Friday, March 18, 2011

(५४) प्रपंच आणी परमार्थ


गोपाळरावांना परमार्थाचे वेध लागले होते. 'परमार्थ साधून  मोक्ष गाठायचा आणी सांसारिक बंधापासुन मुक्त व्हायचं',
हा त्यांचा हेतू होता.
त्या मुळे ते प्रपंचा कडे दुर्लक्ष्य करायचे.
सावकाराचं कर्ज डोक्यावर आलं, शेतात गुरं शिरले, पण गोपाळरावांना जणू त्यापासून काही कर्तव्यच नव्हतं.
मुलीच्या लग्नाकडे सुद्धा ते लक्ष्य घालत नव्हते.
इकडे स्वामी, चोळप्पाना त्याच गावात असलेल्या, आपल्या एका आजारी भक्तासाठी औषध द्यायला पाठवतात.
तिथे चोळप्पा, गोपाळरावांना आपले दागिने निमुटपणे सावकाराच्या माणसाला देताना पाहतात.
गोष्ट काढल्यावर गोपाळराव सांगतात- " संसारात मला काहीही रस नाही, मी सद्गुरूच्या शोधात आहे"
चोळप्पा, त्यांना स्वामीना भेटा, असा सल्ला देतात.
गोपाळ राव अक्कलकोटला येतात.
पण स्वामींना आपलं  खोट नाव माधव गोडबोले सांगतात.
शिवाय जगात आपलं कोणी नाही, अशी थाप सुद्धा देतात.
अंतर्यामी स्वामी काहीही म्हणत नाही आणी माधवला आपल्या सेवेत ठेवतात.
तिकडे कर्ज न चुकवल्या बद्दल सावकार त्यांच्या घरच्यांना घरा बाहेर काढतो.
स्वामी तिकडे संन्याश्याच्या रुपात जाऊन, त्यांना अक्कलकोटला स्वामीशरणी जा असं सांगतात.
सर्व जण अक्कलकोटला येतात. त्यांना स्वामी निर्देशानुसार गोपाळच्या बाजूची खोली देण्यात येते.
गोपाळ आपलं तोंड चोरून वावरत असतो.
तिथे गेल्या बरोबर गोपाळच्या आईला हृदय विकाराची बाधा होते.
स्वामी म्हणतात कि तिचा शेवट आला आहे.
आपली आई आता जाणार कळल्यावर गोपाळरावांच्या भावना उचंबळतात.
ते सर्व सोंग विसरून स्वामींची करुणा भाकतात..
स्वामी काहीही करुन माझ्या  आईला बर करा. मी  आपल्याशी खोटं बोललो, मी माधव नाही आणी आलेले लोकं माझ्याच
घरचे आहे.
स्वामी म्हणतात- "अरे परमार्थ लपून छापून, खोटं बोलून होत नाही."
"प्रपंच वाईट नसतो. मोह-मायेत अडकणं हे वाईट असतं."
"प्रपंचात राहुन पण परमार्थ साधता येतं."
"परमार्थ निरपेक्ष भावांनी करायचा असतो."
"एकदा प्रपंचात पडून दुर पळणं हा मोठा गुनाह आहे."
"प्रपंचापासुन पळू नका, नामस्मरण करून आपली आध्यात्मिक प्रगती करा."
"नामस्मरणात प्रचंड ताकत असते."
"एक नामस्मरण केले तर दुसरं  कर्मकांड सुद्धा करायची गरज नसते."
"अपेक्षेविना दुसऱ्यासाठी  केलेलं कार्य सुद्धा परमार्थच असतं, त्या साठी संसार सोडायची गरज नसते."
"वैराग्य मनात असायला हवं, नाहीतर घर-संसार सोडून वनात गेला तर तिथेही दुसरं घर तैयार होईल."
"तुझ्या आईला काहीही झालेलं नाही आहे, तुझ्या मनात परमार्थ आणी वैराग्या विषयी असलेला गैर समज दुर करायला,
ती आमची लीला होती."
"समाधानानी घरी जा, सावकारांनी दिलेले कर्ज फेडले गेले आहे, पण नामस्मरण मात्र विसरू नको."

No comments:

Post a Comment