Friday, April 29, 2011

(६०) सर्वश्रेष्ठ भक्त कौन?

स्वामींच्या श्रेष्ठ भक्ताला पुढच्या एका महिन्या पर्यंत नेवैद्य अर्पण करण्याचा मान मिळणार होता. त्या साठी तीन
व्यक्ती दावेदार म्हणुन होते.
पहिला गावाचा सावकार गणेश, तो गडगंज संपत्तीचा मालक होता, दुसरा गावाचा नावाजलेला हलवाई सदाशिव आणी तीसरा गरीब
पण मनानी श्रीमंत असलेला भास्कर.
तिघेह स्वामींकडे येऊन आपल्यायला हा मान मिळावा, अशी विनंती करतात.
स्वामी अट ठेवतात, तुम्ही काही कृती करा, ज्याची कृती सर्वश्रेष्ठ राहिलं त्याला हा मान मिळणार.
त्या साठी ७ दिवसाची मुदत देण्यात येते.
गणेश सावकार स्वामींची  अप्रतिम प्रकारची मूर्ती घडवायचं काम लावतो,
सदाशिव सुखे मेवे घालुन उत्तम पैकी मिठाई बनवायला लागतो.
एक दिवशी गणेश आणी सदाशिव रस्त्यात भेटतात, एका-मेकांना घालुन-पाडून बोलतात,एका-मेकाची टवाळी करतात.
दोघानाही समोरचा व्यक्ती काय कृती करणार आहे, ते ठाऊक असतं.
काही वेळ आपसात झुन्जल्यावर गणेश सदाशिव ला म्हणतो:- " अरे आपण आपसातच भांडत आहे पण तो भास्कर काय करतो
त्या वर आपलं काहीच लक्ष्य नाही."
सदाशिव ला हे पटतं.
मग काय, दोघेही लपून भास्कराचा पाठलाग करतात. पाहतात तर, भास्कर एका घरात जातो काही वेळ बसतो आणी मग परत
घरी येऊन आपल्या दिनचर्येला लागतो.
ते त्या घराच्या मालकाला विचारतात- "काहो! आमचा मित्र भास्कर इथे येतो पण करतो तरी काय?"
घरधनी म्हणतो:-" काही नाही आमच्या बरोबर बसतात, चार गोष्ठी होतात, आम्ही काही खायला देतो ते खाऊन जातात"
सदाशिव आणी गणेश आश्वस्त होऊन परततात.
मुदत संपल्यावर सर्व लोकं स्वामींकडे जातात.
स्वामी पहिले गणेश कडे त्याची कृती बघायला जातात.
स्वामींची अप्रतिम मूर्ती चंदनाच्या देवघरात ठेवलेली होती. स्वामी वरच्यावर कौतुक करुन परततात.
मग सदाशिव त्यांना आपल्या कौशल्यानी तैयार केलेली उत्तम दर्ज्याची मिठाई अर्पण करतो.
स्वामी मिठाई चाखून बघतात,आणी छान आहे, असं सांगतात.
मग भास्कर ला विचारत:-" काय रे भास्कर! तु काय केली......., कृती?"
भास्कर  म्हणतो:- " स्वामी मी काय विशेष करणार हो! मी फक्त तुमच्या बद्दल माहिती नसलेल्या लोकांकडे गेलो,
त्यांना तुमच्या लीला आणी सामर्था बद्दल सांगितलं."
"तुम्ही जी शिकवण करतात, त्याची त्यांना समझ दिली, त्यांना नामस्मरणाचं महत्व समझावून, त्यांना नाम स्मरणाच्या मार्गावर
आणलं."
"तुमची शिकवण प्रसार पावो, या साठी थोडेशे प्रयत्न केले."
स्वामींची चर्या प्रसन्न होते.
स्वामी म्हणतात:-"शाब्बास भास्करा ! आम्हाला जे पाहिजे  होते, तेचं तु केले."
"तुलाच आम्हाला नेवैद्य अर्पण करायचा मान मिळणार."
गणेश आणी सदाशिवला फार  आश्चर्य वाटतं  म्हणुन स्वामी समझावतात:-
" अरे संतांना देव का पाठवतो ? अज्ञ लोकांना सदमार्गाचा रस्ता दाखवायला, त्यांचं मार्गदर्शन करायला."
"संसार करताना ईश्वराचं विस्मरण न व्हावं, ही आठवण करुन द्यायला."
"आणी संतांना जर कोणी त्यांच्या कार्यात सहाय्य केले तर त्यापेक्षा त्यांना दुसरं काय आवडणार?"
"भास्कर नी आमच्या कार्याला जो हाथभार लावला. अज्ञ लोकांना सद्मार्ग दाखवला,
आमची शिकवण ज्या लोकांपर्यंत पोहचत नाही त्यांच्यापर्यंत
पोहचवली."
"अरे आम्हाला आणखी दुसंर काय आवडणार?"
"अरे मूर्ती-मंदीरं कश्यासाठी बनवतात? लोकांना विसर पडलेल्या ईश्वराच स्मरण व्हावं म्हणुन."
" ईश्वराला किंवा गुरूला त्या मूर्तीचा काय लोभ?"
"संत मिष्ठान्न ग्रहण करता ते भक्तांच्या समाधानासाठी, त्यांनी षढ-रसांच्या तृष्णेवर कधीच विजय मिळवलेला असतो."
"आम्हाला जे अपेक्षित होतं, ते भास्कारानी केलं, म्हणुन भास्कराची कृती सर्वश्रेष्ठ ठरली."

