गणपतीबुवा स्वामींच्या दर्शनाला येतात पण स्वामी त्यांना हकलुन देतात.
गणपती बुवांना फार वाईट वाटतं. योगा-योगानी त्याच गावात एक भोंदू साधू कृष्णास्वामी आलेले असतात.
कृष्णा स्वामी लोकांना भासवायचे की ते साक्षात कृष्णाचा अवतार आहे. गणपतीबुवा तर त्यांच्या आहारीच गेले होते.
आणी याच कारणामुळे स्वामींनी त्यांना हाकलले होते.
स्वामी सदैव सावधगिरी बाळगा अशे म्हणायचे. श्रद्धा ठेवा पण अंध श्रद्धा ठेऊ नका अशी शिकवण नेहमी भक्तांना द्यायचे. पण इथेच तर गणपती बुवा चुकले होते.
गणपती बुवांचा मुलगा अकस्मात आजारी पडतो.
पण कृष्णास्वामी वर अगाढ श्रद्धा असल्यानी गणपती बुवा त्याला वैद्या कडे सुद्धा नेत नाही.
इकडे कृष्णास्वामी यांचे प्रबोधन सुरु असतांना स्वामी समर्थ तिथे येतात.
कृष्णास्वामी त्यांचा अपमान करतात. आपल्या समोर स्वामी काहीच नाही, अशे मत मांडतात.
मग स्वामींना आपल्याशी शास्त्रार्थ करावे, अशे आवाहन पण करतात.
पण स्वामी मुकाट्याने काही न बोलता तिथून निघून येतात.
गावाचे लोकं कृष्णा स्वामींचा जय जयकार करतात.
हा सर्व प्रकार ऐकून गणपती बुवाची कृष्णा स्वामीवरची श्रद्धा वाढते.
त्याशिवाय कृष्णस्वामी त्यांचाशी फार अगत्यानी बोलायचे.
कृष्णास्वामी गावकऱ्यांना भूल घालायला लागले होते कि तुम्ही मला धन-संपदा दान करा त्या बद्दल तुम्हाला अनेकपट धन प्राप्त होणार.
गावकरी सुद्धा त्यांच्या आहारी जायला लागले होते.
पण इकडे गणपतीबुवाच्या मुलाचा आजार हाता बाहेर जात होता.
चोळप्पा कळ-कळीनी त्यांना आपल्या मुलाला स्वामींकडे न्या अशे सांगतो.
पण गणपतीबुवा चोळप्पाला ढकलून देतात.चोळप्पा पडणार तितक्यात मागून स्वामीसमर्थ त्याला सांभाळतात.
मग स्वामी गणपती बुवाला जाम रागवतात: " मुर्खा अजून तुला अक्कल आली नाही. चांगक्या-वाईटाची पारख तुला कशी येत नाही. डोळे बंद करून असा कुणावर कसा विश्वास ठेवतो."
गणपती बुवा तरीही काही ऐकायला तैयार नसतात.
मग स्वामी म्हणतात: " बघ तुझा कृष्णास्वामी काय करतो आहे ?"
सर्व लोकांना समोरच्या भिंतीवर कृष्णास्वामींचे कृष्ण-कृत्य दिसतात.
कृष्णा स्वामींच्या स्त्री-शिष्या नृत्य करत होत्या आणी कृष्णास्वामी मद्य-पान करत नयन-सुखं घेत होते.
मग काय गणपती बुवा सकट सर्व गावकऱ्यांचे डोळे उघडतात.
गणपतीबुवा स्वामींची करुणा भाकतात. कृपासिंधु स्वामी आपल्या कृपा-दृष्टीनी त्यांच्या मुलाला खडखडीत बरा करतात.
इकडे सर्व गावकरी कृष्णास्वामींना चोप देतात. कृष्णास्वामी पळत स्वामी शरणी येतो.
पण स्वामींना खोटे काम करणारे आणी दुसऱ्यांना लुबाडणारे लोकं आवडत नसल्या मुळे ते कृष्णास्वामीला गाव सोडून जा अशी आज्ञा करतात.
कृष्णास्वामी लज्जित होऊन आपल्या शिष्यासह गाव सोडून निघून जातो.
No comments:
Post a Comment