(५२) भक्तीत अटी नसाव्या
लता नावाची एका तरुणीची आई तिच्या लहानपणीच वारली होती. तिचे बाबा स्वामींचे अनन्य भक्त होते.
पण लताची स्वामींवर श्रद्धा नव्हती. तिच्या मते बाबा स्वामींचे अनन्य भक्त असतांना सुद्धा त्यांना पत्नी वियोग का झाला असावा?
उपवर झाल्यावर लताचं लग्न होऊन ती सासरी जाते.
तिथे गेल्यावर लगेच काही दिवसांनी तिचे बाबा आजारी पडल्यामुळे तिला माहेरी यावं लागतं.
वैद्य बुवा क्षय आणी कावीळ झाली आहे असं निदान करतात. कोणतेही
औषध लागू न झाल्या मुळे ती स्वामींची करुणा भाकते-
"स्वामी माझ्या बाबांना बरं केलं तर मी आजन्म तुमची भक्ती करीन."
बाळप्पाचं लताच्या माहेरी येणं होतं. ते तिच्या बाबांचे जुने स्नेही होते.
त्यांच्या सांगण्या मुळे लता स्वामींकडे जाते.
स्वामी पहिले तिची हाजिरी घेतात-
"छान! देवा समोर अटी ठेंवा. माझ्या मना सारख झालं तर मी भक्ती करीन."
"अरे भक्तीत अटी नको. ज्याची भक्ती करतो त्यांनी जसं ठेवले तसं राह्यची तैयारी असावी."
लता आपली चूक मान्य करते.
स्वामी तिला एक मोर-पीस देतात, लता त्या पिसाला बाबांच्या उशी खाली ठेवते.
लताचे बाबा मनोमन स्वामींची प्रार्थना करतात कि स्वामींनी आपल्या मुलीचं पितृत्व स्वीकारावं.
इकडे स्वामी ती प्रार्थना मान्य करतात.
काही दिवसांनी तिचे बाबा हळू हळू बरे होतात.
बाबा खडखडीत बरे झाल्यावर लता सासरी परतते.
काही दिवसांनी बाबा तिच्या सासरी येतात व तिला व जावई बापूंना परवा असलेल्या तिच्या आईच्या श्राद्धा साठी
आमंत्रीत करतात.
नियत तिथीला लता माहेरी येते तर तिला कळतं कि तिचे बाबा चार दिवसा आधीच निधन पावले होते.
तिला धक्काच बसतो कारण दोन दिवसा आधीच तर ते तिच्या घरी आलेले होते.
ती स्वामींकडे येऊन सर्व वृतांत सांगते.
स्वामी म्हणतात-: " लता ! खरं तर तुह्या बाबांच आयुष्य तेव्हाच संपल होतं. आम्ही ते तुझ्या साठी काही वेळ लांबवलं होतं."
"प्रारब्ध आणी सृष्टी नियमात आम्ही बदल करत नाही. प्रारब्ध देवाधीकानाही चुकलेलं नाही".
"सद्गुरुचं कार्य भक्तांना मार्गदर्शन करायचं असतं, ज्या मुळे ते कर्माच्या बंधना पासुन मुक्त होऊन मोक्षाच्या वाटेवर चालू लागतात."
"तुझ्या वडिलांनी तुझं पितृत्व आमच्या वर सोपवलं होतं. आम्हीच तुझ्या घरी तुझ्या बाबांच्या रुपात आलो होतो."
"आणी आम्ही तुझं जीवनभर पिता सारखचं रक्षण करू."
लता अनन्य भावांनी स्वामी चरणी लीन होते.

No comments:
Post a Comment