Saturday, April 23, 2011

(५९) लख्याचा कायापालट

लख्या नावाच्या एका धूर्त चोरा मुळे पूर्ण गाव, हैराण झालं होतं. कुठे ही दडवलेली किमती वस्तू तो बरोबर
हुडकून काढायचा आणी लंपास व्हायचा.
कितीही ताळे असले तरी लख्या पुढे त्यांचा काहीही निभाव लागत नव्हता.
गावाच्या फौजदाराला सुद्धा त्याला अटक करण्यात यश येत नव्हता.
शेवटी गावकरी स्वामींकडे लख्याचा बंदोबस्त करा, असं घाराणं घालतात.
स्वामी म्हणतात:- "आम्ही पाहु काय करायचं ते!"
स्वामी चोळप्पाला म्हणतात:-"जा त्या विक्रम ला निरोप देउन ये कि पुढच्या आठवड्यात आम्ही त्याच्या कडे जेवायला येऊ."
चोळप्पा विक्रम कडे येतात, त्यांना  धक्काच बसतो कि विक्रम च्या घरी कुठेही कडी-कोयंडा नसतो.
जिथे पूर्ण गाव रात्री सुद्धा लख्याच्या भितीनी डोळ्यात तेल घालुन जागा  राह्यचा  तिथे विक्रम असा गाफील कसा राहु शकतो?
विक्रम त्यांना म्हणतो:- " माझ्या घरचं रक्षण स्वामी करतात.मी कशाला चिंता करू."
"जरी लख्या आला तरी स्वामी पाहून घेतील त्याला."
योगायोगानी लख्या गवाक्षाबाहेरून चोरून हा संवाद ऐकतो.
स्वता वर अति-विश्वास असलेला लख्या संतापतो:- "आहे कोण हा स्वामी?"
"ज्याच्या भरोश्यावर हा माणूस घराला कड्या कोयंडे लावत नाही!"
"आज तर याच्याच घरी मी चोरी करणार."
रात्री लख्या विक्रम कडे चोरी करायला येतो,तो काही काही करणार तेवढ्यात तो थबकतो.
तो पाहतो तर समोर खुद्द फौजदार उभा असतो, हातात  रूळ घेऊन.
लख्या जीवाचं रान करुन तिथुन धूम ठोकतो, पण जिद्द सोडत नाही.
काही दिवसांनी लख्या पुन्हा प्रयत्न करतो, या वेळी त्याचा छप्परावरून पाय घसरतो आणी तो खाली कोसळतो
आणी खाली पडतो तर समोर पुन्हा फौजदार हजर.
लख्या  कसा-बसा लंगडत तिथुन धूम ठोकतो.
पुन्हा बरा झाल्यावर प्रयत्न करू असा  निश्चय करतो.
पण काय या वेळेला लख्या बराच होत नाही, कितीही दिवस झाले तरी दुखापत  तशीच्या तशी.
शेवटी वैतागून तो विक्रम च्या शरणी जाऊन सर्व वृतांत सांगतो.
विक्रम म्हणतो:- " अरे खुद्द स्वामी रक्षण कर्ते असतांना कोणी कसा काही चोरी किंवा दरोडा घालू शकतो?"
"तुझी दुखापत स्वामीच बरी करू शकणार."
विक्रम लख्याला स्वामी दर्शनाला आणतो.
स्वामी म्हणतात:-" काय लख्या कितीही प्रयत्न करुन शेवटी यश आले नाही उलट  दुखापतच झाली ना?"
लख्या आपली मान खाली घालतो.
स्वामी म्हणतात:-"आम्हला ओळखतो का?"
लख्याला स्वामींच्या जागेवर फौजदार दिसतात खाकी पोशाख, हातात रूळ.
स्वामी म्हणतात:- "त्या दिवशी यालाच पहिले होते ना?"
लख्याला कळतं कि दोन्ही वेळेला स्वामीनीच आपला बेत फसवला होता.
स्वामी म्हणतात:-:"अरे लख्या, तु पण मागच्या जन्मात आमचाच  भक्त होता, अगदी  देवभोळा, सचोटीनी वागणारा!"
"पण तुझ्या हातून पापं घडल्यानी तु या जन्मात असा चोर झाला."
"अरे एकदा पापं घडले कि ते अशी परिस्थिती निर्माण करतं कि आणखीन पापं होत राहतात."
समर्थांनी सुद्धा म्हटलं आहे-
"पापा करत दरिद्र प्राप्त, दरिद्रे होय पाप संचय
ऐसेचि होत जाये पुन्हा पुन्हा"
एकदा पापं झालं कि समझा पुढे होणाऱ्या पापांची बीजे रोपली गेली आहे.
लख्या म्हणतो:-" पण आता तर फार उशीर झाला आहे, गावकरी मला तुरुंगात धाडल्या शिवाय सोडणार नाही."
स्वामी म्हणतात:-"अजूनही काही उशीर झालं नाही आहे ,ज्याचं जे चोरलं आहे त्याला ते परत कर."
आपल्या हुशारी, आणी समर्थाचा उपयोग लोकांची मदत करायला करत जा."
"जे पूर्वी पापं झाले आहे त्याच्या निरसनासाठी नामस्मरण कर."
"तुला अटक होणार नाही."
"आम्ही भक्तांना सदेव सावध राह्यचा उपदेश करतो पण तुझ्या उद्धारासाठी आम्ही विक्रमला सावध केले नाही."
लख्या पुढचं आयुष्य सत्कार्यात लावायची हमी देउन स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

