Saturday, April 23, 2011

(५९) लख्याचा कायापालट

लख्या नावाच्या एका धूर्त चोरा मुळे पूर्ण गाव, हैराण झालं होतं. कुठे ही दडवलेली किमती वस्तू तो बरोबर
हुडकून काढायचा आणी लंपास व्हायचा.
कितीही ताळे असले तरी लख्या पुढे त्यांचा काहीही निभाव लागत नव्हता.
गावाच्या फौजदाराला सुद्धा त्याला अटक करण्यात यश येत नव्हता.
शेवटी गावकरी स्वामींकडे लख्याचा बंदोबस्त करा, असं घाराणं घालतात.
स्वामी म्हणतात:- "आम्ही पाहु काय करायचं ते!"
स्वामी चोळप्पाला म्हणतात:-"जा त्या विक्रम ला निरोप देउन ये कि पुढच्या आठवड्यात आम्ही त्याच्या कडे जेवायला येऊ."
चोळप्पा विक्रम कडे येतात, त्यांना  धक्काच बसतो कि विक्रम च्या घरी कुठेही कडी-कोयंडा नसतो.
जिथे पूर्ण गाव रात्री सुद्धा लख्याच्या भितीनी डोळ्यात तेल घालुन जागा  राह्यचा  तिथे विक्रम असा गाफील कसा राहु शकतो?
विक्रम त्यांना म्हणतो:- " माझ्या घरचं रक्षण स्वामी करतात.मी कशाला चिंता करू."
"जरी लख्या आला तरी स्वामी पाहून घेतील त्याला."
योगायोगानी लख्या गवाक्षाबाहेरून चोरून हा संवाद ऐकतो.
स्वता वर अति-विश्वास असलेला लख्या संतापतो:- "आहे कोण हा स्वामी?"
"ज्याच्या भरोश्यावर हा माणूस घराला कड्या कोयंडे लावत नाही!"
"आज तर याच्याच घरी मी चोरी करणार."
रात्री लख्या विक्रम कडे चोरी करायला येतो,तो काही काही करणार तेवढ्यात तो थबकतो.
तो पाहतो तर समोर खुद्द फौजदार उभा असतो, हातात  रूळ घेऊन.
लख्या जीवाचं रान करुन तिथुन धूम ठोकतो, पण जिद्द सोडत नाही.
काही दिवसांनी लख्या पुन्हा प्रयत्न करतो, या वेळी त्याचा छप्परावरून पाय घसरतो आणी तो खाली कोसळतो
आणी खाली पडतो तर समोर पुन्हा फौजदार हजर.
लख्या  कसा-बसा लंगडत तिथुन धूम ठोकतो.
पुन्हा बरा झाल्यावर प्रयत्न करू असा  निश्चय करतो.
पण काय या वेळेला लख्या बराच होत नाही, कितीही दिवस झाले तरी दुखापत  तशीच्या तशी.
शेवटी वैतागून तो विक्रम च्या शरणी जाऊन सर्व वृतांत सांगतो.
विक्रम म्हणतो:- " अरे खुद्द स्वामी रक्षण कर्ते असतांना कोणी कसा काही चोरी किंवा दरोडा घालू शकतो?"
"तुझी दुखापत स्वामीच बरी करू शकणार."
विक्रम लख्याला स्वामी दर्शनाला आणतो.
स्वामी म्हणतात:-" काय लख्या कितीही प्रयत्न करुन शेवटी यश आले नाही उलट  दुखापतच झाली ना?"
लख्या आपली मान खाली घालतो.
स्वामी म्हणतात:-"आम्हला ओळखतो का?"
लख्याला स्वामींच्या जागेवर फौजदार दिसतात खाकी पोशाख, हातात रूळ.
स्वामी म्हणतात:- "त्या दिवशी यालाच पहिले होते ना?"
लख्याला कळतं कि दोन्ही वेळेला स्वामीनीच आपला बेत फसवला होता.
स्वामी म्हणतात:-:"अरे लख्या, तु पण मागच्या जन्मात आमचाच  भक्त होता, अगदी  देवभोळा, सचोटीनी वागणारा!"
"पण तुझ्या हातून पापं घडल्यानी तु या जन्मात असा चोर झाला."
"अरे एकदा पापं घडले कि ते अशी परिस्थिती निर्माण करतं कि आणखीन पापं होत राहतात."
समर्थांनी सुद्धा म्हटलं आहे-
"पापा करत दरिद्र प्राप्त, दरिद्रे होय पाप संचय
ऐसेचि होत जाये पुन्हा पुन्हा"
एकदा पापं झालं कि समझा पुढे होणाऱ्या पापांची बीजे रोपली गेली आहे.
लख्या म्हणतो:-" पण आता तर फार उशीर झाला आहे, गावकरी मला तुरुंगात धाडल्या शिवाय सोडणार नाही."
स्वामी म्हणतात:-"अजूनही काही उशीर झालं नाही आहे ,ज्याचं जे चोरलं आहे त्याला ते परत कर."
आपल्या हुशारी, आणी समर्थाचा उपयोग लोकांची मदत करायला करत जा."
"जे पूर्वी पापं झाले आहे त्याच्या निरसनासाठी नामस्मरण कर."
"तुला अटक होणार नाही."
"आम्ही भक्तांना सदेव सावध राह्यचा उपदेश करतो पण तुझ्या उद्धारासाठी आम्ही विक्रमला सावध केले नाही."
लख्या पुढचं आयुष्य सत्कार्यात लावायची हमी देउन स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

No comments:

Post a Comment