Saturday, April 9, 2011

(५७) श्रीमंतीचा अभिमान नसावा

अक्कलकोटला गुरु पौर्णिमेचा उत्सवा निमित्य नामदेवबुवा अक्कलकोटला जायचा बेत ठरवतात.
त्यांच्या बरोबर त्यांचा मित्र आणी गावातला श्रीमंत गोविंदशेठ पण यायला निघतात.
गोविंद शेठ निपुत्रिक होते .ते स्वामींसाठी  पंच-पकवानाचा नेवैद्य आणी भरजरी वस्त्र घेतात.
स्वामींना भेट देउन आपलं मनोवांछित प्राप्त करुन घ्यायचं, असा ध्येय होता.
शंकर नावाचा एक गाव-गडी स्वामींचा निस्सीम भक्त असल्यानी त्याला पण बरोबर घेण्यात येतं.
एक गाव-गडी आपल्या बरोबर अक्कलकोटला जाणार म्हणुन गोविंद शेठाची तळपायाची आग मस्तकात जाते.
ते नामदेवबुवाला शंकर ला का बरोबर घेतलं, असा जाब विचारतात.
नामदेव बुवा म्हणतात:- "शंकर स्वामींचा निस्सीम भक्त आहे, म्हणुन मी  त्याला शब्द दिला आहे, आणी मी  तो पाळणार."
गोविंदशेठ दात ओठ चावून राहतात. रस्त्यात ते शंकर चा तिरस्कार करतात.
रस्त्यात एक गरीब व्यक्ती येऊन मुलाच्या इलाजापाई पैशे मागतो. गोविंद शेठ त्याला हकलतात,
पण शंकर स्वामींना भेट म्हणुन द्यायचे पैशे गरिबाला देतात.
गोविंद शेठ संतापतात, शंकराला रस्त्यात  छळत राहतात.
पुढे न्याहरी करतांना एक  भुकेला मुस्लीम  व्यक्ती अन्न मागतो.
गोविंद शेठ त्याला पुन्हा हकलतात, पण शंकर आपली भाकर त्याला देतो.
रात्री मुक्काम धर्मशाळेत करण्यात येतो तिथे शंकरा कडे पांघरायला काही नसल्यानी तो कुडकुडत राहतो.
स्वामी इच्छेनी गोविंद शेठ च्या अंगावरची भरजरी घोंगडी शंकराच्या अंगावर येऊन पडते.
सकाळी थंडीनी कुडकुडत गोविंद शेठ उठून पाहतो तर काय आपली भरजरी घोंगडी शंकराच्या अंगावर.
तोंडानी शिव्या हासडत तो शंकराशी मारहाण करतो. नामदेवबुवा  मध्ये पडून शंकराचा बचाव करतात.
काही वेळानी गोविंद शेठला कळतं कि आपलं सर्व सामान चोरीला गेलं आहे, त्यात स्वामींसाठी आणलेली किमती भेट वस्तू
सुद्धा असतात.
गोविंद शेठ, पुन्हा शंकरावर आळ लावून त्याच्याशी मारहाण करतात.
झडती घेतल्यावर पण काही न सापडल्या मुळे गोविंद शेठ तात्पुरता माघार घेतात.
अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी मोठ्ठी रांग लागते.
शंकर स्वामी चरणी मस्तक ठेऊन म्हणतो कि तुम्हाला भेट म्हणुन आणलेले पैशे रस्त्यात खर्च झाले.
आता फक्त शेंगदाणेच तुम्हाला भेट करू शकतो.
स्वामी म्हणतात:- " अरे तेरे पैसे हमको कब के मिल गये, तेरा दिया हुवा खाना भी लजीज था."
तैलबुद्धीचा शंकर लगेचच समझतो कि रस्त्यात भेटलेले गरजवंत लोकांच्या रुपात स्वामीच आलेले होते.
त्याचा कंठ दाटून येतो.
स्वामी पुढे म्हणतात:-" रस्त्यात इतका त्रास झालं तरी तु श्रद्धा अढळ ठेवली, पण आता तुला उगाच छळणाऱ्या व्यक्तीला त्याच्या
दुष्कृत्याचे फळ भोगावे लागणार आहे."
रांगेत मागे उभ्या असलेल्या गोविंद शेठाला अर्धांगवायूचा झटका येतो, तो खाली कोसळतो, अर्धं शरीर खिळून जातं.
त्याला नीट बोलता सुद्धा येत नाही.
स्वामी खुद्द त्याच्या जवळ जाऊन म्हणतात:-
"अरे खूब गर्व होताना तुला तुझ्या श्रीमंतीचा, त्याच्यापाई तु निरपराध व्यक्तींचा छळ करायचा."
"आणी काय रे!, स्वामींना भरजरी वस्त्र आणी पंच पकवानाचा नैवैद्य दाखवलं म्हणझे काय सर्व तुझ्या मनासारखं होईल?"
"अरे देवाशी व्यापार करायला निघाला."
"अरे ज्यांनी सर्व ऐश्वर्य दिले त्यालाच ऐश्वर्याचा  एक भाग देउन काय आपलं मनोगत साधणार?"
गोविंद शेठ निरुत्तर होतो.
शंकर स्वामींची करुणा भाकतो आणी म्हणतो स्वामी जर मला त्रास दिल्या मुळे गोविंद शेठ्ची ही
दशा झाली आहे तर त्यांना माफ करा.
तुमचे दर्शन झाले आता माझ्या मनात काहीही खंत उरलेला नाही.
स्वामी म्हणतात:-"पहा किती मोठं हृदय आहे त्याचं, काही शिक् त्याच्यापासून. "
शंकर आपली चूक मान्य करतो.
स्वामी कृपेनी शंकर पुन्हापुर्वी सारखा होतो.

No comments:

Post a Comment