Friday, April 15, 2011

(५८) अपत्य सुखाची आस

लग्नाचे ५ वर्ष झाले तरी गीताला अपत्य सुख प्राप्त झाले नव्हते.त्यामुळे तिची सासू आणी नवरा मदन तिचा छळ करायचे.
एकदिवस सासूबाई मदन च दुसरं लग्न करायला निघतात.
गीता विचार करते कि जर सवत आली तर ती आपल्याला घरा बाहेर काढेल.
त्यापेक्षा जर आपलीच धाकटी बहिणीशी जर आपल्या नवऱ्याचं लग्न झालं तर आपल्याला घरा बाहेर जायची वेळ नाही येणार.
ती स्वामींचे दर्शन घेऊन आपला बेत सांगते.
स्वामी म्हणतात:" गीता, हा विचार मनातातून काढून यामुळे  काहीही फायदा होणार नाही."
पण घरा बाहेर काढल्या जायच्या भितीनी गीता स्वामीवचना कडे दुर्लक्ष्य करते.
मग काय, तिची धाकटी बहिण संगीता आणी मदन विवाहबद्ध होतात.
काही वर्ष होतात तरी संगीतालाही अपत्य होत नाही .
या कारणे मदन आणी त्याची आई दोघांनाही घरा बाहेर काढायला पाहतात.
तितक्यात स्वामी तिकडे येतात.
स्वामी रागावतात:-"अरे ही पद्धत आहे का, आपल्या विवाहित स्त्रियांशी वागायची.अरे जिला लक्ष्मी म्हणून आणतात तिला काय
असं घरा बाहेर काढतात?"
"आणी अपत्य नाही झालं, यात स्त्रीचाच दोष आहे, हे कश्यावरून?"
"दोष पुरुषाचा सुद्धा असू शकतो."
"तुम्हा तिघां मध्ये दोष कुणाचा आहे, हे जर माहित करायचं असेल तर या आमच्या बरोबर."
स्वामींच्या आश्रमात तीन एकासारखे रोपटे दाखवण्यात येतात.
स्वामी म्हणतात:- "तुम्ही तिघानी एका-एका रोपट्याला पाणी घालायचं ज्याच्या  पाणी घातल्यानी रोपट्यात 
वाढ होईल त्याच्यात दोष नाही."
गीता आणी संगीता दोघेही एका-एका रोपट्याला पाणी घालतात, आणी लगेचच त्यांनी पाणी घातलेल्या रोपट्यात वाढ होते.
पण मदननी पाणी घातलेल्या रोपट्याची वाढ होत नाही.
स्वामी म्हणतात:- " मदन आता कळलं कि दोष कुणात आहे?"
"अरे दोष स्त्री आणी पुरुष कुणातही असू शकतो पण जवाबदार मात्र स्त्रीलाच ठरवलं जातं."
मदन वैतागून तिथुन निघतो.
त्याची आई त्याचं सात्वन करते, पण मदन काही ऐकायला तयार नसतो.
त्याचा  आईशी झाल्या संवादात मदनाचं गुपित गावातल्या टवाळ मंडळीच्या कानी पडतं.
मग काय टवाळ  मंडळी मदनची चेष्टा सुरु करते.
मदन चिडून हात उगारतो, मग काय टवाळ मंडळी त्याला बेदम मारते.
आपला असा अपमान झाल्या मुळे मदन चिमणीतलं राकेल अंगावर ओतून आत्म-घात करायचा प्रयत्न करतो.
त्याच्या बायका व आई त्याला अडवतात.
आई म्हणते:" रे बाबा  तुच  जर गेला तर आम्ही तिघींनी कुणाच्या आसऱ्यावर  जगायचं."
मदत थोडा  सावरतो.
शेवटी स्वामींच्या शरणी जाऊन मार्गदर्शन घ्यावं असं ते ठरवतात.
स्वामी म्हणतात: "अरे प्रारब्द्ध प्रतिकूल असल्यानी जर  काही उणीव मानवाच्या पदरी पडली तर त्यातून बाहेर कसं निघावे,
 हा विचार करायला हवा."
"अरे जसं तुम्ही अपत्यसुखानी  वंचित आहा तसं कोणी अपत्य सुद्धा मातृ-पितृ सुखानी वंचीत असेल,
त्याला दत्तक घ्या."
"तुम्हा सर्वांच्या समस्येवर हाच तोडगा आहे."
"त्यामुळे त्या पालकविहीन अर्भकाला पण मातृ-पितृ सुख मिळेल."
सर्वाना स्वामींचा सल्ला पटतो आणी ते समाधानानी घरी परततात.

