूक कळते. मुलगा हुंडयाशिवाय लग्न करायला तैयार होतो.
इकडे शारदा येऊन स्वामींना सांगते:- "स्वामी मी लग्न करणार नाही. मला पैतृक संपतीचा मोह नाही.
पण घरच्यांच्या समाधानासाठी मी कधीच लग्न करणार नाही.
तिच्या घरचे मागोमाग येतात.
स्वामी त्यांची चांगलीच हजेरी घेतात.
मग म्हणतात-"अरे कशे आई-वडील आहा तुम्ही ! आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलीच्या सुखाचा बळी घेतात !"
"आणी शारदेला पहा, तुमच्या स्वार्थासाठी आपल्या सुखाचा सुद्धा ती त्याग करायला तैय्यार आहे."
शारदेच्या घरच्यांना आपली चूक कळते.ते शारदेची माफी मागतात.
आपले वडिलधारी आपली माफी मागतात म्हणुन शारदेला कसंतरीच वाटतं आणी ती त्याना थांबवते..
स्वामी कृपेनी या वेळी शारदेचं लग्न पूर्णपणे ठरतं.
लग्न ठरल्यावर स्वामी शारदे कडे येऊन भोजन ग्रहण करतात.

No comments:
Post a Comment