लग्नाचे ५ वर्ष झाले तरी गीताला अपत्य सुख प्राप्त झाले नव्हते.त्यामुळे तिची सासू आणी नवरा मदन तिचा छळ करायचे.
एकदिवस सासूबाई मदन च दुसरं लग्न करायला निघतात.
गीता विचार करते कि जर सवत आली तर ती आपल्याला घरा बाहेर काढेल.
त्यापेक्षा जर आपलीच धाकटी बहिणीशी जर आपल्या नवऱ्याचं लग्न झालं तर आपल्याला घरा बाहेर जायची वेळ नाही येणार.
ती स्वामींचे दर्शन घेऊन आपला बेत सांगते.
स्वामी म्हणतात:" गीता, हा विचार मनातातून काढून यामुळे काहीही फायदा होणार नाही."
पण घरा बाहेर काढल्या जायच्या भितीनी गीता स्वामीवचना कडे दुर्लक्ष्य करते.
मग काय, तिची धाकटी बहिण संगीता आणी मदन विवाहबद्ध होतात.
काही वर्ष होतात तरी संगीतालाही अपत्य होत नाही .
या कारणे मदन आणी त्याची आई दोघांनाही घरा बाहेर काढायला पाहतात.
तितक्यात स्वामी तिकडे येतात.
स्वामी रागावतात:-"अरे ही पद्धत आहे का, आपल्या विवाहित स्त्रियांशी वागायची.अरे जिला लक्ष्मी म्हणून आणतात तिला काय
असं घरा बाहेर काढतात?"
"आणी अपत्य नाही झालं, यात स्त्रीचाच दोष आहे, हे कश्यावरून?"
"दोष पुरुषाचा सुद्धा असू शकतो."
"तुम्हा तिघां मध्ये दोष कुणाचा आहे, हे जर माहित करायचं असेल तर या आमच्या बरोबर."
स्वामींच्या आश्रमात तीन एकासारखे रोपटे दाखवण्यात येतात.
स्वामी म्हणतात:- "तुम्ही तिघानी एका-एका रोपट्याला पाणी घालायचं ज्याच्या पाणी घातल्यानी रोपट्यात
वाढ होईल त्याच्यात दोष नाही."
गीता आणी संगीता दोघेही एका-एका रोपट्याला पाणी घालतात, आणी लगेचच त्यांनी पाणी घातलेल्या रोपट्यात वाढ होते.
पण मदननी पाणी घातलेल्या रोपट्याची वाढ होत नाही.
स्वामी म्हणतात:- " मदन आता कळलं कि दोष कुणात आहे?"
"अरे दोष स्त्री आणी पुरुष कुणातही असू शकतो पण जवाबदार मात्र स्त्रीलाच ठरवलं जातं."
मदन वैतागून तिथुन निघतो.
त्याची आई त्याचं सात्वन करते, पण मदन काही ऐकायला तयार नसतो.
त्याचा आईशी झाल्या संवादात मदनाचं गुपित गावातल्या टवाळ मंडळीच्या कानी पडतं.
मग काय टवाळ मंडळी मदनची चेष्टा सुरु करते.
मदन चिडून हात उगारतो, मग काय टवाळ मंडळी त्याला बेदम मारते.
आपला असा अपमान झाल्या मुळे मदन चिमणीतलं राकेल अंगावर ओतून आत्म-घात करायचा प्रयत्न करतो.
त्याच्या बायका व आई त्याला अडवतात.
आई म्हणते:" रे बाबा तुच जर गेला तर आम्ही तिघींनी कुणाच्या आसऱ्यावर जगायचं."
मदत थोडा सावरतो.
शेवटी स्वामींच्या शरणी जाऊन मार्गदर्शन घ्यावं असं ते ठरवतात.
स्वामी म्हणतात: "अरे प्रारब्द्ध प्रतिकूल असल्यानी जर काही उणीव मानवाच्या पदरी पडली तर त्यातून बाहेर कसं निघावे,
हा विचार करायला हवा."
"अरे जसं तुम्ही अपत्यसुखानी वंचित आहा तसं कोणी अपत्य सुद्धा मातृ-पितृ सुखानी वंचीत असेल,
त्याला दत्तक घ्या."
"तुम्हा सर्वांच्या समस्येवर हाच तोडगा आहे."
"त्यामुळे त्या पालकविहीन अर्भकाला पण मातृ-पितृ सुख मिळेल."
सर्वाना स्वामींचा सल्ला पटतो आणी ते समाधानानी घरी परततात.

No comments:
Post a Comment