Saturday, April 9, 2011

(५७) श्रीमंतीचा अभिमान नसावा

अक्कलकोटला गुरु पौर्णिमेचा उत्सवा निमित्य नामदेवबुवा अक्कलकोटला जायचा बेत ठरवतात.
त्यांच्या बरोबर त्यांचा मित्र आणी गावातला श्रीमंत गोविंदशेठ पण यायला निघतात.
गोविंद शेठ निपुत्रिक होते .ते स्वामींसाठी  पंच-पकवानाचा नेवैद्य आणी भरजरी वस्त्र घेतात.
स्वामींना भेट देउन आपलं मनोवांछित प्राप्त करुन घ्यायचं, असा ध्येय होता.
शंकर नावाचा एक गाव-गडी स्वामींचा निस्सीम भक्त असल्यानी त्याला पण बरोबर घेण्यात येतं.
एक गाव-गडी आपल्या बरोबर अक्कलकोटला जाणार म्हणुन गोविंद शेठाची तळपायाची आग मस्तकात जाते.
ते नामदेवबुवाला शंकर ला का बरोबर घेतलं, असा जाब विचारतात.
नामदेव बुवा म्हणतात:- "शंकर स्वामींचा निस्सीम भक्त आहे, म्हणुन मी  त्याला शब्द दिला आहे, आणी मी  तो पाळणार."
गोविंदशेठ दात ओठ चावून राहतात. रस्त्यात ते शंकर चा तिरस्कार करतात.
रस्त्यात एक गरीब व्यक्ती येऊन मुलाच्या इलाजापाई पैशे मागतो. गोविंद शेठ त्याला हकलतात,
पण शंकर स्वामींना भेट म्हणुन द्यायचे पैशे गरिबाला देतात.
गोविंद शेठ संतापतात, शंकराला रस्त्यात  छळत राहतात.
पुढे न्याहरी करतांना एक  भुकेला मुस्लीम  व्यक्ती अन्न मागतो.
गोविंद शेठ त्याला पुन्हा हकलतात, पण शंकर आपली भाकर त्याला देतो.
रात्री मुक्काम धर्मशाळेत करण्यात येतो तिथे शंकरा कडे पांघरायला काही नसल्यानी तो कुडकुडत राहतो.
स्वामी इच्छेनी गोविंद शेठ च्या अंगावरची भरजरी घोंगडी शंकराच्या अंगावर येऊन पडते.
सकाळी थंडीनी कुडकुडत गोविंद शेठ उठून पाहतो तर काय आपली भरजरी घोंगडी शंकराच्या अंगावर.
तोंडानी शिव्या हासडत तो शंकराशी मारहाण करतो. नामदेवबुवा  मध्ये पडून शंकराचा बचाव करतात.
काही वेळानी गोविंद शेठला कळतं कि आपलं सर्व सामान चोरीला गेलं आहे, त्यात स्वामींसाठी आणलेली किमती भेट वस्तू
सुद्धा असतात.
गोविंद शेठ, पुन्हा शंकरावर आळ लावून त्याच्याशी मारहाण करतात.
झडती घेतल्यावर पण काही न सापडल्या मुळे गोविंद शेठ तात्पुरता माघार घेतात.
अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी मोठ्ठी रांग लागते.
शंकर स्वामी चरणी मस्तक ठेऊन म्हणतो कि तुम्हाला भेट म्हणुन आणलेले पैशे रस्त्यात खर्च झाले.
आता फक्त शेंगदाणेच तुम्हाला भेट करू शकतो.
स्वामी म्हणतात:- " अरे तेरे पैसे हमको कब के मिल गये, तेरा दिया हुवा खाना भी लजीज था."
तैलबुद्धीचा शंकर लगेचच समझतो कि रस्त्यात भेटलेले गरजवंत लोकांच्या रुपात स्वामीच आलेले होते.
त्याचा कंठ दाटून येतो.
स्वामी पुढे म्हणतात:-" रस्त्यात इतका त्रास झालं तरी तु श्रद्धा अढळ ठेवली, पण आता तुला उगाच छळणाऱ्या व्यक्तीला त्याच्या
दुष्कृत्याचे फळ भोगावे लागणार आहे."
रांगेत मागे उभ्या असलेल्या गोविंद शेठाला अर्धांगवायूचा झटका येतो, तो खाली कोसळतो, अर्धं शरीर खिळून जातं.
त्याला नीट बोलता सुद्धा येत नाही.
स्वामी खुद्द त्याच्या जवळ जाऊन म्हणतात:-
"अरे खूब गर्व होताना तुला तुझ्या श्रीमंतीचा, त्याच्यापाई तु निरपराध व्यक्तींचा छळ करायचा."
"आणी काय रे!, स्वामींना भरजरी वस्त्र आणी पंच पकवानाचा नैवैद्य दाखवलं म्हणझे काय सर्व तुझ्या मनासारखं होईल?"
"अरे देवाशी व्यापार करायला निघाला."
"अरे ज्यांनी सर्व ऐश्वर्य दिले त्यालाच ऐश्वर्याचा  एक भाग देउन काय आपलं मनोगत साधणार?"
गोविंद शेठ निरुत्तर होतो.
शंकर स्वामींची करुणा भाकतो आणी म्हणतो स्वामी जर मला त्रास दिल्या मुळे गोविंद शेठ्ची ही
दशा झाली आहे तर त्यांना माफ करा.
तुमचे दर्शन झाले आता माझ्या मनात काहीही खंत उरलेला नाही.
स्वामी म्हणतात:-"पहा किती मोठं हृदय आहे त्याचं, काही शिक् त्याच्यापासून. "
शंकर आपली चूक मान्य करतो.
स्वामी कृपेनी शंकर पुन्हापुर्वी सारखा होतो.

Sunday, April 3, 2011

(५६) शेजार धरम पाळावा


गणेश आणी वसीम शेजारी  होते, पण त्यांचं आपसात पटत नव्हतं.
गणेशचा मुलगा श्याम आणी वसीम चा साजिद मित्र होते, पण आप-आपल्या वडिलांच्या धाकानी
त्यांना आपसात खेळता येत नव्हते.
छोट्या-छोट्या गोष्टींवर, गणेश आणी वसीमच्या खटपटी व्हायच्या.
गणेश आपल्या मुलाकडून फक्त अभ्यास करवायचा पण त्याला खेळू देत नव्हता
आणी वसीम आपल्या मुलाला शिकु देत नव्हता.
वसीम म्हणायचं कि याला पुढे जाऊन आपला  धंदा करायचा आहे, मग शिकायची काय गरज?
एकदा  गणेश आणी वसीमची खटपट चालू असतांना स्वामी येतात, आणी वसीम कडे जातात.
त्याला ते समझ देतात कि मुलांसाठी शिक्षण किती महत्वाचं असतं,वसीम मुलाला शिकवायचं मान्य करतो.
मग गणेशकडे येतात ,त्याला समझ देतात कि नुसतं शिक्षणच नाही  खेळणं सुद्धा मुलांसाठी गरजेच असतं.
पुन्हा एकदा गणेश आणी वसीमच भांडण जुंपत ,
तेव्हा स्वामी येऊन गणेशला सांगतात कि त्यांनी  वसीमचा अपमान केला आहे,आणी त्याला त्याची एकदिवस सेवा करावी लागेल.
गणेश चक्क नकार देतो, वसीम सुद्धा गणेश कडून सेवा करुन घ्यायला तैयार नसतो.
शेजारधर्म पाळा असं सांगून स्वामी परततात.
एकदा वसीमची बायको आणी मुलगा उर्सला गेलेले असतात.
त्याचं दिवशी गणेश कडे सत्यनारायण कथा असते.
स्वामींना आमंत्रण असतं.
स्वामी येतात आणी आल्या बरोबर गणेशच्या हाती कुराण देउन त्याला वाचायला सांगतात.

थोड्या खिन्न माननी  पण गणेश कुराण वाचायला लागतो.
तिकडे वसीम ला देवाज्ञा होते.
वसीमचे घरचे विलाप करतात, गणेश सुद्धा तिथे शेजारी असल्यानी हजार असतो.
स्वामी सांगतात-" वसीम एक नेकदिल  बंदा होता. कुराण वाचतांना त्याच्या शेवटची वेळ आली होती,
गणेशनी वाचलेल्या कुरण ऐकतानाच त्यांनी प्राण सोडले.
आम्ही गणेशला जी सेवा करण्या बद्दल म्हणत होतो, ती सेवा आज गणेश कडून घडली आहे.
वसीम आता जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त झाला  आहे."
गणेशला पण  कळते कि लाख आपण नकार द्यावा पण मनुष्याला देवाची आज्ञा मानावीच लागते.
तो ही वसीमच्या बायको ला आली बहिण मानुन तिच्या परिवाराची जवाबदारी घेतो.